Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग २१

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग २१

" हो sss बोला ना... " श्रेयसा

" अजूनही तू नवीन नवरी आहेस त्यामुळे तुला एकटीला माहेरी पाठवणे मला तरी बरोबर वाटत नाही...  मी यांना सांगते,  ते उद्या तुला तुझ्या घरी सोडतील... चालेल ना... " रेवती तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतात....

" हो ss चालेल... " श्रेयसा होकार देते...

श्रेयसा थोडा वेळ बोलून आपला अभ्यास करण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून जाते, आज काही तिचा अभ्यासामध्ये मन लागत नाही... शेवटी वेळ घालवावा म्हणून खाली येऊन रेवतीलाच घर कामात मदत करू लागते... दोघी मिळून रात्रीचा स्वयंपाकही बनवतात...

" काय ग , बराच उशीर झाला ना ... अजून आर्य आला नाही... " रेवती एक नजर घड्याळाकडे पाहत तिला विचारते... तशी तिची नजर ही घड्यावर जाते... रोज एवढ्या वेळेपर्यंत आर्यव्रत घरी येत असतो पण आज अजून तो आला नव्हता...  रेवती काळजीने फोन करणार की , आदित्य राज घरी येतात...

" अहो sss आर्य अजून घरी आला नाही... " रेवती काळजीने त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगू लागते...

" हो sss त्याचा फोन आला होता मला..  त्याला आज उशीर होणार आहे... " आदित्य राज तिच्याकडे पाहून तिला म्हणाले...

" किती उशीर? " रेवती

" आता ते काही माहित नाही पण त्याने असे सांगितले आहे की,  जेवणासाठी त्याची वाट पाहू नका तो बाहेरच जेवण करून येईल.... " आदित्य राज सांगतात...

ते तिघे पण थोडाफार गप्पागोष्टी करत बसलेले असतात... आदित्य राज श्रेयसा ला तिच्या कॉलेज बद्दल आणि अभ्यासाबद्दल विचारतात...

" तिची काही दिवस माहेरी जाऊन राहण्याची इच्छा आहे... तर मी काय म्हणत होते,  तुम्ही तिला तिच्या घरी सोडता का ? आता हे मी आर्यव्रत ला सांगितले असते पण आजकल तो त्याच्या कामांमध्येच इतका अडकला आहे की,  कोणाकडे लक्ष नाही...  " रेवती नकारात मान हलवत म्हणाली...

" हो चालेल की, तिकडची आठवण येत असेल तर थोडे दिवस जाऊन राहा बरं वाटेल... कॉलेजचं काय तिकडूनही घेऊन जाऊन करू शकता ना... " आदित्य राज तिच्याकडे पाहून तिला विचारतात...

" हो... " श्रेयसा उत्तर देते... लग्नाच्या वेळी या घरांमध्ये येऊन राहायलाच तिला भीती वाटत होती कारण अनोळखी माणसं,  अनोळखी नाती, सगळच तिच्यासाठी अनोळखी होतं , पण हळूहळू या माणसांनी तिला लावलेला जीव आणि आपल्या नवऱ्यामध्ये भेटलेला एक चांगला मित्र त्यामुळे कुठेतरी तिला आता या घराची सवय लागत होती परंतु अचानक आर्यव्रत चे असे तोडून वागणे तिच्या मनाला लागत होतं...

ते तिघे एकमेकांसोबत गप्पा मारत जेवण करून घेतात... दोघीजणी मिळून सगळं काम आटपून आपापल्या रूममध्ये निघून जातात...

श्रेयसा आपल्या रूममध्ये येऊन बसते पण आज तिला ती रूम खूपच रिकामी वाटू लागते.... मागच्या दोन दिवसापासून त्या रूममध्ये फक्त तिचंच अस्तित्व होत... आर्यव्रत तिला दिसला ही नाही त्यामुळे ती उगाच त्या रूममध्ये फिरत त्याच्या वस्तू हातात घेऊन पाहत होती...

त्याच्या बेडच्या वरच्या बाजूला त्याचा एक मोठा फोटो लावला होता....  इतके दिवस तिने त्या फोटोकडे फारसे लक्ष देऊन पाहिले नव्हते,  पण आज मात्र तिची नजर त्या फोटोवर खीळली होती....

त्याचा तो लांबट चेहरा, रेखीव भुवया, काळे नक्षीदार डोळे, छोटे छोटे कपाळावर आलेले सिल्की केस, त्या फोटोमध्ये असलेल्या त्याच्या त्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची मस्ती तिला जाणवत होती... आर्यव्रत दिसायला खूप हँडसम होता, जिम मध्ये कसरत करून चांगली बॉडी ही त्यांनी कमावली होती... तिने आधी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते परंतु कॉलेज मधल्या मैत्रिणी जेव्हा त्याचा फोटो पाहून त्याची तारीफ करायच्या तेव्हा मात्र त्यांच्या बद्दल तिच्या मनामध्ये जेलेसी निर्माण होत होती परंतु हे का होत आहे हे अजूनही तिला समजले नव्हते...

आपल्या मनातले सगळे विचार झटकून ती स्टडी रूममध्ये झोपायला निघून गेली.... मध्यरात्री कधीतरी आर्यव्रत घरी आला... कोणालाही आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून त्याने आपल्याजवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि घरात शिरला... पूर्ण घर शांत होतं, तो आपल्या रूममध्ये आला... त्याच्या रूममध्ये ही शांतता होती...

श्रेयसा स्टडी रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद करून शांत झोपली होती... दिवसभर आपल्या सॉफ्टवेअर साठी मेहनत केल्यामुळे त्याचंही डोकं आणि शरीर थकलं होतं त्यामुळे तो फ्रेश होऊन डायरेक्ट आपल्या बेडवर येऊन झोपला...

सकाळी आपल्या वेळेवर जेव्हा श्रेयसा ला जाग आली तेव्हा ती दरवाजा उघडून बाहेर आली... समोर आर्यव्रत ला बेडवर शांत झोपलेले पाहून तिच्या मनाला एक वेगळा सुकून मिळाला... काही क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली... तो मात्र गाढ झोपेत होता... त्याच्याकडे पाहतच ती कपाटातून आपले कपडे घेत असताना तिचे एक पुस्तक पटकन खाली पडले, तशी ती दचकून पाहू लागली, पण आर्यव्रत मात्र उठला नाही...

ती हळूच आपले सगळे कपडे घेऊन बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेली... थोड्यावेळाने ती फ्रेश होऊन बाहेर आली, त्याला झोपलेले पाहून ती खाली निघून आली...

" ते रात्री कधी आले ? " श्रेयसा रेवतीला किचनमध्ये पाहून पहिला प्रश्न विचारला...

" मलाही माहित नाही गं ! पण खूप उशीर झाला असेल त्याला... तो काय करत आहे ? " रेवती तिच्याकडे पाहून तिला विचारते...

" अजून झोपले आहेत... " श्रेयसा

" झोपू दे... मागच्या दोन-तीन दिवसापासून त्याच काय चालू आहे काहीच समजत नाही... " रेवती

" मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवू का ? " आज तो आपल्या सोबत नाश्ता करण्यासाठी असेल या विचाराने श्रेयसा विचारते....

" हो... कर ना.... नवऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे तर... " रेवती मुद्दामून तिच्याकडे पाहून तुला चिडवतात तशी ती लाजत त्याच्यासाठी नाश्ता बनवू लागते... काही वेळासाठी जर ती त्याच्यावर रागावलेली आहे ही गोष्ट ही विसरून जाते...

" ते उठले असतील का? " श्रेयसा आतुरतेने व रूमच्या दिशेने पाहून रेवतीला विचारते...

" आता बनवला आहेस तर इकडे बाहेर डायनिंग टेबलवर आणून ठेव आणि जा रूम मध्ये जाऊन त्याला उठव... " रेवती

श्रेयसा बाऊल बाहेर डायनिंग टेबलवर आणून ठेवते आणि त्याला उठवण्यासाठी वर जायला पहिल्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात तोच खाली येताना तिला दिसतो.... त्याला चेहरा फ्रेश दिसत असतो कपडेही बदललेले असतात याचा अर्थ आंघोळ करूनच खाली येत आहे... त्याने कानाला फोन लावलेला असतो आणि कोणाशी तरी बोलत असतो त्यामुळे त्याचे आजूबाजूला लक्ष नसते...

आदित्य राज आपली तयारी करून बाहेर येऊन डायनिंग टेबल जवळ बसलेले असतात.... रेवती त्यांच्या बाजूला उभी असते... सगळ्यांचे लक्ष आर्यव्रत कडे असते...

" हो sss तुम्ही तुमचे काम चालू करा तोपर्यंत मी ऑफिसमध्ये पोहोचतो... हो..  हो sss पुढच्या अर्ध्या तासात मी ऑफिसमध्ये असेल.... " आर्यव्रत फोनवर बोलून फोन आपल्या खिशात ठेवत डायनिंग टेबल जवळ येऊन उभा राहतो...

" Good morning आई.... बाबा... " तू डायनिंग टेबलवर असलेल्या फळांच्या टोकरी मधून एक सफरचंद उचलून आपल्या हातात घेतो...

" अरे असा काय करत आहेस... निदान बसून शांतपणे नाश्ता तरी कर... तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला आहे... " रेवती त्याला तसेच उभे राहिलेले पाहून म्हणाली...

" नाही आई माझ्याकडे वेळ नाही... ऑफिसमध्ये सध्या खूप महत्त्वाची काम चालू आहेत आणि मलाही लवकर ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे... सध्या हे एक सफरचंदच माझ्यासाठी खूप आहे... बाय... " आर्यव्रत बोलून तिकडून बाहेर पडतो....

पायऱ्या उतरत असताना तो फोनवर बोलत असल्यामुळे त्याचे श्रेयसा कडे लक्ष जात नाही आणि नंतर डायनिंग टेबल जवळून तो तसाच मुख्य दरवाज्याच्या जवळ निघून जातो....  तेव्हा ती त्याला पाठमोरी असल्यामुळे तो तिच्याकडे पाहत नाही.... हे सगळं त्याने मुद्दामून केलेले नसते परंतु त्याचं पूर्ण आपल्या सॉफ्टवेअर चालू होण्यावर  असल्यामुळे  त्याच्या लक्षात राहत नाही...

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all