मागील भागात आपण पाहिले की समीरला आपल्या मनातील भावना सांगाव्यात म्हणून प्रिशा त्याला फोन करते पण अचानक त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे असे तिला कळते.आता पाहूया पुढे..
प्रिशा पटकन आपल्या खोलीत गेली.तिने काही पैसे घेतले आणि निघत असतानाच तिला वसुधाताई म्हणाल्या,
" कुठे निघालीस?"
" कुठे निघालीस?"
" अर्जंट कामासाठी जरा बाहेर निघाले आहे.."प्रिशा
तिला अजून हटकन लागू नये म्हणून वसुधाताई म्हणाल्या,
" ठीक आहे.बाबांना सोबत घेऊन जा."
" ठीक आहे.बाबांना सोबत घेऊन जा."
" बाबा तर ऑफिसला गेलेत ना?"प्रिशा
तेवढ्यात विनयराव बाहेर आले.
" बेटा जरा छातीत दुखत होतं म्हणून आलो घरी लवकर."
असे बोलून विनयराव चालता चालता अचानक कोसळले.
" बेटा जरा छातीत दुखत होतं म्हणून आलो घरी लवकर."
असे बोलून विनयराव चालता चालता अचानक कोसळले.
" बाबा,बाबा.."प्रिशा कळवळून ओरडली..
वसुधाताई देखील खूप घाबरल्या.त्यांनी कसेबसे विनयरावांना सोफ्यावर बसवले.ते छाती चोळत, वेदनेने विव्हळत होते.
" आई,तू थांब बाबांजवळ..मी ताबडतोब अँब्युलन्सला फोन लावते."प्रिशा
प्रिशाने अँब्युलन्स बोलवली.ती आणि वसुधाताई विनयरावांना घेऊन त्यात बसल्या.हर्षुला घरीच थांबवलं..
अँब्युलन्समधील डॉक्टरांनी त्यांना त्वरित ऑक्सिजन मास्क लावून योग्य त्या प्रोसीजर्स चालू केल्या.
अँब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली.आता विनयरावांना अधिकच त्रास वाटू लागला.डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी त्यांना आलेला हार्ट अरेस्ट कंट्रोल केला.
डॉक्टरांनी विनयरावांना ताबडतोब मुंबईला हलवावे लागेल असे प्रिशाला सांगितले.
ती वसुधाताईंना म्हणाली,
" आई,तू चल माझ्यासोबत..आपण हर्षुला ही नेवू आणि त्याला मावशीकडे ठेवू."
" आई,तू चल माझ्यासोबत..आपण हर्षुला ही नेवू आणि त्याला मावशीकडे ठेवू."
प्रिशाने लगोलग त्यांना मुंबईला नेले.मुंबईला गेल्यावर विनयरावांची अत्यंत क्लिष्ट अशी हार्ट सर्जरी केली गेली.
हार्ट सर्जन प्रिशाला म्हणाले,
"बरं झालं लवकर आणलं तुम्ही यांना.. ही इज अ लकी मॅन.."
वसुधाताईंचा जीव भांड्यात पडला.त्या म्हणाल्या,
" बघ प्रिशा, मार्गशीर्ष या पवित्र महिन्यातील देवीचाच महिमा आहे हा.."
"बरं झालं लवकर आणलं तुम्ही यांना.. ही इज अ लकी मॅन.."
वसुधाताईंचा जीव भांड्यात पडला.त्या म्हणाल्या,
" बघ प्रिशा, मार्गशीर्ष या पवित्र महिन्यातील देवीचाच महिमा आहे हा.."
प्रिशाला देखील हायसे वाटले.वसुधाताई आणि हर्षु मावशीकडे गेले.आता विनयरावांजवळ फक्त प्रिशा होती.
त्यानंतर अचानक तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि समीरचा देखील अपघात झाला होता हे तिला आठवले. तिचा जीव पुन्हा कासावीस झाला.
' कशी विसरले मी माझ्या समीरला? मी परफेक्ट आहे हा खरंच माझा गैरसमज आहे.किती वेंधळी होत चाललीये हल्ली मी!'
तिने असे स्वगत करत स्वतःला खूप दोषी मानले आणि ती जरा एकांतात गेली.तिने समीरच्या मोबाईलवर कॉल केला.
तिने असे स्वगत करत स्वतःला खूप दोषी मानले आणि ती जरा एकांतात गेली.तिने समीरच्या मोबाईलवर कॉल केला.
" हॅलो.."प्रिशा
" हॅलो,कोण?"
" मी प्रिशा बोलतेय.आपण?"
" मी त्याची आई बोलतेय.."
समीरजवळ आई आहे हे कळताच प्रिशाला बरे वाटले.
समीरजवळ आई आहे हे कळताच प्रिशाला बरे वाटले.
"मी समीरच्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहे.कसा आहे समीर आता?"
" ठीक आहे.थोडा जास्त मार लागलाय पण एवढं सिरियस नाही.."
" हुश्श.."
" आ..."
" आ.. म्हणजे बरं वाटलं मला हे ऐकून..खरं तर मी त्याला भेटायला येणार होते पण मध्येच माझ्याच घरात इमर्जन्सी आली."
" काही हरकत नाही..निवांत ये भेटायला.."
" आता काय करतोय तो?"
" सध्या झोपलाय.उठला की सांगते तुला कॉल करायला.."
" ठीक आहे.."
" बाय.."
' कमाल आहे! समीरची आई मला जणू काही ओळखते असंच बोलत होती.समीरने माझ्याबद्दल सांगितलं असेन का घरी?'प्रिशाच्या मनात आनंदाचे लाडू फुटायला लागले.
तेवढ्यात सिस्टरने तिला आवाज दिला.
" हॅलो,मिस.."
" हॅलो,मिस.."
" हो आले आले.."
घाईतच चालत असताना प्रिशाच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले.
घाईतच चालत असताना प्रिशाच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले.
तिने ते तसेच बॅगेत टाकले आणि सिस्टरकडे पळाली.
" तुमच्या वडिलांचे काही मेडिसिन्स आणून द्या."
" ओके.."
मेडिसिन्स घ्यायला मोबाईलमधुन पैसे आता देता येणार नव्हते.प्रिशाला जाम टेन्शन आलं.तिने पर्स चाचपडली.तिला पैसे सापडले; कारण बाबांना ही दुखापत होण्याआधी ती समीरला भेटायला निघाली होती; त्यावेळी तिने बॅगेत पैसे टाकले होते.
तिला बरं वाटलं.
तिने पटकन मेडिसिन्स आणली आणि सिस्टरकडे दिली.
तिचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला; कारण मोबाईल फुटल्यामुळे समीरसोबत तिचा कुठलाही संपर्क होऊ शकणार नव्हता.नेमके आता मोबाईल घेणे देखील शक्य नव्हते.
तेवढ्यात वसूधाताई आल्या.
तिचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला; कारण मोबाईल फुटल्यामुळे समीरसोबत तिचा कुठलाही संपर्क होऊ शकणार नव्हता.नेमके आता मोबाईल घेणे देखील शक्य नव्हते.
तेवढ्यात वसूधाताई आल्या.
प्रिशा त्यांना म्हणाली,
" आई,मोबाईल खाली पडला..बाबांचे मेडिसिन्स मागितले होते
सिस्टरने.. "
" आई,मोबाईल खाली पडला..बाबांचे मेडिसिन्स मागितले होते
सिस्टरने.. "
" मग आणून दिलेस का?"
" हो.माझ्या पर्समध्ये पैसे होते.."
वसूधाताई आपल्या लेकीची धावपळ बघून तिला जवळ घेत म्हणाल्या,
" अच्छा.. जाऊ दे झालं ना काम ते महत्वाचं.. जा घरी मावशीकडे.जेवण करून ये, तोवर मी थांबते.."
" अच्छा.. जाऊ दे झालं ना काम ते महत्वाचं.. जा घरी मावशीकडे.जेवण करून ये, तोवर मी थांबते.."
" आई, पण माझा मोबाईल.."
" प्रिशा घेवून देईल तुला नवीन मी..तोपर्यंत बाबांचा वापर.."
" बरं.. "
समीरबाबत मनात पुन्हा चाललेला हलकल्लोळ सावरत ती मावशीकडे गेली.
थोड्या दिवसांत विनयरावांना बरे वाटू लागले तरीही त्यांना डॉक्टरांनी काही दिवस सक्तीने ऍडमिट राहायला सांगितले.वसुधाताई आणि हर्षु यांना प्रिशाने घरी पाठवले. ती दोघेही आपल्या शहरात परतली पण प्रिशा मात्र विनयरावांसोबत हॉस्पिटलमध्येच थांबावे लागणार असल्याने मुंबईलाच थांबली.
तिच्या मनात रोज समीरचा विचार यायचा.
'कसा असेल माझा समीर? नक्कीच बरा असणार! तो चिडला असेल का माझ्यावर?नशीब माझ्याशी हा कसला खेळ खेळत आहे? मला त्याला ओरडुन ओरडुन सांगायचं आहे की मी तुझ्यासारखीच इम्परफेक्ट आहे,तुझीच आहे; पण माझी ही साद पोचेल त्याच्यापर्यंत?'

काय होणार या प्रेमकहाणीमध्ये पुढे? जाणून घ्यायचं आहे? तोपर्यंत स्टे ट्यूनड..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे