Login

आत्म्याचं ग्रंथालय भाग 2

एक भयंकर स्वप्नं
चॅम्पियन ट्रॉफी

आत्म्याचं ग्रंथालय भाग 2

“आई मी त्या ग्रंथालया जवळ गेलो. कुलपाला नुसता हात लावला तर कुलूप उघडल्या गेलं. मी घाबरलो पण पुस्तक वाचायची तीव्र इच्छा मनात असल्याने ते दार हळूच उघडलं. ते दार उघडून मी आत गेलो तर आत मध्ये खूप अंधार होता. कुठेही उजेडाचा मागमूस नव्हता. लाईट लावायला बटन कुठे असावं म्हणून मी शोध घ्यायला सुरुवात केली तेवढ्यात अचानक भिंतीवरच्या सगळे लाईट लागले.

त्या ग्रंथालयात आई एक विचित्रच गारठा मला जाणवला. धुक्यासारखं काहीतरी जाणवलं. असं वाटलं बाहेर काही नाही इथेच काहीतरी जळतंय म्हणून असा वास येतोय. मनात मी म्हणतच होतो की किती उकडतंय तर वरचे पंखे चालू झाले. ते बघून मला आणखी घाबरल्या सारखं झालं.

मी चोहीकडे नजर फिरवली. सगळीकडे पुस्तकच ठेवलेली शेल्फ होती. त्या पुस्तकांच्या शेल्फमध्ये इतकी पुस्तक होती की मला पुन्हा वेड लागल्यासारखं झालं. जवळजवळ धावतच मी त्या सेल्फ जवळ गेलो पण सगळी पुस्तक अशी जुनाट दिसत होती. कितीतरी धूळ त्या पुस्तकांवर बसली होती. मी एकेक पुस्तक बघत बघत एका पुस्तकाला हात लावला आणि ते पुस्तक उघडून मी बघितलं तर !”

सुशांत पुन्हा सांगताना घाबरला आणि थांबला. त्याच्या आईने त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तिच्या लक्षात आलं सुशांत असा घाबरणारा मुलगा नाहीये. तो आत्ता जर एवढा घाबरला आहे म्हणजे ते स्वप्न नक्कीच घाणेरड असलं पाहिजे. घाणेरडे म्हणजे नेमकं काय? काय होत ग्रंथालयात आणि त्या ग्रंथालयात अंधार, घाणेरडा वास हेखूप वर्ष जर ‌ग्रंथालय बंद असेल तर असा वास येतो पण याच्यात घाबरण्यासारखं काय आहे? तिला काहीच कळत नव्हतं.
तिने त्याला पुन्हा हलवलं,

“ सुशांत मला सांगतोस ना पुढे काय झालं?”

“ आई पुढे जे झालं ना ते मला सांगता येईल की नाही माहित नाही ?पण मला आतून अशी भीती वाटायला लागली आहे.”

“नको घाबरू बेटा मी आहे ना तुझ्याजवळ. सांग काय झालं ते “

सुशांत म्हणाला,

“ आई मी हळूहळू त्या सेल्फ वरच्या एकेका पुस्तकाकडे बघत होतो. सगळी पुस्तकं मला जुनी दिसत होती. सगळ्यांची कव्हरं जुनी दिसत होती. त्याचा एक विचित्र वास पसरलेला होता. एका पुस्तकाला मी हात लावला आणि सहज म्हणून ते पुस्तक बाहेर काढलं तर त्याच्यावर लिहिलं होत :सुशांत’ मला कळेना या पुस्तकावर माझं नाव कसं काय आलं?”

एवढ्यात माझ्या कानाशी कुणीतरी बोललं."

कोण बोललं असेल सुशांतच्या कानाशी बघूया पुढल्या भागात
—-----------------------

0

🎭 Series Post

View all