Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग १३

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग १३

श्रेयसा आणि तिच्या सासू ने मिळून छान स्वयंपाक बनवला आणि पूर्ण परिवार ने मिळून एकत्र जेवण केले.. त्या दिवसापासून घरातले वातावरणही थोडे बदलले. श्रेयसा चे रेग्युलर कॉलेज सुरू झाले म्हणून ती रोज सकाळी लवकर उठून थोडीफार किचनमध्ये कामे करून कॉलेजला जात होती. संध्याकाळी घरी आल्यावर घर कामांमध्ये मदत करत आपला अभ्यासही करत होती.

रूम मध्ये ही आता त्या दोघांचे थोडेफार बोलणे होत होते.. त्या दोघांनाही एकमेकांची तिकडे असण्याची सवय झाली होती... श्रेयसा ला तिच्या अभ्यासा मध्ये काही मदत लागली की, आर्यव्रत तिलाही समजावून सांगत होता... तिचे कॉलेज आणि घर याचा समतोल चांगला चालला होता...

आर्यव्रत ने आपले M Tech शिक्षण पूर्ण केले होते त्या सोबत त्याने  Java कोर्स केला होता आणि सध्या एका मोठ्या कंपनीमध्ये वेब डेव्हलपर म्हणून काम करत होता... त्याची कंपनी खूप मोठी होती.. त्या कंपनीची मेन ब्रांच बाहेरगावी होती परंतु त्या ठिकाणी गावाच्या बाहेर काही अंतरावर त्या कंपनीची ब्रांच ओपन केली होती आणि तिकडे आर्यव्रत ने इंटरव्यू दिला होता, गावच्या ठिकाणीही त्यांना चांगला शिकलेला मुलगा मिळाला म्हणून त्यांनी लगेच आर्यव्रत काला वेब डेव्हलपर म्हणून कंपनीमध्ये कार्यरत ठेवले होते.. त्याला त्याच्या कंपनीने त्याच्या रेगुलर कामासोबतच एक नवीन प्रोजेक्ट करायला सांगितला होता. तो या प्रोजेक्टसाठी एक नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करत होता...

हा सॉफ्टवेअर गावाच्या भल्यासाठी उपयोगात आणण्याचा त्याचा विचार होता... या सॉफ्टवेअर मध्ये त्याने गावाचा पूर्ण आराखडा आणि माहिती व्यवस्थित नमूद करून ठेवली होती. गावात असणारे हॉस्पिटल, छोटे क्लिनिक, शाळा आणि पोलीस स्टेशन यासोबतही हे कनेक्ट करू शकत होते. हा सॉफ्टवेअर गावातील प्रत्येकाच्या घरातल्या मोबाईल मध्ये सेट केला तर जेव्हा त्यांना इमर्जन्सी हॉस्पिटल किंवा पोलिसांची गरज असेल तर ते त्यांना त्या सॉफ्टवेअर मधून डायरेक्ट सिग्नल पाठवू शकतात , त्याचबरोबर तो सिग्नल इकडे कंपनीत बसलेल्या लोकांनाही मिळेल जेणे करून ज्यांचेही या सिग्नल कडे लक्ष जाईल ते लवकरच समोरच्या व्यक्तीची मदत करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचेल...

आर्यव्रत याला आपल्या गावासाठी खूप काही करायचे होते आणि त्यासाठी तो आधी एक सॉफ्टवेअर बनवून त्याच्यामध्ये नंतर भरपूर गोष्टी ऍड करण्याचा प्रयत्न करत होता... गावातल्या मुलींच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेतेचाही त्याने विचार केला होता...  सध्या त्याला कंपनीमध्ये बॉसला दाखवण्यासाठी एक बेसिक सॉफ्टवेअर तरी तयार करायचा होता...

मागच्या काही महिन्यापासूनच तो हा सॉफ्टवेअर पूर्ण करण्याच्या प्रयत्न मध्ये होता आणि आतापर्यंत त्याचे ते काम जवळजवळ पूर्ण होत आले होते... थोडीफार चाचणी केल्यानंतर तो हा सॉफ्टवेअर त्याच्या बॉसला दाखवणार होता...

आर्यव्रत आज खूप खुश होता... त्याने विचार केला पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये तो त्याच्या सॉफ्टवेअरची चाचणी करून एकदा श्रेयसा ला त्याबद्दल सांगेल आणि मग तो सॉफ्टवेअर बॉस समोर प्रेझेंट करेल... त्याने आज ऑफिसमध्ये आल्यापासून आपल्या त्या सॉफ्टवेअरच्या चाचणीचे काम सुरू केले होते पण अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सगळ्या कंपनीची लाईट गेली...

" Ohhh no.... " आर्यव्रत वैतागूनच इकडे तिकडे पाहू लागतो कारण त्याचा तो सॉफ्टवेअर चालू असताना मध्येच  लाईट गेल्यामुळे त्याचा कम्प्युटर बंद होतो....

" What happened? ही लाईट कशी काय गेली ? " आर्यव्रत वैतागून जोरात ओरडतो...

" सॉरी सर... नक्की काय झालं ते सांगता येत नाही.. असे ऐकण्यात आले आहे की,  गावामध्ये काहीतरी इलेक्ट्रिशन चे काम चालू आहे म्हणूनच हा इलेक्ट्रिसिटी चा प्रॉब्लेम झाला... " ऑफिसमध्ये काम करणारा एक पिऊन धावतच त्याच्याजवळ येऊन त्याला उत्तर देतो....

" किती वेळ लागणार आहे ? " आर्यव्रत

" सर , मला काही कल्पना नाही.. " तो पिऊन हळू आवाजात म्हणाला...

" मग जा जाऊन चेक कर... एवढी साधी गोष्ट ही तुला आता सांगावी लागणार आहे का ? " आर्यव्रत चिडून म्हणाला...

" हो sss हो. सर... " असे बोलून  तो पिऊन घाबरून तिकडून पळून गेला..

आर्यव्रत वैतागलेल्या भावनेने आपल्या केबिनमध्ये इकडून तिकडे फिरत होता... सध्याची परिस्थिती खूप बिकट होती आणि त्याला काहीही सुचत नव्हते...

***********************
श्रेयसा आज नेहमीप्रमाणे सकाळी स्वतःचे सगळे आवरून कॉलेजला गेली होती. कॉलेजमध्ये तिच्या काही मैत्रिणी ही झाल्या होत्या.. कॉलेज सुटल्यावर आपल्या मैत्रिणी सोबत छान गप्पा मारत आनंदाने ती थोडी शॉपिंग करायला गेली.. तसं तिने घरी फोन करून रेवतीला सांगितले...

शॉपिंग करत असताना तिला काही वस्तू त्यांच्या रूमसाठी ही खूप आवडल्या...

" अय्या sss किती छान आहेत ना... मला तर हे खूप आवडले... " श्रेयसा आपल्या मैत्रिणीला दाखवत म्हणाली...

" अगं , तुला जर एवढेच आवडल असेल तर घेऊन टाक ना... तुझ्या रूममध्ये तुला ठेवता येईल... " तिची मैत्रीण म्हणाली...

" मला तर हे खूप आवडलं आहे, पण आर्य ला आवडेल का ? एकदा त्यांना फोन करून विचारू का ? " श्रेयसा स्वतःशीच बोलत आपला मोबाईल घेऊन त्याला फोन करते... फोनची रिंग जात असते पण समोरून फोन काही उचलला जात नाही...

" काय झालं श्रेयसा ?  तुला आवडले आहे ना मग... काही प्रॉब्लेम आहे का ? तुझ्याकडे पैसे नाहीत का? हवे असेल तर मी देते तुला... " तिची मैत्रीण तिच्याकडे पाहून विचारू लागली...

" नाही ग , असे काही नाही... थांब... " असे बोलून श्रेयसा काही वस्तू आपल्या रूमसाठी विकत घेते.... शॉपिंग झाल्यानंतर ती आणि तिच्या मैत्रिणी एका मॉलमध्ये येऊन फुड कोर्ट मध्ये बसतात... थोडफार खाऊन ते आपल्या घरी जायला निघतात....

" आलीस बाळ... ये बस! " रेवती तिला दारातून आत येताना पाहून म्हणाली आणि तिच्यासाठी पाणी घेऊन  आली...

" हे बघा.... आज मी थोडीफार शॉपिंग केली आहे... तुम्ही पण सांगा ना ,  तुम्हाला कशी वाटते ? " श्रेयसा आनंदाने त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगू लागते आणि आपण आणलेल्या सगळ्या वस्तू एकेक करून त्यांना दाखवते...

" खूप छान आहे... " रेवतीही अगदी कौतुकाने तिने आणलेल्या सगळ्या वस्तू पाहते...

" या वस्तू मी माझ्या रूम मध्ये ठेवले तर चालतील ना ? " श्रेयसा प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते...

" अगं, हे तुझं घर आहे... तुला तुझ्या घरामध्ये आणि तुझ्या रूममध्ये काय ठेवायचं असेल तर तू ठेवू शकते आणि यासाठी तुला कोणाची परमिशन घेण्याची अजिबात गरज नाही... " रेवती

" थँक्यू.... हे दोन शोपीस मी इकडे खाली हॉलमध्ये ठेवते आणि हे सगळ मी माझ्या रूममध्ये लावते.... किती छान वाटेल ना... " श्रेयसा आनंदाने एक एक वस्तू पाहून त्यांना विचारते....

" हो sss.... तुला कसं करायचं आहे तसं कर... मी तुझ्यासाठी गरम गरम कॉफी बनवून घेऊन येते.. कॉफी सोबत काही खाणार आहेस का ? " रेवती

" नाही.... नको sss आम्ही शॉपिंग नंतर मैत्रिणींनी मिळून बाहेरच थोडफार खाल्ल आहे त्यामुळे आता भूक नाही... " श्रेयसा बोलून ते दोन शोपीस तिला आवडत असलेल्या हॉलमधल्या ठिकाणावर ठेवते आणि बाकीचे सामान घेऊन आपल्या रूममध्ये जाते...

रूममध्ये ती आणलेल्या सामानांसाठी काही वेळ नजर फिरवत जागा शोधत असते... आर्यव्रत च्या काही वस्तूंची जागा हलवून ती त्या जागेवर आपण आणलेल्या वस्तू ठेवते...

’ जेव्हा आर्य हे सगळं बघेल,  तेव्हा त्यांनाही खूप आवडेल... ’ श्रेयसा आनंदाने स्वतःच्या मनामध्ये विचार करू लागते...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all