Login

गोष्ट कोरोनची

लॉकडाऊन काळातील काही किस्से वाचा कवितेतून.....
ऐका दोस्त मित्रहो, राजे लोकहो ,
सांगतोय एक कहाणी ..
किस्से असले कोरोनाचे, 
ऐका माझी ही जुबानी ..

सतरंगी अतरंगी लोक इथले , 
असलं गावं आमचं भारी
तरण्या - बांड्यांपेक्षाही , 
म्हातार्‍याचीच गोष्ट की हो न्यारी

गण्या, मण्या, मंग्या , दिन्या
भारी एकेक पोरं
यांच्याच भोवती कथेचं या 
फिरतं कथानक सारं

एके दिवशी झाल असं , 
भावड्याचं (कोरोना ) राज्यात आगमन झालं
अन् कळतांच हे म्हातार्‍यांनी आमच्या ,
सारं गाव बंद की हो केलं

कडुबाई म्हातारी आमची ,
गावाची रेडू (रेडिओ ) झाली
अन् भावड्या पासून लांब राहण्याची
युक्ती तीनं दिली 
ठेवायला  लांब त्याला ,
उन्हांची जाण्याची अफवा  सोडिली ..

परिणाम त्याचा झाला असा,
लिंबाखालची मैफील फिकी झाली
लुगड्या वाल्या साऱ्या म्हताऱ्यांची,
बघा पडीक शेतात बैठक रंगली  

उन्हामध्ये भावड्या म्हणे , 
आपल्यापासून लांब - लांब राहतो 
म्हणून  म्हताऱ्या साऱ्या पडिकात बसल्या अशा , 
जणु रंगेबिरंगी फ्लॉवर पॉटचं भासतो

मग दिवस तो उजाडला अन्
मोदिजी मन की बात बोलले
देशभक्तांच गाव आमचं , 
इथले देशभक्त जागे झाले

मोदिजींनी आमच्या पुढं ,
जनता कर्फ्यु चा प्रस्ताव  मांडला
अन् देशासाठी म्हणे गण्या आमचा , 
बापासंग भांडला...

म्हणतो गण्या घरात रहा दिवसभर , 
मोदिजी हे असं म्हणाले
जाणार नाही शेतावर मी बापू 
तु किती जरी विनवले

ऐकून बापानं त्याचं मग , 
पायतानं असं काढलं
देशभक्त गण्याला हो आमच्या
बदाबदा हाणलं ..

इकडे गावात बायांनी
चर्चा सुरु केली
दिवसभर घरात का रहायचं ? 
याची प्रश्नोत्तरे सुरु झाली

कडुबाई म्हातारी आमची
जरा बोलया पुढं आली
कानी जाऊन ऐेकाका बाईच्या ,
काहीतरी बडबडली

म्हणते कडूबाई - मोदी म्हणे विमानानं, 
औषध आहे फवारणार
अन् झटक्यात  एकाच फवाऱ्यात ,
आपल्या भावड्याला हो मारणार

संध्याकाळ झाली तरी 
पाऊस काही आला नाही
म्हणे म्हातारी त्याने
फकस्त धूरच फवारला ,
पाणी काही फवारलं नाही  ..

धोतरातलं म्हातारं दगडुबा आमचं ,
कमेटमेन्ट केलेली त्याने भारी
मोदी साहेबांच ऐकून  दिवसभर 
लघवीलाही आलं नाही दारी

सकाळपासून दगडूबा म्हातारा
घरातच कोंडून बसला 
जेव्हा कळलं झाली फवारणी , 
तेव्हाच घराबाहेर दिसला

रात्री नऊला गावात आमच्या , 
जलोश सुरु झाला
भावड्याला आम्ही एका दिवसाच्या,
कर्फ्युन हो संपविला

कशी सांगु अजुन तुम्हाला गंमत एकेकाची
ऐका राजाहो सांगतोय , ही गोष्ट कोरोनाची.....