Login

कनिका... एक बदल जीवनाचा भाग २

आपल्या आत्मसन्मानासाठी एका मुलीने तिच्या स्वभावात केलेला बदल.
" शांत राहिलं की लोक कमी बोलतात आणि कमी बोलतात तर गैरसमजही कमी होतात. " कनिका ने तेवढेच शांतपणे उत्तर दिले.

आत्ता पुढें,

“हं… ही तर मोठ्यांची फिलॉसॉफी.” वेदांत थोडा धाडस करत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर कनिका हसली पहिल्यांदाच थोडी जास्त!

त्यानंतर दोघेपण एकमेकांना ओळख देत होते एकमेकांसोबत बोलत होते. चांगली ओळख झाल्यामुळे कनिकालाही त्याच्यासोबत बोलायला काही वाटत नव्हते.

पण ते गाव असल्यामुळे गावात लगेच चर्चा सुरू झाली.

“कानाचं शहरातून आलेल्या मुलाशी बोलणं… काहीतरी आहे यात!” गावातली चर्चा घरापर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागत नाही तसेच काहीसे झाले. काकूच्या कानावर ही बातमी आढळली.

“तुझी मुलगी जरा जास्तच मोकळी फिरते. कॉलेजात मुलांशी बोलते, हसते… हे बरोबर नाही!” मंगला काकू लगेच घरी येऊन कनिकाच्या आईजवळ चिडचिड करत म्हणाल्या.

“माझी मुलगी काही चुकीचं करत नाही. तिला शिकायचंय, पुढं जायचंय.” कनिकाच्या आईने मात्र तितक्याच शांतपणे उत्तर दिले. आपल्या आईचे उत्तर ऐकून कनिकालाही बरं वाटलं.पण काकूला ते पचेनासं झालं.

काही महिन्यांनी गावामध्ये मोठा हळदीकुंकू चा समारंभ ठेवण्यात आला होता. या समारंभात सगळ्या बायका छान साड्या नेसून दागिने घालून आल्या होत्या.

“आजकालची मुलं बघा… शिकायला जातात की काहीतरी वेगळंच शिकायला? आमच्या घरातच उदाहरण आहे. " सगळ्या बायकांमध्ये उभा असलेल्या मंगला काकू तुटकपणे म्हणाल्या. सगळ्या बायकांना ऐकण्यासाठी अतुरल्या. त्याचवेळी कनिकाची आई ही तिकडे आली.

“अगं, हीच! ही कनिका! कॉलेजात एका मुलाशी फिरते, हसते. आता रोज फोनवर काहीतरी बोलणं होत… नवा जमाना आहे!” मंगला काकू तिच्याकडे हात दाखवून सांगत होत्या.

कनिका आणि तिची आई मात्र शांतपणे ऐकत होत्या. सगळ्या बायकांमध्ये लगेच चर्चा रंगली.

" एवढ्या मुली या गावांमध्ये होत्या परंतु यापूर्वी असे कधी काही ऐकायला आले नाही बाई!" एक बाई पुढे येऊन म्हणाली.

" कनिका चेहऱ्यावरून तर किती शांत दिसते आणि मला माहित नव्हते गुपचूप असे सगळे चालत असेल... " दुसऱ्या बाईनेही आवाज चढवला...

कनिकाचे मन भरून आले.  सगळे आपल्याबद्दल असे विचार करत आहे हे ऐकून तिला वाईट वाटले. ती शांतपणे तिकडून निघून घरी आली.

" काय झालं, अशी शांत बसून का आहेस? रडायचं नाही." तिची आई तिच्या जवळ येऊन म्हणाली.

“आई, मी काही चुकीचं केलं आहे का?” तिने आईकडे पाहून प्रश्न केला.

“बाळा, नाही! पण समाजाला जे कळत नाही… ते दोष वाटतं.” तिच्या आईने उत्तर दिले. आपल्या आईला शांत पाहून कनिका गप्प झाली परंतु तिचं मन उदास होते , ती तशीच झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजात वेदांतने पाहिलं की कनिका डोळे लाल करून बसली आहे.

“कनिका, काय झालं?” वेदांत तिच्या जवळ आला आणि तिला विचारले. तिने काहीही उत्तर दिले नाही , नजर वर करून त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही.

“माझ्यामुळे काही झालं का?” त्याने पुन्हा प्रश्न केला.


To be continued...
0

🎭 Series Post

View all