Login

*तीच अस्तित्व * भाग -6

नाचणारीच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं कि अनुश्री च्या चिरा उतरवण्याच्या विरोधात राधा होती ..तिला आपल्या मुली च आयुष्य एखाद्या नरकात जावं असं अजिबात वाटतं नव्हतं ..पण सुरेश तिचा नवरा काही ऐकणारा नव्हता आता पाहूया पुढे ...,


रात्रभर टेन्शन मुळे राधा ला काही झोप लागली नाही, त्यामुळे ताप उतरण्याऐवजी तिच्या डोक्यात गेला होता ..पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिची एवढ्या वर्षाची मेहनत अश्या प्रकारे तिला वाया घालवायची नव्हती ..ती पूर्ण रात्रभर तोच विचार करत राहिली कि काय करता येईल, तिच्या डोळ्याला डोळा सुद्धा लागला नाही आणि पहाटेच उठून अनुश्री च तिने गाठोडे बांधलं ..थोडं उजाडलं तस ती अनुश्री ला जीवात जीव नसताना सुद्धा धडपडत उठवायला गेली . तिचा तापलेला हात तिला लागला तस अनुश्री दचकून उठली ...आणि घाबरून तिने आपल्या आईला विचारलं..,


"अग आई, तू एवढ्या पहाटे का उठलीस???..बघ तुझा ताप पण उतरला नाही. मी थोड्याच वेळात मावशी कडे जाऊन पुन्हा नवीन काढा करून आणते ...पण तू जाऊन पड हा आणि काही हवं आहे का तुला ?अशी उठून आलीस म्हणून आणि हे काय......??"


तिचं हात मधले गाठोडे पाहून अनुश्री च्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले

"ते समदं राहुंदे ..तू तुज आदी आवर बग लगबगीन...."

आधी तिला समजलं नाही आपली आई असं का बोलते पण नंतर अनुश्री ला वाटलं कि तिची आई पुन्हा फडावर चालले ,आणि म्हणून हे गाठोडं बांधल आहे तिने तीच..तिला समजत नव्हतं आई अशी का वागते....

"गाठोडं हाय ..कपड्यांचं ..जा आता बिगीबिगी आवर ..."


राधा इकडे तिकडे पाहत बोलली.....


"ते काही नाही हा आई तू पूर्ण पणे बरी झाल्या शिवाय मी तुला कुठे हि पाठवणार नाही ..चांगला आठवडाभर तू आराम करायचा आहेस आणि ह्या विरोधात मी तुझं काहीही ऐकणार नाही ...जा जाऊन पड ...मी आवरते "


अनुश्री तिला बळजबरीने झोपायला पाठवत होती...

"फडावर म्या न्हाय जात ...तुला म्या मुंबई ला धाडणार हाय .."

राधा म्हणाली तस आश्चर्याने अनुश्री तिच्या कडे पाहायला लागली

"मला ? कश्याला ? कश्यासाठी??"""


न समजून तिने तिला विचारलं...


"कश्याला म्हंजी ..तुज पुढल शिक्षण बाकी हाय ..ते तू तिकडचं जाऊन पूर कर ..इथलं बास झालं आता ."


राधा तिला म्हणाली...


"पण आई ...एवढ्या लवकर का???..माझी परीक्षा आताच झाले त्याचा निकाल पण यायचा बाकी आहे .."


"निकाल लागला का म्या सवता येईन घिऊन.. पण आता जा..."

राधा काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती
.....


" तू आधी बरी हो मग मी जाईन ना .."


अनुश्री आपल्या आईला समजावत होती ...आपल्या आईला आणि भावाला सोडून जायला तिचा जीव लागत नव्हता....


"तुला सांगून समजत न्हाय का... जा म्हणल ना तर जा..."

राधा जोरात ओरडली तशी तिला धाप लागली..धावत जाऊन अनुश्री ने तिला पाणी पाजलं आणि हळू हळू तिच्या पाठीवरून हात फिरवायला लागली.....


"आई , अग एवढ्यात का ..माझा निकाल लागू दे आणि तू बरी झालीस कि जाईनच ना ...आता तू माझं ऐक .... माझा जीवन नाही लागणार ग... तुझी आणि गणू ची काळजी वाटते.... त्यात .तुझा ताप पण खूप वाढलाय ...तू आराम कर मी ...मी काढा आणते ......"


अनु तिच्या आईला समजावत होती, खरं तर राधाला पण तिला एवढ्या लवकर पाठवायचं नव्हतं.. पण तिच्या पुढे दुसरा पर्याय पण नव्हता....


"अनु बाळ , अग तुला कळत कस न्हाय ..पण त्या हैवानाने तुझा चिरा उतरवण्या आधी तू इथनं निघून तालुक्याला जा ...'


शेवटी राधा ने खर काय ते राधा ला सांगितलंच...ते ऐकून अनुश्री ला देखील जबरदस्त धक्का बसला....पण स्वतःला सावरून


"बाबा, असं काही नाही करणार... मी त्यांना असं काही नाही करून देणार... तू पड... आधी तुझा ताप उतरू दे.. मग ठरवूया काय करायचं ते...."

असं म्हणून अनुश्री ने जबरदस्ती ने तिच्या आईला अंथरुणावर झोपवलं पण जाताना राधा ने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली ...


"अनु तुला माजी आन हाय ..तू आजच तालुक्याला जाशील ...."


अनुश्री ऐकणार नाही हे राधाला ठाऊक होत म्हणून तिने तिला स्वतःची शपथ दिली....


"अग पण आई......"


ती बोलतच होती कि मध्येच थांबवून राधा बोलली.....,


"तू माजी काळजी करू नगोस , तुझ्या त्या वैद्य मावशी कडून घेईन म्या काढा पण तू इथनं बाहेर जण जास्त गरजेचं हाय ....मी येईन तुला भेटाया...मग गणु बी तुज्या जवळ राहील .तुमची दोगांची मला सोय लावायची हाय........"

राधा ने अनुश्री ला शपथ दिल्यामुळे तिचा नाईलाज झाला.. पण तिथे कुठे आणि कस राहायचं हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला....

"अग पण आई, तिथे मला कोण ओळखत नाही मी राहू तरी कुठे ..आणि कस......"


ती अस्वस्थ झाली....

"त्याची तू काळजी नगो करुस.....तिथं माझ्या वळखिची एक हाय तुला घ्यायला येईल ती ..सुमन तीच नाव ...ती करेल तुझी राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था ..अन म्या धाडीन पैके बी ..काळजी नगो करुस ..तुजी आय जोपर्यंत जिती हाय.. तुला घाबरण्याची गरज न्हाय....."

असं म्हणून राधा ने अनुश्री च्या कपालच चुंबन घेतलं ..दोघीना खूप भरून आलं होत ...काही वेळ दोघीनी एकमेकांनी च्या मिठीत आपले एवढा वेळ अडवलेले अश्रू मोकळे करून दिले ...

"आई अग खरच गरज आहे का ह्या सगळ्याची.. मी तिकडे जायची ...आता तुला गरज असताना मी तुला असं सोडून जाणे मला पटत नाही आणि माझी इच्छा देखील नाही ..."

अनुश्री रडत म्हणाली.. अजून राधा ला बिलगून बोलली...

"अनु मला समजत न्हाय असं वाटतंय का तुला .मी काय खुश आहे का तुला दुरला पाठवून ..पण तुज्या जल्मापासन म्या एकच सपन पाहिलय..तुला शिकवण्याचं.... तू एक चांगली डाक्टर झालेली पाहायचं हाय मला ...तू हित राहिलीस तर तुज आयुष्य खराब व्हईल ....स्वतःसाठी नगो पण माज्यासाठी इथनं जा पोरी अन तुज्या आयुष्यच भलं कर ...म्या हात जोडते तुज्या पुढं ..."

असं म्हणून राधा ने हात जोडले ..तस अनुश्री ने पटकन तिचे हात पकडले ...,

"आई , अग असं नको करुस ..मी जाईन ..इथून पण मला वचन दे ...तू मला लवकरच भेटायला येशील आणि स्वतःची काळजी घेशील ..."


त्यावर राधा ने हसून मान हलवली ....

जड अंतःकरणाने अनुश्री तिथून आवरायला म्हणून उठली... खरंतर अनुश्री ची अजिबात इच्छा नव्हती तिला सोडून जायची पण आपल्या आई पुढे तीच काही चाललं नाही आणि ती नाराजीने आवरायला निघून गेली.आणि एवढा वेळ कशी तरी आणलेली हिम्मत सोडून राधा च्या डोळ्यातून अश्रू गळू लागले ...तीच शरीर तिला साथ देत नव्हतं ..फक्त अनुश्री तिथून जाईपर्यंत तिला धीर बांधायचा होता ..ताप वाढतच चाललं होता ...आणि तिला आतून लुळे पडल्यासारखं वाटत होत ..पण ती हरली तर अनुश्री जाऊ शकणार नाही ह्याची तिला पूर्ण खात्री होती म्हणून ती कुठून तरी बळ आणत होती आणि देवापुढे सारखे हात जोडून प्रार्थना करत होती ...