चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी
शीर्षक: जीवनसाथी
लघुकथा फेरी
शीर्षक: जीवनसाथी
जुवारी नदीच्या लाटांवरून डुलत-डुलत येणारी फेरीबोट गल्ल्याच्या समोरच्या खिडकीतून मारियाच्या दृष्टीस पडली आणि नकळतच तिचे लक्ष समोरच्या घड्याळाकडे गेले. रात्रीचे दहा वाजत आले होते.
फेरीबोटीची शेवटची फेरी येईपर्यंत ती गल्ल्यावर बसून गिऱ्हाईकाची वाट पाहत असे. फेरीबोटीत नेहमीच्या गिऱ्हाईकांसोबत दोन-तीन नवीन गिऱ्हाईके पण येत असत. घोटभर दारू घशाखाली उतरवून ती लोकं घरच्या वाटेला लागत, हे तिला नेहमीच्या अनुभवाने माहीत होते.
ती लगबगीने उठली. तिने टेबलवरचे रिकामे ग्लास उचलून आत ठेवले. फडक्याने टेबलं पुसली आणि पुन्हा गल्ल्यावर येऊन बसली.
एवढ्यात फेरीबोट धक्क्याला लागली. तिच्या अपेक्षेप्रमाणे फेरीबोटीतून उतरलेल्या प्रवाशांपैकी सात-आठ जण तिच्या बारमध्ये शिरले. त्यांच्या मागणीनुसार तिने त्यांना दारू ग्लासात ओतून दिली. रात्र झाल्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही आरामात बसून पिण्याच्या मनःस्थितीत नव्हता. उभ्याउभ्याच त्यांनी ग्लास रिकामे केले आणि पैसे देऊन बाहेर पडले.
ती लगबगीने उठली. तिने टेबलवरचे रिकामे ग्लास उचलून आत ठेवले. फडक्याने टेबलं पुसली आणि पुन्हा गल्ल्यावर येऊन बसली.
एवढ्यात फेरीबोट धक्क्याला लागली. तिच्या अपेक्षेप्रमाणे फेरीबोटीतून उतरलेल्या प्रवाशांपैकी सात-आठ जण तिच्या बारमध्ये शिरले. त्यांच्या मागणीनुसार तिने त्यांना दारू ग्लासात ओतून दिली. रात्र झाल्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही आरामात बसून पिण्याच्या मनःस्थितीत नव्हता. उभ्याउभ्याच त्यांनी ग्लास रिकामे केले आणि पैसे देऊन बाहेर पडले.
तिने गल्ल्यासमोरच्या टेबलाचा ड्रॉवर उघडला. दिवसभरात बराच गल्ला जमला होता. तिने त्या नोटा गोळा केल्या आणि न मोजताच आपल्या फ्रॉकच्या खिशात टाकल्या. आता तिथे कुणीच नव्हते. नकळतच तिला जुझेची आठवण झाली.
कुठे गेला हा? तिने बारच्या दारावर उभे राहून, "जुझेऽऽ… जुझेऽऽ!" अश्या मोठमोठ्याने हाका मारल्या. पण तिला "ओ" मिळाला नाही. ती थोडीशी वैतागली. त्याला कसे समजवावे हेच तिला कळत नव्हते. कितीही सांगितले तरी आपले ते सोडत नाही. ऐकत नाही. बराच वेळ ती दरवाजावर उभी राहिली. एवढ्यात वरच्या वाड्यावरील मारियो एका हातात गळाची काठी आणि दुसऱ्या हातात माशांचे 'गाथन'( गुंफलेले मासे) घेऊन येताना तिच्या दृष्टीस पडला. काही क्षणातच तो तिच्याकडे पोहोचला.
कुठे गेला हा? तिने बारच्या दारावर उभे राहून, "जुझेऽऽ… जुझेऽऽ!" अश्या मोठमोठ्याने हाका मारल्या. पण तिला "ओ" मिळाला नाही. ती थोडीशी वैतागली. त्याला कसे समजवावे हेच तिला कळत नव्हते. कितीही सांगितले तरी आपले ते सोडत नाही. ऐकत नाही. बराच वेळ ती दरवाजावर उभी राहिली. एवढ्यात वरच्या वाड्यावरील मारियो एका हातात गळाची काठी आणि दुसऱ्या हातात माशांचे 'गाथन'( गुंफलेले मासे) घेऊन येताना तिच्या दृष्टीस पडला. काही क्षणातच तो तिच्याकडे पोहोचला.
"काय रे मारियो, काय आणले आहेस?" त्याला पाहून तिने विचारले.
"गाथन आणली आहे मारिया..." हातातली माशांची गाथन तिच्या नजरेसमोर धरत तो म्हणाला.
"इतक्या रात्रीची कोणाला पाहिजे तुझी ही गाथन?"
"ताज्या मुड्डोश्या आहेत, कालवण रुचकर होणार."
"फुकट देणार?" ती त्याच्यावर चिडली.
"मला पैसे नकोत. घोटभर दारू दे."
"मेल्या, याचसाठी तो दिवस-रात्र नदीवर गळ टाकून बसलेला असतो. एक दिवस तरी बायका-मुलांना खायला घाल."
"मारिया... आजचा शेवटचा दिवस." तो काकुळतीला येऊन म्हणाला.
आता तो दारू घेतल्याशिवाय जाणार नाही, हे मारियाला माहीत होते. तिने त्याच्या हातातील गाथन घेतली. वर उचलून नजरेसमोर धरली. ताज्या फडफडीत मुड्डोश्यांकडे पाहून ती सुखावली. उद्या चमचमीत हुमण ( माशांचे कालवण) करता येईल, असा विचार करून तिने ते गाथन फ्रीजमध्ये ठेवले. ग्लासात थोडी दारू ओतून मारियोच्या समोर ठेवली.
मारियोने ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. घटाघटा करत त्याने एका दमात तो संपवला. तोंड आंबट करीत त्याने तो ग्लास मारियाकडे दिला.
"मारियो, तू जुझेला बघितले आहेस का?" त्याच्या हातातला ग्लास घेत मारियाने विचारले.
"नाही मारिया."
"नदीवर मासे तर पकडत नाही ना?"
"नाही गं..."
"कुठे गेला तेच कळत नाही. हाका मारल्यास उत्तर देत नाही."
"भांडला आहे का तुझ्याबरोबर?"
"भांडणे तर त्याचे रोजचेच आहे. कितीही समजावले तरी समजून घेत नाही. चल, मला बार बंद करायला मदत कर."
मारियोने बारच्या सगळ्या खिडक्या बंद केल्या. शेवटी मुख्य दरवाजा बंद केला. मारियाने त्याला कुलूप लावले.
"बरं, येतो मारिया," म्हणत मारियोने आपल्या गळाची काठी उचलली आणि आपल्या घराच्या दिशेने चालू लागला.
तिने बाजूलाच असलेल्या आपल्या घराचा दरवाजा उघडला आणि लाईट लावली. अचानक पेटलेल्या विजेच्या प्रकाशात एवढा वेळ मंद प्रकाशात असलेले तिचे डोळे दिपून गेले.
थोडा वेळ ती तिथेच उभी राहिली. नेहमीप्रमाणे तिने खिशातले पैसे काढून कपाटाच्या आतल्या खणात टाकले. दिवसभराची दगदग घालवण्यासाठी ती नेहमीसारखी समोरच्या सोफ्यावर डोळे मिटून बसून राहिली.
थोडा वेळ ती तिथेच उभी राहिली. नेहमीप्रमाणे तिने खिशातले पैसे काढून कपाटाच्या आतल्या खणात टाकले. दिवसभराची दगदग घालवण्यासाठी ती नेहमीसारखी समोरच्या सोफ्यावर डोळे मिटून बसून राहिली.
हल्ली जुझेचे हे नेहमीचेच होऊन गेले होते. गिऱ्हाईकाच्या वेळी आपली नजर चुकवून तो थोडी थोडी दारू पित असे. कितीतरी वेळा आपण त्याला सांगितले होते, "बाबा रे, असे करू नकोस. तुला प्यायचे असेल तर माझी त्याला ना नाही. रात्री गिऱ्हाईके आटोपली की बार बंद करते वेळी थोडीशी घे..." पण तो ऐकत नसे.
आताही तसेच झाले. गिऱ्हाईकांची तर गर्दी होती. आत जाऊन पाहिले तर हा तोंडाला बाटली लावून पित होता. त्याने तोंडाला बाटली लावलेली पाहिली तर गिऱ्हाईकांना काय वाटेल? आपल्याला तर एकदम रागच आला. दोन-चार शिव्या हाणतच जोराने त्याच्या थोबाडीत मारली, तसा गिऱ्हाईक सोडून गुपचूप तिथून बाहेर पडला.
कोण हा जुझे...? आपल्या दूरच्या नातेवाईकांतला. लहानपणीच आई-वडील वारल्यामुळे पोरका झालेला. आपल्या वडिलांनी त्याला चौघाजणांच्या कुटुंबात खपून जाईल आणि आपल्यालाही छोट्या-मोठ्या कामात मदत करील या आशेने आणला होता. आपल्या कुटुंबातही त्याला कुणी परका मानले नाही. आई-वडिलांनी तर आपलाच मुलगा मानला. आमच्याबरोबर त्याला शाळेत घातले. वडील आमच्याबरोबरीने त्याला कपडे आणायचे. पुस्तके, वह्या, खेळणी आमच्याबरोबरीने खाऊ आणला तर आम्हा तिघांना समान वाटून द्यायचे. फक्त वडिलांना तो छोट्या-मोठ्या कामात मदत करायचा, जे आम्ही दोघं भावंडे करीत नव्हतो.
जुझेही तसा चांगला मुलगा होता... शांत, सरळ स्वभावाचा. सांगितलेले काम मुकाट्याने करणारा. कधीही कुणाला उलट उत्तर न देणारा. त्यामुळे वडिलांना तो फारच आवडायचा.
आताशा मारियाला या जगण्याचा कंटाळा आला होता. कशासाठी करायचे हे सगळे? कोणासाठी गोळा करायचा हा पैसा-अडका? आपल्याला अशी दुसऱ्यांना दारू पाजावी लागणार, असं तिला कधीच वाटलं नव्हतं. तिनं एक वेगळे स्वप्न पाहिले होते, सुखी संसाराचे... पण शेवटी ते स्वप्नच राहिले.
गोवा मुक्तीनंतर तिचा एकुलता एक भाऊ पुर्तगालला निघून गेला. कायमचाच. त्याची इथे राहण्याची इच्छाच नव्हती. वडिलांनी त्याला खूप समजावले..
"आपले पूर्वज याच मातीत जन्मले, वाढले आणि इथेच संपले. त्यांनीच उभी केलेली एवढी मोठी इस्टेट आहे, शेतं आहेत, भाटं आहेत. आणि हा बारसुद्धा... दोन वेळच्या घासासाठी काहीच कमी पडणार नाही..." पण त्याने ऐकले नाही. आपल्या पाठीमागे आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचे काय होईल, म्हातारपणी त्यांना कोण आधार देईल, याचा विचारसुद्धा न करता तो विदेशात गेला.
"आपले पूर्वज याच मातीत जन्मले, वाढले आणि इथेच संपले. त्यांनीच उभी केलेली एवढी मोठी इस्टेट आहे, शेतं आहेत, भाटं आहेत. आणि हा बारसुद्धा... दोन वेळच्या घासासाठी काहीच कमी पडणार नाही..." पण त्याने ऐकले नाही. आपल्या पाठीमागे आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचे काय होईल, म्हातारपणी त्यांना कोण आधार देईल, याचा विचारसुद्धा न करता तो विदेशात गेला.
आणि कामिल... ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केले होते. त्यानेही नोकरीसाठी परदेशी जाऊच नये, असे तिला मनोमन वाटत होते. इथंच एखादी छोटीशी सरकारी नोकरी करावी आणि सदैव आपल्या अवतीभोवती असावे. पण त्याच्या डोळ्यांना झगझमतं, चकाकतं जग दिसत होते. त्याच्या वाड्यावरील बरेचजण लंडन, कुवेत किंवा इतर युरोपीय देशांत नोकरी करीत होते. एक-दोन वर्षांनी घरी येत होते. उंची रंगीबेरंगी कपडे घालून मिरवत होते. मित्रांबरोबर पार्ट्यांवर पाण्यासारखा पैसा ओतत होते. गाड्या उडवत होते. गळ्यात चकाकणाऱ्या सोन्याच्या साखळ्या, हाताच्या सगळ्या बोटांत मोठमोठ्या अंगठ्या घालून श्रीमंतीचं प्रदर्शन करत होते.
कामिलला हे सारं आकर्षित करत होते. सरकारी नोकरी करून पंधरा-वीस हजाराच्या पगारात भिकारड्यासारखं जगण्यापेक्षा आपणही परदेशात जावं, असं त्याला वाटत होते. तो तिच्याकडे परवानगी मागायला आला तेव्हा ती थोडीशी नाखुश होती. पण त्यानं हट्टच धरला.
"फक्त पाच वर्षांसाठी जाऊन येतो. नंतर इथं एखादा लहानसा धंदा करूया. लग्न करूया. स्वतःचं लहानसं असं वेगळं घर बांधूया आणि राजा-राणी सारखं सुखात राहूया." असे म्हणत सोनेरी स्वप्न दाखवू लागला. शेवटी नाईलाजाने तिने त्याला होकार दिला.
"फक्त पाच वर्षांसाठी जाऊन येतो. नंतर इथं एखादा लहानसा धंदा करूया. लग्न करूया. स्वतःचं लहानसं असं वेगळं घर बांधूया आणि राजा-राणी सारखं सुखात राहूया." असे म्हणत सोनेरी स्वप्न दाखवू लागला. शेवटी नाईलाजाने तिने त्याला होकार दिला.
सुरुवातीला तो छानछान पत्रे लिहायचा. दोघांनी एकत्र घालवलेल्या संध्याकाळींच्या आठवणी जागवायचा. तिच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नसल्याचं सांगायचा. त्याची ती पत्रे वाचून ती हुरळून जायची. त्या पत्रांची उत्तरेही तशाच हळव्या भाषेत असायची.
दिवसामागून दिवस जाऊ लागले. हळूहळू त्याची पत्रे कमी होऊ लागली. त्यातली भाषाही बदलू लागली. एक-दोन ओळीत आपली खुशाली कळविण्यापुरतीच तो पत्रे लिहू लागला. तिला वाटले, रोज त्याच त्याच आठवणी लिहून तो कंटाळला असेल; कदाचित कामामुळे वेळही मिळत नसेल. पण दोन-अडीच वर्षांनंतर त्याची पत्रे येणे बंद झाले.
ती गोंधळली... काय करावे तिला काहीच कळेना. परदेशातून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे ती चौकशी करू लागली, पण कुणीच काही सांगत नव्हते. अशी सहा वर्षं तर केव्हाच उलटून गेली... आपल्याला त्याने फसवले असेल का? तिथे एखाद्या गोऱ्या पोरीच्या प्रेमात तर पडला नसेल ना? तिच्या मनात शंका येत राहिल्या.
"नाही, तो तसं करणार नाही. आपल्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. आज ना उद्या तो परत येईल," असे तिला मनोमन वाटत होते. अजूनही ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून होती.
त्यातच दोन वर्षांपूर्वी तिचे आई-वडील एका पाठोपाठ वारले आणि ती एकाकी पडली. आता हा बार चालविण्याशिवाय तिला दुसरा मार्गच राहिला नाही.
बराच वेळ ती सोफ्यावर बसून होती. शेवटी उठली. स्वयंपाकघरात गेली. दुपारी रांधून ठेवलेले मटण प्लेटमध्ये घेतले. पावाबरोबर कसेबसे खाल्ले. प्लेट नेऊन सिंकमध्ये टाकली आणि बाहेर आली.
दारात उभी राहून पुन्हा एकदा "जुझेऽऽ... जुझेऽऽ..." म्हणत तिने हाका मारल्या. रात्रीच्या त्या किर्र वातावरणात तिचा आवाज चारी बाजूंनी घुमला. तरी जुझेकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ती निराश होऊन आत आली. दरवाजाला आतून कडी लावली. लाईट बंद करून बेडवर आडवी झाली.
बराच वेळ ती अंथरुणावर तळमळत होती. तिचा डोळा लागत नव्हता. सारखा डोळ्यासमोर जुझे दिसत होता... कुठं गेला असेल तो? उपाशी असेल का? थंडीत कुडकुडत कुठेतरी वळचणीला पडला असेल का? का वागतो तो असा?
पूर्वी तो असा नव्हता. शांत स्वभावाचा, कधीही उलट उत्तर न देणारा. सांगितलेलं काम मुकाट्याने करणारा. पण त्या दिवसानंतर तो पूर्णच बदलला. एकटा राहू लागला. आपल्याशी बोलणे टाळू लागला.
विचार करता करता नकळत तिला तो प्रसंग आठवला...
त्या रात्री ती अशीच झोपली होती. दिवसभर काम करून दमल्यामुळे बेडवर पडताच तिचा डोळा लागला. गाढ झोपेत असतानाच कॉट हलल्यासारखे झाले आणि तिची झोप मोडली. तिनं कुस बदलली. काही वेळानंतर तिच्या छातीवर कुणाचा तरी हात फिरत असल्याचे तिला जाणवले.
ती पटकन कॉटवरून उठली आणि लाईट लावला. समोर जुझे उभा होता. त्याचे डोळे लाल दिसत होते. डोक्यावरचे केस विस्कटलेले होते. चेहरा राकटलेला वाटत होता. तोंडाला दारूची घाण येत होती.
"जुझे, तू?" म्हणत तिने रागाने आपल्या अंगातली सारी शक्ती एकवटून त्याच्या गालावर थप्पड मारली.
बराच वेळ गाल चोळत तो तिच्यासमोर उभा राहिला.
"मारिया... तू मला मारलंस?" थोड्या वेळाने तो बोलला. त्याच्या गालावरून अश्रू ओघळत होते.
"मग तू माझ्या अंगाला स्पर्श करण्याची हिंमत कशी केलीस?" तिने ओरडून विचारले.
तो गप्पच राहिला.
"सांग ना, का केलंस असं? सांग."
त्याचे खांदे गदागदा हलवत ती विचारू लागली.
"मारिया... तुला कसं सांगू? मी तुझ्यावर..." त्याच्या गळ्यात हुंदका दाटून आला.
"थांबलास का? मला तरी कळू दे तुझ्या मनात काय आहे." तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता.
"मारिया, तुला आठवते का, लहानपणी वाड्यावरची सगळी मुले आमची मस्करी करायची. तुझ्याशी लग्न करायला तुझ्या वडिलांनी मला इथे आणले आहे, असे म्हणायची. खरे सांगू? मला तू खूप आवडायचीस. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करत होतो. पण पुढे तू कामिलच्या प्रेमात पडलीस. मग मी माझ्या भावना दाबून टाकल्या. कामिल परदेशी जाऊन आता सहा-सात वर्षं झाली आहेत. आता तो परत येईल असे वाटत नाही. मला वाटले आपण दोघांनी लग्न करावे, पण तुला विचारायची भीती वाटत होती. आज मला दारू जरा जास्त झाली आणि मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. हे माझ्याकडून चुकले, मारिया... मला क्षमा कर. माझ्या हातून चूक झाली." असे म्हणून तो पटकन मागे फिरला आणि निघून गेला.
त्या प्रसंगानंतर तो पूर्ण बदलला. तिच्याशी तुसडेपणाने वागू लागला. नीट काम करेनासा झाला. काही सांगितले तर ऐकेनासा झाला. घरापासून दूर राहू लागला. दिवस-रात्र दारूच्या नशेत राहू लागला.
जुझेच्या आठवणीने ती रात्रभर तळमळत राहिली. तिला अपराध्यासारखे वाटू लागले. आपण त्याला नेहमीच कमी लेखले. दुय्यम ठरवले. आई-बाप नसलेला पोरका, आमच्या आश्रयाला ठेवलेला. अशा नजरेने त्याच्याकडे पाहिले. त्याची हेटाळणी केली. त्याच्या भावनांचा कधीही विचार केला नाही. त्याच्याशी तुसडेपणाने वागत आले. प्रसंगी शिव्याही घातल्या, थप्पडसुद्धा मारली. पण त्याने कधीच प्रतिकार केला नाही, उलट उत्तर दिले नाही. आपल्यासाठी तो झिजत राहिला, तळमळत राहिला.
शेवटी ती उठून बाहेर आली. तिने दरवाजा उघडला. दरवाजासमोरच्या पायरीवर जुझे हात-पाय दुमडून झोपलेला तिच्या दृष्टीस पडला. थंडीने त्याचे सारे शरीर कुडकुडत होते.
"जुझेऽऽ... जुझेऽऽ..." म्हणत तिने प्रेमाने हाक मारली. पण त्याने प्रतिसाद दिला नाही.
शेवटी तिने त्याच्या खांद्याला धरून हलवले, तसा तो उठून बसला.
"चल, जुझे... आत ये," म्हणत तिने त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन ती आपल्या बेडरूममध्ये गेली...