चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक :- आणि तिने लढाई जिंकली - भाग एक
आणि तिने लढाई जिंकली - भाग एक
"एवढी मोठी गोष्ट लपवलीस तू आमच्यापासून? तेव्हाच आम्हाला का नाही सांगितलंस?", तिच्या सासऱ्यांचा कडक आवाज कानावर आदळला आणि क्षणांतच घरभर कुजबुज सुरू झाली. सासरे, नणंद, दीर, जाऊबाई ह्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
“हिच्या अंगावर कुष्ठरोग आहे.”, तिची नणंद म्हणाली.
“लग्नाच्या वेळी हे मुद्दाम लपवलं आपल्यापासून आणि हिला आपल्या गळ्यात बांधली.", तिची सासू म्हणाली.
“पण कितीही लपवलं तरी समजायचं राहतं का?जाऊबाईंचा आवाज तिच्या कानावर पडला.ती हादरली. घाबरलेल्या आवाजात ती सगळ्यांना समजावू लागली,
“हे कुष्ठरोगाचे डाग नाहीत, फक्त त्वचेवर असलेला लहानपणीपासूनचा डाग आहे, तो वाढत नाही कि त्याला कही होत नाही … मी काहीही लपवलं नाही.” ती पोटतिडकीने बोलत होती पण तिचं ऐकायला कुणी तयार नव्हतं. तिने न राहवून तिच्या नवऱ्याकडे नजर टाकली, पण त्याच्या नजरेत विश्वासाऐवजी शंका होती. आणि एवढे सगळे बोलत असताना तो मात्र सुंभासारखा उभा होता, जणू त्याला काही फरक पडत नव्हता.
ती घाबरून केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती
बडबडली,
“मी काही लपवलं नाही… मला स्वतःलाच कधी वाटलं नाही की हे डाग एवढं संकट ठरतील. ” ती रडत बोलत होती पण तिचं कोणच ऐकायला तयार नव्हतं उलट तिच्यावरच बोटे उमटवली जात होती.
तिच्या डोळ्यातले पाणी पाहून सुद्धा कुणाच्या हृदयाला पाझर फुटला नाही.
ती अस्मिता देसाई, तिच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले होते. तिच्या डोळ्यात अजूनही स्वप्नं उभार घेत होती संसाराची, हातातला हिरवा चुडा एवढ्यात उतरेल अशी कल्पनाही तिला नव्हती. एकांतामध्ये किती तरी वेळा तिच्या नवऱ्याने तो डाग बघितला असेल तेव्हा त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण आज मात्र त्याच्या घरचे तिला एवढं बोलत असताना तो गपचूप होता.
तर झालं असं कि त्या दिवशी सकाळी ती अंगणात कपडे धुत होती. हात हलवताना साडीचा पदर थोडा खाली सरकला आणि तिच्या मानेवरचे पांढरे डाग तिच्या सासूला दिसले. सासूने ते पाहिलं आणि बघतच बसली पुढच्याच क्षणी तिच्या आवाजाने घरातले सगळेच जमा झाले.
तर झालं असं कि त्या दिवशी सकाळी ती अंगणात कपडे धुत होती. हात हलवताना साडीचा पदर थोडा खाली सरकला आणि तिच्या मानेवरचे पांढरे डाग तिच्या सासूला दिसले. सासूने ते पाहिलं आणि बघतच बसली पुढच्याच क्षणी तिच्या आवाजाने घरातले सगळेच जमा झाले.
“बाई... बाई.... हिने आमची फसवणूक केली.... कसला डाग आहे हिच्या मानेवर... "
त्या मोठ मोठ्याने बोलायला लागल्या तस बाकीचे सगळे तिच्यावर तोंडसूख घ्यायला लागले.त्यांनी तिथल्या तिथे निर्णय घेतला,
“या घरात तिला जागा नाही. तिने त्यांच्या मुलाला फसवलं. आता आहेस तस बाहेर पडायचं. "
अंगावरच्या साडीच्या पदराने तिने चेहरा झाकला आणि दाराजवळ उभ्या असलेल्या नणंदेने तिच्या हातात कपडे कोंबले. तिला घरातही न घेता तसंच बाहेर हाकलून दिलं.
सहा महिन्यांपूर्वी ह्याच घराने तिचं नववधू म्हणून स्वागत केल होत आणि आज त्यांनीच तिचा अपमान करून तिला बाहेर काढलं होत.तिच्या पाठीमागे दार बंद झालं व कुजबुज कानावर पडू लागली. आता तिच्यापुढे फक्त एकटेपणा, अंधार आणि वेदना होत्या.
सहा महिन्यांपूर्वी ह्याच घराने तिचं नववधू म्हणून स्वागत केल होत आणि आज त्यांनीच तिचा अपमान करून तिला बाहेर काढलं होत.तिच्या पाठीमागे दार बंद झालं व कुजबुज कानावर पडू लागली. आता तिच्यापुढे फक्त एकटेपणा, अंधार आणि वेदना होत्या.
कुठे जाईल अस्मिता?
काय असेल तिच्या नशिबात?
काय असेल तिच्या नशिबात?
क्रमश:
©®हर्षला"सान्वी "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा