........."त्या बंगल्यावर"....
भाग १ ला
फक्त हातापायांची वऴवळ करू शकत होता तो.धडाधड हात आपटत होता.पायांचाही व्यर्थ प्रयत्न चालू होता.सर्व ब्रम्हांड जणू समोर ऊभं होतं.हवालदिल झालेला होता.हातात काहीच नव्हतं.
तो ऊपडा..म्हणजेचं पोटावर होता रादर तसा त्याला ठेवला होता,बहूतेक.पाठिवर मजबूत पायाचा गुडघा होता ..कोणाचा तरि.डोक माने पासून,दाबून धरलेलं होतं.कंबरे वरची पकड ईतकि जबरदस्त होती ...की तो काहीच करू शकत नव्हता.अेक पाय कंबरेवर ,गुडघ्याने...अेक पाय ऊजव्या हातावर जो बाहेर होता...अन् डावा हात ..कोणाच्या तरि मजबूत हाताने ..दाबून ठेवलेला होता ,असा..की तो काहीच करू शकत नव्हता.ताकत ,हिंमत..या सर्व कागदावरच्या गोष्टि असतात..असे त्याला आता वाटू लागले होते.
फक्त तडफड चालू होती.ती ही किती साथ देणार होती....प्रभू रामचंद्रासंच माहीती.मानेसकट डोकं,अखेरचा प्रयत्न करत होतं.त्यातूनही त्याने डोळे ऊघडलेंच.पण पाण्या शिवाय काहीच दिसत नव्हते.नाका तोंडात पाणी कधीच भरलं होतं.
होय...कूणी तरि बूडवंत होतं त्याला.व्यर्थ तडफड चालू होती.काहीच क्षणांची..मग काय होणार होतं...माहीत नव्हतं...पण तो हार मानणार नव्हता..
जिवावर बेतलं की सात हत्तीचं बळ येतं म्हणतात.तो ते आजमाऊन पहात होता.पण आजवर ऐकलेल्या म्हणी..आयला..बहूतेक..पुस्तकातंच...साबीत होत होत्या...आणी त्याचा लढा संपू लागला होता.वरची पकड अधिक मजबूत होत होती..बहुतेक निर्वाणीची..अन् तो शेवटता श्वास...नाही नाही..मला जगायचय.. मला जगायचयं...
का..?मला का मारता..?मला जगायचय ,सोडा..सोडा..अेकंच शेवटची ,अखेरची ,ऊसळी...पण...नाही...छे..नाहीच जमंत...आता कोंडतोय श्वास..फुप्पुसं...भरू लागलीत पाण्याने..त्याला जाणवंत होतं...अन् मरण मरण म्हणजे काय..आई..गं..तो आज अनुभवत होता..
अन् अखेरचा श्वास...बस्...संपलं आयुष्य...खलास...तो संपला...
अन तितक्यात ४.४० ए एम्.चा गजर..रूम डोक्यावर घेऊ लागला.
"गूड माँर्निंग...प्लिज वेकप्...गूड माँर्निंग...प्लिज वेकप्..."
थाडकन् जागा झाला.बायकोची बडबड चालू होती.
"नाही ऊठंत ..तर लावतोस कशाला रे गजर...बच्चू ..?स्वत:ही नाही झोपत अन् मलाही नाही.."
तो या सगऴ्यांतून सावरणार..तर त्याला पाच मिनीटे तरि हवी होती.आता अपर्णा च ऊठली.वैतागत तीने अलार्म बंद केला.मनोहर ने बरोबर पाच मिनीटे घेतली.वातानुकूलीत रूममधेही गड्याला दरदरून घाम फूटला होता.त्याची अवस्था खुप वाईट होती.
"बच्चू, आज परत तेच स्वप्न...?"
"हं...!" तो ऊद्गारला.
तीने नाईट गाऊनच्या मिळेल त्या हिस्याने ,मनोहरचा चेहेरा पुसला.अंजारलं गोंजारलं..जवऴ घेतलं...
"अेकदा आपण कोणाला विचारून का नाही घेतं..?हे आज किती तरि वर्ष होतय.मधे मधे तूला अशी स्वप्नं पडतायतं"
"आणी बदल मुळींच नाही...अगदि सेम टू सेम...३ वर्ष झाली.महिन्यांतून चार पाचदा तरि हे पडतंच पडतं..हे काही चांगलं नाही.काहीतरि आहे..जे कूठेतरि बिनसलयं.."
"बच्चू..विचार कर..माझ्या बोलण्याचा.मी तूला असं नाही पाहू शकंत..मला काळजी वाटते."
"लग्नाला सहा वर्ष झाली.देवयानी प्रकरणानंतर जर काही वाईट घडलं असेलं तर फक्त हेच.तेही सतत चालू आहे..बाबू...जाऊया अेका गुरूजींकडे..मी ओळखते त्यांना.."
अपर्णा कळकळीने बोलंत होती.मनोहर निमूट ऐकत होता.आता तो बर्या पैकी सावरला होता.
गेली ३ वर्ष त्याला हे स्वप्नं तसंच्या तसं..आणी सेम वेळेला पडायचं.तो आजवर या वर ऊत्तर शोधू नव्हता शकला.पण काहीतरि गहन होतं..असं ऊगाचंच त्याला वाटे..अन् अर्पणाला त्याहून जास्त.
बेड मधून ऊठून पहिले अन्हिकं ऊरकू लागला.जिम...अंघोळ,दिवा बत्ती..अगदी रूटीनं..
पण आज नेहमी पेक्षा घाई होती.खुप लवकर आवरायचं होतं त्याला.तो आज बाहेर जाणार होता..
बाहेर असं नाही.बीचवरंच..परंतु बीच लाईन ला पुढे सहा किमी वर अेक काँटेज वजा बंगलो त्याने घेतला होता..केंव्हाचं..आताच असं नाही.तिथे आज गेट टू गेजर होतं..हो..त्याचे सर्व कवी मित्र येणार होते.मित्र मैत्रीणी...काही मैत्रीणी फँमीली सोबंत...काही मित्र अेकटेच...
जवऴ जवऴ १० जणं बोते..तो पकडून..
तो बंगला वजा काँटेज सुनसान जागी होता.पण अद्ययावत होता.सात रूम..एसी व नाँन एसी..दोन्ही..
सेल्फ कंटेंट ..
कामगारही होते.काही कमी नव्हतं.टिव्हि,सिसि टिव्हि, व्हेज नाँन व्हेज जेवणाची व्यवस्था..सर्व..
दोन कूक..दोन रूम सर्व्हिस,दोन हरकामे..असा सहा जणांचा स्टाफ होता.पर्यटक आनंदाने रहायचे.शहर,गावापासून लांब..परंतु अद्ययावत सेवेने युक्त बंगलो.त्यातून बीच फेसींग सर्व.काही काही कमी नव्हतं.
होतं तर अेकंच...जे आवश्यक होतं तेच कमी होतं...हां...आता टाँवर चे काम चालू होतं.एखादं वर्ष तरि लागलं असतं.पण तोवर नेट शिवाय त्या बंगल्यावर जगावं लागत असे.
" नो नेट.. की नो साधी रेंज"
त्या बंगल्यावर गेला माणूस की जगाशी संपर्क तुटायचा.काँल करू शकत नव्हता की ईंटरनेट वापरू शकत नव्हता.
पण वातावरण काय बोलालं..तिथलं..?आहाहा..निसर्ग रम्य सर्व..बंगल्यातंच अेक स्विंमिंग पूल..अन्..बीच पहायला बसायला अगदि बिच फेसींग बेच.ची व्यवस्था..माणूस एकदा आला ना की पुन्हा ईथेंच यायला आग्रह करे.
आता असा हा बंगला,मनोहर ने आज..त्यांच्या स्वत:साठींच राखून ठेवला होता.विकडेज होते.तसा काही प्राँब्लेम नव्हता.
नऊ जणं मित्र अन् परिवार मेंबर पकडून पंधरा झाले असते..दोन चार पिल्लं...लहानगी ..बस्..
जड नव्हतं ..मँनेज करणं.वेळेला ३५ लोकं रहातात..या बंगल्यात...पंधरा नथिंग होते.
प्रत्येकासाठी वेगवेगऴ्या रूम त्याने आरक्षित केल्या होत्या.तो स्वत:ही दोन तीन दिवस घरि जाणार नव्हता.
अपर्णा ची चूळबूळ सूरू झाली होती.
" जा आम्हांला टाकून.मित्र यायचेत म्हणे.मग त्यांना ठेव ना ..वस्तीला तू ये ना घरी.सकाळी परत जा.हाँटेलवरचं टेंशन नको..मी पाहीन.पण वस्तीला ये."
"माझं काही नाही हं.सागर ,प्रियाला झोप येत नाही ना बापा शिवाय..म्हणून बोलतेय.मला काय करायचयं.."
तीचा त्रागा कळंत होता.रोज सागर प्रिया..त्यांच्या सेपरेट रूममधेच झोपायचे.प्राँब्लेम होता तो अपर्णाचाचं.तीला मनोहरच्या कूशीत गेल्या शिवाय ,झोपच येत नसे.आणी आता तीची गोची झाली होती.दोन रात्री याच्या शिवाय काढायच्या कशा..?
"अगं..तूम्ही हा चला की सोबंत...त्यात काय.."हसंत हसंत मनोहर बोलला.
"हो..जे शक्य नाही तेच बोलं.."मस्त पैकी वेगवान नाक मुरडंत ,आपल्या खास शैलीत...तीने राग पुन्हा व्यक्त केला.
"शाळा बूडवू पोरांच्या..?अाणी घरचं कोण बघेलं..?आई बाबांचं जेवण ,ओषधं कोण पाहीलं..?
माझी बाग आहे...त्यांना पाणी कोण घालेलं..?"
"म्हणे..चला..सोबतं..हूम्म.."पुन्हा एकदा नाक मुरडलं गेलं.
मनोहर हसू लागला..
"अगं शोना..दोनच दिवस..जमलं च तर येऊन जाईन मधेच.दोन दिवस काढं.."
" जा..जा..मी नाही बाबा अडवंत.आणी हो तिकडे फोन लागायचा नाही.जेवण वेळेवर घे.जास्त जागू नको.डायेट अेखाद दिवस सोड..चालेलं..पण ऊपाशी राहू नको.."
"आणी हो....जाण्याच्या दिवशी सर्वांना घरी आणं..चहापाणी करू मस्त...लव यू...जा बच्चू..लवकर ये हं प्लिज..."
आता तीचा तो लाडीक चेहेरा पाहून ,मनोहर ला क्षणभर वाटलं..गेट चू गेदर कँसलच करावं.
"सौ खुशीयाँ एक तरफ..और...अपने पत्नी का हसरा चेहेरा एक तरफ.."
पण क्षणभरंच..जावं तर लागणारंच होतं.सर्व मित्र मैत्रीणी सकाळीच निघाले होते.मैफील रंगणार होती..साहीत्याची...चारोळ्यांची....छान दोन दिवंस..आयुष्य साहित्यमय व जरा वेगळं होणार होतं.
नास्टा करून..आई बाबांना हाक मारून..अन् अलगंद..शोनाला मिठी मारून...तो आता मेन डोअर मधून बाहेर पडला.दोन दिवसं फँमीली पासून लांब तसा तो प्रथमंच चालला होता.लेकरांना एकदा पोटाशी घेतलं.गोड गोड पा ची देवाण घेवाण झाली.
बाय करायचं नाही...कधीचं..तीचा हट्टंच असायचा तसा.
सि यू..करून...त्याने
अपर्णाला एक फ्लाईंग किस दिला...
आता पार्किंग लाँट मधून त्याची ईस्टिलो बाहेर पडंत होती...
बीच च्या रोडवर....पहिले हाँटेल..तिथे सर्वांना आवश्यक सुचना करून तो ...आपल्या नविन बंगल्या कडे निघणार होता..
" कोंकण..." या आपल्या बंगल्यापासून तो आता सात किमी वर होता.
बंगल्यावर पोहचला तेंव्हा...मीनीबस मित्रांची मागोमागंच होती...
सर्व खुप खुश होते.आज ते तसे प्रथमच एकमेकांना भेटले होते.आजवर फक्त
"दिल दोस्ती दुनिया दारी"या आपल्या ग्रुप वर ते भेटलेले.परंतु आज ते एकमेकांचा चेहेरा पहिल्यांदाच पहात होते.
पैकी सर्वच जणं ,मुंबई येथे..व पुणा मुंबई हाय वेवर...प्रत्येकाच्या रिसिव्ह होण्याच्या ठिकाणी भेटून झाले होते.
'मनोहर नागवेकर.'.नावाच्या वेड्याला ,व तो आपल्या मित्रांना आज ..आता भेटणार होते..
आणी अखेर भेट झाली...सर्वात पहिले मिठि मारली ती वैभव ने...तसा तो पहिले भेटला होता.चारोळी संग्रहाच्या प्रकाशना वेळी.पण आज त्या घटनेला कालावधी लोटला होता.
मीठी मारून झाली.आता जो तो भेटू लागला.
पार्किंग लाँट मधेंच पंधरा मिनीटे गेली.
"ए मन्या,चल चल पटकन..रूम वगैरे दाखवं चल...माझ्या पोरांना भूक लागलेयं.."कविता घाई करू लागली..
मनोहरनेही पहिले तेच करायचं ठरवलं.
पुढच्या पंधराच मिनीटांत जो तो आपापल्या रूम मधे फ्रेश होऊ लागला.
मनोहर ने किचन मधे आवश्यक त्या सुचना केल्या. आता लवकरचं नास्टा, त्यांचा..हाँल मधील टेबलावर मांडला जाणार होता...
मस्त दोन दिवसांचं नियोजन ,रश्मी ताईने आखून आणलं होतं.रश्मी ताई..डाँक्टर होती.पण साहित्य क्षेत्रात ...तीची झेप मोलाची होती.
अजून होते...सर्वांची सर्व जण नव्याने ओळख देणार होता..तसंच नियोजन होतं.आता अकरा वाजू लागले होते..आणी नास्टा काहीच वेळात येणार होता.
मनोहर बाकी तयारी पहात होता.शेवटी तो.यजमान होता.
बंगल्याच्या डाव्या अंगाला काहीच नव्हतं.याच्या प्राँपर्टिची वाँल कंपाऊंड सोडली..तर पुढे घनदाट सूरूंच जंगल होतं.
ते फाँरेस्ट विभागाच्या अखत्यारितीत येत होतं.ऊजवी बाजूचंही काही वेगऴ नव्हंत.थोडक्यात काय ...तर "कोंकण"बंगलो...ईथे अेका बेटासारखाच होता जणूं...
आज या बेटावरील बंगल्यात नाही म्हंटले तरि १५ पाहूणे,स्वत: मनोहर,स्टाफ पैकी ६ जणं..ईतकेच होते.
पण स्टाफ ,विकेंड सोडला तर घरी जायचा.घाबरायचे ते..सुनसान एरिया..नो नेटवर्क..सो ते घरि जायचे.
आजही ते रात्री घरि जाणार होते..सर्व तयारी करून.तसेही हे पाहूणे असे नव्हतेचं..मालकाचे मित्रच होते.
आता मनोहर हाँलमधी येऊन सर्वांना हाक मारत होता.
तितक्यात त्याला बिचवर काही हालचाल दिसली...आज ईकडे माणसं तर नाहीत कूणी..पर्यटक..मग कोण आहे तिकडे...
लांब दूरवर..नजर पोहचत होती तोवर...तो पहात होता.ओहोटी लागली होती.पाणी आत गेले होते.ढोपरभर पाणी असेल अशा भागात ती हालचाल होती.
कळंत नव्हते काय ते..पण लेडी होती बहूतेक..पण वेगळीच हालचाल..बहूतेक ती गरोदर वाटत होती..पाण्यांतून एकटिच फिरत होती.तेवढ्या तेवढ्याच भागात.
"अरे मन्या..ऐक नं.."
वैभवच्या आवाजाने तो भानावर आला.
तोच सर्व आले होते..आता नास्टा ही पोहचला होता...गरम गरम कांदे पोहे..वर ओलं खोबरं..अन् वाफाळता चहा..
सर्व बसले...वैभव ने न रहावून पुन्हा तिकडे नजर टाकली...बीच कडे...
आता तीथं कोणंच नव्हतं....डावी ऊजवी कडे...शंभर मिटरच्या अंतरावरही कोणंच प्रयत्न करूनही दिसलं नाही....
तो काहीसा विचलीत होत होता..तोच पोहे समोर ठेवत ,वर्षाताई बोलली.."अरे भावा..ईकडे तूझी लाडकी अर्पू नाही येणार भरवायला...खा पटकन्.."
टेबलावर आता हशा पिकला होता.जो तो खुश होता...मनोहरही...
पण त्याची नजर आता मधेच...तिकडे....बीच कडे जात होती....
स्त्री...गरोदर एकटी..पाण्यात....
तो न रहावून ...मनातल्या प्रश्नांची ऊकल घ्यायचा प्रयत्न करत होता...मधेच पाण्याकडे पहात होता....
क्रमश :
मनोज नागांवकर
@नागांव बीच...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा