Login

आषाढी एकादशी पेहराव Ashadhi ekadashi poshakh costume dress

Dressing on the occasion of Aashadhi Ekadashi.

आषाढी एकादशी पेहराव

आता दोनच दिवसावर आषाढी एकादशी आली आहे आणि सगळीकडेच अगदी भक्तिमय वातावरण आहे. अनेक शाळांमध्ये देखील आषाढी एकादशी अगदी आनंदात साजरी केली जाते. आजच्या पिढीला भक्तिरसात न्हाऊन निघता यावे, त्यांनाही आपल्या पूर्वापार सुरू असलेल्या परंपरेची माहिती मिळावी म्हणून अनेक शाळा एकादशी साजरी करण्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबवतात. हमखास या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे एकादशीचा पारंपरिक पेहराव. या लेखात आपण एकादशी निमित्त कसा पेहराव करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. 

एकादशी ही वारकरी गणांमध्ये अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. कित्येक किलोमीटरचा हा प्रवास पायी करताना अनेक भक्तिमय गीते, खेळ आणि ओव्या म्हटल्या जातात. प्रत्येक जण अगदी भक्तिभावाने वारीत सहभागी झालेला असतो. आपल्या मागच्या सगळ्या चिंता मागे टाकून "ग्यानबा तुकाराम" नामगजरत टाळ आणि मृदुंगाच्या तालावर नाचत - नाचत वारकऱ्यांचा हा प्रवास सुरू असतो. 

याच एकादशी निमित्त अनेक शाळा मुलांना खास एकादशी पेहराव करून यायला सांगतात. सगळी इटुकली पिटुकली मुलं अगदी गोंडस तयार होऊन शाळेत जातात आणि अगदी बालपणी पासूनच त्यांच्यावर नकळत भक्तीचे संस्कार व्हायला सुरुवात होते म्हणूनच मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्याच्या या महत्त्वाच्या जडणघडणीत आवश्य सहभाग घ्यावा. 

चला तर मग आता जास्त वेळ न घालवता हा खास एकादशी पेहराव कसा करायचा याच्या टीप्स बघूया. 

  • खास मुलींसाठी पेहराव:- 

मुली आधीच खूप गोजिरवाण्या असतात त्यात एकादशी म्हणलं की त्यांचं हे सौंदर्य अजूनच खुलून येतं. मुलींना तयार करण्यासाठी तुम्हाला खालील सामान लागेल. 

१. नऊवारी साडी/ परकर पोलका 

२. छोटेसे तुळशी वृंदावन

३. पारंपरिक दागिने 

फक्त एवढ्या कमी सामानात तुम्ही तुमच्या छोट्या परीला खूप छान तयार करू शकता. चला पाहूया काही गोड पऱ्या ज्या एकादशी निमित्त छान तयार झाल्यात. 

१. युगंधरा 

२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी खुर्द च्या विद्यार्थिनी:- 


 

३. आरोही आणि आराध्या पाटील 

 

४. नव्या वैरागडकर 

५. काव्या शिंदे 

६. आरवी सावळे

  • मुलांसाठी एकादशी पेहराव कसा असावा? 

मुले एकादशी निमित्त वारकरी, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल यांच्यापैकी यांच्यापैकी कोणाचीही वेशभूषा करू शकतात. 

वारकरी वेशभूषा करण्यासाठी 

१. धोतर आणि बंडी 

२. टोपी 

३. टाळ

४. माळ

या गोष्टींची आवश्यकता असेल. 

ज्ञानेश्वर महाराजांची वेशभूषा करण्यासाठी

१. केसांचा विग 

२. गंध 

३. केशरी सोवळे 

४. माळ 

५. कमंडलू 

या गोष्टींची आवश्यकता असेल. 

तुकाराम महाराजांची वेशभूषा करण्यासाठी

१. पगडी 

२. उपरणे

३. धोतर आणि बंडी

४. चिपळ्या 

५. माळ 

६. वीणा 

या गोष्टींची आवश्यकता असेल. 

विठ्ठलाची वेशभूषा करण्यासाठी

१. उपरणे 

२. सोवळे 

३. मुकुट 

४. दागिने 

या गोष्टींची आवश्यकता असेल. 

चला तर बघूया आपले छोटे छोटे वारकरी कसे तयार होतात. 

१. ईशान गोडसे (वेशभूषा:- वारकरी)

२. आयुष कुलकर्णी (वेशभूषा:- वारकरी) 

३. वरद कुंजीर (वेशभूषा:- वारकरी)

४. दर्शील वैरागडकर (वेशभूषा:- वारकरी) 

५. पार्थ जाधव (वेशभूषा:- वारकरी) 

६. निशांत कोंडके (वेशभूषा:- वारकरी) 

७. अभिज्ञ सावंत (वेशभूषा:- संत तुकाराम महाराज)

८. रुद्र इंगळे (वेशभूषा:- संत तुकाराम महाराज)

९. आयुष कुलकर्णी (वेशभूषा:- संत ज्ञानेश्वर महाराज) 

१०. अर्जुन आणि अर्णव क्षीरसागर (वेशभूषा:- विठ्ठल) 


 

अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना एकादशी निमित्त तयार करून त्यांच्यातही भक्तिरसाची गोडी निर्माण करू शकता. 

वरील फोटो पाहून तुम्हाला मुलांना कसे तयार करायचे याचा अंदाज आलेलाच असेल. मुलांना तयार करण्यासाठी लागणारी वीणा, कमंडलू अश्या वस्तू तुम्ही स्वतः घरी करू शकता. 

घरोघरी वहीचा जाड पुठ्ठा हा असतोच. त्यापासून अगदी काही मिनिटात या वस्तू तयार होतील. 

सगळी तयारी झाल्यावर मुलांना विठूनामाच्या गजरात फेर धरायला शिकवले की अगदी परिपूर्ण अशी एकादशीच्या पेहरावाची तयारी पूर्ण झाली.