Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग १५

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग १५

आर्यव्रत च्या मनामध्ये मात्र अजूनही त्याच्या सॉफ्टवेअर बद्दलचे विचार चालू असतात आणि त्यामुळे त्याचा राग आणखीन वाढू लागतो...

" मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही माझा फोन उचलला नाही... मी या वस्तू विकत घेतल्या, मला या सगळ्या या रूमसाठी खूप आवडल्या आणि म्हणून मी तुमच्या वस्तू बाजूला सारून त्या जागेवर या सगळ्या वस्तू इकडे ठेवल्या होत्या... या सगळ्या वस्तूं नवीन आणि युनिक आहेत त्यामुळे तुम्हालाही आवडेल असे मला वाटले म्हणून मी त्या अशा जागेवर ठेवल्या जेणेकरून तुम्हाला लगेच दिसेल आणि तुम्हाला हे सरप्राईज आवडेल... " श्रेयसा स्वतःच्या मनातल्या भावना त्याला सांगू लागते...

" मला असले सरप्राईज अजिबात आवडत नाही... मुळात मी तिकडे ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे काम करण्यासाठी जात असतो टाईमपास करण्यासाठी नाही , जे कोणीही मला फोन करेल आणि मी फोनवर निवांत बोलत बसू... " आर्यव्रत एकदम खवळूनच तिच्याकडे पाहून चिडक्या स्वरात म्हणाला...

" मला तसे म्हणायचे नव्हते... " त्याचा तो रागीट स्वर ऐकून श्रेयसा अजूनच घाबरून गेली....

" यापुढे माझ्या रूममध्ये मला विचारल्याशिवाय काहीही चेंजेस करायचे नाही आणि तू... एक गोष्ट विसरून गेलीस का ? हे लग्न आपल्या मर्जीने झाले नाही तर आपल्याला जबरदस्ती करावे लागले आहे... हे नाते अजून पर्यंत ना तू स्वीकारले आहे नाही मी.... मग कोणत्या हक्काने या रूमवर स्वतःच वर्चस्व गाजवण्या चे प्रयत्न करत होतीस ?

माझ्या मनाविरुद्ध मी तुला या रूममध्ये राहू देत आहे कारण आपल्यामध्ये असलेली दरी माझ्या घरच्यांना दिसायला नको म्हणून नाहीतर माझ्या रूम मध्ये माझ्या मनाविरुद्ध कोणी येऊन राहिलेल मला अजिबात आवडत नाही आणि ही गोष्ट तू जेवढ्या लवकर समजून घेशील तेवढ तुझ्यासाठी चांगल आहे... " आर्यव्रत

श्रेयसा तर त्याचं बोलणं ऐकून पूर्णपणे गोंधळून गेली होती आणि त्याचा तो रागीट स्वर ऐकून पूर्णपणे घाबरून गेली होती... मागच्या काही दिवसापासून तो इतका नॉर्मल बोलत होता की,  काही वेळासाठी ती त्यांच्या लग्नाचे मुख्य कारणच विसरून गेली... पण आता जेव्हा त्याने पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आणून दिल्या तेव्हा मात्र तिचे मन अजून भरून आले आणि तिला त्याचे ते बोलणं ऐकून खूपच वाईट वाटू लागले...

" सॉरी sss तुमच्या या रूममध्ये मी पुन्हा असे काहीही करण्याचा प्रयत्न करणार नाही... " श्रेयसा रडत बोलत स्टडी रूमच्या दिशेने निघून जाऊ लागते...

आर्यव्रत आधीपासूनच त्याच्या सॉफ्टवेअर च्या टेन्शनमध्ये असल्यामुळे तिच्या बोलण्याने त्याचा राग आणखीनच वाढू लागतो... त्याचीही चिडचिड होऊ लागते.... तो त्या रागानेच जोरात आपला हात झटकतो आणि अचानक त्याचा हात बाजूच्या टेबल ला जाऊन लागतो त्याचबरोबर त्या टेबलवर श्रेयसा ने नवीनच आणून ठेवलेले काचेचे शोपीस त्याच्या हाताने खाली पडून फुटते.... पूर्ण रूम मध्ये जोरात आवाज घुमतो तशी त्या दोघांची नजर खाली पडलेल्या शोपीस वर जाते.... आर्यव्रत रागानेच त्या खाली पडलेल्या सगळ्या काचांकडे पाहत असतो....

श्रेयसा घाबरून च मागे वळून त्या खाली पडलेल्या शोपीस ला पाहत असते... ती आपल्या नादात डोळे पुसत स्टडी रूम मध्ये जात असल्यामुळे त्याचा चुकून हात लागला आहे ही गोष्ट तिला माहीत नव्हती... त्याचा तो रागीट चेहरा पाहून तिच्या मनाला असंच वाटतं की, त्याने जाणून-बुजून ते शोपीस रागाने खाली फेकून फोडले आहे त्यामुळे तिलाही त्याच्या बोलण्याचा, त्याच्या वागण्याचा खूप राग येऊ लागतो...

श्रेयसा स्टडी रूम मध्ये जाऊन रूमचा दरवाजा धाडकन लावून घेते आणि आत सोफ्यावर बसून रडू लागते.... आज तिला तिच्या लग्नानंतरचा पहिला दिवस आठवतो...

’ आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे आपण या घरामध्ये आलो आहे... या घरामध्ये आपण जास्त दिवस राहू शकत नाही... ’ ही भावना पहिल्या दिवशीच तिच्या मनामध्ये आली होती परंतु हळूहळू घरातल्या इतर माणसांचा स्वभाव आणि आर्यव्रत चे असे तिला संभाळून घेणे यामुळे काही वेळासाठी ती मागच्या सगळ्या गोष्टी विसरली होती आणि या घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती, आता तिला त्या रूममध्ये त्याच्यासोबतही कम्फर्टेबल असे वाटत होते त्यामुळेच ती सोयीस्कर रित्या त्या रूममध्ये वावरत होती पण आज पुन्हा एकदा त्याचं ते टोचून बोलणं तिच्या मनाला खूप लागलं आणि ही रूम आपली नाही हे कटाक्षाने जाणवलं...

" आर्य ssss अरे हे कस फुटलं ? बाळा तुला कुठे लागल तर नाही ना... " रेवती काहीतरी फुटण्याचा जोरात आवाज ऐकून घाबरूनच त्याच्या रूममध्ये आली होती... तिने खाली पडलेल्या त्या काचा पाहिल्या आणि काळजीने आर्यव्रत कडे पाहून त्याला विचारू लागली...

" मला नाही वाटत माझ्या रूममध्ये ही कोणी मला शांतपणे बसू देईल,  त्यापेक्षा मी कुठेतरी बाहेर निघून जातो.... मला थोडी शांतता आणि एकांत पाहिजे आहे... " आर्यव्रत त्या सगळ्या गोष्टीमुळे अजूनच गोंधळून गेला होतात त्यामुळे कोणासोबत काहीही बोलण्याची त्याची इच्छा नव्हती तू तसाच त्याच्या रूम मधून तडतड पावले टाकत बाहेर निघून जातो... घरातून बाहेर येऊन तो सरळ आपल्या गाडीमध्ये येऊन बसतो आणि गाडी चालू करून समोर दिसेल तो रस्ता पकडतो....

" आज हा असा काय वागत आहे ? याला नक्की काय झाल ? " रेवती पण त्याच्या आशावा अचानक वागण्याने पूर्णपणे गोंधळून गेलेली असते... ती खाली एक काम करणाऱ्या मावशीला वर बोलावून त्या रूम मधल्या सगळ्या काचा व्यवस्थित साफ करायला सांगते...

स्टडी रूमचा दरवाजा बंद असल्यामुळे श्रेयसा तिकडे आज बसली असेल असा विचार रेवती च्या मनात येत नाही ती आपल्या नादातच त्या मावशी करून सगळं साफ करून घेते आणि तशीच खाली निघून जाते...

" आज दादा एवढ्या रागात का आहेत ? " त्या मावशी पण त्याचा तो राग पाहून रेवतीला विचारतात...

" कोणास ठाऊक ? आज चक्क तो त्याच्या ऑफिस मधूनही लवकर आला...  तेव्हाच मला त्याचा मूड काही ठीक वाटत नव्हता..... बहुतेक त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी झाले असणार.... " रेवती पण काहीसा विचार करत म्हणाली....

" हो पण तरीही दादांना याआधी एवढ्या रागामध्ये कधी पाहिले नव्हते आणि आताही दादा रागाने कुठे बाहेर निघून गेले... " त्या मावशी काम करत सांगत होत्या...

" हो sss आता जोपर्यंत त्याचा राग शांत होत नाही त्याला नक्की काय झाले आहे हे विचारता येणार नाही... त्याचा राग शांत झाला की , तो परत घरी येईल.... " रेवती विचार करतच आदित्य राज यांना फोन करते आणि घरात घडलेला सगळा प्रसंग त्यांच्या कानावर घालते.... कितीही आपल्या मुलाचा स्वभाव माहित असला तरी एका आईच्या मनाला काळजीही लागूनच राहते.... एवढ्या रागाने तो घरातून बाहेर पडला आहे म्हटल्यावर त्यांनाही काळजीने भीती वाटू लागते म्हणून त्या फोन करून आदित्य राज यांना सांगतात...

" तुम्ही काळजी करू नका... मी बघतो , तो कुठे गेला आहे ते... त्याची आधीपासून ची सवय आहे तुम्हाला माहित आहे ना राग आला की तो असाच मोकळ्या , शांत जागेवर जाऊन बसतो आणि मग थोड्यावेळाने परत येतो... " आदित्य राज

" हो sss पण तरीही तुम्ही एकदा बघा... तो नक्की कुठे गेला आहे ? मला खूप भीती वाटत आहे... " रेवती

" तुम्ही घाबरू नका... आम्ही आमच्या माणसांना पाठवतो त्यांचा शोध घेण्यासाठी आणि जसे काही समजेल तुम्हाला फोन करून कळवतो... " आदित्य राज बोलून फोन ठेवून देतात आणि आपल्या ऑफिस मधल्या चार-पाच माणसांना आर्यव्रत कुठे गेला आहे ते शोधण्यासाठी गावामध्ये पाठवतात....

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all