आमचे रक्त
"तिला माहेरी जायचे असेल तर खुशाल जाऊदे ,हवे तितके दिवस राहू दे हरकत नाही विनू...हो पण एका अटीवर माझे दोन्ही नातू मात्र तिच्या फाटक्या माहेरी जाणार नाहीत.. ते ह्या मोठ्या तालेवार घराण्याचे नातू आहेत ,वंश आहेत..आपले रक्त आहेत..लाडात वाढलेले आहेत..त्यांची इथे जी ठेप ठेवली जाते तशी तिच्या त्या फाटक्या माहेरी ठेवली जात नाही..काय ते घर ,काय ती छोटी वस्ती..काय ते गरिबीतले आजी आजोबा..मला म्हणूनच तिथे नाते करावे वाटत नव्हते..नको होती ती पोर सून म्हणून ,तिचे शिक्षण आणि रूप बघून तू वेडा झाला होतास आणि विनवणी करून तू हे स्थळ गळ्यात बांधून घेतलेस..मला तुझी ही पसंती अजिबात तोलामोलाची वाटली नाही ,ते आज ही तोलामोलाची वाटत नाही..माझे नातू असे उठून तिच्या माहेरी मी जाऊ देणार नाही..तिला जाऊ दे तिकडे ,सवय आहे तिला त्या गिरबीतल्या वातावरणाची ...पण माझे ठरले आहे मुलं तिकडे जाणार नाहीत म्हणजे नाहीत..."
सासूबाई बरेच बोलून गेल्या होत्या ,मुलगा त्यांना समजून सांगत होता तरी त्यांचे बोलणे टोमणे चालूच होते ,मुलाला आईच्या ह्या बोलण्याचा राग येत होता ,त्याच्या बायकोच्या घरचा अपमान म्हणजे त्याचा अपमान असे त्याला वाटत होते...त्याने काढता पाय घेतला आणि सरळ त्याने वर जाऊन त्याची बॅग तयार करून आणली ,त्याची बायको ही सोबत होती ,मुलं ही सोबत होते..त्याने आईला सांगितले..."आई मी ही आता काही दिवस छान शांतीच्या शोधत हे घर सोडून ही खोटी श्रीमंती ,हा दिखावा सोडून आणि हा तुझा बंगला सोडून माझ्या परिवाराला घेऊन हिच्या वडिलांच्या घरी रहायला जात आहे...आम्ही येऊ काही दिवसांनी...तिच्या आईवडिलांना आज त्यांच्या मुलीच्या रक्ताच्या मुलांसोबत काही आनंदाचे क्षण घालवायचे आहेत...मुलांना ही त्यांच्या अंगात नसा नसात ज्या आजोबांचे रक्त आहे जे आपली ही श्रीमंती काही केल्या वेगळे करू शकत नाही त्या रक्ताची ओढ लागली आहे...हो तिथे इथल्या पेक्षा खूप भरभरून प्रेम माया आहे..जीव जिव्हाळा देणारे त्यांच्या रक्ताची माणसं आहेत...जर फक्त तुमचेच रक्त असते तर मी ही तिला आणि मुलांना तिकडे जाऊ दिले नसते ,आणि माझ्यात ही जर फक्त ह्याच घराचे रक्त असते तर बाबांनी ही तुझ्या त्या गरिबीत पिचलेल्या माहेरी मला ही जाऊ दिले नसते ,पण त्यांनी कधी ही तुझे माहेर तोडले नाही ,आमच्या मामाचे गाव तोडले नाही ,आजी आजोबांना घालून पाडून बोलले नाहीत...उलट मला आठवते तसे काही दिवस निवांतपणा मिळावा म्हणून तेच तुझ्या माहेरी येऊन रहायचे...तेव्हा तुझे उर अभिमानाने भरून यायचे...हो ना !! तेव्हा तूच म्हणत असायची मुलांमध्ये दोन्ही घरचे रक्त आहे तर दोन्ही घरी ओढ असावी..मग फक्त माझ्याच मुलांना का नको ही ओढ..का ???
आईला आता गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता ठेवला मुलाने...आपले ते शाही रक्त आणि इतरांचे ते पाणी..पण वेळीच मुलांनी आईला तिने दिलेल्या धढ्यांची आठवण करून द्यायला हवीच..जर तिने चांगले काही संस्कार दिले असतील तर.....!
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा