' वहिनी महिना संपून २ दिवस होऊन गेले. प्रशांत भाऊजी अजून आले नाहीत आईंना घ्यायला?
मला उद्या माझ्या बहिणीच्या डोहाळजेवणाला जायचं आहे.
त्यांना काहीही करून आजच संध्याकाळी आईंना घ्यायला पाठवा.
स्वातीने आपल्या मोठ्या जावेला म्हणजे पूनमला फोनवर सांगितलं.
मला उद्या माझ्या बहिणीच्या डोहाळजेवणाला जायचं आहे.
त्यांना काहीही करून आजच संध्याकाळी आईंना घ्यायला पाठवा.
स्वातीने आपल्या मोठ्या जावेला म्हणजे पूनमला फोनवर सांगितलं.
काय हे स्वाती १ महिना झाला की बरोबर तुझा फोन असतो . जरा १० दिवस जास्त झाले तर काय बिघडत नाही.
पूनमनेही स्वाती ला समोरून उत्तर दिलं.
पूनमनेही स्वाती ला समोरून उत्तर दिलं.
वहिनी, तुम्ही आणि भाऊजी स्वतःच दुकानं चालवता. उद्या काय झालं तर तुम्ही सुट्टी घेऊ शकता, पाहिजे तेव्हा दुकानात जाऊ येऊ शकता. पण माझं आणि सागरचं तसं नाही . साधा उशिर जरी झाला तरी आमचा अर्ध्या दिवसाचा पगार बुडतो.
मग काय करणार आम्ही सांगा.
त्यात अर्धा पगार आईंच्या औषध पाण्यांत आणि त्यांच्या केअरटेकर ला देण्यातच जातो.
मग काय करणार आम्ही सांगा.
त्यात अर्धा पगार आईंच्या औषध पाण्यांत आणि त्यांच्या केअरटेकर ला देण्यातच जातो.
त्यानंतर पुढची १० मिनिटं दोन्ही जावा फोनवर आपल्या सासूबाईंमुळे होणाऱ्या त्रासाचं रडगाणं गात बसल्या.
पलीकडे खोलीत बेडवर झोपलेल्या मनोरमाबाईंना त्यांची चर्चा ऐकून रडू कोसळले.
पलीकडे खोलीत बेडवर झोपलेल्या मनोरमाबाईंना त्यांची चर्चा ऐकून रडू कोसळले.
दीड वर्षापूर्वी घरी येत असताना एका कार चालकाने पाठीमागून त्यांना धडक दिली. त्यामुळे त्यांच्या मणक्याला जबर दुखापत झाली. चालकाने त्यांचा हॉस्पिटलचा खर्च केला पण कायमची त्यांची रवानगी बेडवर झाली.
मनोरमाबाई ६५ वर्षाच्या होत्या. त्यांना दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार होता.
शिवाय मुलगी कांचन सासुरवाशीण होती. नवरा , मुलगी आणि सासू - सासऱ्यांसोबत ती जवळच्या ठिकाणी राहत होती.
त्यामुळे जमेल तसं ती आपल्या आईला भेटायला यायची . जेवणाचा डब्बा आणायची. थोडीफार सेवा करायची. पण तिचीही परिस्थिती आईला घरी घेऊन जाण्याइतकी चांगली नव्हती.

सासूबाईंना कोण सांभाळणार यावर दोन्ही सुनांमध्ये भांडण व्हायचे . नातेवाईक आणि जवळच्या लोकांना पण भेटायला येऊ देत नव्हते.
शेवटी दोघांनीही एक एक महिना सांभाळायचं अस ठरलेलं होतं.
शेवटी दोघांनीही एक एक महिना सांभाळायचं अस ठरलेलं होतं.
संध्याकाळी मोठा मुलगा प्रशांत नाराजीनेच छोट्या भावाकडे आला.
कॅब बोलवली आणि भावाच्या मदतीने आईला उचलून कॅबमध्ये मागच्या सीटवर झोपवलं आणि आपल्या घरी घेऊन गेला.
कॅब बोलवली आणि भावाच्या मदतीने आईला उचलून कॅबमध्ये मागच्या सीटवर झोपवलं आणि आपल्या घरी घेऊन गेला.
मोठ्या सुनेकडेही त्यांची तीच हालत होती. त्यांच्या खाण्यापिण्याकडे , स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जायचं. त्यामुळे रोज त्या परमेश्वराकडे आपलं मरण मागायच्या.
आईची ही अवस्था कांचनला पाहवली जात नव्हती. शेवटी तिने आपल्या नवऱ्याच्या मदतीने एका NGO मार्फत आईची सोय एका संस्थेत केली.
हे ऐकून तर दोन्ही मुलांना आणि सुनेला प्रचंड आनंद झाला.
हे ऐकून तर दोन्ही मुलांना आणि सुनेला प्रचंड आनंद झाला.
सासूबाईंना संस्थेत सोडून आल्यानंतर
मात्र त्यांनी कधीच चौकशी केली नाही.
शेवटी कांचनलाच
आईचा औषधं गोळ्यांचा खर्च, संस्थेची फी वैगेरे भरावी लागली.
सहा महिन्यानंतर मनोरमा बाई फार आजारी पडल्या. अंथरुणातच त्यांनी आपल्या लेकीला जावयाला पाहून हात जोडले आणि आशीर्वाद देत या जगाचा निरोप घेतला.

मुलांनी शेवटचे विधी पार पाडले. त्यानंतर १५ दिवसांनी २ माणसे घरी आली.
नमस्कार आम्ही *** रुग्ण संस्थेतून आलो आहोत. तुमच्या आई मनोरमाबाई गेली १ वर्ष २ महिने संस्थेच्या सोयी उपभोगत होत्या. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं पण त्या संस्थेच्या देणेकरी लागतात. हे ८०,००० बिल आलं आहे. १५ दिवसांत भरुन टाका.
ही बातमी आणि बिलाचा आकडा ऐकून दोन्ही भावांना चक्करच आली.
तेवढ्यात पूनम म्हणाली...
सासूबाईंना संस्थेत त्यांच्या मुलीने दाखल केलं होतं, त्यामुळे आम्ही देणं द्यायचा प्रश्नच नाही.
तुम्ही हे व्यवहाराच तिच्याशीच बोलून घ्या.
तेवढ्यात पूनम म्हणाली...
सासूबाईंना संस्थेत त्यांच्या मुलीने दाखल केलं होतं, त्यामुळे आम्ही देणं द्यायचा प्रश्नच नाही.
तुम्ही हे व्यवहाराच तिच्याशीच बोलून घ्या.
पण जर हे बील भरलं नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. शेवटी तुमच्या आई आहेत.
संस्थेचा माणूस म्हणाला.
संस्थेचा माणूस म्हणाला.
आई आता या जगात नाहीत त्यामुळे आम्हाला आता या प्रकरणात अडकवू नका. त्यांची मुलगी बघून घेईल हे. - पूनम
स्वातीने हुशारीने कांचनला फोन करून परिस्थिती सांगितली आणि ताबडतोब बोलावले.
थोड्यावेळात कांचन आली.
आत येताच सगळ्यांना हात जोडून म्हणाली..
माझ्या आईला दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे खुप यातना व्हायच्या. निदान ती गेल्यावर तरी त्रास नका देऊ.
साहेब सध्या माझ्याकडे पैसे नाहीत पण तुम्ही हे ठेवून घ्या. मला काही महिन्यांची मुदत द्या .मी थोडे थोडे करून पूर्ण पैसे फेडेल. असे म्हणून कांचन ने आपल्या बोटातली एकुलती अंगठी त्या माणसांसमोर धरली.
साहेब सध्या माझ्याकडे पैसे नाहीत पण तुम्ही हे ठेवून घ्या. मला काही महिन्यांची मुदत द्या .मी थोडे थोडे करून पूर्ण पैसे फेडेल. असे म्हणून कांचन ने आपल्या बोटातली एकुलती अंगठी त्या माणसांसमोर धरली.
५ मिनिटं त्या अनोळखी माणसांनी आपापसात काहीतरी कुजबुज केली आणि बॅगेतून २ लाखाचं नोटांचं बंडल काढून कांचनच्या हातात देत म्हणाले,
" ताई खरंतर आम्हीच तुमच्या आई- वडिलांचे देणेकरी आहोत.
१० वर्षापूर्वी हयातीत असताना तुमच्या वडिलांनी माझ्या आईच्या ऑपरेशन साठी आम्हाला २ लाखांची मदत केली होती पण तेव्हा आमची परिस्थिती नव्हती.
बऱ्याचदा आम्ही फोन करून यायचं ठरवलं पण तुमच्या घरचे मनाई करत होते.
हे पैसे योग्य व्यक्तीच्या हाती पडावे म्हणून आम्हाला हे नाटक करावं लागलं.
कांचन ताई कृपया हे पैसे स्वीकारा आणि आम्हाला या ऋणातून मुक्त करा.

भरल्या डोळ्यांनी आईच्या फोटोला हात जोडत कांचन पैसे घेऊन निघून गेली.
इकडे त्यांची दोन्ही मुलं आणि सुना मख्खपणे एकमेकांच तोंड पाहत बसले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा