डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३९
श्रेयसा आपली तयारी करून रूम मधून बाहेर येते... खाली हॉलमध्ये तिचे आई-वडील दोघेही बसलेले असतात... त्यांची नजर तिच्यावर जाते...
श्रेयसा आपली तयारी करून रूम मधून बाहेर येते... खाली हॉलमध्ये तिचे आई-वडील दोघेही बसलेले असतात... त्यांची नजर तिच्यावर जाते...
" अगं बाई, माझी लेक किती सुंदर दिसत आहे.. " सुरभी तिला समोरून येताना पाहून आश्चर्याने बघत म्हणाली... तिचा आवाज ऐकून श्रीकांत चे लक्षात त्या दिशेने गेले...
" आई... मी बाहेर जात आहे.. आर्य ने मला भेटायला बोलावले आहे... " श्रेयसा आपल्या आई वडिलांजवळ येऊन म्हणाली... बोलताना आपके चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती...
" सुखी रहा बाळा... " तिच्या वडिलांनी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले... श्रेयसा ही आनंदाने आपल्या घरातून बाहेर पडली... ती गाडी मध्ये येऊन बसली आणि ड्रायव्हरने गाडी चालू केली... गाडी गाव बाहेर असलेल्या त्या हॉटेलच्या दिशेने धावू लागली... इकडे तिच्या हृदयाची धडधड वाढली....
काही वेळातच श्रेयसा त्या हॉटेल जवळ येऊन पोहचली... ती गाडीतून खाली उतरली आणि इकडे तिकडे पाहू लागली... आर्य तिला कुठे दिसला नाही म्हणून ती थोडी कावरी बावरी झाली....
ती थोडी हिम्मत करत हॉटेल च्या एंट्रन्स मधून आत चालत गेली... तिला पाहून हॉटेलचा मॅनेजर जो तिकडेच उभा होता तो पटकन पुढे आला...
" श्रेयसा मॅडम ? " मॅनेजरने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारलं..
" हो sss... " श्रेयसा ने उत्तर दिले
" This way mam... " मॅनेजरने सांगितले तशी ती त्याच्या मागोमाग चालू लागली.... मॅनेजर तिला त्या हॉटेलच्या एका बाजूने पुढे चालत घेऊन गेला... समोरच लिफ्ट होती... त्याने लिफ्टचे बटन दाबले... श्रेयसा ला आत जाण्याचा इशारा केला... श्रेयसा आजूबाजूला पहात लिफ्ट मध्ये गेली...
" 10th floor mam.... " मॅनेजरने तिच्याकडे पाहून तिला सांगितले... तिने होकारात मान हलवली आणि लिफ्ट मध्ये दिसणार दहा नंबरच बटन दाबलं... लिफ्ट सुरू झाली... तिच्या मनामध्ये आता भीती, एक्साईटमेंट, प्रेम, भेटण्याची ओढ सगळ्याच भावना एकत्र झाल्या होत्या त्यामुळे नक्कीच ला काय होत आहे हेच तिला समजत नव्हते....
लिफ्ट दहाव्या मजल्यावर येऊन थांबली आणि लिफ्टच्या दरवाजा उघडला... श्रेयसा बाहेर आली तेव्हा समोर एक व्यक्ती उभा होता.... कपड्यावरून तो त्या हॉटेलमध्ये काम करणार स्टाफ वाटत होता...
" This way mam.... " त्यानेही तिच्याकडे पाहून एका बाजूला जाण्याचा इशारा केला... श्रेयसा त्या दिशेने पुढे चालू लागली... आता तर आपल्या पायातही प्राण नसल्यासारखे तिचे पाय अडखळू लागले.... त्या संपूर्ण मजल्यावर शांतता पसरली होती... जास्त कोणी दिसतही नव्हते... अधून मधून फक्त एखादा हॉटेल स्टाफ दिसत होता त्यामुळे मन खूपच घाबरत होते पण त्याला बघण्याची ही मनाला ओढ लागली होती...
श्रेयसा त्या दिशेने चालत पुढे आली होती की, आपल्या समोरचा मी जरा पाहून मात्र थक्क झाली.... पुढे टेरेस टाईप ओपन लोन होता... तो पूर्णपणे वेगवेगळ्या फुलांनी सजवलेला होता परंतु त्या सजावटीमध्ये गुलाबांच्या फुलांचा उपयोग जास्त केला होता... तिने सगळीकडे नजर फिरवली... एका बाजूला बसण्यासाठी टेबल आणि खुर्ची होती... तो टेबलही छान सजवला होता... मधोमध मोठा स्विमिंग पूल होता... त्यातही गुलाबांच्या पाकळ्यांनी काही अक्षर लिहिली होती...
तिने अजून थोड पुढे जाऊन ती अक्षर वाचण्याचा प्रयत्न केला.... " Do You Love Me? " असे लिहून पाण्यामध्येच मोठा हार्ट काढण्यात आला होता...
स्विमिंग पूल च्या बाजूला एक मोठा सोफा होता तिकडेही त्याच्या बाजूला असलेल्या टेबलवरही छान सजवण्यात आले होते... सोफ्या च्या मागच्या भिंतीवर एक मोठा परदा होता, ज्यावर तिचे काही फोटो झळकत होते...
त्याच्याखालीही गुलाबांच्या पाकळ्यांनी " Do you Love me? " असा प्रश्न लिहिण्यात आला होता.... सगळीकडे सुहासिक कॅन्डल्स लावलेल्या होत्या त्यामुळे मंडप प्रकाश पडला होता... बाहेर आकाशातल्या चंद्राचाही उजेड दिसत होता.... श्रेयसा हे सगळं बघून भांबावून गेली होती परंतु अजूनही तिच्या नजरेला ते दिसलं नव्हतं जे पाहण्यासाठी इथपर्यंत आलो होती...
" आर्य sss.... " तिने थरथर त्या स्वरातच त्याला आवाज दिला....
" Yes my baby... " एका बाजूने आवाज आल्याबरोबर तिची नजर त्या बाजूला गेली... तिचा आर्य तिकडे काही अंतरावरच उभा होता...
आर्य ने काळ्या रंगाची जीन्स घातली होती... त्यावर लाल रंगाचे शर्ट घातले होते... वरून काळ्या रंगाचे डेनिम जॅकेट... केसं छान जेल लावून सेट केले होते... बियर्ड व्यवस्थित ट्रिम केली होती... त्याला असे अचानक समोर पाहून श्रेयसा ही पाहत राहिली...
" You are looking gorgeous... " त्याने पुढे येऊन तिच्या हातामध्ये सुंदर असा गुलाबांचा गुच्छ दिला...
" Thank you... " तिने प्रेमाने तो गुच्छ आपल्या हातात घेतला आणि त्यामध्ये असलेल्या गुलाबान वरून आपला हात फिरवला... तिकडच्या वातावरणामध्ये सगळीकडे फुलांचा सुहास दरवळत होता...
" Come... " आर्यव्रत ने तिच्याकडे पाहून तिला टेबलच्या दिशेने चालण्याचा इशारा दिला... ते दोघे ही त्या टेबल च्या दिशेने चालू लागले... आजूबाजूला सगळीकडे शांतता पसरली होती... मागे बॅकग्राऊंडला कुठेतरी सौम्य असे संगीत लागले होते... त्याचा हलकासा आवाज कानामध्ये घुमत होता...
" बस ना... " अरे तिच्यासाठी खुर्ची पुढे ओढली आणि तिला बसायला सांगितले... श्रेयसा ने त्याच्याकडे पाहून हलकी स्माईल केली आणि खुर्चीवर बसली... आर्यव्रत ही समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला... त्याने टेबलच्या बाजूला असलेले एक बटन दाबले... इतक्यात समोरून एक वेटर तिकडे आला...
त्याने त्या वेटर ला सांगून दोघांसाठी कॉफी आणि स्नॅक्स मागवले.... वेटर तिकडून ऑर्डर घेऊन निघून गेला... अजून ही दोघांमध्ये शांतता पसरलेली होती... श्रेयसा सगळ पाहून गोंधळून गेली होती... आनंद, आश्चर्य, एक्साईटमेंट अशा वेगवेगळ्या भावना तिच्या मनामध्ये भर घालून होत्या...
काही वेळातच तो वेटर त्यांनी दिलेली ऑर्डर घेऊन आला आणि व्यवस्थित टेबलवर मांडून तिकडून निघूनही गेला...
" तुला जशी आवडते अगदी तशीच कॉफी बनवायला सांगितली आहे... टेस्ट करून बघ... नक्की आवडेल... " आर्यव्रत कॉफीचा कप तिच्या पुढे सरकवत तिला म्हणाला... श्रेयसा ने तो कप आपल्या हातात घेतला आणि हळूहळू घोट घेत कॉफी पिऊ लागली...
" आज पहिल्यांदाच असे अवघडल्यासारखे वाटत आहे ना... म्हणजे बघ ना.. बोलायचं तर खूप काही आहे तुझ्यासोबत पण सुरुवात कुठून करू ते समजत नाही... " आर्यव्रत ही कॉफी पित म्हणाला...
" हम्म.. " श्रेयसा ला ही काय बोलावे सुचत नव्हते... त्यांनी आपल्यासाठी केलेली सगळी सजावट पाहून तिचं डोकं बधिर झालं होतं... मनामध्ये एक्साईटमेंट पण होती आणि आपल्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या भावना त्याच्या समोर कशा मांडाव्या याचा विचार करून हृदयाची धडधड ही वाढत होती...
" श्रेयसा, तुला तर माहीतच आहे आपलं लग्न ज्या परिस्थितीत झाले होते... लग्नानंतर आपल्याला एकमेकांसोबत जास्त बोलण्याची ही इच्छा नव्हती... तेव्हा जे विचार तुझ्या मनात चालू होते तसेच काहीसे विचार माझ्या मनातही चालू होते आणि म्हणूनच आपण एकमेकांना जितकं जास्त टाळता येईल तेवढा प्रयत्न करत होतो..." आर्यव्रत तिच्याकडे पाहून शांतपणे सांगत होता...
" हो ना... तेव्हा तर आपण एकमेकांना व्यवस्थित ओळखतही नव्हतो... लग्नाच्या आधी तर आपण एकमेकांना नीट पाहिलेही नव्हते... " श्रेयसा म्हणाली...
" तेव्हा मी आपल्या नात्याचा खूप विचार केला.. हे नातं मला मुळीच मान्य नव्हतं... असे कसे एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत लग्न करावे ते पण आत्याच्या पिढीमध्ये.. मला ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती आणि हे मी किती वेळा घरी बोलून दाखवले, पण तेव्हा ते काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते... " आर्यव्रत म्हणाला...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा