Login

दिशा स्वप्नांची.... भाग 3 रा

I like to read


स्पर्धा
दिशा स्वप्नांची.. भाग 3
(कथामालिका)
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

         दिवस भरभर जात होते. मुलांची  शाळा आणि अभ्यास व्यवस्थित चालू होता.अमर ने 12वीची परीक्षा दिली होती. आणि रजनी ने 10विची.
आणि आता मुलांना कुठेतरी फीरायला जायच होत.
गेले आठवडाभर दोघेही रेखाला सांगत होते .
बाबांशी बोल म्हणून.
"जास्त लाम्ब नको. जवळच कुठेतरी जाऊया".पाहिजे तर देवदर्शन करू पण प्लिज आई विचार ना .
"नेहमी जातो की तीन महिन्यातून एकदा"रेखा मुलांना समजावत हाती.
"आम्हाला सारख  समुद्रावर जाऊन कंटाळा आलाय." 
"ठीक आहे. आज रात्रीची जेवण झाली की बोलू .
पण कुठे जायचं ते ठरवून घ्या. नाहीतर आयत्यावेळी मला ओरडा ऐकावा लागेल."

"ए, काहीही काय आई बाबा कधी ओरडले ग."

"ठीक आहे,   आता जा बाहेर मला जेवण बनवू दे. बाबा येतील आता ."
-------
अजय आणि त्याचे बाबा  अंगणात बसले होते. रात्रीची जेवण झाली की दोघही बाहेर थोड्यावेळ गप्पा मारत. कधीकधी अजयची आई आणि रेखाही सामील होत असत. दिवसभर  काय काय घडलं एकमेकांना सांगत.
आजही दोघे गप्पा मारत बसल होते.  

बाबांना आता पूर्वीसारखं  काम जमत नव्हतं.बाबांनी त्यांच्या चुलत भावाला शेती करायला दिली होती. घरातच  मुलांशी खेळत, त्यांना समजुतीच्या गोष्टी सांगत,गावच्या देवळात भजनी मंडळांमध्ये सहभाग, कधी दोघींना मदत करत, रेडिओवर गाणी ऐकत,  रोजची वर्तमानपत्र वाचणे असा त्यांचा दिनक्रम चालू होता.

अजयची आई तेलाची बाटली घेऊन आली.
"अजु, ये बस इथे तुझ्या केसांना तेल लावते.   मस्त डोक्याची मालीश करते."
"नको, आई तु खूप जोरात करतेस .  तुझे हात दुखतात  नंतर. राहू दे".
"काही माझे हात दुखत नाही. ये तू.म्हणत त्या खुर्चीत बसल्या."
"तू काय ऐकायची नाहीस ."
त्यांनी तेल मालीश सुरू केली. आणि विचारल," ठीक आहे ना.  बर वाटतंय का."
"हो."
तितक्यात  अमर, रजनी आणि रेखा  अंगणात आले.
"अहो, ऐका ना."
"हा, बोल."
मुलं म्हणत होति की त्यांना ह्या सुट्टी मध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जायचय.
"हो जाऊ की  दरवर्षी सारख."
"नाही. दोन्ही मूल एकदाच ओरडली.
"काय झालं ".अमरनी त्याच  डोकं आईच्या हातातून बाजुला केलं.
"काय झालं ओरडायला. नाही जायचय."
"जायचय पण दुसरीकडे कुठेतरी,जिथे आपण कधी गेलो नाहीये."
"ठीक आहे, जाऊया  कुठे जायचे ते तुम्ही ठरवा."
त्याला कळलं होतं, मुलं आता मोठी होत आहेत. थोडस त्यांच्या मनाने पण घेतलं पाहिजे.
"उद्या सांगा  मला,मी जाऊन झोपतो". म्हणत अजय आत गेला.
------
"अहो,  आमचं ठरलं कुठे जायचं."
"चांगलं आहे.  सांगा मग कुठे जायचं.तस मला राजाला तयार करायला."
"कोल्हापूर."
"काय??? कित्ती लाम्ब  आहे ते, गेलीस काय कधी."
"नाही गेलीय, म्हणून तर जायचय. बरेच वर्षाची इच्छा आहे.कोल्हापूर च्या आंबाबाईची ओटी भरायचीय.
पण राहून गेलं ते राहूनच गेलं.'
"कधी बोलली नाहीस. "
"मला वाटलं तुम्ही नाही बोलाल."
"ते तर मी आत्ता पण नाहीच बोलतोय."
"बाबा चला ना प्लिज,, आमचे सर सांगत होते.   तिथे ना जवळ पन्हाळा किल्ला आहे. मला बघायचाय".  अमर विनवणी करत म्हणाला.
"मला पण किल्ला बघायचा आहे. " रजनीने त्याच्या सुरात सूर मिसळला.
"आम्हाला तर दोन्ही कडे फिरायला जायचय.  हो, म्हण की अजय."
"बापरे, तुमची एक टीम झाली. मी एकटा काय करू. ठीक आहे जाऊया. कधी जायचं सांगा."
"अहो, थांबा जरा एक विचारू का."
"हा बोल की."
"आपण मुंबईला होतो ना तेव्हा मी आणि नंदा वहिनींनी(सुरेशची बायको) एकदा असच बोलता बोलता ठरवल होत की, मूल थोडी मोठी झाली की , कोल्हापूर ला जाऊन देवीचं दर्शन करू."
"तुम्ही जरा सूरेश भाऊजीना फोन करुन विचारता का.
ते चार जण आले तर."

हो, आताच फोन करतो . म्हणत अजय बाहेर गेला.
बराच वेळ अजय फोनवर बोलत होता.
फोन खिशात ठेवत अजय हसत हसत आला.
"काय रे, हसतेस काय एकटाच, आई
"अग , हसू नाहीतर काय करू. "
"म्हणजे  हो म्हंटले का भाऊजी "रेखा
हो, म्हंटला नाही तर येण्याची तयारी पण झाली .
काय?
"हो, अग त्याच कालच ठरलं. वहिनींनी पण तुझ्यासारखच सांगितलं. तो 2 दिवसांनी येतोय. आपण आपली तयारी करूया. काय चालेल ना.गुरुवारी संध्याकाळी येतील.
मग आपण शुक्रवारी पहाटे लवकर निघू चार वाजेपर्यंत . सकाळी ९ वाजेपर्यंत पोचू."
"सुरेश बोलला  , तिथे 2 रूम बुक करू.  ठीक आहे.
जायचं ना."
"हो," मुलं आनंदाने ओरडली.
सुरेशने आहे मग काय काळजी नाही. आई
ठीक आहे  .राजाला घेऊन जायचय.   चालेल ना.
हो, मूल अजून ओरडली.
-----------------********---------

मुंबईत सुरेशच्या घरी
नन्दा, आग बाहेर ये. तुला काहीतरी सांगायचंय.
काय हो, आज आल्याआल्या काय सांगायचंय, हे घ्या पाणी प्या आधी, ग्लास हातात देऊन  नन्दा बाजूच्या खुर्चीत बसली .
"अग दुपारी अजयचा फोन आला होता. आपलं ठरलं  फिरायला जायचं, तसच त्याने पण ठरवलंय."
"वाह, हे खूप छान .  "
"मुल बाहेर गेलीत, आली की पाहिले त्यांना सांगते. मग काय त्यांची पिकनिक शॉपिंग की काय ते करतील."
"बर, ठीक आहे."
विरेन नि नुकतीच  बी. कॉम.पदवीची  परीक्षा दिली होती. तर शारदाने  बारावीची परीक्षा दिली होती.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी  सुरेश,नंदा ,विरेन आणि शारदा  संध्याकाळी गावी आले.  अजयकडेच आले.  पहाटे लवकर निघायचं होत.
बाजूच सुरेशच घर बंद होत.   सुरेशच्या आईच तो दहावीत असताना एक आजाराचं निमित्त होऊन निधन झालं होतं, तर  बाबा पुण्याला सुरेशच्या दादा कडे राहत. त्याने बाबांना विचारलं होत, पण आजकाल त्यांचे गुडघे जास्तच दुखत होते.म्हणून ते नाही बोलले.
-----
"कसे आहात बाबा? "सुरेश ने  अजय च्या बाबांना वाकून नमस्कार केला.
पाठोपाठ नन्दानेही सगळ्याची विचारपूस केली.
रेखा नंदाला घेऊन आत गेली. शारदाही तिच्या मागे गेली.
अमर आणि विरेन ने सर्व बॅगा आत आणल्या.
  तितक्यात माळ्यावरून काहीतरी पडल्याचा आवाज आला.
रजनी माळ्यावर  गेली होती, तिच्या हातून बाटल्या खाली पडल्या होत्या.
अमर पटकन  वर आला, त्याच्या मागून विरेनही हळूहळू  पुढे आला.
"काय ग, आत्ता इथे काय करत होतीस, लागलं का."
"अरे, दादा आईने ह्या पाण्याच्या बाटल्या काढायला सांगितल्या होत्या, "
"हो पण त्या दुपारी बोलली होती."
"आणि मी विसरली, तीला आठवन्यापूर्वी मी
विचार केला पटकन काढून  ठेवेन.
तर हा डब्बा पडला."
"लवकर  आठवलं, एव्हढी घाई कशाला उद्या सकाळी काढल्या असत्या तरी चालल असत".विरेन तिच्याकडे बघून हसतच बोलला.
हो, का ठीक आहे. मग सकाळी  येते.रजनी
अग ए, तो तुझी मस्करी करतोय. अमर
ती काही बोलणार तोच रेखाने तिघांनाही खाली येण्यासाठी आवाज दिला.
रजनी , काय ग ही वेळ आहे का , दुपारी सांगितलेलं काम संध्याकाळी करते.
अग ,आई मी खरच विसरले. Sorry
"असू दे, ग का ओरडते तिला, रजनी ये इकडे, कशी आहेस   कित्ती मोठी झालीस ग."
रजनी ने वाकून नंदाला नमस्कार केला. "मी मस्त, काकू तुम्ही कशा आहात. "

------------
चला आता रात्र झाली, झोपा. सकाळी लवकर उठायचं आहे.   गप्पा  प्रवासातही  बोलता येतील. पण उद्या उठायला उशीर नको व्हायला. आजीने सर्वाना  सांगितले.
तसे सगळे पटकन झोपायला गेले
आज पहाटे खूपच गडबड चालु होती. सर्व बॅगा गाडीत व्यवस्थित ठेवल्या होत्या.  गाडीला(राजाला)  खूप मोठा झेंडूच्या फुलांचा हार घातला होता.
कोण, कुठे बसणार हे अजून ठरलं नव्हतं.
काका, मी चालवू गाडी. विरेन ने अजयला विचारले.
आता नको, तू येताना चालव. ठीक आहे. पण आधी तुझ्या बाबांना विचार.
" पण येताना तर मी चालवते.  "रजनी
"काय, तू गाडी .जोक करते सकाळीं सकाळी".विरेन तिच्याकडे बघून हसत बोलला.
"Excuse me .  मला येते गाडी चालवताना.ok.आम्ही जेव्हा पण सगळे कुठे बाहेर  जातो तेव्हा येताना अर्धा रस्ता मी गाडी चालवते.  आणि अर्धा रस्ता दादा. आमचं ठरलय.
" येतानाच येताना बघू, आधी निघुया का , चला बसा लवकर. "अजयने सांगितले.
पुढे अजय आणि सुरेश बसले.  तर मागे एक कडेला रजनी आणि मध्ये रेखा, नंदा आणि दुसऱ्या कडेला शारदा अश्या बसल्या. त्यांच्या समोर एक कडेला विरेन आणि मध्ये आजी आजोबा आणि दुसरीकडे अमर बसला.
"गणपती बाप्पा मोरया......"म्हणत प्रवास सुरु झाला.

-----
क्रमशः
(कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा.
व्याकरणाच्या चुका असल्यास माफ करा.)

मधुरा महेश...




















 

0

🎭 Series Post

View all