Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ८

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल.
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ८

श्रेयसा फ्रेश होऊन पटकन खाली गेली. बाहेर हॉलमध्येच रेवती आणि काकी बोलत बसल्या होत्या. पुढेच काही अंतरावर मुख्य दरवाजाच्या जवळ आर्यराज आणि त्यांचे भाऊ बोलत बसले होते. श्रेयसा मनातून थोडी घाबरली , तशीच हिम्मत करत त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली.

" सॉरी, ते पुस्तक वाचत होते. कशी झोप लागली मला समजले नाही. पुन्हा असे नाही होणार.. " श्रेयसा ने जवळ जाऊन आपल्या सासूसमोर दिलगिरी व्यक्त केली...

" आज कालच्या सुनांचं पहावं तेवढं नवलच आहे बाई, सकाळचे ही लेट उठायचं आणि दुपारच ही आरामशीर झोपायचं.  मग घरातलं सगळं काम कोणी करायच , सासू ने! " काकी तिच्याकडे पाहून ठसक्यात म्हणाली.

" सून घरी आल्यावर सासू ने काम करायचे नाही किंवा आपल्याला जेव्हा घरात कुणी आपलं काम करावे अशी गरज असते तेव्हाच आपण लग्न करून सून घरी घेऊन येतो , असा समज चुकीचा आहे... माझ्या मते तरी आपल्या घरची सून ही आपली लक्ष्मी असते आणि लक्ष्मीने तिच्या मनाने जर घरात वावरले ना तर घरात आनंदही वावरतो.

हे तिचं घर नाही,  ती या घरामध्ये लग्न करून आली आहे त्यामुळे या घरातली सगळी कामे तिला करावी लागणार आहेत... असे आपल्या सुनेला सांगण्यापेक्षा हे तुझंच घर आहे त्यामुळे तू स्वतःच्या मनाने काहीही करू शकते , हे जेव्हा आपण प्रत्येक सासू आपल्या सुनेला सांगू ना...  तेव्हा कोणत्या सुनेला तिचं सासर वाईट वाटणार नाही,  उलट स्वतःचं हक्काच पहिलं घर वाटेल... " रेवती शांत स्वरात त्या काकींकडे पाहून म्हणाल्या...

" ताई तुम्ही असे वाईट वाटून घेऊ नका... मी फक्त सहजच म्हणाले होते, " काकीने रागाने एक नजर श्रेयसा कडे पाहत रेवतीला समजवण्याच्या स्वरात म्हणाल्या.

" मी पण सहजच माझ्या मनात जे काही आहे ते सांगितले... तू पण वाईट वाटून घेऊ नको आणि हो, श्रेयसा बाळा तुला कॉफी करून आणू दे... तुला अजून काही खायचे असेल तर त्या मावशींना सांग त्या बनवून देतील अजिबात लाजू नको हे तुझं घर आहे. " रेवती तिच्याकडे पाहून प्रेमाने म्हणाल्या.

" हो... मsss मी कॉफी घेते... " श्रेयसा बोलून तिकडून किचनच्या दिशेने निघून गेली. तिला मनापासून खूप छान वाटले होते जेव्हा रेवतीने हे तिचे घर आहे असे हक्काने सांगितले होते.

’ आपण नेहमी एखाद्या सासूने सुनेला जाळून मारले किंवा तिचा छळ केला असेच ऐकत आले आहोत, पण काही सासू अशाही असतात जे आपल्या सुनेला आपल्या लेकी प्रमाणे वागवतात... माझी नशीब खरच चांगल की, मला अशी सासु भेटली. ’ श्रेयसा कॉफी पीत मनामध्ये विचार करत असताना अचानक तिचे आणि आर्यव्रत चे बोलणं तिला आठवलं आणि पुन्हा एकद तिचं मन नाराज झालं.

’ इतका सुंदर सासर भेटून काही फायदा नाही कारण मुळात ज्या व्यक्ती सोबत मी लग्न केला आहे त्याला आणि मलाही लग्नच मान्य नाही. ’

दोन-तीन दिवस तिकडे राहून काका काकी आणि आरोहीं आपल्या घरी निघून गेले. पहिले काही दिवस दोघेही एकमेकांशी जवळजवळ बोलतच नव्हते. एकाच छताखाली राहूनही ते परस्परांपासून मैलोनमैल दूर होते.

आर्य सकाळी लवकर उठून आपली सगळी काम करून कामाला जायचा. श्रेयसा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मनापासून निभवत होती पण स्वतःला कुठेतरी हरवल्यासारखं तुला वाटत होते.

एकाच रूम मध्ये राहत असल्यामुळे कधी कधी दोघांची नजरा नजर व्हायची, पण एकमेकांकडे बघूनही त्यांना काय बोलावे ते सुचत नसायचे म्हणून मग ते आपला चेहरा वळवून घ्यायचे. घरातल्या लोकांचे उपस्थितीत मात्र दोघेही चेहऱ्यावर अगदी सौजन्य असल्यासारखे दाखवत होते.

" श्रेयसा बाळा, तुझ्या वडिलांनी सांगितले होते तुला पुढे शिक्षणाची इच्छा आहे. मग अजून किती दिवस अशी घरात बसून राहणार आहेस ? " रेवती

" नाही , ते सध्या कॉलेजमध्ये सुट्ट्या चालू आहेत म्हणून मी घरी आहे. कॉलेज सुरू झाले की मी रेगुलर कॉलेजला जाईल. " श्रेयसा

" हो, पण रोज किचन मध्ये जाऊन जेवण बनवायला पाहिजे असे गरजेचे नाही. किचनमध्ये आपल्याकडे काम करायला भरपूर लोक आहेत. मी जाते कारण तुझ्या नवऱ्याला आणि  सासऱ्या ला काम करणाऱ्या बायकांच्या हातचे जेवण आवडत नाही म्हणून मग मी सगळ्यांसाठी जेवण बनवते. " रेवती

" मला पण किचनमध्ये काम करायला आवडते , तेवढाच माझाही वेळ निघून जातो. " श्रेयसा

" ठीक आहे. जशी तुझी इच्छा. तुला जे काही करायचं असेल ते मनापासून कर..  मला फक्त एवढेच सांगायचे होते की,  तुला कुठल्याही गोष्टीची काही जबरदस्ती नाही. " रेवती

आज रविवार असल्यामुळे सगळे जण घरात एकत्र होते. आर्यव्रत ला ही ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे तोही निवांत बसलेला होता. श्रेयसा स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करत होती. तिने स्वतः रेवतीला बाहेर सगळ्यांसोबत बसायला पाठवले होते. तिच्या हाताला ही छान चव होते त्यामुळे घरातले आनंदाने तिने हाताने बनवलेल अन्न खात होते.

श्रेयसा चा सगळा स्वयंपाक झाला सगळ्यांना खाण्यासाठी सलाड कापत असताना अचानक तिच्या बोटाला चाकू लागला आणि रक्त येऊ लागले. तिच्या चेहऱ्यावर त्रासदायक वेदना निर्माण झाल्या.

" अगं , हे काय झालं आणि तुझं लक्ष कुठे होतं ? " आर्यव्रत जो बाहेरूनच तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून पटकन आत आला आणि तिच्या बोटातून येणारे रक्त पाहून काळजीने म्हणाला.

" ते मी सगळ्यांसाठी सलाड कापत होते.. " श्रेयसा तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले होते.

" थांब... मी फर्स्टट्रेड बॉक्स घेऊन येतो... " असे बोलून आर्यव्रत पटकन किचनच्या एका बाजूला ठेवलेला बॉक्स घेऊन तिच्या समोर येऊन उभा राहिला.

" म sss मी लावते मलम... " त्याच्या चेहऱ्याकडे पाहून श्रेयसा ला आश्चर्य वाटल

" केवढी जखम झाली आहे बघ. रक्तही किती जात आहे.. " आर्य मात्र तिचे काहीही नाही ऐकून घेतात तिचं बोट आपल्या एका हाताने पकडून व्यवस्थित त्याच्यावर मलम लावत होता. त्याने तिच्या हाताला स्पर्श केल्याबरोबर तिच्या पोटामध्ये फुलपाखरांचा उडू लागला. त्याच्या अशा स्पर्शाने आपल्याला नक्की काय होते हेच तिला समजत नव्हते.. तिने हळूच त्याच्याकडे पाहिले, पण तो मात्र तिच्या बोटांवर पट्टी बांधण्यामध्ये व्यस्त होता.

" पट्टी बांधली आहे , पण तू आता बाहेर येऊन बस...  अजून जे काय करायचं असेल ते बाकीचे लोक करतील. " असे बोलून तिचे काहीही ऐकून न घेता आर्य तिला बाहेर घेऊन आला.

" काय झालं ग... " रेवतीने तिच्या हातावरची पट्टी पाहिली आणि काळजीने तिच्याजवळ आली.

" काही नाही. ते फक्त थोडा चाकू लागला. " श्रेयसा

" मम्मी, घरात काम करण्यासाठी एवढी सगळी माणसं असताना पण ही का काम करत असते ? " आर्य थोड्या रागानेच आपल्या आईकडे पाहून विचारतो.

" आर्य अरे तिला कोणी ही कामासाठी जबरदस्ती केली नाही. तिला आवडतं म्हणून ती करत आहे. " त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून रेवतीलाही छान वाटले.

" तिच्या हाताला लागले आहे त्यामुळे आता पुढचे काही दिवस तरी ती कोणत्याही काम करणार नाही. " आर्य कोणाला काहीही न विचारता हुकूम देऊन मोकळा झाला.

" हो रे.... आता जोपर्यंत तू स्वतः सांगत नाही तोपर्यंत घरात कोणीही तुझ्या बायकोला काही काम सांगणार नाही. " रेवती ही त्याची मस्करी करत म्हणाल्या. लांब बसले असले तरी आर्यराज यांच्या कानावरही त्यांचे शब्द पडत होते आणि ते पण हलकेच गालात हसत होते. श्रेयसा मात्र त्याचं बोलणं ऐकून पूर्णपणे गोंधळून गेली होती.  तिला काय बोलावं तेच समजत नव्हते.


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all