कोकणातील शांत, लहानसं गाव सावंतवाडी. हिरव्या दऱ्या, नारळाची झाडं, कौलारू घरं आणि जिवाभावाची नाती. या गावातली सर्वात गोड, शांत आणि निरागस मुलगी कनिका. लहानपणापासूनच आपल्या शांत स्वभावामुळे आणि गोड वाणीमुळे तिने सगळ्यांचे मन जिंकून घेतले होते. गावातील सगळ्यांनाच ती खूप आवडायची. कधी उगाचच राग नाही, कोणा बाबत काही तक्रार नाही, चुकारपणा नाही.
कनिका कधीच कोणाला उलट बोलायची नाही. तिला कोणी काहीही सांगितले की ऐकायची, हसायची आणि शांत राहायची.
कनिकाच्या घरी मोठं शेत होते, त्यांनी पाहिलेली जनावर होती , घराचे वातावरण अगदी आनंदी असायचे. तिच्या वडिलांचा स्वभाव एकदम शांत आणि आई मायाळू स्वभावाची होती. त्यांच्या घरात एक अशी व्यक्ती होती जिला कुरघोडी करण्याची वाईट सवय होती ती म्हणजे कनिकाची काकू. मंगला काकू. मंगला काकूंचा स्वभाव अगदी तिखट.
कनिका च्या चुलत बहिणी निशी आणि दिया दोघी पण तिच्या पेक्षा मोठ्या होत्या. त्यांच्या राहणीमानानुसार त्यांचे शिक्षण, कपडे असायचे. त्या दोघींचं पण स्वतःचे फोनही होते.
कनिका मात्र अगदी साधी राहायची. शेतीच्या कामांमध्ये मदत करणे, आपला अभ्यास नियमित पूर्ण करणे, ती घर कामातही आपल्या आईला मदत करायची, तिचा हा स्वभाव मात्र तिच्या काकूला खटकायचा.
" कनिका, तू अशी गावंढळ मुलीसाठी का वागतेस? जरा तुझ्या माहिती बहिणींकडे पहा, आपली दिया बघ, कशी शहरामध्ये शिकते, इंग्लिश बोलते, छान कपडे घालते. तू मात्र अगदी जुन्या पद्धतीचे जीवन जगतेस. " एकदा मंगला काकू तिच्याकडे पाहत तोंड वाकडं करत म्हणाल्या.
" काकू मला असे साधे आणि सिम्पल जगायलाच खूप आवडते. मी इकडे खूप आनंदात आहे. " कणिकाने नेहमीप्रमाणे गोड स्वरात सांगितले.
एक दिवस गावात नवीन कॉलेजचं उद्घाटन झालं. त्या गावामध्ये फक्त बारावीपर्यंतचे शिक्षण होते पण आता या कॉलेजमध्ये बारावीच्या पुढचे शिक्षण भेटायला ही सुरुवात झाली.
" कनिका बाळा, आता आपल्या गावामध्येच कॉलेज सुरू झाले आहे तर मलाही असे वाटते की तू पुढचे शिक्षण घ्यायला पाहिजे. " कनिकाची आई तिला म्हणाली. कनिकाने पण होकार दिला.
तिने कॉलेजला जाण्याची तयारी केली. तिचा पुढच्या शिक्षणाचा फॉर्म भरण्यात आला. आपली बॅग घेऊन कनिका कॉलेजमध्ये आली. तिकडचे वातावरण पाहून तिला अगदी जग बदलल्यासारखे वाटलं. नवीन लोक, नवीन वातावरण, नवीन चेहरे.
त्या कॉलेजमध्ये वेदांत नावाच्या एका मुलाने ही नवीन ऍडमिशन घेतले होते. तो शहरामधून तिकडे गावात शिकण्यासाठी आला होता. वेदांत ही शांत अभ्यासू आणि विनम्र स्वभावाचा होता. पहिल्याच दिवशी त्याची नजर कनिकावर पडली.
कनिकाचे ते गोड हसू , लाजरा चेहरा आणि निरागस डोळे पाहून वेदांत मनातच हसला. त्या दोघांना पण लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करण्याची सवय होती. कॉलेज संपल्यानंतर किंवा एक्स्ट्रा लेक्चर मध्ये ते दोघेपण लायब्ररी मध्ये जाऊन अभ्यास करायचे परंतु अजून तरी एकमेकांसोबत बोललो नव्हते. वेदांत तिला पहायचा परंतु अजून तिच्यासोबत बोलण्याची त्याची हिंमत झाली नव्हती.
एक दिवस वेदांत लायब्ररीमध्ये आला तेव्हा त्याला काही अंतरावर कनिका तिचा अभ्यास करत असताना दिसली. तो पण तिच्या बाजूला जाऊन बसला. कनिकाने आपली मान वर करून एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि परत आपली नजर आपल्या पुस्तकात फिरवली.
" तू कधीच बोलत नाहीस , असे का ? की फक्त शांत रहा ना आवडतं? " त्यादिवशी थोडी हिम्मत करून वेदांत ने विचारलं.
" शांत राहिलं की लोक कमी बोलतात आणि कमी बोलतात तर गैरसमजही कमी होतात. " कनिका ने तेवढेच शांतपणे उत्तर दिले.
To be continued...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा