Login

षडाक्षरी काव्य

मनातल्या अबोल भावना
बेचेन मन हे
माझे असे राही
नयनांना ओढ
तुझी वाट पाही

हिरवा हा चुडा
हातात सजला
मेहंदीने माझा
हात हा रंगला

सुंदर हा साज
सजला प्रेमाने
मिलनाची ओढ
वाढली प्रीतीने

सात फेऱ्यांच्या या
बंधनात आले
आज पासून मी
अर्धांगिनी झाले...

सौ. एकता निलेश माने