Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग २३

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग २३

" सॉरी आई... मला तुझ्यावर असे रागवायचं नव्हते, मी चुकून बोलून गेले...खरं तर मला कोणत्या गोष्टीचा राग आला आहे तेच मला समजत नाही.." श्रेयसा शांत चेहऱ्याने आपली चूक कबूल करते...

" काय झाला आहे का ? तुझा चेहरा असा का वाटत आहे ? " सुरभी काळजीने तिच्या जवळ बसत तिला विचारते.

" नाही... मी ठीक आहे, मला थोडा वेळ आराम करायचा आहे..." श्रेयसा शांत पने म्हणाली...

" ठीक आहे... " असे बोलून सुरभी तिच्या रूममधून बाहेर निघून गेली... श्रेयसा आपल्या बेड वर जाऊन झोपली... आज खूप दिवसानंतर ती स्वतःच्या रूममध्ये मोकळेपणाने बसली होती परंतु तिचे मन मात्र कशातही लागत नव्हते...

’ आज मी माझ्या घरी आली आहे... माझ्या रूममध्ये, मनमोकळेपणाने बसले आहे तरीही, माझ्या मनाला शांती का वाटत नाही... त्या घरात त्याच्या रूममध्ये असल्यामुळे त्याच्या आठवणी माझ्या आजूबाजूला होत्या पण आता इकडे तर तसे काही नाही तरीपण त्याची आठवण का येत आहे.. ’  श्रेयसा मनामध्ये विचार करत असते... त्याच्यापासून , त्याच्या आठवणीपासून दूर जाण्यासाठी खरतर ती या घरी निघून आलेली असते, पण इकडे येऊन पण तिच्या मनाला आराम भेटत नाही...

’ त्याला माझी काही काळजी नाही त्याने पहिल्या दिवशी जसे सांगितले होते की हे अनिश्चित बंधन आहे त्याच्यासाठी! ही गोष्ट अजूनही त्याच्या मनामध्ये जशीच्या तशी आहे,  पण हे बंधन माझ्यासाठी ही जबरदस्तीचे होते तरीही आता मला असे का वाटत नाही... का माझ्या मनामध्ये सारखा त्याचा विचार येतो... त्याने काही दिवस माझ्यासोबत हसून काय वागला का मला सारखं त्याचं ते हसणं, त्याचं माझी काळजी घेणं आठवतं.. हे सगळं काय आहे ? ’ श्रेयसा च्या मनात तिच्या भावनांचा कल्लोळ उडालेला असतो... तिला तिच्या मनाला काय पाहिजे आहे हे अजूनही तिला समजत नाही... विचार करत असती आपल्या बेडवर शांतपणे झोपून जाते...

" आर्य, सॉफ्टवेअर चे बऱ्यापैकी काम झाले आहे... आपण आतापर्यंत जेवढ रिकव्हर केला आहे... ते एकदा व्यवस्थित तपासून घे.... त्यामधला काही छोटा मोठा डेटा उडाला तर नाही ना,  हे एकदा व्यवस्थित चेक कर आणि त्याचा बॅकअप घे... मागच्या दोन ते तीन दिवसापासून आपण खूप लोड घेऊन काम केल आहे.... मला तरी आज थांबण्याची गरज वाटत नाही...  उद्या सकाळी वेळेवर येऊन आपण बाकीचे काम करूया... " त्यांच्यासोबत काम करत असलेला सॉफ्टवेअर वाला त्यांना म्हणाला...

" हो sss आर्य,  हे ठीक बोलत आहे... तू ही खूप टेन्शन घेऊन काम केलं आहे... " त्याचा कलिग म्हणाला...

" माझेही आज एक पर्सनल काम आहे त्यामुळे मलाही थोडा लवकर निघावे लागेल... " सॉफ्टवेअर वाला त्या दोघांकडे पाहून म्हणाला...

" हो sss तुम्ही आता निघाला तरी चालेल... आम्ही एकदा हे सॉफ्टवेअर व्यवस्थित चेक करून घेतो त्याचा बॅकअप घेतो आणि मग घरी जातो... " आर्यव्रत त्या दोघांकडे एक नजर पाहून त्या सॉफ्टवेअर वाल्याला सांगतो...

" ओके... " तो सॉफ्टवेअर वाला बोलून तिकडून निघून जातो... आर्यव्रत आपल्या खुर्चीवर येऊन बसतो आणि कम्प्युटरवर तो सॉफ्टवेअर ओपन करून एकदा चेक करू लागतो तोपर्यंत त्याचा सोबत असलेल्या त्याचा सह कर्मचारी त्याच्या बाजूलाच बसलेला असतो... ते दोघेपण सॉफ्टवेअर व्यवस्थित चेक करतात...


" आतापर्यंत तरी सगळ व्यवस्थित आहे... कोणतीच फाईल डिलीट झाल्यासारखी वाटत नाही... मी असं ऑफर मध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या होत्या , ते एका डायरीमध्ये हे लिहून ठेवले होते आणि त्यानुसार हे अगदी बरोबर आहे.... " आर्यव्रत व्यवस्थितपणे चेक करून त्याला सांगतो...

" ठीक आहे, मग आता बॅकअप घेऊन ठेव तोपर्यंत मी जरा माझे काम करून येतो मग आपण एकत्रच घरी जाऊया... " त्याचा सह कर्मचारी बोलून त्याचे केबिन मधून बाहेर पडतो... आर्यव्रत आपल्या जवळ असलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये त्याचा बॅकअप घेतो... आज त्याचा सॉफ्टवेअर बऱ्यापैकी व्यवस्थित चालू झाल्यामुळे त्याचं मनही शांत झालेलं असतं... आता जे काय थोडं काम आहे ते,  ते तिघे मिळून पुढच्या एक ते दोन दिवसात पूर्ण करणार होते आणि मग तो सॉफ्टवेअर आर्यव्रत आपल्या ओनर समोर उपस्थित करणार होता....

त्याचा बॅकअप घेऊन पूर्ण होतो तोपर्यंत त्याचा सह कर्मचारीही त्याचे राहिलेले काम संपवून तिकडे येतो मग दोघे पण ऑफिस मधून बाहेर निघतात... सकाळी येताना आर्यव्रत त्याला आपल्या गाडीमधूनच घेऊन आलेला असतो त्यामुळे आता त्याला सोडूनच तो पुढे आपल्या घरी जाणार असतो...

" मग आर्य, आता ठीक वाटत आहे ना ? मागच्या दोन दिवसापासून तुझ्या चेहऱ्यावर फक्त टेन्शन दिसत होतं... " त्याला सह कर्मचारी बाजूला बसून त्याच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला...

" खूप मेहनत केली होती रे या सॉफ्टवेअर साठी... हे सॉफ्टवेअर पूर्ण झालं आणि जर ते कंपनीकडून अप्रूव्ह झालं तर आपल्या गावाचा खूप फायदा होईल... " आर्यव्रत

" माहित आहे रे मला... तुझी मेहनत अगदी जवळून पाहिली आहे मी आणि नेहमी तू जे काही करतो ते सगळ्यांचा विचार करून करतो... हे आतापर्यंत माझ्याही लक्षात आले आहे त्यामुळे तर जेव्हा समजले की,  सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा मलाही खूप टेन्शन आलं होतं... " सह कर्मचारी काळजीने म्हणाला...

" थँक्यू यार sss थँक्यू सो मच ... खरंच या सगळ्यांमध्ये तुमच्या दोघांची खूप मदत झाली... " आर्यव्रत

" प्लीज यार असे आभार मानू नकोस... दरवेळी तू सगळ्यांच्या मदतीला धावून येतो....  मग एकदा कधीतरी आम्हाला पण अशी संधी मिळाली आहे तर आम्ही का सोडू..." सहकर्मचारी

" असं काही नाही.... मला फक्त एवढंच वाटतं की आपण जर चांगल्या मनाने कोणाची मदत करू, तर लोकही तेवढ्या चांगल्या मनाने आपली मदत करतात... " आर्यव्रत

" हा , तुझ्या मनाचा मोठेपणा आहे... चला सर आमचं घर आलं तुम्ही पण घरी जाऊन आराम करा... " तो सहकर्मचारी बोलून गाडीमधून खाली उतरतो... त्याला बाय करतो आणि आपल्या घरी निघून जातो... आर्यव्रत गाडी आपल्या घराच्या दिशेने वळवतो...

आज लवकरच आपल्या घरी पोहोचलेला असतो... गाडी पार्क करून अगदी गाणं गुनगुणतच तो घराच्या आत प्रवेश करतो...

" आर्य... आज लवकर... " रेवती त्याला पाहून आश्चर्याने विचारते....

" हो sss आई... आज काम लवकर झालं म्हणून लवकर आलो.... आई खूप भूक लागली आहे, जेवण तयार आहे का ? " दोन-तीन दिवस त्याने व्यवस्थित जेवणही केलेले नसते त्यामुळे आता त्याला भूकही जाणवते ...

" हो बाळा.... तू पटकन फ्रेश होऊन ये,  तोपर्यंत मी तुझ्या साठी गरमगरम जेवण वाढते... सगळं तयार आहे फक्त पोळ्या बनवायच्या बाकी आहेत त्या पण तू खाली येईपर्यंत बनतील... " रेवती आनंदानेच त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाली...

"  लवकर बनव .. आज तुझ्या हाताने बनवलेले जेवण खाण्याची खूप इच्छा होत आहे... मी पटकन फ्रेश होऊन येतो... " आर्यव्रत बोलून फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून जातो... आर्यव्रत रूम मध्ये गेल्याबरोबर कपडे घेऊन बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जातो... दहा मिनिटात तो फ्रेश होऊन, कपडे चेंज करून बाहेर येतो...

’ मागच्या दोन-तीन दिवसापासून मी या मॅडम कडे ही फारसे लक्ष दिले नाही... बघूया बहुतेक अभ्यास करत बसल्या असतील... ’ आर्यव्रत मनामध्ये विचार करतच स्टडी रूमचा दरवाजा उघडून आत मध्ये पाहू लागतो परंतु आत मध्ये कोणीच नसते... तसे त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून येते...



क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all