Login

लागली आनंदाची चाहूल

लागली आनंदाची चाहूल
१)
नवीन आयुष्याच्या वळणावर
टाकले आहे मी पहिले पाऊल
मनाला माझ्या या लागली
तुझ्यावर असलेल्या प्रेमाची चाहूल...

२)
मन कावरे बावरे होऊनी
भीतीने कासावीस झाले
जाणवू लागली चाहूल मला
मिलनाचे दिवस जवळ आले...

३)
सप्त पाऊले चालुनी
मी राया तुझी रे झाले
नवीन संसाराची चाहूल
सौभाग्याचे दिवस उजाडले...

४)
प्रेम आनंदाने बहरले
आमच्या या अंगणात
चाहूल लागली येण्याची
नवीन पाहुणा आयुष्यात....

सौ. एकता निलेश माने