डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४८
त्याच्या आवाजाने सुरभीलाही पटकन जाग येते आणि ती उठून आजूबाजूला पाहू लागते... श्रीकांत, आदित्य राज आणि रेवती हे सगळे तिकडेच रूमच्या बाहेर बसलेले असतात त्यामुळे आवाजाने ते पण धावत रूममध्ये येतात....
" काय झालं? " सगळेजण एक साथ तिच्याकडे पाहून तिला विचारतात...
" पाणी.... " श्रेयसा सगळ्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तिला अवघडल्यासारखे वाटू लागते...
" हा देते... " सुरभी पटकन आपल्या जागेवरून उठून तिला पाणी देते... श्रेयसा सगळं पाणी हळूहळू पिते...
" आता कसं वाटत आहे ? " रेवती पुढे जाऊन काळजीने विचारते...
" ठीक आहे... " श्रेयसा
" काही दुखणं जाणवत आहे का ? " रेवती
" नाही... पण माहित नाही का मन बैचेन होत आहे... " श्रेयसा
" नको काळजी करू... हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे होत असेल... " रेवती
" आई sss तुम्ही आर्यला भेटून आलात ... त्यालाही आता जाग आली असेल ना ? तो अजून मला भेटायला नाही आला... " श्रेयसा इवलस तोंड करत म्हणाली....
" आला होता, पण तेव्हा तू झोपली होतीस म्हणून मग त्याने तुला डिस्टर्ब केले नाही... " सुरभी खोटं सांगते...
" कमाल आहे त्यांची... त्यांच्या येण्याने मी काय डिस्टर्ब होणार होते... उलट त्यांना समोर पाहून मला आनंद झाला असता ना... जाऊदे, मी आता त्यांना भेटायला जाते... ते झोपले असतील तरी मी त्यांना उठवणार.... तुम्ही कोणीही मला ओरडायचे नाही.... " श्रेयसा हसत सगळ्यांकडे पाहत त्यांना सांगते...
" श्रेया.... डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितला आहे त्यामुळे तू या रूमच्या बाहेर जाऊ शकत नाही... " सुरभी तिचा खांदा पकडून तिला जागेवर बसवत म्हणाली....
" अग आई, तू कुठे एवढ्या डॉक्टरांचं बोलणं मनावर लावत आहेस.... मी एकदम ठीक आहे... व्यवस्थित चालू शकते आणि मी जास्त वेळ तिकडे थांबणार नाही... डॉक्टर येण्याच्या आत मी परत माझ्या रूममध्ये येते.... बाबा तुम्ही चला माझ्यासोबत नाहीतर आई मला जाऊ देणार नाही... " श्रेयसा आपल्या वडिलांकडे पाहून त्यांना लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करते...
" श्रीकांत घेऊन जा तिला... तिलाही बघण्याचा अधिकार आहे... " आदित्य राज त्यांच्याकडे पाहून म्हणाले.... त्यांना आता माहित होते की कितीही तिला अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती काही अडणार नव्हती.... कधी ना कधी ही गोष्ट तिलाही समजणार होती आणि आता तिची तब्येत बऱ्यापैकी सुधारली होते त्यामुळे हीच योग्य संधी होती तिला सांगण्याची...
" चल.... " श्रीकांत पुढे येऊन तिला उतरायला आधार देतात... श्रीकांत तिचा हात पकडून तिला आय सी यु दिशेने घेऊन जातात.... सुरभी आणि रेवती दोघी पण त्यांच्यापासून काही अंतरावर त्यांच्या मागे चालत असतात... आय सी यु जवळ येऊन ते थांबतात...
" बाबा... आर्य कोणत्या रूम मध्ये आहे ? " ती एका बाजूला असलेल्या अरुण कडे पाहून त्यांना विचारते....
" या समोरच्या.... " ते आय सी यु कडे बोट दाखवून तिला इशारा करतात... तशी ती शांत झाल्याने त्या रूम कडे पाहू लागते.... रूमच्या दरवाजाला वर मोठी गोलाकार काच होती... श्रेयसा हिम्मत करत एक एक पाऊल पुढे टाकत त्या दरवाज्याच्या जवळ येऊन उभी राहते.... त्या काचे मधून तिची नजर आत झोपलेल्या आर्य वर जाते आणि त्याच्या शरीरावरच्या जखमा त्याच्या शरीरावर असलेल्या त्या सगळ्या वायरी आणि आजूबाजूला असलेल्या सगळ्या मशीन चे आवाज ऐकून मात्र तिचे डोकं गर गरू लागते....
श्रेयसा तिकडेच खाली कोसळते... श्रीकांत तिच्या मागेच असल्यामुळे ते पटकन पुढे येऊन तिला सावरतात...
" बाबा... आर्य sss ते असे का झोपले आहेत ? त्या रूममध्ये एवढ्या सगळ्या मशीन का लावलेले आहेत ? तुम्ही सगळ्यांनी मला त्यांच्याबद्दल खोटं सांगितले... " श्रेयसा चा आवाज हळवा झाला होता....
" फक्त तुझ्यासाठी बाळा... तुझ्या तब्येतीमुळे तुला सांगितलं नाही.... " श्रीकांत तिला धीर देत म्हणाले...
" बाबा आर्य कसे आहेत? डॉक्टर काय म्हणाले ? त्यांना इकडे आयसीयू मध्ये का ठेवले आहे ? " श्रेयसा त्यांच्याकडे पाहून त्यांना एकावर एक प्रश्न विचारते...
" उद्या पहाटेचे ऑपरेशन आहे... त्यासाठी शहरातून एक डॉक्टरांची टीम येणार आहे... या सगळ्या मशीन व्यवस्थित रिस्पॉन्स कराव्यात म्हणून आयसीयू मध्ये ठेवले आहे... " श्रीकांत तिच्या प्रश्नांची उत्तरे देतात... आता अजून काहीही तिच्यापासून लपवण्याची त्यांची इच्छा नसते...
" मला त्यांना जवळून बघायचे आहे... मी इकडे त्यांच्याजवळ बसून राहणार जोपर्यंत त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत... " श्रेयसा रडक्या आवाजात म्हणाली....
" हे शक्य नाही बाळा... डॉक्टर कोणालाही आज जाण्याची परमिशन देत नाही... तुम्ही बाहेरूनच बघू शकता असे त्यांनी सांगितले आहे... आणि सध्या तुझी परिस्थिती ही ठीक नाही त्यामुळे तू तुझ्या रूममध्ये चल आणि आराम कर.... " श्रीकांत
" नाही बाबा... मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही... " श्रेयसा
" असा हट्ट नको करू ग पोरी... तुला स्वतःकडे लक्ष द्यावं लागणार आमच्यासाठी नाही निदान स्वतःच्या आर्य साठी तरी आमचे ऐक आणि रूममध्ये चल.... तुला तुझ्या आर्य ची शपथ आहे... " श्रीकांत... आर्य ची शपथ दिल्यामुळे ती पण गपचूप आपल्या रूममध्ये येऊन आराम करते... परंतु शांत बसून असते कोणासोबत एक शब्दही बोलत नाही...
रात्रीच्या वेळी सुरभी तिला थोडे जेवण भरवते... मोजून दोन-चार घास खाऊन ती नकार देते... सुरभी तिला तिच्या मेडिसिन देते... त्या मेडिसिन घेऊन श्रेयसा शांत डोळे बंद करून झोपून जाते... तिचं वागणं सगळ्यांना समजत असते परंतु आता कोणीही काही करू शकत नव्हते म्हणून सगळे शांत होते....
हळूहळू मेडिसिन ची गुंगी तिला चढू लागली आणि ती झोपली.... सुरभी तिच्या बाजूला बसून होती बाकीचे सगळे बाहेर आयसीयूच्या जवळ येऊन बसले होते.... खूप रात्र झाल्यामुळे सुरभी चा ही बसल्या जागेवर डोळा लागला...
रात्रीच्या एक दीड च्या दरम्यान ती डॉक्टरांची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल झाली... हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरांनी त्यांना आर्य च्या तबीयत बद्दल सगळी माहिती व्यवस्थित दिली.... ते सगळे आयसीयू मध्ये येऊन एकदा आर्य ला चेक करू लागले... सगळ्यांची चाललेली गडबड पाहून श्रीकांत आणि आदित्य राज ही उठून उभे राहिले..... रेवती पण खुर्ची वर बसून मागे डोके टेकून पडली होती... नुकताच तिचा डोळा लागला होता त्यामुळे त्या लोकांनी तिला आवाज दिला नाही....
" डॉक्टर.... " आदित्य राज त्या सगळ्या डॉक्टरांना पाहून पुढे आले....
" काळजी करू नका... ऑपरेशनची तयारी ऑल मोस्ट सगळी पूर्ण झाली आहे.. फक्त काही प्रोसिजर बाकी आहेत त्या पूर्ण करून आम्ही लवकरच यांना ऑपरेशन थेटर मध्ये घेऊ... " डॉक्टर त्यांच्याकडे पाहून त्यांना शाश्वती देतात....
डॉक्टर एकमेकांसोबत डिस्कस करत असताना नर्स आणि वॉर्ड बॉय मात्र त्या सगळ्या मशीन हलवण्याची तयारी करत असतात.... पहाटे चार पर्यंत आर्य ला ऑपरेशन थेटर मध्ये घेण्यात येते....
ऑपरेशन थेटर चा दरवाजा बंद होतो आणि त्याच्यावर असलेला लाल दिवा प्रज्वलित होतो.... ते दोघे पण तिकडे बाहेरच उभे असतात....
" अहो sss आपला आर्य कुठे आहे ? " सकाळच्या सात वाजता ओवी सूर्यकिरणे खिडकी मधून डोकावून रेवतीच्या चेहऱ्यावर येऊन पडतात तशी तिला जाग येते... जागा आल्याबरोबर तिची नजर आयसीयू वर जाते... ती पटकन उठून आर्य ला पाहण्यासाठी तिकडे जाते परंतु रिकामी बेड पाहून मात्र तिला आश्चर्य वाटते ते..... बाजूला काही अंतरावर श्रीकांत आणि आदित्य राज या दोघांना उभे पाहून ती घाईने त्यांच्याजवळ जात त्यांना विचारते.........
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
