डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३०
" बरं तू आधी फ्रेश हो आणि खाली ये ... रडून चेहरा कसा लाल झाला आहे.... तुझे वडील जर घरी आले आणि त्यांनी तुला अशा अवस्थेत पाहिले तर मलाच ओरडत बसतील... " सुरभी तिला म्हणाली...
" हो sss मी फ्रेश होऊन खाली येते... " श्रेयसा शांत पने म्हणाली..... सुरभी तिच्या रूम मधून खाली निघून जाते... श्रेयसा बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होते आणि बाहेर येऊन आपला मोबाईल हातात येते तेव्हा तिच्या लक्षात येते की तिच्या मोबाईलवर. आर्यव्रत चे मिस कॉल आहेत....
’ काय करू? कॉल बॅक करू का... नाही sss मी का करू... पण त्याने मला कॉल का केला असेल ? त्याला त्या मुली बद्दल तर सांगायचं नसेल ना... कोण असेल ती? आर्यव्रत चा लग्नाच्या आधी काही भूतकाळ असेल का ? ’ श्रेयसा च्या मनात नको नको ते प्रश्न येऊ लागतात... तिचं डोकं शांत होत नव्हते, आर्यव्रत च्या विचारांनी मनाची गर्दी केली होती त्याने ती पूर्णपणे अस्वस्थ झाली होती...
तिला आपल्या रूममध्ये एकटीला बसण्याची इच्छा होत नव्हती म्हणून ती पटकन आपला मोबाईल घेऊन खाली आली... खाली येत असताना तिने आपल्या मैत्रिणीला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तेव्हा तिला त्यांची आठवण झाली आणि आपण आपल्या रागात आपल्या मैत्रिणींना तसेच तिकडे हॉटेलमध्ये सोडून घरी निघून आलो हे ही आठवले....
" हॅलो... सॉरीssसॉरीsss आय एम व्हेरी व्हेरी सॉरी... " श्रेयसा तिची मैत्रीण अनन्या ने फोन उचलताच म्हणाली...
" श्रेया sss अरे मगाशी हॉटेलमध्ये काय झालं होतं तुला ? अशी अचानक तू घरी का निघून आलीस... तू ठीक आहेस ना... " अनन्या तिला काळजीने विचारते...
" हो sss मी तुला सांगते... मी तुला भेटायला येते... " श्रेयसा
" ऍक्चुअली आम्हीच तुला भेटायला येणार होतो कारण काकीने सांगितलं की तू स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतले आहेत आणि कोणाशी बोलतही नाही... " अनन्या
" नाही sss असे काही नाही.... मी ठीक आहे... " श्रेयसा
" श्रेया sss हे बघ आपण एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहोत ना... आपण कधीही काही झाले तरी एकमेकांना सांगतो.... मला काल तुझा चेहरा बघितल्यापासूनच असे वाटत होते की, नक्कीच काहीतरी आहेss जे तू आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत... श्रेया, तू मला ही सांगणार नाही आहेस का ? " अनन्या
" अनु , मला खरंच माझ्या मनातली गोष्ट तुला सांगायची आहे... आता मला स्वतःलाही ते सहन होत नाही आणि त्यासाठी तुला भेटायचे आहे... आज आपण दोघी भेटूया आणि एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसुया जिकडे आपल्याला व्यवस्थितपणे बोलता येईल... " श्रेयसा
" ठीक आहे... मी दहा मिनिटात तुझ्या घराजवळ पोहोचते... " अनन्या
" हो चालेल, तोपर्यंत मी थोडा वेळ आईकडे बसते... माझ्या वागण्याने तिलाही वाईट वाटले असेल... " श्रेयसा बोलून फोन ठेवून देते आणि खाली हॉलमध्ये येते...
" हे बघ मी तुझ्यासाठी अगदी तुझ्या आवडीची कॉफी बनवून आणली आहे... ही पिल्यावर तुलाही बरं वाटेल... " सुरभी किचन मधून बाहेर येत तिच्याकडे पाहून म्हणाली..
" हो sss आणि तुझ्यासाठी? " श्रेयसा आपल्या आईकडे पाहून विचारते...
" मी नंतर माझ्यासाठी चहा घेईल... आधी तू पी बघू... " सुरभी तिला प्रेमाने आपल्याजवळ बसवते...
" नाही sss... तू पण माझ्यासोबत चहा घेणार आहेस... किती दिवसानंतर असा मोकळा वेळ मिळाला आहे... " श्रेयसा
" ठीक आहे... " सुरभी पण किचन मध्ये आवाज देऊन स्वतःसाठी चहा मागवून घेते...
" आई.... सॉरी sss मला मगाशी तुझ्या सोबत असे बोलायचे नव्हते... मी चुकून बोलून गेले... " श्रेयसा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली...
" असू दे ग... मला माहित आहे आमच्यामुळे तुझ्या आयुष्यात तुला जो एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला तो तुझ्यासाठी ही सोफा नव्हता... पण काय करणार बाळा तेव्हा वेळच तशी होती.... त्या गोष्टीबद्दल तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही की माझ्या एकुलत्या एक लेकीला तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्याचाही स्वतंत्र आम्ही तिला देऊ शकलो नाही.... लहानपणापासून तुला अगदी प्रेमाने जपले होते... तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या... तुझ्या मनासारख आयुष्य जगायला आम्हीच तुला शिकवले आणि आयुष्यच महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबरदस्ती ही आम्हीच केली... " सुरभी कळवळून सांगत होती...
" आई, प्लीज! तू असे नको बोलूस ना.. लहानपणापासून तू आणि बाबांनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केले आहेत तर मी तुमच्यासाठी एवढं तर करू शकते ना... " श्रेयसा आपल्या दोन्ही हातांनी आपल्या आईचे हात पकडून प्रेमाने म्हणाली...
" हो ग बाळा, पण शेवटी लग्न हे आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे बंधन असते आणि या अनिश्चित बंधनात आमच्यामुळे तुला अडकावे लागले... " सुरभी
" आई , त्यावेळी काय सिच्युएशन होती ती मलाही माहित आहे... तू आणि बाबांनी विचार करूनच असा निर्णय घेतला असेल याचाही मला अंदाज आहे... माझ्यासाठी तुम्ही कधीही वाईट विचार करणार नाही हेही मला चांगलंच माहित आहे त्यामुळे प्लीज असा स्वतःला दोष देना सोडून दे... " श्रेयसा
" बाळा, मला एका प्रश्नाचे अगदी खरं उत्तर देशील ? " सुरभी थंड नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारते...
" हो sss... " श्रेयसा
" बाळा, या अनिश्चित बंधनामध्ये तू खुश तर आहेस ना ? त्या घरामध्ये सगळं ठीक आहे ना ? आर्यव्रत आणि तुझ्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना ? " सुरभी
" हो sss आई... " श्रेयसा
" नाही ग म्हणजे जसे तुला जबरदस्ती हे लग्न करावे लागले, तसे काहीसे त्यांच्याबरोबरही झाले असेल ना... त्यांनाही हे लग्न जबरदस्त करावे लागले असेल ना... म्हणूनच मी विचारत आहे तुमच्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित आहे ना ? " सुरभी
" हो आई... आमच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे... तू नको जास्त काळजी करू... मी ठीक आहे... " श्रेयसा आपल्या आईला समजावण्याचा प्रयत्न कर करत असते परंतु तिच्या शब्दांमध्ये तो निश्चितपणा नसतो जो असायला पाहिजे कारण ती खुश आहे की नाही हे अजून तिलाही माहित नसते...
" नक्की ना बाळा .. मला दिवस रात्र फक्त ही एकच काळजी असते की , तुझा संसार सुखाचा व्हावा... तुला आनंदाने संसार करताना पाहून मी स्वतः देवाचे दर्शन घ्यायला जाणार आहे... " सुरभी
" आई... " श्रेयसा बोलत असते की, त्यांना समोरून अनन्या येताना दिसते...
" अनन्या तू , ये ना... " श्रेयसा
" बर झाल आलीस... मगाशी त्या दोघी पण तुझ्या काळजीने इकडेच थांबल्या होत्या... संध्याकाळी भेटायला येतो असे बोलून गेल्या... " सुरभी
" हो काकी , तिला भेटायला चालू आहे आणि चांगला जाब विचारायला आहे... ही नेहमी आपल्या दोघींना त्रास देत असते ना.... " अनन्या मस्करीच्या स्वरात म्हणाली...
" हो ना.... तुझी मैत्रीण आहे , विचार काय जाब विचारायचा आहे ते... तुमच्या दोघींच्या मध्ये मी बोलणार नाही... " सुरभी हसून तिच्याकडे पाहत उत्तर देते...
" हो ते तर मी विचारणार आहे, पण त्याच्या आधी मला तुमच्या हातचा गरमागरम चहा भेटला तर खूप फ्रेश वाटेल.... " अनन्या
" हो sss तुम्ही दोघी बसा... मी तुझ्यासाठी मस्त आलं घालून चहा घेऊन येते आणि खायलाही घेऊन येते... " असे बोलून सुरभी तिकडून किचनमध्ये निघून जाते...
" बोला मॅडम, आता ठीक वाटत आहे ना... " अनन्या तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिला विचारते...
" तू आधी चहा पिऊन घे... घरात या विषयाबद्दल चर्चा करायला नको उगाचच आईसमोर ही चर्चा नको... तिला आधीच माझे खूप टेन्शन आहे आणि मला नाही आवडणार तिला त्रास झालेला.... " श्रेयसा...
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा