Login

घरटं भाग २

घरटं
घरटं भाग २

त्या अंधाऱ्या घरात काही क्षण विराज अक्षरशः जिथे होता तिथे थिजल्यासारखा उभा राहिला. श्वासांचा वेग एवढा वाढला होता की त्याचेच फुलणारे श्वास त्याच्या कानात घुमत होते. त्या शांततेत एक क्षणभर आधी लागलेला दाराचा आवाज पुन्हा पुन्हा त्याच्या मनात वाजत होता. पाठीमागून येणारा थंडावा त्याच्या मानेवरून सरकला आणि त्याने नकळत मानेला हात लावला पण तो वाऱ्याचा झुळूक नव्हता हे आता त्याच्या मनाला स्पष्ट जाणवत होतं.

त्याने कॅमेर्‍याचा स्क्रीन पाहायचा प्रयत्न केला, पण ती पूर्ण काळी पडलेली. थोड फार सेटिंग हलवून पहिले, पण काहीच न्हवतं काही क्षण डोळे मिटून घेतले. स्वतःलाच समजावत राहिला"भास असेल मनगडंत काहीतरी" पण तेवढ्यात त्या शांतेला भेदून एक कुजबुज कानाजवळून आली अगदी हळू"ते परत येतील... त्यांनी वचन दिलं होतं, ना?"हा आवाज काही नवीन नव्हता. अगदी ओळखीचा वाटला. जसं एखादं जुनं स्वप्न परत आठवावं, तसे त्याच्या मनात काही तरी हलले.

विराजने एकदम मागे वळून पाहिलं. पण काहीच नव्हतं. तीच भिंत, कोपऱ्याला लागलेली जाळी आणि अंधारात मिसळलेला कोपरा.पाय थरथरत होते, तरी तो पुढे सरकू लागला. एका अनामिक ओढीने किचनच्या दिशेने पावलं वळली. काही तरी सापडेल, काही तरी स्पष्ट होईल या आशेने.

किचनच्या दारातून आत पाय ठेवताच त्याच्या पायाखालची एक फरशी हलल्यासारखी वाटली. तो थबकला. नीट पाहिलं तर, त्या फरशीखालचं काही तरी वेगळं जाणवत होतं. हळूच ती फरशी बाजूला केली. खाली एक लाकडी झाकण होतं जुनं आणि धुळीने झाकलेले त्याने सावधपणे ते झाकण उचलले आणि समोर उघडलं एक लपलेलं तळघर.खाली उतरायला एक लाकडी जिना होता. मोबाईलचा टॉर्च चालू करून सावधपणे तो त्या तळघरात उतरू लागला.खाली उतरल्यावर त्याचे पाऊल एका काचेसारख्या वस्तूवर पडले त्याने खाली वाकून पहिले तर एक तुटलेला आरसा होता. त्याने त्यावर टॉर्च रोखला आणि समोरच्या भिंतीवर जे दिसलं, त्याने त्याचा श्वास थांबला.त्या भिंतीवर कोळ्यांच्या जाळ्यांआड एक जुना फोटो लावलेला होता. तेच जोडपं. तीच मुलगी. पण या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं.फक्त रिक्त डोळे. जणू ते फोटो नसून साक्षीदार होते.त्याच्याच कॅमेऱ्यात एक क्षण टिपला गेला होता पाठीमागे कोणीतरी उभं होतं.

तोच झोपाळा आता झपाट्याने हलू लागला होता आणि घराच्या वरच्या मजल्यावरून, एक लहान मुलीच्या पावलांचा आवाज येत होता ते सर्व पाहून विराजचा हात थरथरु लागला, पण त्याच्या डोळ्यांमध्ये आता केवळ कुतूहल नव्हतं तर एक भयानक सत्य उलगडत होतं हे घर फक्त अस्तित्वात नव्हतं तर ते जिवंत होतं.ते बोलत होतं आणि त्याचे बोल आता विराजने ऐकायला सुरुवात केली होती.

कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all