डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग १९
" काय? रूम मध्ये नाही... मग कुठे गेला आहे ? " आदित्य राज प्रश्नार्थक नजरेने विचारतात...
" आज सकाळी लवकरच ऑफिसला गेला आहे... मी थांबवण्याचा प्रयत्न करत होते, नाश्ता करून जा असेही म्हणाले परंतु माझ्याकडे वेळ नाही , महत्वाचे काम आहे असे सांगितले... पुढे काही ऐकूनच घेतले नाही... " रेवती काळजीने म्हणाल्या...
" ठीक आहे... असेल ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचे काम त्याशिवाय तो असे वागणार नाही... आधीच ऑफिसमधल्या कामाचे टेन्शन आहे त्याच्या डोक्यावर त्यात तुम्ही अजून त्याला त्रास देऊ नका... काही वेळ त्याला शांत राहू द्या... सगळं व्यवस्थित झालं की , तो स्वतःहून तुमच्याजवळ येऊन सांगेल... " आदित्य राज एक नजर श्रेयसा कडे पाहून रेवतीला समजावतात....
" हो sss मी कशाला कोणाला काय बोलू... तुमचा सगळा बोलणं समजत आहे मला पण एक आईच्या मनात असलेली आपल्या बाळाची काळजी तीही काही चुकीची नाही ना... " रेवती
त्या दोघांचं बोलणं चालू असतं श्रेयसा चे मात्र त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष असते... ती आर्यव्रत च्या वागण्याने पूर्णपणे दुःखी झालेली होती... तिच्यावर असे रागावून पण तो तिच्यासोबत एका शब्दाने बोलायला आला नाही याचे तिला फार वाईट वाटते, त्यात कहर म्हणजे काल ती रूममध्ये गेली नाही तर त्याने साधी तिची विचारपूस ही केली नाही की ती कुठे आहे रूम मध्ये का आली नाही...
श्रेयसा आपली तयारी करून कॉलेजमध्ये निघून जाते... कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करत असते परंतु तिचे कशातही मन लागत नाही... सारखा आर्य चा विचार करत मन भरून येऊ लागते...
" श्रेयसा काय झालं ग, आज तुझं कॉलेजच्या लेक्चर मध्ये मन लागत नाही... काही झाल आहे का ? " तिची मैत्रीण तिला पाहून विचारते...
" नाही ग, असे काही नाही.... " श्रेयसा म्हणाली...
" असे खोट बोलू नको... तुझ्या चेहऱ्याकडे पाहूनच समजत आहे... " दुसरी मैत्रीण म्हणाली...
" अग, ते रात्री झोप व्यवस्थित झाली नाही ग म्हणून.. बस अजून काही नाही... " श्रेयसा विषय बदलण्याचा प्रयत्न करत म्हणाली....
" ओह् हो sss म्हणजे रात्री मॅडमची झोप व्यवस्थित झाली नाही तर... का ग? नवऱ्याने झोपू दिले नाही का ? " पहिली मैत्रीण मस्करीच्या स्वरात विचारू लागली...
" हो ना... इतकी सुंदर बायको आपल्या समोर असताना कोणाला झोपायची इच्छा होत असेल... " दुसरी मैत्रीण ही तिची मस्करी करू लागली...
" हे काय बोलत आहात तुम्ही दोघी ... आपण कुठे बसलेलो आहोत आणि तुमचं काय चालू आहे ? " श्रेयसा वैतागलेल्या स्वरात त्या दोघींकडे पाहून म्हणाली....
" आपण कॉलेजमध्ये आहोत आणि मॅडमचे आज कॉलेजमध्ये एकाही लेक्चर मध्ये मन लागत नाही... " पहिल्या मैत्रिणींने लगेच उत्तर दिले..
" शिवाय आमचे मॅडमची काल रात्री झोपही पूर्ण झाली नाही आणि म्हणूनच तिचे आज मन कशात लागत नाही आहे... त्यांना त्यांच्या नवऱ्याची खूप जास्त आठवण येत आहे... बरोबर ना... " दुसऱ्या मैत्रिणीने लगेच तिला विचारले... तशी श्रेयसा शांत नजरेने तिच्याकडे पाहू लागली कारण त्यांचे बाकीचे वाक्य कितीही चुकीचे असले तरी शेवटचा प्रश्न मात्र एकदम बरोबर होता... तिच्या मनामध्ये आर्यव्रत चे, त्याच्या कालपासून बदललेल्या वागण्याचीच विचार चालू होते आणि म्हणूनच तिचे मन कॉलेजमध्ये लागत नव्हते...
" कस ओळखलं... अग आमच्या मैत्रिणीच्या मनातली गोष्ट आम्ही ओळखणार नाही तर मग कोण ओळखणार... " तिच्या चेहऱ्यावरची शांतता पाहून लगेच ती मैत्री म्हणाली...
" अरे हा लेक्चर तसाही ऑफ आहे तर आपण एक काम करूया का मॅडमचा मूड चांगला करण्यासाठी त्यांचे नवऱ्याला फोन करूया का... जेव्हा ते समोरून तिच्यासोबत बोलतील , तेव्हा आपल्या मॅडमलाही बरं वाटेल आणि निदान पुढच्या लेक्चर मध्ये लक्ष लागेल... " दुसरी मैत्रीण युक्ती करा तिच्याकडे पाहून म्हणाली आणि ती काय बोलायच्या आधीच तिच्या बॅगमध्ये असलेला मोबाईल बाहेर काढला...
" नको.... ऐका ना... त्यांना फोन करू नका, ते आता ऑफिसमध्ये असतील... " श्रेयसा त्या दोघींनाही समजावण्याच्या स्वरात म्हणाली...
" ऑफिसमध्ये असले म्हणून काय झालं , आपल्या लाडक्या बायकोचा फोन उचलणार नाहीत का ? " पहिल्या मैत्रिणीने लगेच प्रश्न केला...
’ कालपासून तर तो माझ्यासोबत व्यवस्थित बोलतही नाही आहे... माझ्याकडे तर अजिबात लक्ष नाही , मग माझा फोन उचलला का ? ’ तिचा प्रश्न ऐकून श्रेयसा च्या मनालाही प्रश्न पडला...
" बघा... परत मॅडम आपल्या नवऱ्याच्या विचारांमध्ये गुंग झाल्या.... मॅडम असे सारखं विचारांमध्ये हरवणे बरोबर नाही हा... त्यापेक्षा आपण फोन करून त्यांच्यासोबत बोलून घ्या... " दुसरी मैत्रीण पुन्हा मस्करीच्या स्वरात म्हणाली....
" नाहीsss नको... प्लीज ! " श्रेयसा त्यांना थांबवणार तरीही त्यांनी तिला इग्नोर करून तिच्या मोबाईलवरून आर्यव्रत चा नंबर डायल केला... श्रेयसा त्यांच्या हातातून फोन घेऊन फोन कट करण्याचा प्रयत्न करत होती, पण इतक्यात समोरून रिंग वाजू लागली... तशी ती शांतपणे त्या मोबाईल कडे पाहू लागली...
’ त्या दोघींनी फोन लावला तर खरा पण आता जर त्याने फोन उचलला तर आपण काय बोलायचं, त्याच्यावर आपला राग दाखवायचा की नॉर्मल वागायचे? ’ तिचे मन तिलाच प्रश्न विचारू लागले... हृदयाची धडधड अचानक वाढली... समोरून जेव्हा त्याचा आवाज कानाला ऐकू येईल , तेव्हा काय होईल? नकळतपणे ती विचार करू लागली...
फोनची रिंग बाजून बंद झाली... समोरून फोन उचलला गेला नाही आणि पुन्हा एकदा तिचे वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये अडकलेले मन शांत झाले आणि फोन न उचलल्यामुळे अजूनच उदास झाले...
" त्यांनी फोन नाही उचलला... " नकळतपणे श्रेयसा च्या मुखातून उदास स्वर बाहेर पडले... लेक्चर संपल्याची घंटा झाली...
" अगं तो ऑफिसमध्ये काम करत असेल.... कुठल्यातरी महत्त्वाच्या बॅटिंगमध्ये अडकला असेल किंवा महत्त्वाच्या कामांमध्ये बिझी असेल... जेव्हा मोबाईल कडे लक्ष जाईल, तेव्हा तुला फोन करेल... आता तू जास्त विचार करू नको चल आपण लेक्चर मध्ये जाऊन बसू... " तिच्या मैत्रिणी तिला समजावत क्लासरूम मध्ये घेऊन जातात...
*************************
आर्यव्रत सकाळी ऑफिसमध्ये आल्यापासून आपल्या एका कलिग सोबत ते सॉफ्टवेअर ओपन करण्याचा प्रयत्नामध्ये गुंतलेला असतो.... त्यांनी एका सॉफ्टवेअर स्पेशलिस्टलाही बोलावलेले असते... तोही त्यांच्यासोबत बसून त्यांची मदत करत असतो...
आर्यव्रत सकाळी ऑफिसमध्ये आल्यापासून आपल्या एका कलिग सोबत ते सॉफ्टवेअर ओपन करण्याचा प्रयत्नामध्ये गुंतलेला असतो.... त्यांनी एका सॉफ्टवेअर स्पेशलिस्टलाही बोलावलेले असते... तोही त्यांच्यासोबत बसून त्यांची मदत करत असतो...
" आर्यव्रत… I’ll be honest… हे साधं crash नाही... " तो सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट त्या दोघांकडे पाहून म्हणाला...
"म्हणजे? तू म्हणशील की हे उघडणारच नाही? माझं सगळं संपलं? माझी इतक्या महिन्याची मेहनत धुळीला मिळाली... " आर्यव्रत त्याच्याकडे पाहून नाराजी च्या स्वरात विचारू लागला...
"नाहीsss संपलं नाही... पण सोपं ही नाही....
लाईट अचानक गेली तेव्हा सॉफ्टवेअरच्या काही core files लिहिल्या जात होत्या… त्या अर्ध्या राहिल्या. त्यामुळे सिस्टमला त्या फाईल्स नीट ओळखता येत नाही आहे.. . हे virus नाही… हे pure data corruption आहे... " त्या सॉफ्टवेअर वाल्याने व्यवस्थितपणे समजावत त्यांना सांगितले...
" म्हणजे sss मी स्वतःही ते सॉफ्टवेअर ओपन करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही समजत नव्हते म्हणून मग तुम्हाला बोलावले.... आता हे corruption कसे कमी होईल? माझे सॉफ्टवेअर चालू होईल का? " आर्यव्रत अपेक्षेने त्याच्याकडे पाहून त्यांना विचारू लागतो....
" हे बघा sss तुमच्या सॉफ्टवेअरचा नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे , एकदा मी व्यवस्थित चेक करून मग तुम्हाला समजावून सांगतो... " तो सॉफ्टवेअर वाला बोलून पुन्हा एकदा त्या कम्प्युटरवर काही बटण दाबायला सुरुवात करतो... आर्यव्रत आणि त्याचा तो ऑफिस कॉलिंग एकमेकांकडे पाहत असतात... तो नजरेने आर्यव्रत ला शांत राहायला सांगतो...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा