Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४६

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ४६

" डॉक्टर sss डॉक्टर... या पेपरवर हे काय लिहिले आहे ? " आदित्य राज त्यांना ते पेपर दाखवत विचारतात...

" ही सगळी फॅमिली असते... कोणत्याही ऑपरेशन आधी आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांकडून असा फॉर्म साइन करून घेणे गरजेचे असते... " डॉक्टर समजावण्याच्या स्वरात सांगतात...

" पण तुम्ही तर सांगितले होते ना की,  ऑपरेशन नंतर माझा आर्य बरा होईल... मग या फॉर्ममध्ये असे का लिहिले आहे ? " आदित्य राज भीती च्या स्वरात विचारतात...

" हो sss हे बघा , जेवढ आमच्या हातात आहे तेवढ करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू... बाकी वरच्याची जशी इच्छा... पण आपल्या हातात वेळही खूप कमी आहे... " डॉक्टर

" डॉक्टर तुम्ही ऑपरेशनची जी काय प्रोसिजर आहे ते पूर्ण करा... आम्ही हा फॉर्म भरून  तुम्हाला लवकरात लवकर देतो... " श्रीकांत मध्ये बोलत डॉक्टरांना सांगतात... डॉक्टर होकारात मान हलवत तिकडून निघून जातात....

" श्रीकांत अहो पण हे सगळं... " आदित्य राज त्यांच्या हातात फॉर्म देत त्यांना विचारतात... श्रीकांत एकदा स्वतः तो फॉर्म व्यवस्थित वाचून घेतात...

" आदित्य राज आता जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही बघा.... आपण जेवढा वेळ घेऊ तेवढा त्याच्या जीवावरचा धोका वाढणार आहे... तुम्ही आता खंबीर होऊन या फॉर्मवर सिग्नेचर करा.... आपल्याला अजून त्या लोकांनाही सांभाळायचे आहे... श्रेयसा ला जेव्हा शुद्ध येईल तेव्हा सगळ्यात आधी ती आर्य बद्दल विचारणार आहे... " श्रीकांत त्यांच्याकडे पाहून त्यांना धीर देत म्हणाले...  आदित्य राज यांनी खंबीर होऊन तो फॉर्म पूर्ण भरला.... श्रीकांतने त्यांना तिकडे बसवले आणि तो फॉर्म डॉक्टरांना देण्यासाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले...

" डॉक्टर sss... " श्रीकांतने त्यांच्या केबिनच्या दरवाजावर नॉक करत आवाज दिला....

" हो sss या... बसा.... " डॉक्टरने त्यांच्याकडे पाहून त्यांना आत येऊन बसायला सांगितले...

" डॉक्टर मी मुद्दामून त्यांच्यासमोर काही विचारले नाही पण मला तरीही  तुमच्याकडून या ऑपरेशन बद्दल जाणून घ्यायचे आहे... आर्यव्रत ठीक आहे ना ? " श्रीकांत यांनी गंभीर स्वरात त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारले....

" हे बघा,  तुमच्याकडून लपवण्यात काही अर्थ नाही... आर्यव्रत यांची तब्येत खरच खूप नाजूक आहे.... त्यांच्या शरीरातलं खूप रक्त गेला आहे आणि त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा ही झाल्या आहेत... हे ऑपरेशन करणे खूप महत्त्वाचे आहे पण ही ऑपरेशनच्या रिझल्टची आम्ही शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही.... " डॉक्टरांनी सविस्तरपणे त्यांना सांगितले... तसे श्रीकांत ही शांत चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहू लागले...

थोडा वेळ डॉक्टरांसोबत बोलून श्रीकांत त्यांच्या केबिन मधून बाहेर आले.... आदित्य राज अजूनही ऑपरेशन थेटर च्या दरवाजामध्ये उभा राहून आपल्या मुलाला पाहत होते... तो एक बाप होता त्यामुळे आपल्या डोळ्यात अश्रू दाखवू शकत नव्हता,  पण आपल्या पोटच्या गोळ्यासाठी जेवढा त्रास एका आईला होतो तेवढाच त्रास एका बापालाही होत असतो....

श्रेयसा त्या डोळ्यांची हळूहळू हालचाल होऊ लागली... तिच्या हाताची बोटे ही हलू लागली...

" श्रेया sss बाळा..... श्रेया.... " सुरभीला तिच्या हालचालीची जाणीव झाली तशी ती पटकन उठून तिच्या गालावरून हात फिरवत आवाज द्यायला लागली...  सुरभी चा आवाज ऐकून रेवतीही तिच्या जवळ येऊन उभी राहिली....

" आ sss र्य...... आ , र.... य....... " श्रेयसा चे डोळे बंद होते पण तरीही तिच्या ओठांमधून हलके शब्द बाहेर पडत होते... सुरभी आणि रेवती दोघींनीही ते शब्द ऐकण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांना समजले तेव्हा मात्र त्या दोघी पण एकमेकींकडे पाहू लागले....

" श्रेया.... बाळा... इकडे बघ... मी तुझी आई.... डोळे उघड.... " सुरभी प्रेमाने तिच्या केसावरून हात फिरवत हळू आवाजात म्हणाली... श्रेयसा ने हळूहळू आपल्या पापण्या वर करत सुरभी कडे पाहिले....

" आ... ई.... मी.... " श्रेयसा आपले डोळे फिरवत इकडे तिकडे पाहत एक एक शब्द उच्चारत होती...

" हो sss बाळा... मी आहे , तुझ्या जवळच आहे... " सुरभी नही तिचा हात आपल्या हातात पकडला आणि तिला धीर देत म्हणाली....

" श्रेया.... बाळा बरं वाटत आहे ना ? " रेवती पण दुसऱ्या बाजूने तिच्या जवळ येऊन बसली आणि तिला विचारू लागली...

" आर्य..... " रेवतीकडे पाहून लगेच श्रेयसा च्या डोळ्यात प्रश्न निर्माण झाला...  रेवती एक नजर सुरभी कडे पाहून शांत झाली... आता ती काय उत्तर देणार होती कोणत्या तोंडाने... श्रेयसा ची तबीयत ही बरी नव्हती त्यामुळे तिला खरं सांगून अजून तिचा त्रास वाढवण्याचा विचारही त्यांना करू वाटत नव्हता...

" आर्य sss कुठे ? " श्रेयसा त्या दोघींच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना विचारू लागली.... कुठेतरी तिच्याही मनामध्ये भीतीची लहर संचारली....

" श्रेया sss बाळा... तू आराम कर , जास्त विचार करू नको... आम्ही आहोत ना इकडेच...  " सुरभी तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली....

" नाहीsss मला आर्य ला भेटायचे आहे... आता त्यांना बघायचे आहे... ते कुठे आहेत  ? " तिच्या दोघींकडे पाहून त्यांना प्रश्न विचारू लागली.... तिचे प्रश्न ऐकून इकडे रेवतीचे मन भरून आले , तिला तिच्या अश्रू अनावर होऊ लागले म्हणून ती  पटकन त्या रूममधून बाहेर आली .... रेवतीला असे अचानक रूम मधून बाहेर येताना पाहून आदित्य राज आणि श्रीकांत दोघेपण आश्चर्याने एकमेकांकडे पाहून पटकन तिच्या दिशेने धावत तिच्या जवळ आले....

" रेवती,  काय झालं ?  तू अशी का रडत आहेस ? श्रेयसा कशी आहे ? " आदित्य राज यांनी काळजीने तिच्याजवळ येऊन तिला विचारलं... श्रीकांत त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी तिकडे थांबले नाही ते पटकन रूममधून आत निघून आले...

" अहो sss तिला शुद्ध आली आहे , पण शुद्धीवर आल्यापासून ती आर्य बद्दलच विचारत आहे... आता तिला काय उत्तर देऊ ? " रेवती रडक्या स्वरात त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते...

" नाही रेवती.... तिला आर्य च्या तब्येतीबद्दल काहीही समजायला नको... आपण आपल्या एका मुलासाठी दुसऱ्या मुलीचा जीव डोक्यात घालू शकत नाही.... मी पटकन डॉक्टरांना भेटून श्रेयसा शुद्धीवर आली आहे ते सांगतो... " असे बोलून आदित्य राज डॉक्टरांना सांगायला जातात...

त्यांचं बोलणं ऐकून डॉक्टरही श्रेयसा ला चेक करण्यासाठी पटकन त्या रूममध्ये येतात... तिचे आई वडील तिच्याजवळच बसलेले असतात....

" थांबा एक मिनिट , बाजूला व्हा... मला पेशंटला एकदा चेक करून द्या..." डॉक्टर त्या दोघांनाही दोन्ही बाजूला पाहून म्हणाले... श्रीकांत तिकडून बाजूला झाले... डॉक्टर तिच्या जवळ आले आणि तिला चेक करू लागले... 

डॉक्टर तिला चेक करत जसे प्रश्न विचारत होते त्या प्रश्नांची ती उत्तर देत होती.... तिला लावलेली सलाईन संपली होती म्हणून डॉक्टरांनी ती काढून बाजूला ठेवली...

" आता यांची तबीयत व्यवस्थित आहे... तरीही आजचा एक दिवस तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवता येईल... उद्या पाहिजे तर तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता... " डॉक्टर त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना सांगून तिकडून निघून जातात...

" आर्य sss ते कुठे आहेत ? तुम्ही सगळे मला त्यांच्याबद्दल का सांगत नाही.... मला त्यांना बघायचे आहे... " श्रेयसा त्या सगळ्यांकडे पाहून रडक्या स्वरात त्यांना म्हणाली...

" बाळा आधी तुझी तबीयत व्यवस्थित होऊ दे मग आम्ही तुला त्याच्याकडे घेऊन जातो.... " सुरभी तिच्याकडे पाहून तिला समजावण्याच्या स्वरात सांगू लागते....

" नाही आई.... त्यांना बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही... मला फक्त एकदा त्यांना बघू द्या... मी तुमच्यापुढे हात जोडते, पण माझे आर्य कुठे आहेत मला सांगा ? " श्रेयसा रडकुंडीला आली होती....


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all