Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग १

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल.
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर –जानेवारी 2025–26

अनिश्चित बंधन... लग्न!


आज पडत असलेल्या पावसाने भयानक रूप धारण केले होते. गावातल्या चौकात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. तरीही गावांमध्ये सगळीकडे लग्नाची तयारी अगदी आनंदने सुरू असलेली दिसून येत होती. गावातली प्रमुख सगळीच माणसे मिळून लग्नाची तयारी करत होते अगदी उत्साहाचे वातावरण त्या गावांमध्ये निर्माण झाले होते. पण त्या लग्नातील प्रमुख दोन व्यक्ती म्हणजेच आर्यव्रत आणि श्रेयसा , दोघांच्याही मनामध्ये आज प्रचंड वादळ उठलं होतं.

आर्यव्रत हा गावातला प्रत्येकाचा प्रिय असा व्यक्ती होता. शांत स्वभावाचा, ठाम विचारसरणी असलेला, गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मदतीसाठी अगदी धावून जाणारा. त्याचे स्वप्नही तसे होते. त्याला आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं, गावासाठी ही काहीतरी करण्याची जिद्द त्याच्या अंगात होती, पण लग्न हा विषय अजून तरी त्याच्या डोक्यामध्ये कुठेच नव्हता.

श्रेयसा, शिकलेली, सुसंस्कृत, स्वतःच्या करिअरवर प्रेम करणारी , सतत आनंदी राहणारी मुलगी. तिलाही सध्या मोकळेपणाने तिचा आयुष्य जगायचे होते. अजून तरी तिने लग्नासारख्या बंधनामध्ये स्वतःला बांधून घेण्याचा अजिबात विचार केला नव्हता.

दोन गावांच्या वेशीवर जागेवरून झालेले वाद आणि या वादामुळे अगदी विकोपाला गेलेली गावाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गावातील पंचांनी मिळून सगळ्या सदस्यांना एकत्र बसवून एक निर्णय घेतला होता... या निर्णयामध्ये त्या दोन्ही गावातली प्रतिष्ठित श्रीमंत असे घराणे ही हजर होते. या दोन घरांमध्ये जर वाद वाढला तर त्या वादामध्ये दोन्ही गावाचे नुकसान होणार होते त्यामुळे शेवटी दोन्ही गावांची शांती राखून ठेवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला... लग्नाचा !

दोन्ही गावाच्या भल्यांसाठी आजच या दोन घराण्यांचे असे संबंध जोडून द्यायचे की त्यांनी एकमेकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे आणि त्यासाठी हे लग्न होणेही तेवढेच महत्त्वाचे होते...

" गावाच्या भल्यासाठी तुम्ही माझा का बळी देत आहात ? " श्रेयसा लग्नाची प्रस्तावना ऐकून जवळजवळ ओरडलीच!

" तुम्ही लहान असल्यापासून आम्ही तुमचा सगळा हट्ट पुरवला. तुम्हाला जस जगायचे तस जगू दिले, तुम्ही जे काही मागितले ते तुमच्यासमोर हाजीर केले. मग आज आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही ही एक गोष्ट ही करू शकत नाही का ? " श्रीकांत पाटील म्हणजेच तिचे वडील तिच्याकडे लागत नजरेने पाहून विचारत होते.

" बाबा.... तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे पण म्हणून मी अशी स्वतःच्या आयुष्याचे आहुती देणार नाही. " श्रेयसा

" तुम्हाला तुमच्या आयुष्याची आहुती द्यायला सांगितली नाही लग्न करायला सांगितले आहे ते पण त्या इनामदार च्या मुलासोबत. त्यांचं घरा नाही आपल्यासारखाच प्रतिष्ठा आणि श्रीमंत आहे. त्यांच्या घरातही तुम्हाला इतक्याच सुख सुविधा मिळतील. मग काय प्रॉब्लेम आहे ? " श्रीकांत

" पण बाबा मी अजून लग्न करण्याचा विचारच केला नाही. मला अजून माझ्या आयुष्यात खूप काही करायचं आहे,  खूप काही शिकायचं आहे. अजून माझं वय काय आहे. तुम्ही इतक्या लवकर माझ्या लग्नाचा विचार कसा करू शकता ? " श्रेयसा

" हे बघा, आम्ही तुम्हाला विचारले नाही आहे आम्ही आमचा निर्णय तुम्हाला सांगितला आहे आणि या लग्नासाठी तुम्हाला तयार व्हावेच लागेल. " श्रीकांत बोलून तडक तिकडून निघून जातात.

" आई,  तू तरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. सांग ना बाबांना की, मलाही लग्न नाही करायचं आहे. " श्रेयसा आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

" श्रेयु बेटा, तुझ्या वडिलांनी आजपर्यंत कधी माझ ऐकला आहे जे आता ऐकतील आणि तसे पण हा निर्णय त्यांनी सगळ्या गावासमोर घेतला आहे त्यामुळे मला नाही वाटत ते आता या निर्णयापासून माघार घेतील... तुझ्या बाबांचा स्वभाव तुला माहित आहे ना , ते एक वेळ जीव देतील पण दिलेले वचन मोडणार नाहीत... " श्रेयसा ची आई सुरभी आपल्या थरथर त्या हाताने तिला जवळ घेत म्हणाली.

आपल्या मुलीचा असा अचानक लग्नाचा विचार त्यांनाही योग्य वाटत नव्हता पण आपल्या नवऱ्यासमोर याआधीही कधी काही बोलण्याची त्यांची हिम्मत नव्हती आणि यापुढेही ते कधी करणार नव्हते. हा निर्णय दोन्ही गावाच्या आभाल्यासाठी घेण्यात आला होता त्यामुळे कुणालाही दुसरा काही उपाय सुचत नव्हता.

" आई प्लीज तू सध्या इकडून जा. मला कोणासोबतही बोलण्याची इच्छा नाही. काही वेळ मला एकटे राहू दे. " श्रेयसा रागाने आपल्या आई कडे पाहत म्हणाली. तिची आई ही काही न बोलता तिकडून निघून गेली.

" गावच्या भल्यासाठी तुम्ही आपल्या लाडक्या मुलीला अशा घरी लग्न करून पाठवत आहात ज्या घरासोबत आपले इतक्या वर्षाचे वैर होते.. " सुरभी बाहेर हॉलमध्ये बसलेल्या श्रीकांत जवळ येऊन त्यांना विचारू लागते.

" हे बघा, ते वैर मिटवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आता या विषयावर आणखीन चर्चा नको... " श्रीकांत आधीच वैतागलेले असतात त्यात त्याच विषयावर सतत बोलणं ही त्यांना आता नकोसे वाटत होते.

आपल्या बेडरूम मध्ये बसून डोळ्यातून अश्रू गाळत श्रेयसा एकटीच विचार करत असते...

’ मला एका अशा अनिश्चित बंधनामध्ये बांधले जात आहे जे बंधन मला मान्य नाही... लग्न !’


********************************

" चिरंजीव, तुम्ही तर गावच्या भलं करण्यासाठी काही करायला तयार असता मग आता अशी माघार का घेत आहात ? " इकडे आदित्य राज आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाले.

" आबासाहेब, मी अजूनही आपल्या गावासाठी काहीही करायला तयार आहे पण म्हणून मी एका अशा व्यक्तीसोबत लग्न करायचे की , तिला मी व्यवस्थित ओळखतही नाही... हे शक्य नाही! " आर्यव्रत आपल्या वडिलांकडे पाहून नाराजीच्या स्वरात म्हणाले...

" आमचेही लग्न असेच झाले होते. आम्हाला तर आमच्या आई-वडिलांनी लग्नाबद्दल काही विचारलेही नव्हते सरळ लग्न लावून दिले... तुमच्या आईला पण आम्ही लग्नामध्ये  पाहिले आहे... " आर्यराज

" आबासाहेब तेव्हाची गोष्ट वेगळी होती... पण आता एकमेकांना भेटल्याशिवाय , ओळखल्याशिवाय असे कसे लग्न करायचे. हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. " आर्यव्रत

" आम्ही इकडे तुमचा निर्णय विचारण्यासाठी आलो नाही आहे...  आम्ही संपूर्ण गावासमोर पाटलांना लग्नाचे वचन दिले आहे आणि हे वचन काही झाले तरी पूर्ण होणारच त्यामुळे आता या विषयावर कोणताही विभाग नको तुम्हालाही लग्न करावेच लागेल. " आर्यराज बोलून तिकडून निघून जातात.

’ मला एक असे अनिश्चित बंधन जबरदस्ती स्वीकारावे लागणार आहेत ज्याचा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता... लग्न! ’
आर्यव्रत आपल्या बेडरूमच्या बाल्कनी मधून दूरवर नजर फिरवत नावाच्या सूर्याकडे पाहत विचार करत होते.


क्रमशः


" सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all