डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग १४
जवळजवळ दोन तासानंतर ऑफिस ची इलेक्ट्रिसिटी येते... लाईट आल्याबरोबर आर्यव्रत पटकन आपल्या केबिनमध्ये येऊन आपला कम्प्युटर चालू करतो... तो आपला बनवलेला सॉफ्टवेअर ओपन करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तो बनवलेला सॉफ्टवेअर व्यवस्थित ओपन होत नव्हता... त्याच्या लॉगिन मध्ये विचित्र एरर्स दिसून येत होते, फंक्शन्स व्यवस्थित रिस्पॉन्स ही देत नव्हते..
" हे सगळं काय होऊन बसलं ? हा माझा सॉफ्टवेअर ओपन का होत नाहीये ? " आर्यव्रत तसेच प्रयत्न करत पुटपुटला... तो बराच वेळ त्याचा तो सॉफ्टवेअर ओपन करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर फक्त एक एरर मेसेज चमकत होता,
“Application Failed To Load.”
आणि पूर्ण रूममध्ये पुन्हा एकदा ती निराश शांतता पसरली... आर्यव्रत ने प्रयत्न करुन इतक्या महिन्याची मेहनत म्हणून त्याचा तो सॉफ्टवेअर बनवला होता आणि आता एका झटक्यात त्याची ती मेहनत धुळीला मिळाली होती...
" Any problem? " त्याला अशा वैतागलेल्या अवस्थेमध्ये केबिनमध्ये बसलेले पाहताना त्याचा सीनियर त्याच्या केबिन मध्ये येऊन त्याला विचारतो...
" हो यार sss... इतकी महिने मेहनत करून मी हा सॉफ्टवेअर बनवला होता.. या सॉफ्टवेअर च्या निमित्ताने मी गावकऱ्यांची थोडीफार मदतही करू शकत होतो त्याचबरोबर ऑफिस च्या दिलेला प्रोजेक्ट चा टाक्स पूर्ण करणार होतो आणि जवळजवळ सगळं पूर्ण झालं ही होतं , फक्त दोन दिवस मला हे सॉफ्टवेअर कसं चालत आहे याची चाचणी घ्यायची होती, पण बघा ना अचानक हा काय घोळ होऊन बसला... " आर्यव्रत नाराजीच्या स्वरात आपल्या सीनियर कडे पाहून म्हणाला...
" आर्य, तू आधी शांत हो.. हे बघ... थोडा वेळ घे आपण बघूया काही होतं का ? " त्याचा सीनियर समजावण्याच्या मनस्थितीत म्हणाला....
" नाही सर, सगळं संपलं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " आर्य खूपच उदास झाला होता...
" आर्य.... तू एक काम कर तू ब्रेक घे... आता सध्या तू घरी जाऊन आराम कर आपण उद्या पुन्हा एकदा हा सॉफ्टवेअर ला ओपन करण्याचा प्रयत्न करू... " त्याचा सीनियर शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देतो...
" हो sss कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात... तसेही मला आता काहीच करायची इच्छा होत नाही आहे... त्यापेक्षा मी थोडावेळ घरी जाऊन आराम करतो... " आर्यव्रत बोलून आपल्या जागेवरून उठून उभा राहतो...
" सर, ते माझं प्लिज एक काम कराल का ? " आर्यव्रत त्यांच्याकडे पाहून उदास स्वरात त्यांना विचारतो...
" समजलं... तू जा , मी इकडचे सांभाळून घेतो... तसेही तू कधीच वेळेच्या आधी निघत नाही त्यामुळे एखाद्या दिवशी लवकर निघाला तरी तुला कोणी काही बोलणार नाही... " त्याचा सीनियर दिलासा देतो...
आर्यव्रत आपली बॅग सोबत घेऊन ऑफिस मध्ये लॉग आऊट करून तिकडून बाहेर पडतो... तो थोड्या रागातच आपली बॅग जवळजवळ गाडीमध्ये फेकून देतो आणि तसाच येऊन गाडीत बसतो... आपल्या विचारातच गाडी चालवत तो घरी येऊन पोहचतो....
" आर्य.... काय झालं रे, आज इतक्या लवकर कसा काय आलास ? " त्याची आई त्याला हॉलमध्ये पाहून आश्चर्याने विचारते...
" आई, माझं डोकं खूप भणभण करत आहे.... मी माझ्या रूम मध्ये जाऊन आराम करतो.... " आर्यव्रत बोलतच आपल्या रूममध्ये निघून जातो...
" अरे असा काय हा मुलगा.... याच्याकडे आई सोबत बोलण्यासाठी दोन मिनिट ही वेळ नाही... जाऊदे मी त्याच्यासाठी मस्त गरम आल्याचा चहा घेऊन जाते त्यामुळे कदाचित त्याला थोड बर ही वाटेल... " असा विचार करून रेवती किचन मध्ये येऊन स्वतःच्या हाताने चहा बनवतात...
आर्यव्रत आपल्या रूममध्ये जाऊन आपली बॅग जवळजवळ बेड वर फेकून देतो आणि स्वतःही बेडवर बसून डोळे बंद करून विचार करू लागतो....
श्रेयसा स्टडी रूम मध्येच आपला कॉलेजचा अभ्यास करत बसलेली असते त्यामुळे तिला तो आल्याचे समजत नाही....
आर्यव्रत आपल्या धुंदीतच टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जातो.... काही वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि बाहेर ड्रेसिंग टेबलवर आपली वस्तू घ्यायला हात पुढे करताना त्याला तिकडे ती वस्तू सापडत नाही त्यामुळे त्याच्या नाकावर अजूनच राग चढू लागतो...
आर्यव्रत आपल्या रूममध्ये आजूबाजूला पाहत असताना त्याला रूम मध्ये काही वस्तू वेगळ्या जाणवतात... आधीच रागात असलेला तो या सगळ्यामुळे अजूनच रागामध्ये भर पडते...
"आई sssssss.. " आर्यव्रत चा अचानक जोरात आवाज ऐकू आल्यामुळे श्रेयसा ही गोंधळून पटकन स्टडी रूममधून बाहेर येत दरवाजात उभी राहूनच घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागते...
" काय झालं एवढ्या मोठ्याने ओरडायला ? अरे तुझ्यासाठी गरम आल्याचा चहा घेऊन येत होते ना... डोकं दुखत आहे असंच म्हणालास ना... " रेवती चहाचा कप घेऊन दरवाजामध्ये येऊन उभी राहत त्याला विचारते....
" मी किती वेळा तुला सांगितले आहे की , माझ्या रूम मधल्या वस्तू हलवत जाऊ नको म्हणून तरी ही तुला का समजत नाही.... " आर्यव्रत रागानेच आपल्या आईकडे पाहून त्यांना विचारतो... त्याचा तो रागीट आवाज ऐकून मात्र इकडं श्रेयसा ची धडकी भरते... आज पहिल्यांदाच तिने त्याला इतक रागवताना आणि रागाने बोलताना पाहिलेले असते त्यामुळे ती पूर्णपणे घाबरून जाते...
" हो sss मला माहित आहे म्हणून तर मी तुझ्या रूममध्ये येत नाही... मी तुझ्या कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही... " रेवती त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली... त्याच्या त्या मोठ्या आवाजामुळे तिलाही काय बोलावे ते सुचत नव्हते...
" मग माझ्या रूममध्ये या वस्तू कुठून आल्या ? आणि माझ्या जुन्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत ? " आर्यव्रत आपल्या हाताने इशारे करत आपल्या आईला विचारतो...
" अरे , हे सगळं तर.... " रेवती त्या सगळ्या वस्तूंना पाहून पटकन काही बोलणार इतक्यात ती शांत होते , तिच्या लक्षात येते की, श्रेयसा ने या वस्तू ठेवण्यासाठी त्याच्या आधीच्या वस्तू जागेवरून हलवल्या आहेत पण सध्या तो इतक्या रागात आहे की काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही म्हणून शांत राहिलेलं बरं.
" श्रेयसा बाळा, याच्या जागेवर असलेल्या त्या सगळ्या वस्तू... " रेवती तिच्याकडे पाहून तिला हळू आवाजात विचारते...
" हो sss ते मी इकडे.... " श्रेयसा हळू आवाजात बोलत पटकन पुढे येऊन तिने ठेवलेल्या त्या सगळ्या वस्तू एका कप्प्यामधून बाहेर काढत वर टेबलवर ठेवते...
" माझ्या वस्तू मी जिकडे ठेवल्या आहेत, मला त्या तिकडेच दिसायला पाहिजे... त्यांची जागा कोणीही हलवण्याचा प्रयत्न करू नका प्लीज ! " आर्यव्रत स्वतःच्या रागाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत मोठ्या आवाजात बोलून सगळ्यांना सुनावतो...
" हो रे बाबा.... यापुढे कोणीही तुझ्या कोणत्या वस्तू हलवण्याचा प्रयत्न करणार नाही... घे हा चहा पी आणि जरा शांत हो... " रेवती श्रेयसा कडे पाहून तिला नजरेने शांत राहण्याचा इशारा करत त्याच्या हातामध्ये चहाचा कप देते...
आर्यव्रत तो कप घेऊन खाली बेडवर बसून शांतपणे चहा पिऊ लागतो... रेवती त्याच्याकडे पाहू नकारार्थी मान हलवत त्या रूममधून बाहेर निघून जाते.... श्रेयसा मात्र अजून ही तिकडे एका बाजूलाच घाबरून उभी असते...
" सॉरी.... या सगळ्यांमध्ये आईची काही चुक नाही... मीच तुमच्या त्या सगळ्या वस्तू बाजूला काढून ठेवल्या होत्या... " श्रेयसा हळू आवाजात त्याला सांगू लागते... आर्यव्रत मात्र तिच्याकडे पाहतही नाही...
" आज मी कॉलेज सुटल्यानंतर माझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंगला गेले होते तेव्हा मला या काही वस्तू आवडल्या म्हणून मी त्या घेतल्या होत्या... " श्रेयसा त्याला शांत पाहून सगळं सांगण्याचा प्रयत्न करते...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा