गप्पांची उन्ह सावली....
"आई, दार बंद कर ना…" अर्णव थोड्या चिडक्या आवाजात बोलतो...
"का रे? एवढं काय गुपित आहे आत?" त्याची आई गालात हसत त्याला विचारते...
"आई! बंद कर ना पटकन…!" अर्णव चा चिडका आवाज....
आई गालात हसत दरवाजा हलक्याच आवाजात बंद करते आणि तिचा पंधरा वर्षांचा मुलगा अर्णव परत आपल्यातच गढून जातो... एका बाजूला मोबाईल, दुसऱ्या बाजूला वही आणि मध्ये तो – विचारांत हरवलेला....
उषा – एक समजूतदार, प्रेमळ पण काळजी करणारी आई... नवऱ्याचं सातव्या वर्षी निधन झाल्यानंतर, ती आणि अर्णव दोघेच एकमेकांचा आधार... अर्णव वयात येतोय, आणि तिच्या लक्षात येतंय की तो हळूहळू गप्प होत चाललाय....
ती त्या रात्री अर्णवला दूध देताना विचारते,
"काय रे, आज खूप गप्प गप्प आहेस... काही विशेष?"
"काय रे, आज खूप गप्प गप्प आहेस... काही विशेष?"
"नाही ग आई… अभ्यास होता थोडासा... " अर्णव सहजपणे उत्तर देऊन मोकळा होतो...
"अभ्यास काय मनात चालतो गप्प , पण डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसतंय.... " आई गंभीर नजरेने त्याच्याकडे पहात विचारते...
अर्णव नजर चुकवतो...
"आई, तुला सगळं कसं कळतं गं?"
"आई, तुला सगळं कसं कळतं गं?"
"कारण मी तुझी आई आहे... माझ्या पोटातून बाहेर पडलेला जीव आहेस तू.... " शांत आवाजात आई उत्तर देते...
अर्णव हलकंसं हसतो...
उषा पुढे बोलायला सुरुवात करते,
"बघ, एक सांगू का? तू आता मोठा होतो आहेस... शरीर बदलतं, मन बदलतं… भावनाही नवी वाटायला लागतात.... हे सगळं होतं, आणि योग्य आहे ,पण त्यावर बोलणं गरजेचं असतं.... नाहीतर आत काहीतरी साचतं...."
"बघ, एक सांगू का? तू आता मोठा होतो आहेस... शरीर बदलतं, मन बदलतं… भावनाही नवी वाटायला लागतात.... हे सगळं होतं, आणि योग्य आहे ,पण त्यावर बोलणं गरजेचं असतं.... नाहीतर आत काहीतरी साचतं...."
अर्णव थोडा विचार करून आईकडे पाहतो,
"आई, तुला सांगितलं तर तू रागावशील का?" शांत चेहऱ्याने प्रश्न विचारतो...
"आई, तुला सांगितलं तर तू रागावशील का?" शांत चेहऱ्याने प्रश्न विचारतो...
उषा जवळ बसत म्हणते, "नाही रे राजा... तू सांगशील ते मी ऐकेन.... राग नको असला तर मी तो लपवेन...."
तेवढ्यात अर्णवचा स्वर खालचा होतो, "आई… मला एक मुलगी आवडते..."
आई काहीच न बोलता त्याच्याकडे पाहत राहते... तिच्या मनात थोडंसं धडधडलं. पण चेहऱ्यावर काही न दाखवता ती फक्त म्हणते,
"असं वाटणं खूप नैसर्गिक आहे रे... . काय नाव तिचं?"
"असं वाटणं खूप नैसर्गिक आहे रे... . काय नाव तिचं?"
"निहारिका... ." अर्णव लाजत म्हणतो...
"छान नाव आहे... तुला ती का आवडते?" आई शांतपणे पुढचा प्रश्न विचारते...
"ती खूप साधी आहे आई... बाकी मुलीसारखी नखरेल नाही... हसत असते, आणि… म्हणजे तिच्याशी बोलावसं वाटतं..." अर्णव जणू भरपूर दिवसानंतर आपल्या मनात असलेली भावना व्यक्त करत असतो...
"बोलतोस का तिच्याशी?" आई
"थोडं फार... पण खूप लाज वाटते ग..." अर्णव चे मनमोकळे उत्तर ऐकून आई शांत होते...
"हम्म... तुला तिच्याशी काय वाटतंय ते ओळखणं महत्त्वाचं आहे... काही बोलायचं असलं की आधी मनाशी स्पष्ट असावं लागतं..." आई समजावण्याच्या स्वरात बोलते...
अर्णव आश्चर्याने विचारतो,
"आई, तुला काहीच वाईट वाटत नाही का मी असं सांगितल्यावर?"
"आई, तुला काहीच वाईट वाटत नाही का मी असं सांगितल्यावर?"
"कसं वाटणार? तू मला सांगतोयस हेच खूप आहे... प्रत्येक आईला भीती असते की, मुलं मोठी झाली की लपवायला लागतात पण तू सांगतोयस म्हणजे मी काही तरी बरोबर केलंय असं वाटतंय... ." त्याची आई त्याच्याकडे पाहून समाधानाने उत्तर देते...
अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं, तो म्हणतो,
"आई, माझं मलाच कळत नाही काही वेळा... राग येतो स्वतःवर... कधी खूप एकटं वाटतं... मग मोबाईलमध्ये हरवून जातो... तुला काहीच सांगावसं वाटत नाही..."
"आई, माझं मलाच कळत नाही काही वेळा... राग येतो स्वतःवर... कधी खूप एकटं वाटतं... मग मोबाईलमध्ये हरवून जातो... तुला काहीच सांगावसं वाटत नाही..."
आईनं त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला... "हेच वय असतं... स्वतःशी झगडायचं... पण हे लक्षात ठेव मी कायम तुझ्यासोबत आहे.... कोणतंही विचार, भावना किंवा गोंधळ जेव्हा वाटेल तेव्हा बोल.... मी ऐकेन.... तू माझा मुलगाच नाही, माझा मित्र आहेस...." आई त्याची समजूत काढत बोलते...
अर्णव मनातून हलका होतो.... पहिल्यांदाच त्याने ही भावना कुणाशी शेअर केली होती.... ते आईशी बोलणं होतं म्हणून त्याला नक्कीच विश्वास होता की तो योग्य व्यक्तीकडे बोलतोय...
दुसऱ्या दिवशी आई त्याच्या आवडत बोर्नविटा घातलेले दूध घेऊन त्याच्या खोलीत येते...
"राजा, आज रविवार आहे... थोडं चालायला जाऊया का?" आई शांतपणे त्याला विचारते...
"आई… चालायला? तू ना, अगदी थोडी वेगळी आहेस..."अर्णव मंद हसत उत्तर देतो...
आई हसत म्हणाली, "म्हणजे?"
"म्हणजे… बाकी मित्रांच्या आया त्यांच्या मुलांना अशा गोष्टी सांगितल्यावर रागवतात... तू मात्र बोलतेयस, समजून घेतेयस... " अर्णव प्रामाणिकपणे आपल्या मनात असलेली गोष्ट सांगतो...
"कारण मी तुला गमावू इच्छित नाही... आपल्यात एक भिंत निर्माण होईल का अशी भीती वाटते. म्हणून मी आधीच ती पाडून टाकते...." आई शांत चेहऱ्याने त्याच्याकडे पाहून उत्तर देते...
अर्णव हसतो..."तुला सांगतो, कधी कधी वाटतं… आपण मुलं किती गोंधळलेली असतो.... शरीर बदलतं, भावना नवी वाटतात… काही समजत नाही. आणि बोलायला कुणी नाही..."
आई त्याच्या हात आपल्या हातात घेते.. . "म्हणून तर मी आहे... मी डॉक्टर नाही, पण अनुभव आहे... मी पण तुझ्यासारखी होते एकेकाळी.... फक्त स्त्री म्हणून भावना थोड्या वेगळ्या असतात... पण गोंधळ सारखाच असतो..." आई त्याच्याकडे पाहून त्याच्या मनात असलेली शंका दूर करण्याचा प्रयत्न करते...
त्या दिवसानंतर आई आणि अर्णव दोघांचे नाते अधिक दृढ होतं... ते एकत्र टीव्ही बघतात, कधी मोबाईलवर मीम्स शेअर करतात... अर्णव आईला त्याच्या मनातले विचार, शंका, गोंधळ सांगतो... आई त्याला हसत, कधी समजावत, कधी फक्त ऐकून घेत उत्तरं देते....
एका रात्री, अभ्यास करत असताना अर्णव म्हणतो,
"आई, मला भीती वाटते की तू एकटी पडशील जर मी कधीतरी प्रेमात पडलो तर…"
"आई, मला भीती वाटते की तू एकटी पडशील जर मी कधीतरी प्रेमात पडलो तर…"
आई त्याच्या पाठीवर हात ठेवते...
"अर्णव, प्रेम हे जगण्याचा भाग आहे... पण जेव्हा प्रेम करशील, तेव्हा तुझं मन स्वच्छ असू दे. आणि तुझी आई कधीच एकटी नसते तू माझ्या हृदयात आहेस ना राजा...." आई शांतपणे त्याचा मन समजून घेत उत्तर देते...
"अर्णव, प्रेम हे जगण्याचा भाग आहे... पण जेव्हा प्रेम करशील, तेव्हा तुझं मन स्वच्छ असू दे. आणि तुझी आई कधीच एकटी नसते तू माझ्या हृदयात आहेस ना राजा...." आई शांतपणे त्याचा मन समजून घेत उत्तर देते...
अर्णव उठून आईला घट्ट मिठी मारतो...
"आई, तू सगळ्यांत भारी आहेस... मी इतका लकी आहे की तू माझी आई आहेस...."अर्णव आनंदाने आईकडे पाहून बोलतो...
"आई, तू सगळ्यांत भारी आहेस... मी इतका लकी आहे की तू माझी आई आहेस...."अर्णव आनंदाने आईकडे पाहून बोलतो...
"आणि मी अजून जास्त लकी की तू माझा मुलगा आहेस." आई हसून त्याला उत्तर देते...
आई आणि मुलगा हे नातं बोलून आणि समजून घ्यायचं असतं.... वयात येणं ही फक्त शारीरिक किंवा मानसिक प्रक्रिया नाही
ती आईशी नव्याने मैत्री करण्याची संधी असते... जिथे संवाद असेल, तिथे गोंधळ, गैरसमज किंवा भिती टिकत नाही...
ती आईशी नव्याने मैत्री करण्याची संधी असते... जिथे संवाद असेल, तिथे गोंधळ, गैरसमज किंवा भिती टिकत नाही...