Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४२

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ४२

" मग मॅडम पुढे काय विचार केला आहे ? " आर्यव्रत गाडी चालवत तिच्याकडे पाहून तिला विचारतो...

" पुढे काय,  उद्या कॉलेजला जायचं... " श्रेयसा सहज उत्तर देऊन मोकळी होते...

" अग वेडाबाई , आपल्या नात्याचा पुढे काय विचार केला आहे? " आर्यव्रत नकारार्थी मान हलवत विचारतो...

" म्हणजे? मला समजले नाही... नात्याचा काय विचार करायला पाहिजे... " श्रेयसा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारते...

" श्रेया... मी तरी या नात्यांमध्ये पुढे जाण्याचा विचार करत आहे , पण मला तुझी ही इच्छा जाणून घ्यायची आहे... " आर्यव्रत

" मला पण तुमच्या सोबत या नात्याचा विचार करायचा आहे... " श्रेयसा

" Great... श्रेया , मी विचार करत होतो की पुढची काही दिवस मला या सॉफ्टवेअर चे काम बघावे लागणार आहे... गावच्या विकासासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग करणार आहे त्यामुळे पुढचे काही दिवस तरी माझे व्यस्त असतील... एकदा का सगळ्यांना व्यवस्थित समजावले की, मग त्यानंतर काही दिवस मग मी आपल्यासाठी काढू शकतो.... आपण दोघे मिळून काही दिवसासाठी कुठेतरी बाहेर फिरून यायचे का ? अर्थात तुझ्या कॉलेज ची सुट्टी घेऊन तुला जाणं जमत असेल तर... " आर्य गाडी चालवत असताना तिच्याकडे पाहून तिला विचारतो...

" पुढच्या महिन्यात आमच्या कॉलेजच्या एक्झाम आहे त्यानंतर मग आपल्याला बाहेर जायला वेळ मिळेल... " श्रेयसा

" हो चालेल ना..  त्या वेळात मीही माझं सॉफ्टवेअरचे काम करण्यामध्ये बिझी असेल... " आर्यव्रत

" तुमच्या सॉफ्टवेअरचे स्वप्न पूर्ण होत आहे ना... आपल्या या गावाला त्या सॉफ्टवेअरचा खूप फायदा होईल ना ? " श्रेयसा

" हो sss श्रेया... ही तर फक्त सुरुवात आहे अजून खूप काही करायचे आहे... माझ्या लाईफ मध्ये आधी फक्त गाव च्या विकासाचे स्वप्न होते, पण आता अजून एक स्वप्न आहे... " आर्यव्रत

" कोणते? " श्रेयसा

" आपल्या आयुष्याचे... या आधी मी कधीही लग्नाचा विचार केला नव्हता... आधी मला माझे स्वप्न पूर्ण करायचे होते, त्यानंतर मी मग याबद्दल विचार करणार होतो त्यामुळे आपला लाईफ पार्टनर कसा असावा याबद्दलही कधी काही ठरवले नव्हते... पण आता गोष्ट वेगळी आहे... आता माझ्या आयुष्यात माझा लाईफ पार्टनर आहे त्यामुळे त्याच्याबद्दल विचार करणे ही माझी जबाबदारी आहे... " आर्यव्रत

" मी पण कधी लग्नाबद्दल की होणाऱ्या लाईफ पार्टनर बद्दल जास्त काही विचार केला नव्हता,  पण आपल्या लाईफ पार्टनर मध्ये जे काही थोडेफार गुण असावे असे मला वाटत होते ते सगळे मला हळूहळू तुमच्यामध्ये दिसू लागले...

आपल्यामध्ये हळूहळू मैत्री झाली आणि मग मी तुम्हाला जेव्हा समजून घेऊ लागले... हळूहळू तुमचा स्वभाव मला आवडत गेला आणि मग माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराचे चित्र माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट झाले... मला जसा माझ्या जीवनाचा साथीदार पाहिजे होता तुम्ही अगदी तसेच आहात... " श्रेयसा

" खरंच! तुझं बोलणं ऐकून मला खरच खूप छान वाटलं... मी तुझ्या स्वप्नातला राजकुमारासारखा आहे हे ऐकून तर मला खूप आवडले... " आर्यव्रत तिची मस्करी करत म्हणाला...

" आर्य sss... " श्रेयसा काहीसा विचार करत त्याला आवाज देते...

" हो... " आर्यव्रत

" आपल्या लग्नाच्या वेळी मी लग्नासाठी सजले तर होते पण मनापासून नाही... तेव्हा ना मला त्या लग्नामध्ये काही इंटरेस्ट होता आणि नाही माझं लग्न ज्या सोबत होत आहे त्याच्यामध्ये पण आता गोष्ट वेगळी आहे....

आता मला मनापासून तुमच्यासाठी तुमची नवरी बनून तुमच्या समोर यायचे आहे.. नवरीच्या साज शृंगार मध्ये... " श्रेयसा

" हो श्रेया... मला पण तुला नवरीच्या विषयामध्ये पाहायचे आहे... माझी बनवायची आहे... " आर्यव्रत

" हो आर्य... मला पण... " श्रेयसा

बरीच रात्र झालेली असते त्यामुळे सगळीकडे अंधार पडलेला असतो.... रात्र झाल्यामुळे रस्त्यावर जास्त गाड्याही नव्हत्या... ते दोघे पण एकमेकांसोबत मस्त हसत बोलत चालले होते...

आर्यव्रत ने आपल्या आईला आधीच सांगितले असल्यामुळे त्याच्या आईने फोन करून आपल्या ड्रायव्हरला पाटील वाड्यात पाठवले होते... सुरभीने श्रेयसा चे काही महत्त्वाचे सामान एका बॅगमध्ये भरून ती बॅग त्याच्याकडे पाठवून दिली...

तो ड्रायव्हर ती बॅग आणून रेवती च्या हातात देतो... रेवती ती बॅग व्यवस्थितपणे त्यांच्या रूम मध्ये ठेवून देते...

" ही बॅग... ड्रायव्हर का घेऊन आला ? " आदित्य राज घरी आले होते त्यामुळे ती बॅग रेवतीला घर घेऊन जाताना पाहून आश्चर्याने विचारतात...

" आर्यव्रत या सुनबाईंना घेऊन बाहेर गेला आहे... त्यानेच मला तिचे सामान इकडे मागवायला सांगितले... ते दोघं फिरून डायरेक्ट घरी येणार आहेत... " रेवती खाली येताना सांगते...

" असे का? काही महत्त्वाचे काम होते का ? " आदित्य राज काळजीने विचारतात...

" काय ओ sss तुम्ही पण... आता लग्नानंतर चे महत्वाचे काम काय असते तुम्हाला वेगळे सांगायला पाहिजे का ? जसे काही तुम्ही आम्हाला कधी बाहेर घेऊन गेला नव्हता.. " रेवती लाजून उत्तर देते...

" अजूनही तुम्ही तशाच लाजत आहात... जशा लग्नाच्या वेळी लाजत होत्या... " आदित्य राज प्रेमाने त्यांच्याकडे पाहून उत्तर देतात..

" पण आता आपली वय ते राहिले नाही... आता आपला मुलगा मोठा झाला आहे आणि आपल्या घरात सुनबाई आले आहे... " रेवती

" मग काय झालं! घरी सून आली याचा अर्थ असा नाही की आपल्यातला प्रेम कमी झाले... " आदित्य राज

" इश्य sss... तुमच काहीतरीच असतं... थांबा मी तुमच्यासाठी गरम चहा घेऊन येते... " रेवती लाजून किचनमध्ये निघून जातात.... आदित्य राज हसतच त्यांना जाताना पाहत असतात...

आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेही उशिरा आणि जेवण करून येणार असल्याचे रेवतीला माहित असते म्हणून ते दोघेपण वेळेवर जेवण करून आपल्या रूममध्ये निघून जातात....

आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेही एकमेकांसोबत म्हणू शकतो गप्पा मारत असतात... पूर्ण रस्ता मोकळा असल्यामुळे आर्यव्रत आरामशीर गाडी चालवत असतो...

अचानक त्यांच्या समोरून एक मोठा ट्रक भरधाव वेगात त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसतो....

" आर्य sss.... " श्रेयसा चे लक्ष त्या दिशेने जाते तशी ती घाबरूनच ओरडते....

" तू घाबरू नको श्रेया.... " आर्यव्रत आपली गाडी व्यवस्थित नियंत्रित करत त्या ट्रकला चुकवण्याचा प्रयत्न करत रस्त्याच्या एका बाजूने पुढे जात असताना त्या ट्रक च्या ड्रायव्हरचा आपल्या ट्रक वरून पूर्णपणे नियंत्रण सुटतो आणि त्या ट्रकची जोरदार धडक आर्यव्रत च्या गाडीला बसते.... ट्रक वेगात असल्यामुळे धडक ही खूप वेगाने लागलेली असते....

" श्रेया sss .... " आर्यव्रत तिला वाचवण्यासाठी तिला आपल्या भाऊपाशात पूर्णपणे सामावून घेण्याचा प्रयत्न करतो.... ट्रकच्या धक्क्यामुळे त्यांची गाडी पूर्ण उलटी होते... गाडीची पुढच्या बाजूची काच तुटून सगळीकडे विखरली जाते.... काचांचे छोटे छोटे तुकडे आर्यव्रत च्या शरीरावर लागतात....

त्यांची गाडी रोड वरून अल्टी पलटी होत रोडच्या बाजूला असलेल्या खोलगट अशा खडकाळ भागात जाऊन उलटी पडते... रात्रीची वेळ असल्यामुळे त्या भागामध्ये कोणी ही नसते.... गावचा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याला त्या वेळी कोणती वाहने ही नव्हती त्यामुळे योग्य वेळी त्यांची मदत करण्यासाठी तिकडे कोणीही पोहोचू शकले नाही....

गाडी बराच वेळ त्या खडकाळ भागात जाऊन उलटी पडली होती, पण आत मधून कोणतीही हालचाल झाली नव्हती... काही वेळाने अचानक श्रेयसा ने अलगद आपले डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहू लागली.... तिचा ड्रेस पूर्णपणे रक्ताने माखला होता... तिच्या अंगावर असलेले रक्त पाहून ती खूपच घाबरून गेली.... तिची नजर बाजूला गेली आणि भीतीने तिच्या पोटात गोळा दाटून आला....


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all