Login

दिशा स्वप्नांची..... Part 8

I like to read


दिशा स्वप्नांची .... भाग 8
 स्पर्धा
कथामालिका
(सादर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे)
 '"हे बघ, इथे वरती बघ"विरेन
"केव्हढी मोठी बिल्डिंग आहे."
हो, तुझ्या कामाचं आहे हे,इथे फॅशन डीझाइनिंग चे कोर्सेस शिकवतात. म्हणून तुला आणलंय.
"काय?थँक्स विरेन "हणत तिने त्याचा हात पकडला
"युवर वेलकम "म्हणत हळूच त्याने हात बाजूला केला.
मग आता 12विचा रिझल्ट लागला की लगेच इकडे यायचं आणि ऍडमिशन घयायची.  मी नसेन. पण तू शारदा ला घेऊन ये ok"
"तू कुठे जाणार आहेस"
अग,मला पुण्याला  जॉब भेटलाय.वर्षभर तिथेच काम करायचंय.नन्तर इकडेच मुंबईला त्यांच्या ब्रांच ला येईन.तिचा पडलेला चेहरा बघत बोलला.
ओक ठीक आहे.
"मला तुला काही विचारायचं होत."
"बोल की"
"सेम टू यु म्हणजे काय"
"मला माहित होतं.तू हे विचारणार,
ऐक ना रजनी आता ना तू इकडे शिकायला येण्यासाठी तुझ्या घरी कस सांगणार आहेस त्याचा विचार कर.
सेम टू यु तर आहेच त्याबद्दल नन्तर बोलू. मी परत येणारच आहे.ok '"
दुसऱ्या दिवशी शारदाने तिला तीच कॉलेज दाखवलं .
एव्हढं मोठं कॉलेज बघून ती बघतच बसली.
इथे शिकायला मिळालं तर, ती मनातच विचार करत होती.
******
रजनी 12 वीला सुध्दा फर्स्ट क्लास मधेच पास झाली होती.
 रात्री सगळे जेवायला बसले होते.
मग आता काय शिकायचंय.अजय
बाबा, मी ना ग्रॅज्युएशन करायचा विचार करत होते.
काय, अमर तिच्याकडे बघतच बसला.
हो, पण इथे नाही. मुंबईला शारदा ताईच कॉलेज किती मस्त आहे."
"तिकडे कुठे".अमर
"बाबा, प्लिज ना"
"बर ठीक आहे."
"मी बोलतो, सुरेश बरोबर  ठिक आहे.
चला जेवा आता."
********
सुरेशच्या ओळखीने रजनीच कॉलेज मध्ये ऍडमिशन झालं.
ती त्यांच्या घरी राहायला आली. तीच कॉलेज पण सुरू झालं.कॉलेज सकाळचं होत. तस तिने  लगेच तिथूनच जवळ असलेल्या एका टेलरिंग इन्स्टिटय़ूट ला ऍडमिशन केलं.  फी साठी तिने तिचे साठवलेले पैसे दिले.  1  वर्षाचा कोर्स होता.तिला बेसिक पासून शिकायचं होत. 
तिने विचार केला फॅशन चा कोर्स केला तरी शिवायला तर यायला हवं. फॅशन डिझायनिंग पुढच्या वर्षी करेन..
आता हे शिकते. तिने ही गोष्ट फक्त तिच्या आईला आणि नंदाला सांगितली होती.
"काकू, उद्यापासून माझा क्लास सुरू होतोय.  दुपारी 2 ते 4 ची वेळ आहे."
"ठीक आहे.नीट मन लावून शिक . आणि घरी सराव
करायला माझी मशिन आहेच".नंदा
बघता बघता एक वर्ष पूर्ण  झालं.ती एफ.वाय. बी.कॉम. पास झाली. त्याबरोबर तिचा टेलरिंगचा कोर्स पण झाला
तिच्या टेलरिंग च्या मॅम ने तिला तिथे  शनिवार आणि रविवारच्या दिवशी शिकवण्यासाठी विचारले.
कारण ती पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट खूप मन लावून शिकत होती.
तिने विचार करायला थोडा वेळ मागितला.
त्याच दिवशी विरेन घरी आला होता. त्याची मुंबईत बदली झाली होती.
घरात शिरताच तिला त्याच अस्तीत्व जाणवल होत.तिची नजर त्याला शोधत होती.
"रजनी ,जरा आत ये.माझं एक काम होत तुझ्याकडे , विरेन ने तिला आवाज दिला
ती आत गेली. त्याने पटकन दरवाजा बंद केला.
"दारं का लावलं?"
"तू कॉलेजला का जातेस.तुला तर पुढे शिकायचं नव्हतं ना.
"तू तुझं स्वप्न विसरलीस काय". तो रागावला होता.
"नाही विसरले,.म्हणत तिने तीच टेलरिंग च सर्टिफिकेट दाखवलं.त्यात पण फर्स्ट क्लास होता.
"हे कधी केलंस."
कॉलेज करत करत.हे पण केलं."
"पण कॉलेज का करतेस."
तू म्हणाला होतास ना पूर्ण कॉलेज कर.
"सेम टू यु बोलायच्या आधी.गावाला."
हे सेम टू यु आहे का अजून.मला का नाही सांगितलंस.'
"सरप्राईस होत. आता जाऊ का. आईला फोन करून दोन्ही रिझल्ट सांगायचे आहेत . काकूंना पण हे दाखवायचय.त्यांची मला खूप मदत झालीय."
म्हणत ती दार उघडून बाहेर आली.
"काकू, कुठे आहात."
"इकडे किचन मध्ये आहे."
तिने नंदा ला दोन्ही रिझल्ट दाखवले. आणि मॅम ची जॉब ची ऑफर पण सांगितली.
आज नन्दाने तिच्या आवडीचं जेवण बनवलं होत.
तिने शांतपणे जेवण केलं.नंतर  नंदाला सगळं आवरायला मदत केली .  आणि  शारदा च्या रूम मध्ये झोपायला गेली.
त्याने नेहमीसारख तिला गुड night मेसेज केला.
सकाळी तिने नंदा ला सांगितले की तिला घरी जायचय.
विरेन, तुझ ऑफिस कधी सुरू होणार आहे."
आई, मंगळवार पासून, का ग"
आज गुरुवार आहे, म्हणजे अजून चार दिवस बाकी आहेत.माझं एक काम करशील "
बोल ना आई, काय करायचंय"
रजनीला तिच्या घरी जायचय ."जरा घेऊन जाशील का."
"नेईन की. कधी जायचं , तिकीट काढायला लागेल ना"विरेन
"तिकीट कशाला,  आपली कार घेऊन जा. फक्त जरा हळू चालव."सुरेश
"काका,  मी जाईन बसने.  कशाला उगाच त्याला त्रास.आजच तर आला आहे." रजनी
अग, त्रास काय त्यात.सुरेश
हो ,ना. मला काही त्रास होणार नाही आपण आज रात्री निघुया  ठीक आहे. आई, मी जरा बाहेर जाऊन आलो ग
म्हणत बाहेर गेला.
********
क्रमशः
--मधुरा महेश
(कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा)