Login

ती तारीख..

एक अनपेक्षित अनुभव..


चला चला, माझं लग्न आहे आज.. गणेश खुशीत सांगत होता सगळ्यांना.. कुठल्याशा मळकटलेल्या मुंडावळ्या बांधून घरभर फिरत होता.. हॉल मध्ये पाट आणून ठेवला.. त्याला जमेल तशी त्याभोवती रांगोळी काढली.. रांगोळी कसली, त्याच्या आयुष्याचे उडालेले रंगच ते.. सनई म्हणून पिपाणी मोठमोठ्याने वाजवत होता.. त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्याच्याबद्दल काळजी, करुणा दिसत होती..


इतक्यात कोणीतरी अनोळखी व्यक्ती आत आली.. ती चाललेला प्रकार पाहून आश्चर्यचकित झाली.. तिला काहीच कळेना, हा काय प्रकार आहे ते..


कोणीतरी जोरात ओरडलं, घेऊन जा याला याच्या खोलीत.. तशी त्या अनोळखी माणसाची तंद्री भंग झाली..


आता त्या हॉलमध्ये ती अनोळखी व्यक्ती आणि त्या घरातली एक व्यक्ती, म्हणजेच त्या मुलाची आई होती..


" मॅडम, माझं देशपांडे वकिलांकडे काम होतं.. ते आहेत का घरात?? "   :  ती अनोळखी व्यक्ती


" नाही.. आपण?? "    :  त्या मुलाची आई


" मी.. दामोदर जोशी.. वकीलसाहेबांकडे काम होतं.. "    :  ती अनोळखी व्यक्ती


" बरं.. "   :  त्या मुलाची आई


" मॅडम, वाईट वाटून घेऊ नका पण एक विचारू का?? "   :  ती व्यक्ती


" तुम्ही आल्यावर जो प्रकार पाहिला, त्याबद्दलचं बोलायचंय ना.. "    :  त्या मुलाची आई


" हो.. म्हणजे.. "     :  ती व्यक्ती


" ज्याला मुंडावळ्या घालून पाहिलंत, तो माझा एकुलता एक मुलगा गणेश.. दोन वर्षांपूर्वी त्याचं 20 मार्च ला लग्न ठरलं होतं.. खूप खुश होता.. पण लग्नाच्या दिवशी फेरे घेताना अचानक होमाची आग वाढली आणि त्यात नवरी मुलगी होरपळली.. हॉस्पिटलमध्ये नेलं पण काहीच उपयोग झाला नाही.. ट्रीटमेंटला काही रिस्पॉन्स देईनाशी झाली आणि एक दिवस ती हे जग सोडून गेली..


गणेशला त्या धक्क्यातून अजून सावरलेला नाही.. तेव्हापासून बरोबर दर महिन्याच्या 20 तारखेला तो त्याच मुंडावळ्या घालून असा स्वतःचं लग्न असल्याच्या आविर्भावात वावरतो.. Treatment सुरु आहे त्याची.. पण नियतीने मनावर घातलेला घाव तो.. इतक्या सहजासहजी कसा भरेल.. "  


बोलताना तिचे डोळे भरून आले..


" खूप वाईट झालं.. पण तुम्ही काळजी करू नका.. सगळं काही ठीक होईल "    :  ती व्यक्ती धीर देत म्हणाली..

0