डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३६
" श्रेयसा, माझ्यामुळे तुला जो त्रास झाला आहे त्यासाठी सॉरी... " आर्यव्रत तिच्या कडे पाहून म्हणाला...
" नाही आर्य.... तू असं सॉरी बोलू नकोस... खरं तर तेव्हा तुझी अवस्था समजून घ्यायला पाहिजे होती , पण मी नाही समजली... मैत्रीच्या नात्याने तरी तुझ्या त्रासामध्ये तुला साथ द्यायला पाहिजे होता, पण मला याबद्दल काहीच माहीत नव्हते... " श्रेयसा
" माहित आहे ग... त्यावेळी मी घरी कोणाला काही सांगितले नाही... सगळं व्यवस्थित होईल की नाही या काळजीने मी अस्वस्थ होतो... माझं टेन्शन घरी सांगून मला घरच्यांनाही टेन्शन द्यायचे नव्हते... " आर्यव्रत
" पण आता सगळं ठीक झाला आहे आणि तुमचा सॉफ्टवेअरही व्यवस्थित चालत आहे... " श्रेयसा त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून लगेच विषय बदलते...
" उद्या आमच्या ऑफिसच्या ओनर ऑफिसमध्ये येणार आहे आणि हा सॉफ्टवेअर बघणार आहे... त्यांना आवडलं तर आम्ही सॉफ्टवेअरला पुढे युज करून आपल्या गावच्या विकासाचे काम
सुरू करू शकतो... " आर्यव्रत आनंदाने श्रेयसा ला सांगू लागतो...
सुरू करू शकतो... " आर्यव्रत आनंदाने श्रेयसा ला सांगू लागतो...
" काँग्रॅच्युलेशन आर्य, मला माहित आहे तुमचा हा सॉफ्टवेअर तुमच्या ओनरला नक्कीच आवडणार... " श्रेयसा
" मला ही असेच वाटते... " आर्यव्रत काहीसा विचार करत उत्तर देतो...
" आर्य, आता खूप उशीर झाला आहे... तू घरी जा... परत सकाळी तुम्हाला लवकरच ऑफिसलाही जायचे असेल ना... " श्रेयसा
" हो sss पण मला सांग तू परत घरी कधी येणार आहेस ? " आर्यव्रत प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारतो...
" मी sss उद्या येते... " श्रेयसा
" नक्की? " आर्यव्रत
" हो sss... पण तू जा आता, कुणी यावेळी आपल्याला इकडे पाहिले तर काय विचार करतील... " श्रेयसा घाबरून एक नजर आपल्या घराकडे पाहून म्हणाली...
" काय विचार करणार आहेत ? नवऱ्याला आपल्या बायकोची आठवण आली म्हणून तर तिला भेटायला आला.. यात काय चुकीचं आहे ? " आर्यव्रत सरळ उत्तर देऊन मोकळा होतो... श्रेयसा त्याचे उत्तर ऐकून त्याच्याकडे पाहू लागते...
" आता मी घरी जात आहे , पण उद्या संध्याकाळी जेव्हा मी ऑफिस वरून घरी येईल तेव्हा मला माझी बायको माझ्या घरात पाहिजे आहे.... " आर्यव्रत तिच्याकडे पाहून धमकीच्या स्वरात म्हणाला... ती अजूनही शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती...
" बाय... " आर्यव्रत बोलून हळूच आपले ओठ तिच्या गालावर टेकवतो... तसे तिचे डोळे मोठे होतात... आर्यव्रत तिच्या चेहऱ्यावरची रिएक्शन पाहून हसतच आपला लॅपटॉप गाडीमध्ये ठेवत स्वतः गाडीमध्ये जाऊन बसतो... श्रेयसा ला आता आपल्या सोबत काय होत आहे ते समजत नसते... त्याच्या वागण्याचा अंदाजा लागत नसतो...
" बाय बायको, लवकरच भेटू आपल्या घरी... " आर्यव्रत बोलून आपला एक डोळा ब्लिंक करत गाडी चालू करतो... त्याची गाडी गेटच्या दिशेने पुढे जाऊ लागते... वॉचमेन गेट उघडतो, त्याची गाडी गेटमधून बाहेर निघून जाते....
श्रेयसा आपल्या गालावर हात ठेवून अजूनही तिकडे तशीच उभी असते...
’ आज आर्य माझ्या सोबत जसे वागले, मला जे काही बोलले, ते काय? म्हणजे त्यांच्या मनामध्ये नक्की काय असेल ? त्यांनाही आता मी आवडत असेल का, त्यांच्या वागण्यातून असेच काहीसे वाटत होते... ’ श्रेयसा च्या मनाचा पूर्णपणे गोंधळ उडाला होता...
" श्रेया sss बाळा तू एवढ्या रात्री इकडे काय करत आहेस ? " अचानक आपल्या मागून आलेले आवाजाने श्रेयसा घाबरून मागे पाहू लागते त्याची आई मागे तिच्यापासून काही अंतरावर उभी होती...
" हुं; ते ss मी... " श्रेयसा ला काय उत्तर द्यावे ते समजत नाही...
" आत चल, इतक्या रात्रीची अशी बाहेर थांबू नको... " सुरभी तिच्याजवळ येऊन तिला आत घेऊन जाते... श्रेयसा आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर झोपते पण तू मनामध्ये मात्र आर्यव्रत चे विचार चालू असतात...
’ श्रेया... मला माहित आहे की तू अजूनही माझाच विचार करत असणार आणि माझी ही अशीच इच्छा आहे की, तू माझाच विचार करावा... खरंतर मी तुला आजच आत्ताच माझ्या मनातली गोष्ट सांगणार होतो परंतु ही जागा आणि वेळ सांगण्यासाठी योग्य नव्हती , पण मला तुझ्या मनातले जाणून घ्यायचे होते आणि ते मला समजले आहे.... मी उद्या तुझी आपल्या घरी येण्याची वाट पाहत आहे... तेव्हाच मी माझ्या मनातली भावना तुला सांगेल... ’ आर्यव्रत गाडी चालवत आनंदाने विचार करत असतो....
आज आर्यव्रत खूपच खुश होता कारण त्याचे दोन्ही स्वप्न पूर्ण होत असताना त्याला दिसत होते... एक म्हणजे त्याचा सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत आणि दुसरं म्हणजे श्रेयसा च्या मनातल्या फिलिंग आहे त्याला अंदाजा आला होता... त्यानंतर तो कधी घरी पोहोचतो त्यालाही समजत नाही... गाडी व्यवस्थित पार्क करून तो आपल्या धुंदीतच घराच्या आत येऊन आपल्या रूममध्ये निघून जातो....
आपल्या घरी पोहोचेपर्यंत त्याला पहाटेचे चार वाजलेले असतात... झोप तर त्याच्याही डोळ्यावर नसते... कधी एकदा सकाळ होते असे त्याला झालेले असते... तो आपला फोन हातात घेतो आणि श्रेयसा ला मेसेज पाठवतो...
" मी घरी पोहोचलो... "
" ओके... " पुढच्या पाच मिनिटातच तिचाही रिप्लाय येतो... याचा अर्थ तीही आपल्यासारखी जागी आहे हे त्याला समजते...
" झोप येत नाही आहे का ? माझी आठवण येत आहे का ? " तो तिला छळण्यासाठी पुढचा मेसेज पाठवतो...
" असे काही नाही... घरी व्यवस्थित पोहोचला ना ते जाणून घ्यायचे होते... मला खूप झोप येत आहे , मी झोपते... " श्रेयसा पटकन असा मेसेज करून त्याला सेंड करते आणि मोबाईल बाजूला ठेवून डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करते.... तिचा रिप्लाय वाचून तोही हसून मोबाईल बाजूला ठेवतो...
आर्य ची रात्रभर झोप झाली नव्हती तरीही तो आज खूप फ्रेश वाटत होता... सकाळी लवकरच जिम मध्ये जाऊन त्याने कसरतही केली आणि आपली तयारी करून खाली हॉलमध्ये आला... रेवती आणि आदित्य राज दोघेही हॉलमध्ये बसले होते...
" गुड मॉर्निंग आई, गुड मॉर्निंग बाबा... " तुझ्या दोघांकडे पाहून त्यांना ग्रीट करतो....
" आज मी घरीच प्रसाद बनवून देवाला चढवला आहे आणि आता थोड्या वेळात मी आणि तुझे बाबा आपल्या गावच्या मंदिरामध्ये जाऊन देवाला प्रसाद चढवणार आहे... " रेवती आनंदाने त्याच्याकडे पाहून म्हणाली...
" आई, एवढ सगळं करायची काय गरज होती ? " आर्यव्रत आपल्या आईची तयारी पाहून म्हणाला...
" आज माझ्या मुलाच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे मग त्याच्यासाठी आम्ही एवढं करणारच ना... तुला तुझ्या आयुष्यात असेच यश मिळत राहो... हे एकच देवाकडे मागणे आहे... " रेवती प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली...
" तुमच्या दोघांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे म्हणून तर आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो.... " आर्यव्रत आनंदाने त्या दोघांकडे पाहून सांगतो...
" आमच्या मुलाने त्याच्या आयुष्यात त्याला जे पाहिजे ते करावे.... त्याचे हे वडील नेहमी त्याच्यासोबत असतील... " आदित्य राज प्रेमाने त्याला म्हणतात... आपल्या आई-वडिलांसोबत थोडा वेळ गप्पा मारून नाश्ता करून आर्यव्रत आपली बॅग घेऊन घरातून बाहेर पडतो...
आज सगळेच ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचलेले असतात आणि आपापली काम करत असतात.... त्यांच्या ओनरचाही फोन येऊन जातो, काही वेळातच ते ऑफिसमध्ये पोहोचणार होते... आर्य त्या दृष्टीने एकदा आपले सॉफ्टवेअर व्यवस्थित कसे प्रेसेंट करायचे याची प्रॅक्टिस करत होता....
" आर्य.... आपल्या होणार नाही तुला मीटिंग हॉलमध्ये बोलावले आहे... टू प्रेझेंटेशन देण्यासाठी तयार आहेस ना.... " संजय त्याच्या केबिनचा दरवाजा उघडत म्हणाला...
" हो sss... " आर्य ने आत्मविश्वासाने उत्तर दिले आणि आपल्याला लॅपटॉप घेऊन संजय सोबत मीटिंग हॉल मध्ये गेला....
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
