ईरा कोल्हापूर संमेलन २०२५ विशेष..!
डाॕ. अमित मेढेकरसर व डॉ. निधी मॕडम ईरा कोल्हापूर संमेलनाचे मुख्य आकर्षण …!
ईरा संमेलन म्हटले की आदरणीय अमितसर व निधी मॕडम यांचे नाव पटकन मुखात येते. सा-या जगात सकारात्मकतेची बीजे पेरणारे , विविध सेशनमधून लेखकांच्यासाठी मार्गदर्शन करणारे,एका स्रीने उभारलेल्या व्यासपीठाला उभारी देणारे अमितसर ईरासाठी बावनकशी सोने आहेत त्यांची समर्पणवृत्ती नेहमी प्रेरणा देते.
गेटटुगेदर हि संकल्पनेला सत्यात उतवणा-या , नियोजन आणि लेखकांना विविध गोष्टीतून प्रवृत्त करणाऱ्या निधी मॕडम ईरासाठी भक्कम आधारस्तंभ आहेत.कोल्हापूर संमेलन अगोदर निधिजी यांनी लेखकांचे लाईव्ह घेऊन संमेलनाला खरी चालना दिली. त्यामुळे संजना मॕडम यांना मोलाचे सहकार्य करण्यात निधी मॕडम आघाडीवर आहेत.
गेटटुगेदर हि संकल्पनेला सत्यात उतवणा-या , नियोजन आणि लेखकांना विविध गोष्टीतून प्रवृत्त करणाऱ्या निधी मॕडम ईरासाठी भक्कम आधारस्तंभ आहेत.कोल्हापूर संमेलन अगोदर निधिजी यांनी लेखकांचे लाईव्ह घेऊन संमेलनाला खरी चालना दिली. त्यामुळे संजना मॕडम यांना मोलाचे सहकार्य करण्यात निधी मॕडम आघाडीवर आहेत.
ईरा व्यासपीठाची संमेलनाची संकल्पना रुजली आणि ईराच्या सर्वेसर्वा संजना मॕडम यांना निधी मॕडमसारख्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाव्दारे संमेलन यशस्वी केली. पुणे येथिल पहिल्या संमेलनात लेखकांना कोणतीच कल्पना नव्हती की संमेलानात काय करायचे परंतु अमितसर व निधी मॕडम विविध खेळांनी कमाल केली आणि मनोरंजनामुळे संमेलन कधी संपले हे कळले नाही. नंतर नाशिक संमेलनात वेगळे खेळ व मनोरंजन यामुळे संमेलनात बुद्धीला चालना देणारे खेळ आणि जोडीला सर्वाबरोबर आनंद यामुळे यावेळी कोल्हापूर संंमेलनात कोणती संकल्पना आणतात याकडे लक्ष लागले होते. सगळ्यांचे स्वागत झाल्यानंतर सर्व लेखकांचे संघ तयार करुन बुद्धीला चालना देणारे खेळ सुरु झाले. सगळ्यांनी यामध्ये भाग घेऊन भरपूर आनंद लुटला. लहाणपणी अनेकांनी दोरी उड्या मारल्या होत्या या संमेलनात दोरी उड्या मारुन आपल्या आठवणी जाग्या केल्या. विविध खेळ समजून सांगण्याची अमितसर व निधी मॕडम यांची कला खूपच प्रभावी वाटली.
दिवसभरातील खेळानंतर संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये खूप आनंद लुटला. येथेही गाणी व खेळ व झाले. रात्रीच्या मैफिलमध्ये अंताक्षरी व ईरा किंग व ईरा क्वीन हा बहारदार कार्यक्रम झाला. यामध्ये लेखकांना अनेक कठिण प्रश्न विचारुन त्यांची बौद्धिक कसोटी घेतली यावरुन अमितसरांची लेखक हा वैचारिक दृष्टीने समृद्ध व्हावा हा प्रयत्न खूपच भावला. कपल गेम्स व रिलमध्ये निधी मॕडम यांनी लेखकांना खिळवून ठेवले.
एकंदरीत अमितसर व निधी मॕडम यांनी आपल्या कल्पकतेतून संमेलनाला कोल्हापूरी साज चढवला. खेळ , मनोरंजन, सत्कारसमारंभ , ईराचे स्फूर्तीगीत या सगळ्या कार्यक्रमात अमितसर वा निधी मॕडम यांनी अभूतपूर्व योगदान दिले आणि ईराचे कोल्हापूर संमेलन यशस्वी केले. ईराच्या सर्वेसर्वा संजना मॕडम सर्व लेखकांना भेटण्याची संधी दिली व अमितसर व निधी मॕडम यांनी लेखकांना प्रोत्साहन देत संमेलन संस्मरणीय केले याबद्दल आम्ही कोल्हापूरकर व ईरा परिवार त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.