Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४०

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ४०

" मला ही... मी विचार केला होता की ज्या व्यक्तीसोबत मी लग्न करेल,  त्या व्यक्तीला आधी व्यवस्थित पडताळेल... तो कसा आहे, त्याची वागणूक कशी आहे, माझ्या मनात असणाऱ्या रूपरेखेत बसणार आहे का ?  हे सगळं मला आधी जाणून घ्यायचं होतं... " श्रेयसा..

" लग्न झाल्यानंतर एकाच घरात आपण असे अनोळखी सारखे वागत राहिलो असतो आणि ही गोष्ट जेव्हा आपल्या आई-वडिलांना समजले असती तर त्यांनाही खूप वाईट वाटले असते... त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून तर मी खरं तुझ्यासोबत मैत्री करण्याचा विचार केला की जेणेकरून अनोळखी होऊन एकमेकांसोबत राहण्यापेक्षा एकमेकांचे मित्र बनवून राहिलो तर एकमेकांना व्यवस्थित समजूनही घेता येईल...

असाच विचार करून मी तुझ्यासोबत मैत्री केली आणि तुला जाणून घेण्याचा प्रयत्न केला... जसा जसा मी तुला जाणून घेऊ लागलो, तसा तुझा स्वभाव मला आवडत गेला.. तुझ्यासोबत मैत्री करून खूप छान वाटले... जेव्हा आपल्याला आपला एखादा चांगला मित्र घरातच भेटतो तेव्हा मग बाहेर जाऊन वेगळे मित्र शोधण्याची गरज पडत नाही...

हळूहळू आपली मैत्री वाढू लागली आणि नकळतपणे कधी तुझा स्वभाव,  तुझा वागणं, तुझं माझ्याजवळ असणं मला आवडू लागलं मला समजले ही नाही...

मधल्या काही दिवसात माझ्या सॉफ्टवेअरच्या कामामुळे मी खूपच बिझी होतो आणि त्या गडबडीत मी तुझ्यासोबत घरच्यांसोबत व्यवस्थित वागलोही नाही... मला तेव्हा लक्षात आले नाही की, तो आपल्या रूमसाठी काही नवीन वस्तू आणल्या होत्या आणि त्या रूममध्ये ठेवल्याही होत्या , पण मी रागाच्या भरात त्या वस्तू तिकडून काढायला लावल्या... माझ्या रूममध्ये मला पुन्हा असे काही चालणार नाही असेही रागावून बोलून गेलो... तू रूम मध्ये ठेवण्यासाठी आणलेले ते काचेचे शोपीस ही माझ्या हातातून चुकून तुटले... मी एवढं सगळं वाईट  वागूनही तू एका शब्दाने मला काही बोलली नाही... ते सगळ शांतपणे सहन केलं... माझ्या त्या बोलण्या चे तुला खूप वाईट वाटले असेल ना ? " आर्यव्रत हळव्या स्वरात तिच्याकडे पाहून तिला सांगत होता...

" हो sss... त्या दिवशी मला खरंच खूप वाईट वाटलं होतं म्हणजे मी मनापासून शॉपिंग केली होती... त्या सगळ्या वस्तू घेऊन आले होते... तुम्ही त्या सगळ्या रूम मधून काढायला सांगितल्या आणि मला खूप आवडले होते ते शोपीस जे तुमच्या हातातून पडून तुटले... तुम्ही तेव्हा जे बोलला त्याने माझे मन खूप दुखावले गेले होते... " श्रेयसा ही हळवी झाली...

" सॉरी sss खरंच सॉरी... माझा तेव्हा तसा उद्देश नव्हता ग पण रागाच्या भरात मी नको ते बोलून गेलो... नंतरही ती गोष्ट माझ्या लगेच लक्षात आली नाही कारण मी माझ्या सॉफ्टवेअरच्या कामांमध्ये खूप बिझी होतो...

त्यानंतरही एकदा मला आईकडून समजले की तू माझ्या आवडीचा नाश्ता बनवून ठेवला होता आणि मी ते न खाता घरातून बाहेर पडलो... तेव्हाही तुला खूप वाईट वाटले असेल ना... " आर्यव्रत

" हो... मी तुमच्यासाठी मनापासून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला होता मला वाटले निदान तुम्ही खावून आवडले की नाही ते तरी सांगाल पण तुम्ही साधं बघितलेही नाही... " श्रेयसा

" अगं... तेव्हा पण आम्ही इतकी मेहनत करून आमचा सॉफ्टवेअर चालू केला होता त्यासाठी लवकर जाणे गरजेचे होते... संजय आणि प्रदीपही माझ्यासाठी लवकर निघाले होते त्यामुळे तो सॉफ्टवेअर मध्ये झालेला सगळा प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवून जेव्हा माझा सॉफ्टवेअर नीट चालेल हीच गोष्ट तेव्हा म्हणत होती आणि त्यामुळे त्यावेळी भूकही लागत नव्हती आणि अन्न ही खाण्याची इच्छा होत नव्हती... तेव्हा मला समजलेही नाही की तू माझ्यासाठी नाश्ता बनवला होता... तिथं नंतर आईने सांगितले... तरीही नकळतपणे माझ्याकडून तू पुन्हा एकदा दुखावली गेलीस... सॉरी... " आर्यव्रत दिलगिरी व्यक्त करत म्हणाला...

" ठीक आहे... असं सारखं सॉरी बोलू  नका... तुम्ही काही मुद्दामून केले नाही... तुमच्याकडून  हे सगळं नकळतपणे घडत गेलं... पण त्यावेळी त्या गोष्टींचे मला खूपच वाईट वाटले , तुमच्या वागण्या चे रडूही आले... तुमचे असे मला इग्नोर करणे अजिबात आवडत नव्हते, पण असे का होत आहे हेच मला समजत नव्हते... तुमच्या वागण्याने माझ्या मनात माझ्याच भावनांचा गोंधळ उडाला होता आणि असे का होत आहे हेही समजत नव्हते...  " श्रेयसा त्याला सांगत होती.. 

" माझ्या बाबतीतही असेच काहीसे होत होते... नीट विचार केल्यावर असे का होत आहे हे मला समजले... " आर्यव्रत हलकेच हसत तिच्याकडे पाहून म्हणाला...

" का होत आहे ? " तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारले...

" कारण नकळतपणे आपण दोघेही या नात्यांमध्ये एक पाऊल पुढे आलो आणि एकमेकांवर प्रेम करू लागलो... मलाही माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना समजल्या आणि मला असे वाटते की तुलाही त्या समजल्या असतील... " आर्यव्रत ने बोलताना हौस तिचा हात आपल्या हातात घेतला...  श्रेयसा चा हात त्याच्या स्पर्शाने थरथर करू लागला...

" मी बरोबर बोलत आहे ना... मी एक प्रश्न तुला विचारला आहे त्याचे उत्तर अजूनही मला मिळाले नाही... " आर्यव्रत तिचा आपल्या हातात असलेला हात जरासा दाबत तिला विचारतो...

" कोणता प्रश्न ? " माहित असून सुद्धा तिने न कळल्याप्रमाणे विचारले...

" मॅडम जर व्यवस्थित या रूमवर नजर फिरवली तर तुम्हाला तो प्रश्न सगळीकडे दिसेल... मनापासून माझ्यावर नजर फिरवली तर तो प्रश्न माझ्या मनातही दिसेल... " आर्यव्रत प्रेमाने तिच्या नजरेत पहा तिला विचारतो... त्यांनी आधीच पूर्ण रूममध्ये येतो प्रश्न लावलेला असतो त्यामुळे आता तिच्या त्या प्रश्नाचा काहीच अर्थ नसतो...

" बोल ना... तुझी ही शांतता माझ्या हृदयाची धडधड वाढवत आहे.... " आर्यव्रत आपला दुसरा हात आपल्या हृदयावर ठेवत तिच्याकडे पाहत म्हणाला...

" या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे मग तरीही तुम्ही मला का विचारत आहात ? " तिने त्याच्याकडे पाहून त्याला उलट प्रश्न विचारला...

" माहित असून देखील मला उत्तर तुझ्या तोंडातून ऐकण्याची इच्छा आहे...  " आर्यव्रत

" हो sss... " श्रेयसा बोलून खाली पाहून लाजू लागली...

" काय हो ? " त्याने पुन्हा तिला लागताना पाहून प्रश्न विचारला...

" तुमच्या प्रश्नाचे उत्तर... तेच तर तुम्हाला पाहिजे होते ना... " श्रेयसा बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाली...

" Do you love me? " त्याने लव्ह या शब्दावर जोर देत तिला विचारल...


" Yes... I love you... " तिने त्याच्या हातात असलेला आपला हात  घट्ट पकडून उत्तर दिले...

" या love you too baby... " आर्यव्रत ने प्रेमाने तिच्याकडे पाहून तिला म्हणाला... दोघेही प्रेमाने एकमेकांच्या नजरेत पाहत होते... आर्यव्रत तसाच तिचा हात आपल्या हातात ठेवून जागेवरून उठून उभा राहिला... त्याला पाहून तीही उठली...

आर्य ने प्रेमाने तिला आपल्याजवळ घेतले आणि तिच्या माथ्यावर हलकेच ओठ टेकवले... श्रेयसा चे डोळे आपोआप बंद झाले... त्यांच्या प्रेमाचा तो पहिला वहिला किस  त्यांना खूप काही सांगून जात होता... त्याचा तो उबदार स्पर्श तिच्या शरीरावर रोमांच उमलवत होता... 

तिने त्याच्या छातीवर आपले डोकं टेकवले आणि दोन डोळे बंद करूनच त्याच्या धडधड ऐकू लागली...  आर्य ने आपले दोन्ही हात तिच्या भोवती गुंडाळले आणि डोळे बंद करून तो ही तिचे आपल्या जवळ असलेले अस्तित्व अनुभवत होता...

दोघे बराच वेळ असेच एकमेकांच्या मिठी मध्ये सामावलेले होते... किती वेळ झाला असेल याचेही त्या दोघांना भान नव्हते...

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all