मला माझीच कविता कळेना
शब्द कुठे कसे जपावे कि वापरावे सुचेना
शब्दांच्या मांडणीत या मनाची कळी खुलेना
शब्द कधी पाखरू बनले
शब्द कधी भावनेत गुंतले
शब्द कधी प्रेमात गुंफले
हेच शब्द कधी कवितेत
भरभरून रडले
एकांत मांडला मी कवितेत
सखा भासला जवळी कवितेत
भाव सगळेच उतरले कवितेत
माझ्या मनातील तो निशब्द कल्लोळ गरजला कवितेत
कधी आटलेल्या भावना
साठलेले पाणी डोळ्यांत भरले
शब्द मांडताना कधी कचरले
भावना मनातील कवितेत उतरले
कोणी मांडले यांत दुःख सारे,
कोणी मांडले मग फुलांचे पसारे,
कोणी मांडले विरह मनाचे
तर कोणी मांडले शब्द प्रेमाचे
कधी कोण जाणे ? शब्द कवितेत बदलले
अन मी माझ्या कवितेत हरवले .
शगुफ्ता ईनामदार
सोलापुर , महाराष्ट्र .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा