डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३८
" आई sss..... " आजही घरी आल्याबरोबर आर्यव्रत चा आवाज सगळ्या घरामध्ये घुमतो... रेवती आरतीची थाळी घेऊन बाहेर हॉल मधे येत असते... तो ही गोंधळून आपल्या आईकडे पाहू लागतो...
" या चिरंजीव.... या.... " हॉल मध्ये बसलेले आदित्य राज त्याच्याकडे पाहून आनंदाने म्हणाले...
" बाबा, तुम्ही यावेळी घरी कसे काय ? " आर्यव्रत प्रश्नार्थक नजरेने आपल्या वडिलांकडे पाहून त्यांना विचारतो...
" आपल्या मुलाचा आनंदाने भरलेला चेहरा पाहण्यासाठी खास तुमच्या आधी मी घरात येऊन थांबलो आहे... " आदित्य राज अभिमानाने त्याच्याकडे पाहून म्हणाले...
" बाबा, पण तुम्हाला कसं काय समजले ? ' आर्यव्रत विचार करत असताना त्याला त्या मीटिंगमध्ये असलेले ग्रामपंचायत सचिव आठवतात...
" हो sss बरोबर विचार केला आहे... माझा मित्र आहे म्हटल्यावर माझ्या कानावर सगळी गोष्ट घालणार ना... " आदित्य राज हसतमुख त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाले....
" बाबा... " आर्यव्रत ने जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारली....
" आज तुम्ही पूर्ण गावात आमचं नाव मोठं केलं... आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो... " आदित्य राज अभिमानाने आपल्या लेकाच्या पाठीवरून हाच फिरवत म्हणाले...
" तुमच्या दोघांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असेल तर मी अजून खूप काही करू शकतो बाबा... " आर्यव्रत
" अहो sss आधी मला माझ्या मुलाचे ऑक्शन करू द्या... " रेवती त्याचा हात धरून त्याला खाली बसवते आणि त्याचं औक्षण करून गोडाचा घास भरवते...
" आर्य sss... तुम्ही तुमच्या या कामगिरीबद्दल श्रेयसा ला सांगितले आहे का? " आदित्य राज त्याच्याकडे पाहून त्याला विचारतात...
" नाही.... मी विचार करत होतो प्रत्यक्ष तिला भेटून सांगावे... " आर्यव्रत काहीसा विचार करत म्हणाले...
" हो sss चालेल की... आज सकाळी तुमचा दिवस आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने सेलिब्रेट करा.. " आदित्य राज शांतपणे त्यांच्याकडे पाहून म्हणाले....
" हो sss... " आर्यव्रत बोलून विचार करत आपल्या रूममध्ये निघून जातो... तो रूममध्ये जाऊन बाल्कनी मध्ये येऊन बसतो आणि आपला मोबाईल बाहेर काढून एक नंबर डायल करतो... थोडा वेळ त्याच्यावर बोलणं होतं मग तो फोन ठेवून , श्रेयसा चा नंबर डायल करतो... दोन-तीन रिंग मध्ये फोन उचलला जातो...
" हॅलो... " श्रेयसा
" काय करत आहेस ? " आर्यव्रत
" आता तयारी करत होते... बाबा म्हणाले की मी घरी आल्यावर तुला सोडायला येतो... ते आत्ताच घरी आले आहेत , थोड्यावेळात आम्ही तिकडे यायला निघू... " श्रेयसा
" एवढ्याशा गोष्टीसाठी आपल्या वडिलांना काय म्हणून त्रास द्यायचा... " आर्यव्रत खट्याळ स्वरात म्हणाले...
" म्हणजे, आई म्हणाली की अशी एकटी जाऊ नको... तुमचं नवीनच लग्न झालं आहे, तुझे बाबा सोडायला येतील ... " श्रेयसा त्याला सांगते...
"तुमचा स्वतःचा हक्काचा नवरा असताना तुम्हाला कोणी सोडायला यायची गरज काय आहे ? " आर्यव्रत
" आर्य... तू नक्की काय बोलत आहे , मला काही समजत नाही... " श्रेयसा गोंधळून विचारते...
" आता काही वेळातच आपली गाडी तुझ्या घराजवळ पोहोचणार आहे... ड्रायव्हरच्या हातात मी तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवले आहे.... ते उघडून बघा आणि संध्याकाळी ठीक साडेसात वाजता गावच्या बाहेरच्या हॉटेलवर येऊन मला भेटा... मी तिकडेच तुझी वाट पाहत आहे.... " आर्यव्रत बोलून फोन ठेवून देतो...
" हॅलो... आर्य sss... हॅलो.... " श्रेयसा बोलत असते पण समोरून फोन बंद झालेला असतो....
’ असा काय हा मुलगा... स्वतःचे बोलून झाले आणि फोन ठेवूनही दिला माझे काही ऐकूनही घेतले नाही... ’ श्रेयसा बंद झालेल्या फोनकडे पाहून मनामध्ये विचार करत होती की , तिला गाडीचा हॉर्न ऐकू आला... तशी ती पटकन आपल्या रूमच्या बाल्कनीमध्ये येऊन खाली पाहू लागली...
आर्यव्रत ने पाठवलेली गाडी त्यांच्या घराच्या बाहेर येऊन उभी राहते... गाडीमधून ड्रायव्हर खाली उतरतो आणि घराच्या आत येतो... श्रेयसा पळत आपल्या रूम मधून खाली येते पण खाली हॉलमध्ये आपल्या आई-वडिलांना दोघांनाही पाहून पायऱ्यांवरच उभी राहते...
" आर्यव्रत साहेबांनी पाठवले आहे... " तो ड्रायव्हर आत येऊन त्या दोघांकडे पाहून त्यांना सांगू लागला...
" जावईबापू ने काय पाठवले असेल ? " सुरभी प्रश्नार्थक नजरेने त्या ड्रायव्हरच्या हातात असलेल्या बॅग कडे पाहत हळू आवाजात श्रीकांत यांना विचारते....
" आता मला काय माहित... " श्रीकांत
" आई.... बाबाsss ते ssss ते त्यांनी माझ्यासाठी पाठवले आहे... " श्रेयसा पटकन पुढे येऊन त्याच्या हातात असलेली बॅग घेत आपल्या आई-वडिलांकडे पाहून म्हणाली...
" ठीक आहे... " सुरभी तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला गोंधळ पाहून हसून उत्तर देते... श्रेयसा ती बॅग घेऊन पळतच घाईने आपल्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद करून बेड वर जाऊन बसते...
" आपल्या मुलीचा असंसार खरच सुखाचा चालू आहे... " सुरभी हसून तिला जाताना पाहून आपल्या नवऱ्याला म्हणाली...
" मी येतो... " ड्रायव्हर त्या दोघांकडे पाहून त्यांना सांगतो...
" अरे असे कसे... थोडा वेळ बसा... त्यांच्या चहा नाश्त्याच बघा... " श्रीकांत सगळीकडे पाहून म्हणतात... सुरभी त्याला बसवते आणि आपल्या घरातल्या ताईंना त्यांच्या चहा नाश्त्याचे बघायला सांगते... थोडा वेळ बसून तिथला पाहून चार घेऊन तो ड्रायव्हर त्याची गाडी घेऊन निघून जातो...
श्रेयसा बेड वर बसून ती बॅग उघडून पाहते तर त्या बॅग मध्ये एक सुंदर लाल रंगाची जॉर्जेट सिल्क ची साडी असते... त्या साडीला मॅचिंग अशी ज्वेलरी असते आणि सोबतच एक छोटी चिट्टी असते.....
श्रेयसा अगदी प्रेमाने त्या साडीवरून आपला हात फिरवते.... त्या साडी वरून हात फिरवताना तिच्या हृदयाची धडधड वाढते... ती प्रेमाने चिठ्ठी उघडून वाचते....
" आज माझ्या बायकोने माझ्या रंगात रंगून मला भेटायला यावे अशी माझी इच्छा आहे... तिचा नवरा आज तिची आतुरतेने वाट पाहत आहे... Come soon dear....
Waiting for you.... "
आर्यव्रत ची चिठ्ठी वाचून श्रेयसा ने लाजून आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला , जणू काही त्या चिठ्ठी मधून आर्यव्रत स्वतः तिच्याकडे पाहत असल्यासारखे तिला भासू लागले... ती आपल्यात रूममध्ये बसून स्वतःशीच लाजू लागली... बराच वेळ ती त्या साडीकडे आणि ज्वेलरीकडे पहात होती, इतक्यात तिच्या फोनची मेसेज रिंग वाजली...
श्रेयसा ने बाजूच्या टेबलवर ठेवलेला आपला फोन हातात घेतला आणि मेसेज उघडून पाहिला...
" आता काय फक्त लाजत बसणार आहे की, लवकर तयारी करून मला भेटायलाही येणार आहेस... " आर्यव्रत चा मेसेज वाचून तर ती आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागली... आपण सध्या काय करत आहोत हे त्याला कसे काय समजले याचे तिला आश्चर्य वाटले... बेड वरून खाली उतरून तिने आपल्या पूर्ण रूमवर नजर फिरवली.... बाल्कनी कडेही पाहू लागली आणि मग स्वतःच्याच विचारावर स्वतः हसू लागली....
" वाट बघा... लवकरच तुमची बायको तुमच्या रंगात रंगून तुम्हाला भेटायला येत आहे... " तिने आपल्या मोबाईल वरून आर्य ला मेसेज पाठवला आणि ती साडी घेऊन तयारी करू लागली...
श्रेयसा ती साडी नेसून छान पैकी तयार झाली... केसाची छान हेअर स्टाईल करून मागे मोकळे सोडले, चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला, डोळ्यांमध्ये काजळ, ओठांवर हलक्या लाल रंगाची लिपस्टिक, कपाळावर छोटीशी लाल रंगाची नाजूक बिंदी, त्याने दिलेले माझी ज्वेलरी घालून श्रेयसा आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी तयार झाली होती...
श्रेयसा ने आपले ते सुंदर रूप आरशामध्ये पाहिले...
’ आर्य जेव्हा मला या ग्रुप मध्ये बघेल, तेव्हा त्याला मी अशीच सुंदर दिसेल ना? ’ तिने आरशात दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिबिंबाला प्रश्न केला.... पण तिला उत्तर स्वतःकडून नाही तर आपल्या नवऱ्याकडून पाहिजे होते....
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा