Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३७

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ३७

मीटिंग हॉलमध्ये त्यांच्या ओनर सोबत अजूनही काही अनोळखी चेहरे त्याला बघायला भेटले...

" हॅलो आर्यव्रत... " त्याच्या होणार नाही त्याच्याकडे पाहून ग्रीट केले...

" हॅलो सर... " आर्यव्रत

" तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरचे प्रेझेंटेशन देण्यासाठी तयार आहात का ? " त्यांच्या ओनर ने विचारले...

" हो सर... " आर्यव्रत ने आत्मविश्वासाने उत्तर दिले...

" ठीक आहे,  मग सुरु करूया... " त्यांचा होणार त्यांच्याकडे पाहून म्हणाला आणि सगळेजण आपापल्या जागेवर बसले... आर्यव्रत प्रेझेंटेशन देण्यासाठी सगळ्यांच्या मधोमध एका डिजिटल स्क्रीन जवळ येऊन उभा राहिला... मनामध्ये देवाचे नाव घेऊन त्याने आत्मविश्वासाने आपल्या सॉफ्टवेअरचे प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली...

तो सगळ्यांना आपल्या सॉफ्टवेअर बद्दल व्यवस्थितपणे समजावून सांगत होता त्यासोबतच सॉफ्टवेअरची स्क्रीन मागे असलेल्या मोठ्या बोर्डवर चालू करून त्याची सविस्तर माहितीही देत होता...

मीटिंग हॉलमध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती... फक्त आर्यव्रत चा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमत होता... सगळे लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकत होते आणि डिजिटल स्क्रीनवर तो जे दाखवत होता ते पाहत होते...

बराच वेळ त्यांची ती मीटिंग चालू होती... आर्यव्रत ने त्या सॉफ्टवेअर साठी किती मेहनत घेतली आहे आणि त्याच्यावर किती बारकाईने काम केले आहे हे सगळ्यांना त्याच्या सांगण्यावरून दिसून येत होते...

आर्यव्रत ने आपल्या सॉफ्टवेअर बद्दल आणि त्यामध्ये असलेल्या सगळ्या माहितीबद्दल अगदी व्यवस्थितपणे सगळ्यांना समजावून सांगितले होते... त्याचे प्रेझेंटेशन पूर्ण झाले तसा तो शांत उभा राहून आपल्या होणार कडे पाहू लागला...

" खूप छान प्रेझेंटेशन दिले आहे.... तुझा हा सॉफ्टवेअरही खूप छान आहे.... " त्याचे ओनर जागेवरून उठून त्याच्यासोबत हात मिळवणी करत म्हणाले...

" धन्यवाद सर... " आर्यव्रत ने त्यांच्याकडे पाहून हसून उत्तर दिले....

" आर्यव्रत मी तुमची या सगळ्यांसोबत ओळख करून देतो... हे महाराष्ट्र शासन अधिकारी आहेत... यांना खास या मीटिंगसाठी मी शहरातून बोलावून घेतले आहे... आणि हे ग्रामपंचायत सचिव आहेत... यांना तर तू ओळखतच असशील... " त्याचे ओनर समोर बसलेल्या काही लोकांसोबत त्याची भेट करून देत म्हणाले...

" हो sss हे ग्रामपंचायत सचिव माझ्या वडिलांचे मित्र आहेत... " आर्यव्रत त्यांच्याकडे पाहून उत्तर देतो...

" हे ग्रामपंचायत मध्ये विकास योजना अमलात आणण्यासाठी सरकारकडून अधिकृत केलेले काही अधिकारी आहेत.. या सगळ्यांना मी खास आज तुझ्या या सॉफ्टवेअरच्या मिटींगसाठी इकडे बोलावले होते... हा सॉफ्टवेअर तू सांगितल्याप्रमाणे गावच्या विकासाचा विचार करून बनवलेला आहे तर याबद्दल या सगळ्यांनाही माहित असावे असे मला वाटत होते.... तुमच्या सगळ्यांचा या सॉफ्टवेअर बद्दल काय विचार आहे ? " त्याचे ओनर एक नजर त्याच्याकडे पाहून त्याला सगळ्यांची इन्फॉर्मेशन देतात आणि त्यानंतर बाकी सगळ्यांकडे पाहून त्यांना प्रश्न विचारतात....

" प्रेझेंटेशन खूपच छान होते आणि सॉफ्टवेअरही छान बनवला आहे... अगदी बारकाव्याने सगळ्या गोष्टीचे निरीक्षण केले आहे... यामध्ये नमूद केलेले सगळे मुद्दे आपल्या ला पुढे जाऊन खूप कामाला येतील.... या सॉफ्टवेअर बद्दल पुढे विचार करायला मला तरी काही हरकत वाटत नाही... " महाराष्ट्र शासन अधिकारी आपले मत सांगतात...

" आर्यव्रत ला मी लहान असल्यापासूनच चांगले ओळखत आहे... लहानपणापासूनच तो असा जिद्दी आणि हुशार मुलगा आहे... तो शाळेत असतानाच त्यांनी आपल्या वडिलांना गावासाठी काहीतरी करणार हे सांगितले होते आणि आज करूनही दाखवले... " ग्रामपंचायत सचिव त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसतमुखाने म्हणाले....

तिकडे उपस्थित असलेले सगळे अधिकारी आपापले मत मांडू लागले... त्या सगळ्यांचे मत आर्यव्रत च्या बाजूने होते... आर्यव्रत ही आपल्या सॉफ्टवेअर बद्दलची प्रशंसा सगळ्यांकडून ऐकून खूप खुश झाला...

" एकंदर या सॉफ्टवेअरवर आपल्याला पुढे काम करण्यामध्ये काही हरकत नाही,  असे मी समजू शकतो.... " ओनर ने सगळ्यांकडे पाहून त्यांना विचारले...

" हो sss मलाही आता असेच वाटत आहे की आपण लवकरात लवकर या सॉफ्टवेअर वर पुढे काम करायला हरकत नाही... " ग्राम विकास योजनेचे अधिकारी त्यांच्याकडे पाहून म्हणाले...

" आर्यव्रत.. मागे काही दिवसांपूर्वी आमची ग्रामविकास कार्यालयामध्ये मीटिंग झाली होती आणि या सॉफ्टवेअर बद्दल आणि गावच्या विकासाबद्दल मी तिकडे चर्चाही केली होती... तेव्हा तुझा सॉफ्टवेअर पूर्ण झाला नव्हता म्हणून मी त्यांच्याकडून काही दिवसाची मुदत मागितली... आज खास या प्रेझेंट टेंशन साठी या सगळ्यांना इकडे आमंत्रित केले होते....

आपल्या कंपनीला ग्राम विकास कार्यालयातून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे... या कॉन्टॅक्ट नुसार आपण या सॉफ्टवेअरवर काम करून गावच्या विकासाचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवणार होतो आणि त्यांना यासाठी मदत करणार होतो... हे कॉन्ट्रॅक्ट इतके दिवस फक्त तुझ्या या सॉफ्टवेअर साठी थांबवून ठेवले होते, आता मात्र यावर काम सुरू करायला पाहिजे.... तू या सॉफ्टवेअर वर काम करण्यासाठी तयार आहेस ना ? " त्याचे ओनर हसतमुखाने त्याला सांगत होते....

" हो सर.... मी जेव्हा हा सॉफ्टवेअर बनवण्याचा विचार केला होता त्या दिवसापासूनच मी या सॉफ्टवेअर चा उपयोग आपल्या गावासाठी कसा आणि कधी करता येईल या दिवसाची वाट पाहत होतो.... " आर्यव्रत

" छान! मग आपण हे कॉन्टॅक्ट साइन करून हा प्रोजेक्ट आपल्या हातात घेऊ... या प्रोजेक्ट वर तुला काम करायचे आहे.... हे प्रोजेक्ट तू स्वतः लीड करणार आहेस... तू तयार आहेस ना ? " ओनर त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाले....

" हो sss सर.... मी तयार आहे... " आर्यव्रत ने जराही वेळ न घालवता उत्तर दिले....

" ठीक आहे... मग मी लवकरच या प्रोजेक्टचे पेपर बनवून घेतो... आपण आता लवकरच या प्रोजेक्टच्या कामाला लागूया... या प्रोजेक्टच्या निमित्ताने आपली सतत भेट होत राहील... आम्हालाही तुमच्या एम्प्लॉईज कडून ग्राम विकासासाठी वेगवेगळ्या योजना पाहायला मिळतील... यानंतर जेव्हा प्रोजेक्टचे पेपर तयार होतील तेव्हा आपली दुसरी मीटिंग आपण ऑरेंज करूया.... " ते अधिकारी त्या सगळ्यांकडे पाहत म्हणाले...

मीटिंग रूम मध्ये त्या प्रोजेक्ट बद्दल बराच वेळ चर्चा चालू होती... त्यानंतर ओनर ने बोलावलेले अधिकारी तिकडून निघून गेले...

" आर्यव्रत तुझ्या सॉफ्टवेअर कडे पाहून समजते की तू या सॉफ्टवेअर साठी किती मेहनत केली आहे... आता अशीच मेहनत तुला या प्रोजेक्टवरही करायची आहे... लवकरच तू गावच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण होईल आणि ते स्वप्न तुझ्याकडूनच पूर्ण व्हावे असे मलाही वाटत आहे म्हणून हा प्रोजेक्ट मी तुला लीड करायला देत आहे.... " ऑनर पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहून त्याला सांगतात...

" खूप खूप धन्यवाद सर आज तुमच्यामुळे मलाही संधी मिळाली आहे... तुम्ही दिलेल्या या संधीचे मी सोनं करून दाखवेल असे वचन देतो.... " आर्यव्रत ही उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहून म्हणाला....

" आर्य sss अभिनंदन भावा.... अखेर तुझे स्वप्न पूर्ण झाले... " त्यांच्या केबिनमध्ये आल्यानंतर संजय त्याला मिठी मारत आनंदाने म्हणाला...

" धन्यवाद... मी आज खूप खुश आहे... आज माझ्या स्वप्नांना पंख मिळाल्यासारखे वाटत आहे... आता फक्त उंच भरारी घ्यायची आहे... " आर्यव्रत

" आर्य sss तुला मिळालेले हे यश पाहून मी खूप खुश आहे... मी बोललो होतो ना, तुझ्या मेहनतीला आज खरं फळ मिळेल... " संजय

" या यशा मध्ये तुमचाही महत्वाचा वाटा आहे कारण वेळेवर येऊन तुम्ही माझी मदत केली... " आर्यव्रत

" आर्य sss मित्रांना मदत करणे हे तुझ्याकडूनच शिकलो आहे.. यापुढेही कधीही तुला माझी गरज वाटली तर फक्त एक आवाज दे हा तुझा मित्र तुझ्यासाठी कधीही हजर असेल... " संजय


" मला माहित आहे... " आर्यव्रत... एकमेकांसोबत आनंदाने बोलतच दोघेपण ऑफिसमधून बाहेर पडतात.. बाहेर वृषालीही त्यांची वाट पाहत बसलेली असते... आर्यव्रत ला पाहून ती पण त्याचे अभिनंदन करते... प्रदीप लाही समजल्यावर तोही फोन करून त्याचे अभिनंदन करतो... आर्यव्रत आनंदाने घरी जायला निघतो...

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all