Login

Gajra ! Ek pravaas ....

गजरा एक प्रवास हा लेख वैचारिक आहे . प्रत्यक्षात जर साम्य आढळले तर हा योगायोग असेल . सत्य परिस्थि??

गजरा..........!आला का हो? नजरेसमोर तुमच्या.काय आलं? एक गजरा?कधी अबोला अबोली सारखा, कधी मोग्र्यासारखा शांतच पण आपल्या सुंगंधाने मन प्रफुल्लित करणारा.विविध फुलांचे विविध प्रकारचे गजरे आणि हो त्यांचे मान देखील वेगळेच असते नाही का?गजरा तोच रुप मात्र वेगवेगळे.कधी तो दोर्‍याने बांधलेला असतो तर कधी सुईने पुरवलेला असतो.सर्व फुलं एकत्र येतात तेव्हा बनतो हा गजरा.दोन रंगांचा ,एकाच रंगाचा, विविध तर्‍हेचा, विविध फुलांचा, कधी बांधली जातात एखाद्या विशिष्ट तऱ्हेने.त्यांचे सौंदर्य देखील अजून खुलत यात.कळी ते फुल ,फुल ते माळी, माळ्याच्या  हातातून मग एक गजरा.हा याचा प्रवास इथवरच थांबत नाही बरं का! कधी तो प्रेमिकेच्या  ओंजळीत सुगंध भरतो,तर कधी हळूच आपल्या जीवनसंगिनी करिता लपवून खिशात आणलेला तो गजरा जेव्हा तिचा कांत तिच्या केसात माळतो त्या क्षणी स्टेटस वर ठेवून साथीदाराचा फोटो दाखवण्यापेक्षा हे जास्त जे प्रेम खुलतं तो प्रेम खुलवणारा गजरा. कधी देव्हाऱ्यात देवाच्या चरणी,तर कधी एखाद्या सुफी संताच्या कबरीवर, तर कधी वीर मरण पावलेल्या जवानांच्या पार्थिवावर,तर कधी कुटुंबातील मृत व्यक्तीच्या तसबिरीवर .गजरा तोच  मात्र रूप वेगवेगळे. हा गजरा क्षणो क्षणी एक नात  निभावत असत. शांतपणे अगदी, या क्षणभंगुर जीवनात प्रत्येक क्षणात जगावं आपल्या सुगंध इतरांना द्यावा हे शिकवणारा गजरा.बरे गजऱ्यात असणारी फुलच आपल्याला हा संदेश देत असतात .मी मात्र नाव गजरा च ठेवला आहे.म्हणायचं काय तर गजराच्या रुपात ही फुलच बोलणार आहेत आपल्याशी आणि बोलतात ही. ऐकतो का हो आपण? या प्रवासात गजऱ्याच्या दृष्टीतुन गजरा पाहुया.
    गजरा हा भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक. सध्या विभागला गेला आहे.पूर्वीच्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीमधील हा देखील भाग. पूर्वीच्या काळी गजरा म्हणजे स्री श्रुंगारातील एक  श्रुंगार असच काही होत. बायकांचे सौदर्य या गजऱ्यामुळे आणखीन उठून दिसायचे. लग्नसमारंभात तर जिथे नजर पडेल तिथे काय ते गजरे च गजरे. याला एखादा समाजच वापरतो असे नाही. काही अपवाद असतील मात्र गजरा हा प्रत्येक जातीच्या बायकांचा आवडता. मला आठवत कि लहानपणी लग्नसमारंभ  असलेल्या ठिकाणी आईसक्रिम वाल्याच्या आधी हमखास गजरे वाला असायचा." अ ई गजरे वाला आया कतो लेव देको गजरा , पैसे देतु मइ." अस न म्हणणारी बाई मी शोधायची. पण काय बेकार काम ते उगाच शोध मोहिम राबवायची. एक वेळस तर गजरा प्रेमी पासुन पळ काढत असता ; नातलगांमधील एक मला सुन बनऊ इच्छिणारी माझी न झालेली माजी सासूबाईने चक्क मला धरून गजरा माळला वेणीत .  अख्या हेअर स्टाईलची ऐशीतैशी. ती बिचारी माजी सासू तिला कोण समजावणार तिची न होणारी सून गजरा पथकातून पळ काढून विसावायला जागा शोधत होती. त्यात भर आईचे " अच्छा करे गजरा लगाये इसे भी मै सब छोऱ्यांकु ले कु दी, मेरीच लगा लेती नी. मई तो कित्ते लगाती थी." आता यांना कोण सांगणार माते तु कित्ते लगाती थी इसलिए हमको भी एक दो अच्छे नी लगते . ५-६ तरी हवे कमीत कमी . जरा समाधान मिळावा गजरा लावल्याचा. 
 बरं हे लग्न समारंभ , बारसे, ओटी भरणे, हळदी कुंकु, सण, समारंभ इ. असे सर्व स्त्री प्रधान कार्यक्रम गजऱ्या विणा कोणताही विधी होऊच शकत नाही. म्हणजे काय तर बाई ही एक चुटकी सिंदूर नंतर एक १० रु. का गजरा कि किमत तुम क्या जानो पुरुष बाबू? तुमसे भी पहला हुआ था जिससे प्यार वो ये गजरा है. गजरा औरत के सर का मेकअप होता है ये गजरा. अशी काही तरी डायलॉग सर्रास ऐकायला मिळतील. हळदी कुंकु समारंभात एखाद्या वेळेस महागड काही वाण देऊन बायका खुश नसतील झाल्या तर हा कमाल गजरा करू शकतो. स्वतंत्र दिवस ते लग्नाच्या बेडी पर्यंत काही का असेना , लहानग्या मुलींपासून ते म्हाताऱ्या आजी पर्यंत सर्वाना , नेहमी वेड लावतो हा गजरा. त्यात भारतीय बाई तर ' पुरा लंडन ठुमकता आणि लंडन सोबत गजरा भी ठुमकता.' मी शाळेत जात असताना आई झाडाला जास्त फुल जर नाही आली तर , वेणीच्या प्रत्येक वळणावर एक फूल रोवायची. मस्त दिसायच ते गजऱ्या पेक्षाही . कमी फुलात ही आनंद डबल मिळायचा . यात तिची मॅनेजमेंट आज कळंतय , कमी असल तरी त्याला सजवता येत आणि ते खुप सुंदर दिसत. आम्हाला हे जमायला उशीर लागतं जरा. अगदी २-३ फुलं जरी असली ना आई त्यांना सहजतेने एका पिन मध्ये टोचून वेणीची शोभा वाढवत असे. नंतर नंतर कळालं तिला गजरा बनवता येत नव्हतं . मी बनवू लागली ती खुप खुश व्हायची मला नाही जमलं ते मुलीनं केल माझ्या. खर सांगायच झाल तर तिने फुलांचा गजरा कधी बनविला नाही , पण नात्यांना एका दोऱ्यात विणन तिच्यासारख आम्हाला नाही जमत. येत नाही म्हणून सोडल नाही तिने , ना सांगितल फक्त जे येतय त्याला अधिक सुंदर कस कराव यावर भर.प्रत्येक नात्याला छान विणलं आहे तीनं. कधी कसली तक्रार नाही. टोचल तरी , बांधलं तरीही . आपण आपल  चांगलच द्यायच. नाती विणताना त्यात प्रेमाचा दोरा असावा. यात मी पणा, स्वार्थ नसावा, प्रत्येकाला एका बंधनात प्रेमाने जोडता याव. हीच शिकवण दिली.  माहेरी आई आणि सासरी सासू दोघी जरा- फार एक सारख्याच. अशी आई आणि सध्या पदाभार सांभाळलेली सासू लाभून सुद्धा मी कुठेतरी मागे पडतेय अस वाटू लागत कधी कधी. ह्या बायकांना कस जमतय त्यांच त्यांनाच माहीत . कोणत्या पर्सनालिटी डेव्हलपमेंट क्लास मध्ये हे शिकवले जात नाही. ह्या अडाणी म्हणवून घेणाऱ्या बायका सांगू शकतील . पण आपल्याला जमलं पाहिजे.     
  गजरा हा फक्त दिसायलाच सुंदर असा नसतो त्याचे फायदे देखील सुंदरच आहेत. याची आपण कधी कल्पना देखील केलेली नसेल.गजरा हा केसांत लावल्याने   आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होते.तसेच स्त्रियांना घरात किंवा त्या नोकरदार असल्या तरी देखील त्यांच्यावर खूप जबाबदारी असते आणि ताण देखील येत असतो या प्रत्येक जबाबदारी पार पाडताना; मनाला ,डोक्याला शांती देण्याचा कार्य  गजरा करतो. गजरा हा अनेक प्रसंगातून  जातो. 
  बाळ जन्माला येत त्याच स्वागत करताना हेच गजरे घरात सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण करतात. जेव्हा सुन त्या बाळाला घेऊन गृहप्रवेश करते ; नवीन नवरी च्या गृहप्रवेशा नंतर पहिल्यांदाच तिच्यावर ती फुल बरसतात, तिच्या पायाशी या फुलाचा गालिचा घातला जातो. आपल्या बाळाला घेऊन ती आनंदात , गहिवरल्या डोळ्यांनी घरात पाऊल टाकते. कदाचित तिच्या मनात सप्तपदी पासून ते आजवर च प्रत्येक पाऊल, सुख दुख तिच्या आठवणींच्या फिती विचारात गिरक्या घेत असावेत.  तिच्या डोक्यात माळलेला गजरा हळुच म्हणतो; बाई गं, हा सत्कार तुझाच . तु नसतीच तर या घरचे दिवे , पणत्या कोणी ग जन्मला घातले असते? अशीच फुलत राहा. जोडून ठेव प्रेमाच्या दोऱ्यात आणि दरवळू दे प्रत्येकाच्या मनात तुझ्या प्रेमाचा सुगंध.
  मुल जेव्हा गुलाब एखाद्या मुलीला देत असतात . ते आपल प्रेम एखादया मुली  समोर व्यक्त करत असतात. मुलगी नकार देते ; तोच मुलगा पुढच्या क्षणाला क्षणभर विचार न करता अँसिड टाकतो तिच्या चेहर्‍यावर, एखादा मुलगा त्या मुलीवर जबरदस्ती करतो . ती जमिनीवर पडलेली फुलं त्याच्या नकळत त्याला विचारतात हा कसला रे गैर मानवी प्रकार? एखाद्या बागेतील कळीला अस कुस्करताना तुझ राक्षसी मन थांबवत नसेल नाही का? हा प्रेम होता का खरा? कि फक्त आकर्षण ? नाहीच मुळी , ते फक्त तुझ राक्षसी मन होत रे. गजऱ्याच्या न दिसणाऱ्या डोळ्यांतून अश्रु ओघळतात आणि गजरा तिथेच निष्प्राण पडतो.
   आज गजरा एक नवविवाहित जोडप्याच्या खोलीतील सज जावटीसाठी उपयोगात येत होता. फक्त येथे त्याच रुप लहान नसून मोठ्या हार, तोरण यात झाल होत. चमेली, मोगरा, गुलाब यां चा संमिश्र गजरा तो वातावरणात एक वेगळच सुवास चैतन्य निर्माण करत होता. नवीन नवरी त्या खोलीत एकटी बसलेली असते. संपूर्ण खोली ती न्याहळत असते. सजावट पाहून , खोलीतील पसरलेल्या सुहास तिच मन प्रसन्न करत असत. सोबतच मनातील हुरहूर वाढवत असत. आजीचे वाक्य तिच्या कानात गुंजतात फुल पाहून. ( दोन दिवसापूर्वी आजी अंगणातील फुल वेचून गजरा बनवताना बोलत असते)
 " बाय हो माझे! सुखी रहा ग पोरी! आनंदाने , खुशीने संसार कर आपला. तुझच आहे ग ते घर ही आणि हे कायम तुझ राहिलच. काळजी नको आमची . हा पाहिलास गजरा ? या फुलांसारख ग पोरीच जीवन. एका झाडावर उमलायच, मध्येच एकाने घेऊन जायच आणि त्याचा गजरा , पुष्प गुच्छ , हार इ. ,बनवायचे. पोरी फुलासारखी रहा. फक्त आपला सद्गुण दयायचा कोणी तोडल तरी, आपण झिजलो तरी. नेहमीच मात्र मोगरा, चमेली नको हा; कधी अबोला ही धरायचा ना सुगंध , ना फार टिकनारा तरीही सुंदर, मी पणा असा काहीच नाही. नेहमी सदाफुली सारख फुलत राहायच मात्र; नेहमी हेच नाही हा ठेवायच! आता सुवासिन होशील तु,गुलाब ही व्हायच सुंदर , सौभाग्यवती, प्रेमाच ' प्रतिक , उठावदार , जर पडलीच वेळ तर टोचायच त्याच्या काट्यासारख पण ठिगळ लावून नाही घ्यायच." 
    " हा गजरा या सारख एका दोऱ्यात घट्ट् विणायच नात्यांना. सुंदर दिसायच सर्वासोबत. सगळी फुल एकत्र आल्याशिवाय नाही होणार सुंदर गजरा. बाकी तु हुशार हायस ." 
  हा गजरा त्या नवरीला बोलत होता हळुच " मी साक्षी आहे तुझ्या प्रेमाचा, तुझ्या विचारांचा . सुखाने संसाराची सुरुवात कर. दरवळु दे तुझा सुगंध प्रत्येकाच्या मनात."

  चार- पाच वर्षापूर्वीची लहानशी गोष्ट ; तीने आज कसल कि बिल भरायच्या पैश्यातून दोन गजरे घेतले होते. तो तिच्यावर खसकतो. ( तावात....) तुझ काय जातय घरात बसून गजरे घालायला , मला कमवाव लागत. 
( ती गहिवरल्या आवाजात उत्तरते) अहो ! पण दोनच तर घेतले. खुप दिवसांनी आला होता गजरे वाला. कधीच नाही ओ घेत मी. आज मन केल म्हणून घेतल.
( तो तिला थांबवत )" काही गरज पडली होती का गजरे माळायची एवढी? बिलाच हिशोब चुकला ना? 
( ती पुन्हा रडत रडत च)" अहो खुप महाग नव्हते ओ.... ; दोनच घेतले फक्त , तुम्ही पण तर ४-५ वर्षात कधीच आणले नाहीत . आज घेतले तर....( तो तिला रागावून गप करतो)
ती यापुढे कधीच गजरा मागत नाही. तो घेतलेला गजरा कोमेजून जातो तिच्या इच्छा ही त्या सोबत कोमजतात. आज तिला सगळे सजवत असतात . पण ती निष्प्राण असते. गजरे हार सर्व श्रुंगार तिचा करतात आणि हा एका कोपऱ्यात बसून रडत हे सर्व पाहात असतो . त्याच्या डोळ्यात पाण्यासोबत चार पाच वर्षापूर्वीच ते गजऱ्याच भांडण तरळत . तिच्या निष्प्राण देहावरील तो गजरा त्याला खुणावत असतो. 
' जर हाच गजरा तिच्या जिवंतपणी तिला घालायला दिला असता तर किती खुश झाली असती. एका बिलामुळे तिला ओरडल त्या पुढील शेवटच्या श्वासापर्यंत कधीच तिच्या केसांत गजरा किवा एखाद फुल तिने माळलेल नाही. आज समजल हे!  ती हे सर्व पाहण्यासाठी जिवंत नाही. आज तिने शेवटचा एकदाचा   गजरा माळून घेतला दुसऱ्याच्या हाताने.' तो उभा राहून  भरल्या डोळ्यांनी पाहत होता . त्याला त्या गजर्‍याची किंमत कळाली होती . जी तो आज मोजत होता. आनंद हे किमतीत नसतच खर ! 

लेख आवडल्यास नक्की शेअर करावा.
 
लेखिका: शगुफ्ता ईनामदार