कृष्णा का दोस्त मेरे हाथों में चिट्ठी देकर रोते चला जाता है।
मैं कुछ पल के लिए वहा थम जाती हूं। मेरे पैलो तले जमीन हिल जाती हैं। जो कुछ हुआ उसके बाद मुझे क्या करू किससे बात करू कुछ समझ नही आता। जो चिट्ठी मेरे हाथों में रहती हैं उसमे और क्या लिखा रहेगा। वो सब पढ़ने का और समझने का मनोबल मुझमें नहीं बाकी रहता। लेकिन आखरी बार कृष्णा के मन में क्या था और उसने ऐसा क्यों किया ये समझने के लिए मुझे वो चिट्ठी पढ़ना जरूरी रहता हैं। मैं घर जाती हू। घर में सबको मिलने के बाद अपने कमरे में जाती हूं।
हे सगळे क्षितिजा खूप लक्षपूर्वक ऐकत असते. तिच्या डोळ्यात पन्ना बद्दल काळजी स्पष्ट दिसत असते.
दोघींचं जेवून झालेलं असत.
दोघींचं जेवून झालेलं असत.
पन्ना पुढे बोलू लागतात....
मैं वो चिट्ठी खोलती हूं। दिल पर पत्थर रखकर मैं पढ़ना चालू करती हूं।
प्रविण उर्फ मेरी प्यारी पन्ना। मैं तेरे इतना होशियार नही हूं। इसलिए मैं आगे सब मराठी में लिखूंगा। मुझे क्या तेरे इतना सरल हिंदी नहीं आता और मुझे पता हैं । तू इतना पढ़ाकू हैं की तुझे मराठी बहुत अच्छी तरह से आता हैं।
( कृष्णा एक मराठी फैमिली में पला बढ़ा लड़का रहता हैं। उसे हिंदी सिर्फ पुस्तक में पढ़ने तक आता हैं। वो हर वक्त मेरे से मराठी में बातें करता था। )
पन्ना पुढे वाचू लागतात.
तुला पन्ना नावाचा अर्थ माहित आहे का? पन्ना एक हिरा आहे . एक रत्न आहे. तू तशीच माझ्या आयुष्यात आलीस. तू असा विचार तरी कसा केलास की मी तुझ्यासोबत एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेन. तुझ्यासोबत असे एवढं माणुसकीला काळीमा फासणार कृत्य करेन. तू शरीराने जरी मुलगा असलास. तरी तुझ्यात मला माझी जीवनसाथी मिळाली होती. सुरवातीला एक कुतूहल म्हणून मी वर्गात तुझ्याकडे बघायचो वाटायचं की हे असे काय ध्यान आहे. एवढा छान आहे दिसायला आणि असा बायकांसारखा का वागतो. मुलींमध्ये राहतो तरी ह्याला कोणतीच मुलगी आवडत नाही. काही मुलींनी तर तुला प्रपोज पण केलं होत तर तू स्पष्ट नकार दिला होतास. मी नेहमी तुझ्यावर लक्ष देऊन असायचो. तू मुलींमध्ये जेवढं खुलून वागायचा तेवढं मुलांमध्ये असताना तू अस्वस्थ असायचा. मला तू नक्की काय कलाकृती आहेस हे जाणून घ्यायचं होतं. "माझे मित्र नेहमी मला म्हणायचे काय सगळ्या मुलींना सोडून त्या बाईल्याकडे बघत असतोस. जरा मुलींकडे बघ. तुझी टेस्ट चेंज झाली आहे का? की तू पण तसाच आहे." असे काही बोलून माझ्यावर हसायचे.
नंतर मला तुला जाणून घ्यायचा. तुझ्याबद्दल समजून घ्यायचा मोह आवरला नाही म्हणून मी तुझ्यासोबत मैत्री केली. तुला म्हणून मी एकदा चहासाठी विचारलं आणि तू सुद्धा जसे काही ह्याच संधीची वाट बघत होतास असे पटकन हो बोललास. आपण चहासाठी गेलो त्या नंतर आपली मैत्री झाली. नंतर आपण जसे जसे भेटत राहिलो तसे मला तुझ्यामधल्या एक एक गोष्टी कळू लागल्या. तुझ्यातले एक एक गुण मला कळू लागले. अर्थात ते चांगलेच होते पण एवढंच की मुलाच्या शरीराला साजेसे नव्हते. एका मुलीला लाजवतील असे गुण तुझ्यात आहेत. तू माझ्यासोबत असताना खुलून वागायचा आणि इतरांन समोर तू उगाच देखावा करायचा हे मला जाणवलं होत. तुझ्यासोबत असताना माझा रोजचा दिवस खूप गुलाबी आणि आव्हानात्मक होता. तुझ्यासोबत असताना मी प्रवीण नाही तर पन्ना च्या प्रेमात पडत होतो आणि तुला समजून घेण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. तुझे ते लाजणे, मुलांसारखे चालणे, इतकंच काय मुलांसारखी ती अदा. मी तुझ्या प्रेमात पडायला लागलो होतो. अर्थात मी पन्ना च्या प्रेमात पडत होतो.
पन्ना चा दुसरा अर्थ तुला माहीत आहे. पन्ना म्हणजे पान. मी तुझ्या आयुष्याचं एक एक पान जसे वाचत होतो. तसे मी आपल्या आयुष्याचं एक एक पान लिहायला लागलो होतो. मला माहित होते की मी जर आपल्या प्रेमाबद्दल कोणाला सांगितलं तर ते गे म्हणतील आपल्याला किंवा आपली टिंगल करतील. म्हणतील की काय तुला तो बायल्या आवडला. पण मला माहित होत. तुझं शरीर जरी मुलाचं असल तरी मन मुलीचं होत आणि ह्यात तुझी काहीच चूक नव्हती. तू तसा राहत होतास कारण तुला जन्मापासून त्या भावना होत्या. तू नेहमी मुलींच्या सगळ्या गोष्टींमध्ये कंफर्टेबल असायचा. एवढंच काय तर तुझे माझ्यासमोर ते स्वतःला सावरुन बसणं. किंवा सारखे कपडे नीट करणं मुलींसारख स्वतःला झाकणं. मुलीचं शरीर असल्याप्रमाणे स्वतःची छाती दिसत नाहीय ना म्हणून सारखं ते कपडे सावरणं. माझे मित्र कधी भेटले तर अवघडण. मुलींनी माझ्याकडे पाहिलं तर तुझ्या चेहऱ्यावर येणारा राग मी सगळे काही टिपत होतो. माझ्यासाठी माझ्या आवडीचा पदार्थ बनवून आणणं. माझी काळजी करणं. मला माझ्या पुढच्या भविष्याबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल समजावणं. वाईट सवयी आणि वाईट संगतीपासून मला लांब ठेवणं. माझे पैसे नेहमी जपून वापरणं. मला तर तुझ्या रुपात माझी प्रेयसी मिळाली होती. तुझे शरीर सोडलं तर सगळ्या गोष्टी एका संस्कारी मुलीप्रमाणे होत्या. मी सुद्धा तुझी इज्जत करत होतो. आपल्या भविष्यासाठी तयारी करत होतो. घरच्यांना कसे समजवायचे ह्याचा विचार करत होतो. समाज आपलं नात स्वीकारेल किंवा नाही पण मला तू हवा होतास. लोक लाख किती नाव ठेऊ देत पण माझ्यासाठी तू एक मुलगी होतास त्यामुळे माझ्यासाठी आपण पूर्ण होतो. म्हणतात ना soulmate म्हणजेच आत्म्याच मिलन किंवा आत्म्याचा सोबती...तो हमे आपके शरीर से कोई ताजुक नही था हमे आपकी रूह से प्यार हुआ था...मी जन्माला आलेल्या पन्ना वर प्रेम करत होतो. जगासमोर असणाऱ्या प्रविणवर नाही. आजकालच्या ह्या आकर्षणाच्या जगात खऱ्या अर्थाने मी प्रेमात पडलो होतो. मी ह्या भावना तुझ्यासमोर शब्दात व्यक्त करणारच होतो पण काही वेळानंतर बाकी तुला माझ्या स्पर्शात, माझ्या वागण्यात तुझ्या बद्दलच प्रेम जाणवले असेलच. मी कधीच वासनेने तुझ्या जवळ आलो नाही.माझ्या डोळ्यात तुला कधीच तुझ्या विषयी प्रेम दिसलं नाही का? तू विचार तरी कसा केलास पन्ना की मी तुझ्यासोबत असे काही वागलो असेन. मी तुझ्यासोबत इतकं घाणेरडं कृत्य करेन. आपण एकांतात असताना देखील मी तुला कधी स्पर्श केला नव्हता. रस्त्यात चालताना हात धरणे किंवा मस्ती करताना स्पर्श झाला असेल तेवढंच काही स्पर्श करायचो मी तुला. त्या व्यतिरिक्त मी कधीच कोणत्याच प्रकारच्या शारीरिक सुखाची मागणी तुझ्याकडे केली नाही. ना कधी तुला त्या नजरेने पाहिल. मी नेहमी तुला इज्जत देत होतो.मी तुला कधीच माझ्या चुकीच्या मित्रांमध्ये नेलं नव्हत. त्यांनी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहिले तर मला सहन होत नव्हत. त्या दिवशी अचानक मित्राचा फोन आला आणि तुला भेटायचं पण ठरलं होत तर तुला कसे नाकारू म्हणून तुला सोबत घेऊन गेलो. मला कल्पना नव्हती की तिथे असे काही होईल. त्यांनी असं प्लॅनिंग करून ठेवलं असेल. त्या दिवशी तुझ्यासोबत जे काही झालं त्या नंतर असे अचानक तुझे निघून जाणं. मला न दिसणं, न भेटणं, ना आपलं बोलणं झालं. ह्या सगळ्या गोष्टींनी मी तुटून गेलो होतो. तुला काही झालं नाही ना तू असं अचानक का गेलास? माझे काही चुकलं का? ह्या सगळ्या विचारांनी मी वेडा झालो होतो. मी तुला खूप शोधलं. सगळ्यांना विचारलं पण कुठूनही तुझी काहीच माहिती मला मिळाली नाही. तू भेटला नाहीस, दिसला नाहीस म्हणून मी आजारी पडलो. त्या नंतर हे सगळे मित्र मला भेटायला आले त्यांच्या समोर मी आपल्या प्रेमाची म्हणजे माझ्या तुझ्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. तेव्हा त्यांनी त्या दिवशी घडलेला प्रकार मला सांगितला आणि मी आतून पूर्ण तुटून गेलो. माझे शरीर प्राणहीन झालं होतं. मी त्यांना काय बोलू, काय शिक्षा देऊ मला काहीच कळत नव्हत. मी त्यांना तिथून जायला सांगितलं. मला माझे असे जगणं नको होतं. त्या दिवशी जे घडलं ते माझ्या प्रेयसी सोबत झालेलं होत. माझ्या पन्ना वर त्या दिवशी शारीरिक अत्याचार झाला होता. हा धक्का मला सहन नव्हता होत मी तुला नेहमी मुलगी म्हणून वागवत आलो. तर एका मुलीवर तेही माझ्या soulmate वर झालेला तो प्रसंग मला कसा सहन होईल. तुझ्या बाबतीत मी किती भावूक आहे हे मला त्या दिवशी जाणवलं. पण माझ्या प्रेमाची कबुली तुझ्यासमोर देणं मला गरजेचं होत. म्हणून ही चीठी तुझ्यासाठी लिहली आणि स्वतःच आयुष्य संपवून घेतल.
पन्ना ह्या सगळ्यात दोष तुझा नव्हता. मी माझ्या मित्रांना काही गोष्टी सांगू शकलो नाही किंवा आपल्या बद्दल समजावू शकलो नाही. मी त्यांचे विचार किंवा समजाचे विचार हे बदलू शकलो नाही. पण तू तसे करू नकोस. तू कोणाला घाबरु नकोस. स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार कर आणि असे काही कर की आपल्या प्रेमाचा लोकांनी स्वीकार नाही केला तरी आदर करतील. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे पन्ना ह्या जन्मात नाही एकत्र होता आले आपल्याला पण पुढच्या प्रत्येक जन्मात माझी अर्धांगिनी म्हणून ये माझ्यासाठी. जमल तर मला माफ कर.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा