परकाया भाग ७०
समीरा ला धक्यावर धक्के मिळत होते .. म्हणजे राहुल बॉस चा मुलगा आहे .. ती विचार करू लागली काय हा मुलगा दिसतो असा .. पण मनात किती रहस्य घेऊन बसलाय .. समीरा राहुल च्या खूप जवळ होती .. तो मधेच झोपेतून उठला आणि तिला म्हणाला " फायनली तू आलीस माझ्या वर्ल्ड मध्ये .. किती वाट बघितली तुझी .. " आणि तिला तिथून तशीच उचलून त्याने बेडवर त्याच्या कुशीत घेतली ..
दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल ने तिला सांगितले .. “हि रूम मी तुझ्या साठीच तयार केलीय .. मी जेव्हा पण माझ्यासाठी काही परचेस करतो तेव्हा तुझ्या साठी पण करतो .. या रूम मध्ये कधीच कोणी राहिलेलं नाही .. आणि माझ्या रूम मध्ये माझे मॉम डॅड पण आलेले नाहीत .. यु आर द फर्स्ट गर्ल इन माय लाईफ अँड इन माय रूम आय लव्ह यु समीरा "
राहुल " मी तुला अजून एक राज सांगणार आहे .. मी तुला प्रोपोज करायच्या जय तुला प्रोपोज करणार आहे याचा अंदाज आला होता .. त्या वेळी मी खूप डिस्टर्ब झालो होतो .. जय ने मोटार बोट हायर केलेली मला माहित होते .. त्या दिवशी त्या मोटार बोट चा ड्राइवर कोण होता माहितेय का ?
समीरा " नाही त्याचे तोंड नीट दिसले नाही "
राहूल " त्या दिवशी मोटार बोट चे डेकोरेशन पण मी केले होते .. सगळे तुझ्या आवडीचे होते .. जय तुला अंगठी घालणार होता तर माझ्या कडून चुकून स्टिअरिंग हलले आणि ती अंगठी पडली .. आणि तो तुला किस करणार होता तेव्हा पण मी मुद्दामून स्टेरिंग हलवणार होतो तर जय ला फोन आला .. "
समीरा हसायला लागली .. “राहुल .. त्या पेक्षा तू मला सांगायचेस ना "
राहुल " अरे यार . .. आपण दोघे लहान पणा पासून एकत्र आहोत .. तुझे पूर्ण एडुकेशन .. तुझा जॉब ह्या सगळ्यात मी तुझ्या बरोबर आहे .. तरी तुला नाही कळले तर सांगून काय उपयोग .. तूच सांग "
राहुल " पण नंतर लगेच जय गावी गेला .. आणि त्यामुळे तू खूप अपसेट होतीस .. त्या दिवशी आपण डिनर ला गेलो होतो तेव्हा तू खूप जय वर खूप चिडली होतीस .. त्या दिवशी रात्री मला खूप वाईट वाटले .. असे वाटले कि मी उगाच तुमच्या दोघांमध्ये येतोय .. त्या नंतर मी ठरवून टाकले कि तुला मी फक्त मैत्रीण म्हणूनच मानेल ..कारण तू खुश तर मी खुश .. पण नशीब बघ ना .. जय वर प्रेम करणारी त्याची वाट बघत होती .. परिस्थिती अशी आली कि जय ला वसू शी लग्न करावे लागले .. तरी पण मी वसू ला पण समजावले होते कि तू लवकर या दोघांना मोकळा करून टाक .. वसू चे जय वर एवढे प्रेम होते कि ती जीव द्यायला पण तयार झाली होती तरी ती तुमच्या दोघांसाठी जय ला सोडायला तयार झाली होती .. पुन्हा परिस्थिती तुमच्या दोघांच्या बाजूने तयार होत होती आणि वसू आणि मी मनापासून तुम्हा दोघांना एकत्र आणायला तयार झालो होतो .. मी डॅड ला सांगून तुला आणि जय ला मुद्दामून एकत्र मिटिंग ला पाठवली होती ..
पण झाले उलटेच जय जसा वसू पासून लांब गेला त्याला त्याचे वसू वर पण प्रेम आहे जे कि लहान पणा पासून आहे हे त्याला जाणवू लागले .. अर्थात याची सुरुवात खूप आधी पासून झाली होती .. जेव्हा जय ला प्रमोशन मिळाले तेव्हा तो आपल्या दोघांना घेऊन पार्टी ला गेला नव्हता .. पण तो वसू बरोबर पार्टीला गेला होता .. मी त्याला हॉटेल मध्ये पहिले होते .. मी तुला फोन करून विचारले होते कि जय ने तुला बोलावले होते का ? तर तुला या संदर्भात काहीच माहित नव्हते .. तेव्हाच मला कळले होते कि जय वसू मध्ये इन्व्हॉल्व होतोय .. मला वाटले तुम्हा दोघांना थोडा एकत्र वेळ घालवायला मिळाला तर जय च्या मनातले सगळे डाऊट क्लीअर होतील .. पण तिकडेच तुमचा ब्रेक अप झाला ..
त्या नंतर सुद्धा मी नॉर्मल होतो उलट मी हे बघत होतो कि तुमच्या दोघांचा ब्रेक अप झाला म्हणून मी तुझ्या साठी एकमेव ऑप्शन आहे असे मलाही मान्य नव्हते .. म्हणून मी मुद्दामून दिल्ली ला गेलो .. खूप दिवस तिकडे राहिलो ... इनफॅक्ट जर तू मला प्रोपोज केले असतेस ना तर मी तुला नाहीच सांगायचे ठरवले होते .. पण आपल्या फ्रेंडशिप वर कधीच परिणाम होऊ दिला नाही ..
झाले असे जेव्हा वसू ने तुझ्या वर अटॅक केला ना तेव्हा मी अल्मोस्ट मेलो होतो .. तुला गमावण्याच्या भीतीने माझी हालत बेकार झाली होती .. आणि आता मला तुला एक मिनिट सुद्धा माझ्या डोळ्या समोरून कुठेही जाऊ द्यायचे नाहीये .. समु आय रिअली लव यु .. आय नीड यु .. आय कॅन नॉट लिव्ह विदाउट यु .. विल यु प्लिज बी माईन फॉर एव्हर "
समीरा ने त्याला घट्ट मिठी मारली .. “यस आय डू .. यस आय डू “
दोघांच्याही डोळ्यांत आनंदाचे .. समाधानाचे अश्रू होते .. फायनली हे दोघे पण एकत्र आले.
दुसऱ्या दिवशी राघव ने जय ला सांगितले कि आज संध्याकाळची सरांची अपॉइंटमेंट मिळालीय . तू आणि वसू तयार रहा .
जय ला आता वसू ला या गोष्टी साठी कॉन्व्हिन्स करायचे होते . दवाखाना म्हटले कि ती आधीच घाबरून जायची .
दुपारी जय ती आणि वीरू मुद्दामून तिला तिला रिलॅक्स करण्यासाठी हॉल मध्ये पत्ते खेळत होते . सर्व टेन्शन विसरून तिघे थोडावेळ हसी मजाक करत होते . मधेच वीरू वसू च्या डोक्यात एखादी टपली मारायचा .. मधेच जय तिचे नाक ओढायचा .. दोघांनी तिचे खूप सारे हात ओढले म्हणून तिला दोघे डिवचत होते .. ती पण चीटिंग आहे राव .. तुम्ही दोघे बघून हुकूम लावताय वगैरे वगैरे असे त्यांचे चालू होते .. तिला असे आंनदी बघून जय ला एक तिघांचा सेल्फी काढायचा मोह झाला .. जय ने त्याच्या मोबाईल चा कॅमेरा सेट केला आणि तिघांनी सेल्फी साठी पोझ दिल्या .. जय लगेच ग्रुप वर तोच फोटो टाकणार होता म्हणून फोटो कसा आलाय ते बघत होता तर .. तर .. एक मिनिट त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास च बसेना .. एक दोन फोटोस क्लिक केलेले .. जय ने पटपट सगळे फोटो चेक केले .. तर मधेच मागे असलेल्या सोफ्याकडे बघितले .. मधेच किचन मध्ये बघू लागला .. एकदा वसू कडे घाबरलेल्या नजरेने बघू लागला ..
वीरू " जय .. काय झालेय .. असा का करतोय .. इकडे तिकडे का बघतोय ?"
जय ने वसू ला कळू नये म्हणून .. काही नाही .. असे म्हणून त्याचे घाबरलेले एक्सप्रेशन बदलले . पण वीरू च्या नजरेतून तो सुटला नाही ..
वीरू " बघू फोटो .. "
जय " नाही नको .. ते बॅटरी लो आहे .. मी चार्जिंग ला लावतो "
जय आत जाऊन पुन्हा मोबाईल मधले फोटो चेक करू लागला .. फोटो मध्ये नताशा पुसटशी दिसत होती .. एका फोटोत ती सोफयावर बसली होती .. एका फोटोत ती किचन मधून बाहेर येताना स्पॉट झाली होती .. आणि एका फोटोत तिने वसू च्या खांद्यावर हात टाकून फोटो ला पोझ दिली होती ..
नताशा .. अदृश्य/सूक्ष्म शरीराने घरात मुक्तपणे वावरत होती .. जशी काय ती त्यांच्या घरातील एक मेंबर आहे
जय ला लिटरली घाम फुटला होता .. कदाचित ती आता त्याच्या बेडरूम मध्ये सुद्धा असू शकेल .. ती साधारण डोळयांना दिसत नाही .. पण फोटोत कशी काय कॅप्चर झाली .. आणि हे काय .. एक आत्मा म्हणा शक्ती म्हणा आपल्या आजू बाजूला वावरतेय आणि हे आपल्याला माहीतच नाही हि गोष्ट किती भयानक होती .
जय चा श्वास त्याच्या गळ्याशी आला होता .. म्हणजे ती वसू च्या मागे मागे सगळीकडे असते आणि जेव्हा तिला काही तिच्या मनासारखे करायचंय तेव्हाच ती वसू च्या शरीराचा आधार घेतेय ..
बाहेर वीरू आणि वसू पत्त्याच्या हातावरून काहीतरी भांडत होते .. जय ने त्यांचा लांबून एक फोटो काढला तर ती दोघांकडे बघतेय असे फोटोत कॅप्चर झाली ..
राघव म्हणाला तसा .. तिला आयता संसार मिळाला होता .. तिला लग्न करायचे होते .. ती वसू ला पण म्हणाली होती मला तुझ्या सारखी नॉर्मल लाईफ जागायचीय . तुझे घर मला सोडून जावेसे वाटत नाही”
जय फोटो झूम करून करून बघू लागला ..
तिने लाल रंगाचा वन पीस घातलाय .. त्यावर तिने वसू च्या ड्रेस ची ओढणी घेतलीय .. तिचे सोनेरी पिंगट केस मोकळे सोडलेत .. तिच्या हातावर मेहंदी काढलीय.
जय ने मेसेज करून राघव ला सगळे सांगितले ..
राघव ने सरांना ते फोटो पाठवले ..
आता जय ला त्याच्या घरात वावरताना भीती वाटू लागली होती .. तो चालताना कदाचित त्याचा जवळ ती असू शकेल ..
जय " वसू बस झाले आता जरा आराम कर .. संध्याकाळी आपल्याला डॉक्टर कडे जायचंय .. रुटीन चेक अप .. बाकी काही नाहीये .. "
वसू " जय .. नको ना .. आज मी किती बरी आहे .. आज मला थकवा पण नाही वाटत आहे .. "
जय " अग तेच तर ब्लड टेस्ट करू .. हिमोग्लोबिन चेक करावे लागणार आहे .. ते कमी झाल्यामुळे थकवा येतोय तुला "
वसू " मग लॅब ला जाऊ ना .. डॉक्टर कडे कशाला "
जय " अग ते डॉक्टर तुला चेक करतील आणि मग सांगतील ना कोणत्या टेस्ट करायच्यात त्या "
वसू जरा नाराजीतच उठली आणि बेड वर झोपायला गेली ..
वीरू " काय रे जय ? काही प्रॉब्लेम आहे का ? तू जरा टेन्शन मध्ये वाटतोय ?"
जय " नाही रे .. काहीच नाही .. " वीरू ला सांगू का नको असेच त्याला वाटत होते .. आणि आता नताशा पण आपले सगळे ऐकतेय हे हि त्याला कळत होते ..
वीरू चटई वरून उठला आणि सोफ्यावर बसायला गेला .. एका फोटोत नताशा तिथे बसली होती तर जय ने त्याला हाताने बाजूला केले .. " अरे इथे नको बसूच "
वीरू " अरे .. असा काय करतोय .. मग कुठे बसू "
जय " एक काम करू आपण आपल्या दोघांचा सेल्फी काढू "
जय ने सोफ्याकडे पाठ होईल असा सेल्फी काढला तर त्यात ती सोफयावर नव्हती ..
जय " छान आलाय सेल्फी .. तुला पाठ्वतो .. तू झोप पाहिजे तर सोफ्यावर "
ती इथे नाहीये म्हणजे ती किचन किंवा वसू बरोबर बेड वर कि काय ?"
जय बेडरूम मध्ये आला .. वसू बेड वर झोपली होती .. जय ने वसू चा फोटो काढला .. तर ती वसु च्या डोक्यावर हाताने थोपटत तिला झोपवत होती ..
जय दोन पाऊले घाबरून एकदम मागेच झाला .. ती वसू च्या आत आहे हे त्याने एक्सेप्ट केले होते पण तिचे अशी अदृश्य शरीराने वसू जवळ वावरतेय .. हे पाहून त्याला खरोखर भीती वाट्याला लागली
वसू " जय .. तू पण ये ना झोपायला .. "
जय जरा घाबरतच " नाही नको .. तू झोप .. तुझे डोकं दुखतंय का ?"
वसू " नाही उलट रिलॅक्स होतंय .. मसाज केल्यावर कशी गुंगी यावी तशी गुंगी येतंय मला .. "
जय ला हात धरून घरातून तिला हुसकून बाहेर काढावी वाटत होते .. पण हे काम आपल्या हातातले नाहीये हे नक्की "
जय ने कपाट उघडले .. चंदीगड च्या आंधळ्या साधूने दिलेलं लॉकेट बाहेर काढले आणि तो ते वसू च्या गळ्यात बांधायला गेला .
वसू " जय .. मला याची गरज नाहीये .. हे ना तुझ्या गळ्यात घालू .. आणि वसू ने त्याच्या गळ्यात ते बांधून टाकले "
जय ला एवढे तर कळलेच होते .. ती वसू ला त्रास देत नाहीये .. ती तिची काळजी घेतेय .. तिला जास्त छेडायला नको ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा