(विषय - नशिबाचा खेळ)
*रिमझिम गिरे सावन - एक सल*
*©® स्वाती बालूरकर, सखी*
विदुलाने रोजच्या प्रमाणे सकाळी बाल्कनीत थोडा वेळ घालवला. कुठल्याही ऋतूत बाल्कनीतून दिसणारी सकाळ ही विलोभनीय असते. हिवाळ्यात धुक्यामुळे बाहेर पाहायला छान वाटतं, उन्हाळ्यात सकाळी गारवा असतो पुन्हा दिवसभर गर्मीने लाही लाही होते. सकाळ बाल्कनीतून खूप छान दिसते आणि पावसाळ्यात तर विचारायलाच नको. श्रावणाचा महिना चालला होता. अधे मध्ये चार चार दिवस झड लागत होती. विदुला आता जीवनाच्या ज्या टप्प्यावर होती तिथे आयुष्यातील धावपळीचा काळ संपला होता. त्यावेळी सासुबाई, सासरे, नवरा यांची घाई, मुलीची शाळा तिचा डबा, सगळीच धावपळ.
सासू-सासरे वयोमानाने निवर्तले. नवऱ्याबद्दल तर काही बोलायलाच नको. तो देखील आता आयुष्याचा भाग नव्हता. मुलगी रिया आता मोठी झाली होती आणि तिची काही जबाबदारी नव्हती. नोकरी नोकरी म्हणून विदुलाचे अर्धे आयुष्य पळापळीत गेले होते. ती घाई पण आता नव्हती, स्वेच्छा निवृत्ती घेतल्यापासून मनात एक शांतता होती आणि आता छंदांसाठी थोडा वेळ देता येत होता. कुणा एका साथीदाराची कमतरता राहतेच पण आयुष्यात. . . कितीही तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला तरीही. काही बोलायला, किंवा मनातलं सांगायला, ऐकायला , कुणी एक हवं असतंच , विशेषतः आयुष्य उताराला लागल्यावर !

आजही ती रोजच्या प्रमाणे बाल्कनीत येऊन थोड्यावेळ थांबली.आभाळ गच्च भरून आलेलं होतं, विदुलाने बाल्कनीतल्या तुळशीसमोर रांगोळी काढली. तुळशीला अगदी कमी पाणी टाकलं कारण कधीही पाऊस पडेल असे वाटलं. पूजा करून मनोभावे हात जोडले. तो तिचा नित्याचा दिनक्रम होता.
घरात आली तर तो वेगळा मेसेज टोन वाजला. त्या मेसेजचा टोन आवाज ऐकून देखील तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित झळकलं.
घरात आली तर तो वेगळा मेसेज टोन वाजला. त्या मेसेजचा टोन आवाज ऐकून देखील तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित झळकलं.
"हाय, गुड मॉर्निंग,तिकडे पाऊस पडतोय का गं ?"त्याचा नेहमी प्रमाणे सकाळचा पहिला मेसेज.
ती खुर्चीवर बसली आणि उत्तर दिलं. " का हो असे विचारताय . . ?"
"कारण इकडे खूप पाऊस पडतोय. दोन दिवसात सूर्यदर्शन झालं नाही आणि आज तर तुला खूप मिस करतोय."
" मला मिस करताय, काय झालं कौशिक? तब्येत बरी आहे ना तुमची?"
"बरी आहे पण तू आलीस तर एकदम ठीक होऊन जाईल. पावसाने थंडी पडली आहे, तू बाजूला असावीस असं वाटतं आहे."
" हे काय आता? तुम्ही तर नेहमी म्हणता ना की मी सतत तुमच्या सोबत असते !"
" हम्म, मी म्हणतो खूपदा तसा. . पण भास असतो विदुला. तू खरीच . . . म्हणजे प्रत्यक्षात इकडे आलीस तर काय बहार येईल ?"
"शक्य नाही ना ते . . तुम्हाला देखील माहित आहे."
इतक्यात त्याचाच व्हाट्सअप कॉल आला.
इतक्यात त्याचाच व्हाट्सअप कॉल आला.
" विदुला, किती वेळ ते टायपिंग करायचं , एक ना , सगळं कळतं मला, पण हल्ली कल्पनेतलं जगच मला सुंदर वाटत आहे. तू विश्वास ठेवणार नाहीस पण हल्ली मला सतत असं वाटतं की तू माझ्या बाजूला आहेस ,अग रात्री तर कधी कधी तुझ्याशी मी गप्पा मारतो."
" दिस इज टू मच सर! काय सांगताय ? काय गप्पा मारता ते विचारणार नाही बरं का मी." ती मिश्किल पणे हसली.
"मनातलं सगळं तुझ्याशी बोलत असतो, आश्चर्य म्हणजे पूर्वी हे सगळं एकतर्फी होतं . . . पण आता तू काहीही म्हण हल्ली तू मला उत्तर पण द्यायला लागलीस. आणि तू विचार गं, तू काहीही विचार मी खरं सांगेन. अगदी काय गप्पा मारतो ते पण सांगेन. "

" पण सर, इतकं कल्पनेत गुंतणे पण बरोबर नाही. हे थांबायला हवंय."
" विदुला, तुझ्या नुसत्या कल्पनेने मी इतका आनंदी राहतो पण देवाने माझी गाठ तुझ्याशी बांधली असती तर. . ."
आणि त्यानेच फोन कट केला.
आणि त्यानेच फोन कट केला.
तिच्या लक्षात आलं की तो खूप भावनिक झाला होता त्याने फोन ठेवलाय, आता त्याच्याशी बोलणं बरं नाही. किती नाही म्हणलं तरी त्याची काळजी वाटतच होती , तिने थोडा वेळ त्याच्या मेसेजची वाट पाहिली
बराच वेळ त्याचा मेसेज आला नाही. विदुला विचारात पडली की हा माणूस खूप भावनिक आहे, एकटा राहतो, माझा वर्चुअल म्हणजे आभासी जगातला मित्र आहे, ठीक आहे . पण त्याने इतकं कल्पनेत वाहत जाणे देखील ठीक नाही.
बराच वेळ त्याचा मेसेज आला नाही. विदुला विचारात पडली की हा माणूस खूप भावनिक आहे, एकटा राहतो, माझा वर्चुअल म्हणजे आभासी जगातला मित्र आहे, ठीक आहे . पण त्याने इतकं कल्पनेत वाहत जाणे देखील ठीक नाही.
इतक्यात त्याचा मेसेज आला आणि मेसेज मध्ये युट्युब वर शोधून तिला एक गाणं पाठवलं होतं.
“रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन.”
ते गाणं आतापर्यंत शेकडो वेळेला पाहिलेलं असून देखील तिने पुन्हा ती लिंक उघडली आणि मनसोक्त पावसात भिजताना मौसमी आणि अमिताभ ला पाहून घेतलं. इतक्यांदा पाहिलेलं आणि ऐकलेलं असूनही आज त्या गाण्यातली पावसाची मजा वेगळी वाटत होती, अर्थात जाणवत होती कारण ते त्याने पाठवलं होतं ! जणू ते गाणं तो म्हणत आहे असा फील तिला आला. माणूस भावनिक झाला की गाण्याचे बोल मनाला भिडतात म्हणे ते अगदी खरे आहे.
रोज मोकळ्या वेळात मस्त मेसेजवर बोलणे व्हायचे. कधीतरी एखाद्यावेळी कॉल वर बोलणे व्हायचे. फेसबुक च्या मेसेंजर वर झालेल्या मैत्रीतून सहा एक महिन्यांनी फोन नंबर घेतले गेले होते.
आज शनिवार, तिच्या मुलीला सुट्टी होती. ती अजून उठली नव्हती म्हणून विदुलाने पंधरा मिनिट वाट पाहून सरळ बाल्कनीत बसूनच त्यांना कॉल लावला.
"काय झालं कौशिक सर? इतकं सुंदर गाणं पाठवलं आहे."
" अगं , तू आधी ते सर म्हणणं बंद कर .. . सर का म्हणतेस गं मला ? मी कधी मॅडम म्हणालो आहे का तुला ? ऑफिस मधून स्वेच्छा निवृत्ती घेतलीस पण त्या तोंडातलं सर काही जात नाही तुझ्या. . हा हा हा!" तो मनमोकळा हसला.
"बरं राहिलं. तर कौशिक ,गाणं पाठवण्याचं प्रयोजन?"
"लक्ष देऊन पाहिलास ना व्हिडिओ, तसाच व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. म्हणजे अमिताभ नंतर मला पुन्हा एकदा त्या स्टाईल मध्ये तो रिमेक करायचा आहे. .हा हा हा!"
" कुछ भी ! हे वय आहे का आता आपलं ? रिमेक करायला ,अहो पण मुंबईत आहे ना तो स्पॉट ?"
"ये ना तू ,एकदा मुंबईला, मी येतो तुला स्टेशनवर घ्यायला. मस्त मरीन ड्राइव्ह वर जाऊ, पावसात भिजू, "
" मी असं काही कधीच म्हणाले नाही तुम्हाला, . . हो की नाही . . .. . मग न घडणाऱ्या गोष्टींच्या गप्पा मारू नका." विदुला लटक्या रागाने म्हणाली.
"सोड ग, या निराशेच्या गप्पा! तुझ्या आणि माझ्या आयुष्यात आता काय राहिलं आहे सांग बर? या कल्पना ज्या मनाला आनंदी करतात त्याच जगून घ्यायच्या, किमान बोलून घ्यायच्या. . . त्याला कुठे पैसे पडतात?"
"मला खरंच शक्य असतं तर आले असते. . पण?"
"तेच तर सांगतो आहे विदुला, मी येते असे म्हण. मग आपण शूटिंग करू. या गाण्यात मला तुझे विशेष फोटो सेशन करायचे आहे , कारण अशीही तू पण फोटोमध्ये माझ्या शेजारी तशीच दिसणार जशी मोसमी दिसते."
" अहो, मोसमी सारखी म्हणजे मी तिच्यासारखी निरागस की बुटकी? काय म्हणायचे आहे तुम्हाला ?"
तो खळखळून हसला.
क्रमशः
©®स्वाती बालूरकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा