Login

ट्रेनमधील थरारक प्रवास...... भाग 2

ट्रेनमधील थरारक प्रवास...... भाग 2
भाग २: मंदिराच्या पायऱ्यांवर

मंदिरात शिरताच अर्पिता आणि आरोही दोघीही हळूहळू श्वास घेऊ लागल्या. तेवढ्यात मागून जोरात आवाज झाला—जणू कोणी मंदिराचा दरवाजा जोरात आपटला होता. त्या दोघींनी मागे पाहिलं... दरवाज्याच्या आत येण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असलेल्या त्या विकृत सावल्या आता एक एक करत पुन्हा अंधारात विरू लागल्या.

"आता आपण सुरक्षित आहोत का?" अर्पिता हळूच कुजबूजली.

"काहीच माहित नाही… पण आपण देवाच्या छायेत आहोत. इथून बाहेर पडायचं नाही आत्ताच," आरोही म्हणाली.

तेवढ्यात मंदिराच्या आतल्या बाजूला एक विस्तृत गाभारा दिसला, जिथे समोर हनुमान मूर्ती होती—खूप जुन्या काळातील, परंतु तेजस्वी. त्या मूर्तीसमोर एक म्हातारा पुजारी ध्यानस्थ स्थितीत बसलेला होता. पण त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र शांतता होती, जणू त्यांना सगळं माहित होतं...

पुजारी डोळे उघडत म्हणाले,
"तुमचं या जागी येणं काही योगायोग नाही."

"तुम्हाला सगळं माहीत आहे?" आरोहीने थरथरत्या आवाजात विचारलं.

"हो. ती ट्रेन, ते प्रवासी, त्या पिशाच्च आत्मा... ते केवळ मृत नाहीत, ते शापित आत्मे आहेत. या मंदिराच्या बाजूला पूर्वी एक स्टेशन होतं... जिथे 1971 साली अमावस्येच्या रात्री एक ट्रेन घसरून कोसळली होती. ती ट्रेन परत आली नाही. पण त्या प्रवाशांचे आत्म्ये—कधीही सुटली नाहीत."

"मग ते लोक आजही...?" अर्पिताने थरकापाने विचारलं.

"हो. आज अमावस्या होती. त्यांच्या शापित अस्तित्वासाठी शक्तीशाली रात्रींपैकी एक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा—तुम्ही जिवंत असल्याने त्यांना अस्वस्थ केलं आहे. तुम्ही वाचलात, पण त्यांना शांत केलं नाहीत..."

"मग त्यांना शांत कसं करायचं?" आरोहीने तातडीनं विचारलं.

पुजारी डोळे मिटून म्हणाले:
"तुम्हाला त्या दुर्घटनेचा इतिहास समजून घ्यावा लागेल, आणि त्यातल्या एका आत्म्याशी थेट संवाद साधावा लागेल— एक अशी आत्मा आहे जी स्वतः बंदी होऊन तिने अनेकांना शापित केले. तिच्यामुळे हे आत्म्ये मुक्त होऊ शकले नाहीत. तसच ते इतके भुकेले आहेत कि या ट्रेनमध्ये जे जे प्रवासी बसले त्यांना त्यांनी आपल्यातलेच एक बनवले आहे. जी तुम्ही गर्दी पाहिली ट्रेनमध्ये चढताना ती त्यांचीच होती. आणि ती होती आत्मा विमला आहे. जीने सगळ्यांना शाप दिला. तिच्या मृत्यूमागचं सत्य अजूनही गुलदस्त्यात आहे." या ट्रेनमधील सगळ्या प्रवाशांचे अपघातातील बॉडीज सापडल्या फक्त विमलाची बॉडी नाही सापडू शकली. तुम्हाला त्या ट्रेनमध्ये पुन्हा प्रवास करावा लागेल हे सगळ जाणून घेण्यासाठी त्याआधी विमलाची कथा जाणून घ्या. तिच्या कथेच रहस्य तुम्हाला इथे सापडेल...
        अर्पिता आणि आरोही पुन्हा त्याच ट्रेनमध्ये जावे लागेल हा विचार करूनच कापू लागतात. पण या आत्म्यांना मुक्ती दिलीच पाहिजे या इराद्याने विमलाची कथा समजून घेऊ लागतात. तीने शाप का दिला हे जाणून घेण गरजेचच झाले होते.
..........

आरोही आणि अर्पिता आता एका अशा प्रवासावर निघणार आहेत जिथे त्यांना फक्त शापित आत्म्यांनाच नव्हे, तर स्वतःच्या मनातल्या भीतीनांही सामोरं जावं लागणार आहे जे आपण बघणार आहोत पुढच्या भागात....