डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४७
" श्रेया sss बाळा .. तुला अशा अवस्थेत पाहून तुझ्या आर्य ला ते आवडणार आहे का ? तुला असे पाहताना त्याला कसे वाटेल ? " तिची होणारी घालमेल पाहून शेवटी आदित्य राज शांतपणे तिला समजावतात....
" बाबा तुम्ही सांगा ना मला, ते कसे आहेत ? मग मी त्यांना बघण्याचा हट्ट करणार नाही... " ती पण त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते... आपल्यावर तिचा असलेला विश्वास पाहून आदित्य राज यांचे मन भरून येते... तिला खोटं सांगण्याची ही त्यांची इच्छा होत नाही परंतु खरं सांगून तिला होणारा त्रासही ते बघू शकत नव्हते....
" तो ठीक आहे.... त्याला शुद्ध आल्यावर त्यांनीही आधी तुझ्याबद्दल विचारले होते.. पण डॉक्टरांनी आता त्याला इंजेक्शन दिले आहे त्यामुळे तो झोपला आहे... उठल्यावर त्याला तुझ्याकडे घेऊन येतो... पण आता तू असा हट्ट करू नकोस आणि तू पण आता थोडा खाऊन या मेडिसिन घे आणि आराम कर.... " आदित्य राज तिचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने समजावतात...
" ठीक आहे... " त्यांच्या बोलण्यावर ती पण शांतपणे विश्वास ठेवते... सुरभी तिला थोडा फळांचा ताजा ज्यूस देते... तिची तो ज्यूस पिण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु आता त्यांचा मान राखण्यासाठी ती कसाबसा थोडा ज्यूस संपवते...
" आई बस झाल... मला काही खायची इच्छा नाही... " श्रेयसा
" ठीक आहे... डॉक्टरांनी या मेडिसिन घ्यायला सांगितले आहेत.... " सुरभी तिच्या हातात काही मेडिसिन देते... श्रेयसा त्या मेडिसिन खाते.... काही वेळातच मेडिसिन ची गुंगी तिच्यावर चढू लागते आणि ती झोपून जाते....
" आता तर कशीबशी झोपली आहे परंतु पुन्हा जेव्हा ती उठेल आणि आर्य बद्दल विचारेल तेव्हा तिला काय उत्तर द्यायचे ? " तिला झोपलेले पाहून सुरभी प्रश्नार्थक नजरेने श्रीकांत कडे पाहून त्यांना विचारते....
" तुम्ही डॉक्टरांना भेटलात का ? आर्य ची तबीयत आता कशी आहे ? डॉक्टर काय बोलले ? " रेवती आदित्य राज यांच्याकडे पाहून एकावर एक प्रश्न विचारते...
" रेवती... डॉक्टरांनी त्याच्या ऑपरेशनची प्रोसिजर सुरू केली आहे.... ऑपरेशन करण्यासाठी शहरातून एक स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम बोलावली आहे.... आपला आर्य ही लवकर बरा होईल... " आदित्य राज तिला शाश्वती देत म्हणाले....
" ऑपरेशन... कसले ऑपरेशन आणि त्याची गरज काय आहे ? " रेवती आणि सुरभी या दोघींनीही डॉक्टरांचे बोलणं ऐकलं नव्हते त्यामुळे त्यांना हे सगळं ऐकून आश्चर्य वाटते...
" गरज आहे रेवती... त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी खूप जखमा झाले आहेत आणि त्याचा रक्तही खूप गेले आहे... " आदित्य राज
" मला माझ्या बाळाला बघायचं आहे.... मला आता त्याला बघायचे आहे... " त्यांचं बोलणं ऐकून तिच्या पोटामध्ये भीतीने गोळा निर्माण झाला आणि ती लगेच जागेवरून उठून त्यांच्याकडे पाहून हट्टी स्वरात म्हणाली...
" रेवती अजून त्याला शुद्ध आली नाही त्यामुळे तुला त्याला भेटता येणार नाही... " आदित्य राज
" मी लांबूनच त्याला पाहिल ओ sss पण प्लीज मला फक्त एकदा माझ्या डोळ्यांनी माझ्या बाळाला बघू द्या... " रेवती विनवणी च्या स्वरात त्यांच्याकडे पाहून बोलत रडू लागली....
" रेवती अशी रडू नको... हे बघ तुला असा धीर सोडून चालणार नाही... आपणच जर आपला धीर सोडला तर मग श्रेयसा ला कोण सांभाळेल... आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती शांत झाली आहे ना... " आदित्य राज
" ती आराम करत आहे तोपर्यंत तुम्ही मला आधी माझ्या आर्य कडे घेऊन चला... " रेवती
" बर sss चला.... " आदित्य राज
" मला पण यायचे आहे... आर्य ला बघायचं आहे... " सुरभी पण आपल्या जागेवरून कुठून उभी राहते आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगते... आदित्य राज आणि श्रीकांत दोघेपण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागतात....
" श्रीकांत तुम्ही थोडा वेळ इकडेच थांबा , मी या दोघींना घेऊन जातो... " आदित्य राज
त्या दोघी पण आदित्य राज यांच्या मागोमाग चालू लागतात... ते ऑपरेशन थेटर च्या जवळ येऊन उभे राहतात...
" आत जाऊन त्याला बघण्याची परमिशन नाही परंतु तुम्ही दरवाजा मधून त्याला पाहू शकता... " आदित्य राज ऑपरेशन थेटरच्या दिशेने इशारा करता दोघींना सांगतात... त्या दोघी पण हळूहळू एक पाऊल पुढे टाकत ऑपरेशन थेटर जवळ जातात....
ऑपरेशन थेटर च्या बेडवर शांतपणे झोपलेल्या आर्यव्रत कडे पाहून रेवतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.... सुरभी ला ही तिचा रडू आवरत नाही....
" आज पहिल्यांदाच मी माझ्या लेकराला अशा अवस्थेत पाहत आहे.... " रेवती आपल्या साडीचा पदर डोळ्याला लावत रडक्या स्वरात म्हणाली...
" धीर धरा ताई... सगळं काही व्यवस्थित होईल... आपल्या देवावर विश्वास ठेवा... " सुरभी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून समजावण्याचा प्रयत्न करू लागली.... त्या दोघी आर्य कडे पाहत होत्या की, वॉर्ड बॉय आणि नर्स तिकडे आल्या.... ती लोक आत जाऊन त्या मशीनवर काहीतरी करत होते...
" अहो sss.... " तिने लगेच आदित्य राज यांच्याकडे पाहिले... ते पण नर्स लोकांना काहीतरी करताना पाहून पटकन पुढे आले...
" तुम्ही काय करत आहात ? " आदित्य राज यांनी तिकडे असलेल्या एका नर्स कडे पाहून त्यांना विचारले....
" डॉक्टरांनी यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करायला सांगितले आहे..... त्या सगळ्या मशीन आम्हाला आयसीयू मध्ये शिफ्ट कराव्या लागतील.... " नर्स त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगू लागली....
" पण डॉक्टर तर ऑपरेशन बद्दल बोलत होते ना ? " आदित्य राज प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारतात...
" हो sss आणि ऑपरेशन साठी शहरातून डॉक्टरांची टीम निघाली आहे, पण त्यांना इकडे पोहोचेपर्यंत रात्र होईल त्यामुळे मी डॉक्टरांनी पहाटे लवकरच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.... तोपर्यंत आम्हाला त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करावे लागेल.... " नर्स त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगतात....
आर्यव्रत ला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात येते... त्या सगळ्या मशीनच्या वायरी पुन्हा एकदा त्यांच्या शरीराला लावल्या जातात..... अजूनही त्यांना शुद्ध आलेली नसते..... आयसीयू त्याच मजल्यावर थोड्या पुढच्या बाजूला असल्यामुळे सगळे तिकडेच बाहेर बसून असतात.... सुरभी फक्त श्रेयसा जवळ बसलेली असते....
संध्याकाळच्या वेळी श्रीकांत स्वतः खाली जाऊन त्या सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन येतात...
" नाही sss माझी काहीही खाण्याची इच्छा नाही.... " आदित्य राज एक नजर त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणाले....
" असे करून चालेल का ? थोडा चहा घ्या म्हणजे बरं वाटेल.... आपल्या मुलांसाठी आपल्याला खंबीरपणे उभा राहिला शरीरात तेवढी ऊर्जाही पाहिजे ना.... " श्रीकांत त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना समजावत होते.... त्यांनी जबरदस्ती करून आदित्य राज आणि रेवती या दोघांनाही चहा आणि थोडा नाष्टा खायला सांगितला.... सुरभीसाठी आणलेले पदार्थ त्यांनी रूममध्ये तिला आणून दिले.... आर्य मुळे त्यांनाही खायची इच्छा नव्हती परंतु आपल्या लेकीच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी कसाबसा तेवढा नाष्टा संपवला....
रात्र सरत चालली होती... सगळीकडे अंधार पडला होता.... डॉक्टर थोड्या थोड्या वेळाने येऊन आर्य ला बघून जात होते.... शहरातील डॉक्टरांची टीम इकडे पोहोचायला अजून बराच अवधी होता...
श्रेयसा ला आता जागी येऊ लागली होती... तिने आपले डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले... घशाला कोरड पडल्यासारखी झाली म्हणून पाणी शोधू लागली.... तिच्या बाजूच्या टेबलवर पाण्याचा जग आणि एक पेला ठेवला होता... तिने बाजूला पाहिले तर सुरभी आपल्या एका हातावर डोकं ठेवून डोळे बंद करून पडली होती...
तिला त्रास नको म्हणून श्रेयसा ने हळूच उठून थोडं वाकून समोर असलेल्या टेबलवरचा पेला उचलण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तिचा हात लागून तो पेला खाली पडला आणि त्या शांत रूममध्ये मोठा आवाज झाला...
क्रमशः
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा