Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ५१ ( अंतिम भाग)

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ५१

श्रेयसा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागते... त्याच्या हाताची बोटे हालत होती, चेहऱ्यावर हळुवारपणे हालचाल जाणवत होती...

" आर्य sss.... आर्य... " श्रेयसा  त्याचा हात पकडून त्याला आवाज देऊन उठण्याचा प्रयत्न करते...

" श्रेssss .... य " आर्यव्रत च्या तोंडातून काही अस्पष्ट असे शब्द दिला ऐकू येतात...

" हा sss आर्य... बोला ना...  आर्य डोळे उघडा.... मी इकडेच आहे... माझ्याकडे बघा... " श्रेयसा त्याच्या हातावर टॅप करत आपला दुसरा हात त्याच्या केसांमधून फिरवते...

तिचा आवाज ऐकून आदित्य राज , रेवती , श्रीकांत आणि सुरभी  चौघे पण तिचा आवाज ऐकून आयसीयूच्या दरवाजा जवळ येऊन उभे राहतात.... ते सगळे आत येणार इतक्यात श्रीकांत आपला हात पुढे अडवून त्यांना थांबवतात...

" थांबा... " श्रीकांत

" आर्यव्रत.... उठा... प्लीज! उठा ना... एकदा डोळे उघडून माझ्याकडे पहा ना.... " श्रेयसा हळव्या स्वरात त्याच्याकडे पाहून त्याला आवाज देते...

" श्रेया sss...  " आर्यव्रत च्या तोंडातून अस्तष्टपणे तिचे नाव ऐकून ती अजून त्याच्या जवळ येऊन बसते...

" हा sss बोला... मी इकडेच आहे... बोला... " श्रेयसा अधीर मनाने त्याच्याकडे पाहून म्हणाली....

आर्यव्रत हळूहळू आपले डोळे उघडून तिच्या कडे पाहतो आणि तिला नजरेनेच थोड जवळ येण्याचा इशारा करतो...

" हा... " श्रेयसा आपला चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या जवळ आणते....

" माझे तsss तुझ्यावर कss खूप पsss प्रेम आहे... " आर्यव्रत हळू आवाजात म्हणाला आणि त्याचे ते बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला...

" माझे पण.... " श्रेयसा त्याच्या गालावर हलके ओठ टेकवते....

डॉक्टर त्याला चेक करण्यासाठी तिकडे आलेले असतात की त्या सगळ्यांना दरवाजा  जवळ उभे राहिलेले पाहून आश्चर्यचकित होतात...

" डॉक्टर... आर्यव्रत... " आदित्य राज डॉक्टरांकडे पाहून त्यांना हातानेच इशारा करून सांगतात... डॉक्टर त्याला शुद्धीवर आलेले पाहून आनंदी चेहऱ्याने आत येऊन त्याला चेक करतात... डॉक्टरांना पाहून श्रेयसा बेडवरून उठून थोडी मागे उभी राहते...

दोन डॉक्टर आणि नर्स लगेच ते आयसीयू मध्ये येऊन त्याला व्यवस्थित चेक करून लागतात... श्रेयसा सुरभी जवळ जाऊन तिला मिठी मारते... डॉक्टर त्याला चेक करून बाहेर येतात... तसे ते सगळेजण घाई गडबडीतच त्यांच्या जवळ जाऊन उभे राहतात....

" डॉक्टर sss आर्यव्रत.... " आदित्य राज आशेने त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारतात...

" ते आता व्यवस्थित आहेत... त्यांच्या जीवावर जो धोका होता तो टळला...  त्यांना वेळेत शुद्ध आली त्यामुळे आता सगळ नॉर्मल आहे...  हा फक्त त्यांच्या शरीरावर असलेल्या जखमा भरून येईपर्यंत त्यांना निदान पुढचा एक महिना तरी हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल... " डॉक्टर चेहऱ्यावर हलकी स्माईल करत त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना म्हणाले... त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले...

" आम्ही आता त्यांना भेटू शकतो ना... " रेवती हळव्या स्वरात त्यांना विचारत होती...

" हो sss तसेही आता काळजी करण्यासारखे काही कारण नाही त्यामुळे आम्ही त्यांना नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट करू... मग तुम्ही पाहिजे तेवढा वेळ त्यांना भेटू शकता , फक्त त्यांना आरामाची ही गरज आहे हे लक्षात ठेवा... " डॉक्टर सगळ्यांकडे पाहून म्हणाले आणि तिकडून निघून गेले...

पुढच्या दोन तासांमध्ये आर्यव्रत ला नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले... सगळेजण त्याला जाऊन भेटले...

" आर्य sss माझं बाळ.... " रेवती त्याच्या बाजूला बसून प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत होती...

" या मुलाने सगळ्यांना घाबरवले... आम्हाला सगळ्यांना असल्या घाबरलेल्या अवस्थेत पाहून खूप बरं वाटलं असेल ना ? " आदित्य राज त्याच्याकडे पाहून त्याला विचारतात...

" आराम करून त्याला आणि आता आपल्यालाही आराम करायला पाहिजे... आदित्य राज तुम्ही रेवती ताईंना घेऊन घरी जावा... थोडा फ्रेश होऊन आराम करून घ्या... " श्रीकांत त्या दोघांकडे पाहून त्यांना म्हणाले...

" नाही... आम्ही ठीक आहे... तुम्ही दोघं घरी जाऊन फ्रेश होऊन , थोडा आराम करून या... " आदित्य राज त्या दोघांकडे पाहून त्यांना सांगतात...

" मी काय म्हणतो.. तुम्ही सगळेच घरी जाऊन आराम करून या... आता मी ठीक आहे... " आर्यव्रत त्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत त्यांना सांगतो.. कारण सगळ्यांचे चेहरे खूप थकल्यासारखे दिसत असतात...

" अरे पण तू इकडे एकटा... तुला काही लागलं तर ? " आदित्य राज काळजीने त्याला विचारतात...

" मी आहे ना... मी आराम केला आहे त्यामुळे आता मला आरामाची गरज नाही...  मला बरं वाटत आहे... तुम्ही सगळेच आर्य ला हॉस्पिटलमध्ये आणल्यापासून जरा ही आराम केला नाही की, व्यवस्थित काही खाल्लं ही नाही त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना आरामाची गरज आहे... " श्रेयसा त्या सगळ्यांकडे पाहून त्यांना म्हणाली...

" ठीक आहे.... आम्ही जातो.. पण तू तुझी ही काळजी घे... तुझी तबीयत ही ठीक नाही... " श्रीकांत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांगतात...

" हो sss मी घेईन माझी काळजी.. " श्रेयसा

ते चौघेपण मग फ्रेश होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी आपापल्या घरी निघून जातात... श्रेयसा आर्य च्या जवळ बसलेली असते...

" मग, घाबरली होतीस ना ?  मी  तुला सोडून जाईल असे वाटले का ? " आर्यव्रत बोलणार इतक्यात श्रेयसा पटकन त्याच्या तोंडावर आपला हात ठेवते आणि नाही मध्ये मान हलवते...

" इतक्या लवकर तरी माझ्यापासून तुझी सुटका होणार नाही... आतापासून पुढच्या सात जन्मासाठी तू फक्त माझी आहे... " आर्यव्रत... श्रेयसा ही त्याला मिठी मारून बसलेली असते बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत असतात...

दिवस हळूहळू पुढे जाऊ लागतात आणि आर्यव्रत च्या जखमाही भरून येऊ लागतात... श्रेयसा सकाळी उठून आपल्या कॉलेजमध्ये जात होती आणि तिकडून मग येऊन आर्यव्रत सोबत पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये बसून गप्पा मारत होती... ती आली की रेवती त्यांना वेळ मिळावा म्हणून घरी निघून जायची...  रोज सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण रेवती हॉस्पिटलमध्ये घेऊन येत होती तर रात्रीच जेवण सुरभी त्यांच्यासाठी घेऊन येत होती... सुरभी आर्यव्रत सोबत रेवती आणि आदित्य राज या दोघांसाठीही जेवण घेऊन येत होती... त्या दोन्ही घराचे संबंध आता खूपच छान झाले होते...

" आर्यव्रत च्या शरीरावरच्या जखमा आता बऱ्यापैकी भरलेल्या आहेत... त्याला आरामाची गरज तर आहे परंतु हॉस्पिटलमध्ये राहण्याची नाही,  त्याला तुमच्या सगळ्यांची गरज आहे... तुम्ही त्याला उद्या घरी घेऊन गेलात तरी चालेल... फक्त त्याच्या हातावर आणि शरीरावर ज्या पट्ट्या आहेत त्या दर पाच दिवसांनी चेंज करण्यासाठी त्याला हॉस्पिटलला यावे लागेल... " डॉक्टर आदित्य राज यांना सांगतात....

" थँक्यू डॉक्टर... " आदित्य राज आनंदाने त्यांच्याकडे पाहून त्यांना म्हणाले... आदित्य राज यांनी डिस्चार्ज ची सगळी प्रोसिजर पूर्ण केली आणि गाडी मागवली... आर्यव्रत त्याला घरी घेऊन जाण्यासाठी सगळेच आले होते...

आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेपण गाडीमधून खाली उतरले... रेवतीने दरवाजामध्ये पुन्हा एकदा त्या दोघांचे औक्षण केले आणि त्या दोघांनी एकत्र घरात प्रवेश केला पण यावेळी एकमेकांचा हात प्रेमाने पकडून... त्या दोघांमध्ये जोडले गेलेले हे अनिश्चित बंधन आता त्यांच्यासाठी जन्मोजन्मीचे बंधन झाले होते....

पहिल्यांदा जेव्हा त्या दोघांनी या घरात प्रवेश केला होता तेव्हा त्यांना हे नाते जबरदस्तीचे होते, जे काही केले होते ते जबरदस्ती केले होते परंतु आता मनापासून त्यांनी या बंधनाला स्वीकारले होते आणि आयुष्यभर एकमेकांचा साथ देण्याचा निर्णय घेतला होता....

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे अनिश्चित बंधन, या दोघांच्या नात्याला प्रेमाच्या वळणावर घेऊन गेले... त्या दोघांच्याही आयुष्यात प्रेमाचा बहर घेऊन आले...


समाप्त...

आज आपली ही कथा इथेच संपत आहे... एक असे बंधन ज्याची सुरुवात जबरदस्तीने झाली होती त्याचे  परिवर्तन हळूहळू प्रेमामध्ये झाले... या कथेला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला... लवकरच भेटू या पुढच्या कथेमध्ये... नमस्कार


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all