थोरलेपण भाग पाच ( अंतिम भाग)
जलदलेखन
जलदलेखन
मागील भागात आपण पाहिलं की अभिजित मित्रांसोबत एका कार्यकामाला जातो,..
.त्या कार्यक्रमात त्याची भेटू होते, अनघा कुलकर्णीशी
तिच्या चेहऱ्यावर शांतपणा, पण डोळ्यांत खोल वेदना बघूनच जाणवायच्या. ती एका अनाथाश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत होती.
पहिल्या भेटीतच ती त्याला म्हणाली,
“तुमचं हसणं छान आहे, पण दिसतंय की खूप दिवसांनी हसलात.”
अभिजीत हसला,
“हो… जबाबदाऱ्या इतक्या होत्या की हसणंही विसरलो.तुमच्या डोळ्यात देखील वेदना दिसतेच आहे.”
तस हसून अनघा म्हणाली,
“माझंही काहीसं असंच. लग्न झालं, पण मूल नसल्यामुळे नवऱ्याने सोडून दिलं. आता या अनाथ मुलांचं हसणं माझं जगणं झालंय.”
ते ऐकून त्याला खूप वाईट वाटलं, ती सुद्धा त्याच्यासारखीच एकटी होती, त्याला तर आईचा कुठेतरी आधार तरी होता. पण अनघा एकटीच होती.
त्यांच्यात हळू हळू बोलणे वाढत गेले.
काही दिवसांनी अभिजीत तिच्या अनाथाश्रमात गेला.
अर्धवट मोडकळीस आलेलं घर, पण त्यात 15-20 मुलं हसत-खेळत होती. ते पाहून त्याला वाईट वाटलं.
त्या दिवसानंतर तो नियमित तिथे जायला लागला.
मुलांच्या शाळेची फी, पुस्तकं, कपडे
तो थोडं-थोडं करून मदत करू लागला.
काळ ओघाने त्याचं जीवनाचं रिकामं पान पुन्हा रंगू लागलं. पुन्हा एकदा जबाबदारीच ओझं त्याने त्याच्या खांद्यावर अगदी आनंदाने घेतलं, पण ह्या वेळेस त्याला साथ होती अनघाची.
काही दिवसांनी अभिजीत तिच्या अनाथाश्रमात गेला.
अर्धवट मोडकळीस आलेलं घर, पण त्यात 15-20 मुलं हसत-खेळत होती. ते पाहून त्याला वाईट वाटलं.
त्या दिवसानंतर तो नियमित तिथे जायला लागला.
मुलांच्या शाळेची फी, पुस्तकं, कपडे
तो थोडं-थोडं करून मदत करू लागला.
काळ ओघाने त्याचं जीवनाचं रिकामं पान पुन्हा रंगू लागलं. पुन्हा एकदा जबाबदारीच ओझं त्याने त्याच्या खांद्यावर अगदी आनंदाने घेतलं, पण ह्या वेळेस त्याला साथ होती अनघाची.
काही महिन्यांनी त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं,
“आपल्याला एक नवं, चांगलं अनाथाश्रम उभारायचं आहे.”
अभिजीतने शहरातल्या घराच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून एक छोटा प्लॉट घेतला.
ती जागा हिरवीगार, शहरापासून थोडी दूर होती.
अनघा म्हणाली,
ती जागा हिरवीगार, शहरापासून थोडी दूर होती.
अनघा म्हणाली,
“इथं लहानसं घर, आणि त्याच्याभोवती बाग असलेला आश्रम… किती सुंदर होईल!”
त्यांनी स्वतः त्या कामात हात घातला,
पैसे साठवले, मित्रांच्या मदतीने बांधकाम सुरू केलं.
त्याचं नाव ठेवलं — ‘स्नेहगृह’.
त्याचं नाव ठेवलं — ‘स्नेहगृह’.
भिंती उभ्या राहिल्या, पण त्या फक्त विटांच्या नव्हत्या,
त्या त्याग, प्रेम, आशेच्या आणि जबाबदारीच्या होत्या.
त्या त्याग, प्रेम, आशेच्या आणि जबाबदारीच्या होत्या.
स्नेहगृह हळूहळू सुरू झालं.
अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
त्यांना शाळेत पाठवायचं, संध्याकाळी गोष्टी सांगायच्या, त्यांच्यासोबत खेळायचं.अभिजीत आणि अनघा दोघेही त्यांच्या जगाचे आधार झाले. त्यांच्याही नकळत ते दोघे एकमेकांना आवडू लागले होते. पण बोलण्यासाठी कोणच पुढाकार घेत नव्हतं.
दोन वर्षांनी सागर आणि रोहन आपल्या कुटुंबासह भेटायला आले. खरं तर सागरचा व्यवसाय बुडाला होता आणि रोहनची नोकरीं गेली होती. ते पैसे दादाने काही खर्च केले नसणार हे त्यांना माहित होत म्हणून मदतीसाठी ते आले होते. पण त्यांनी स्नेहगृह पाहिलं, सुबक, स्वच्छ, आणि आनंदाने भरलेलं.
लहान मुलं पळत होती, काही चित्रं काढत होती, काही गाणं म्हणत होती.
सागर म्हणाला,
“दादा… तू नेहमीच सगळ्यांसाठी जगलास. पण आता पाहून वाटतं, तू स्वतःसाठीही जगायला शिकलास.”
रोहनच्या डोळ्यांत अश्रू होते.
“दादा, तुझ्या छायेत राहण्यासारखं सुख नव्हतं.. माफ कर आम्हाला. "
अभिजीत काही बोलला नाही, फक्त हसला. त्यांच्या येण्याचं कारण समजल्यामुळे आईने त्या दोघांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. त्यामुळे त्यांना मनापासून वाईट वाटलं की नाही समजलं नाही पण त्यांनी दादाची माफी मागितली. शिवाय त्याच हे नव कुटुंब बघून ते दोघे काहीही न बोलता निघून गेले. पण जाताना अभिजितने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवलाच. आताही काहीही न बोलता त्यांच्या हातात पैशाचं पॉकेट ठेवून तो निघून गेला.
थोरळेपण म्हणजे फक्त घर सांभाळणं नाही,तर घर उभं करणं असत.स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याला आनंद द्यायचा, अभिजीतने जबाबदारीतून प्रेमाकडे प्रवास केला
आणि त्या प्रेमातून जन्माला आलं एक नवं घर…
आणि त्या प्रेमातून जन्माला आलं एक नवं घर…
‘स्नेहगृह’ जिथे त्याच्या थोरलेपणाला खरा अर्थ मिळाला.
आईच्या आणि मुलांच्या इच्छेमुळे त्या दोघांनी लग्न केल आणि आता ते पंचवीस मुलांचे आईवडिल झाले होते.
आईच्या आणि मुलांच्या इच्छेमुळे त्या दोघांनी लग्न केल आणि आता ते पंचवीस मुलांचे आईवडिल झाले होते.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा