भरकटते रे मन तुझ्या दुराव्यातूनी
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी
दिस रातीचा प्रहर टाकला तु ओवाळूनी
आमच्यासाठी तु लपवलास तुझे दु:ख मनातले
तुझ्यामुळे रे सुखाचे दिस मला मिळाले
आमच्यासाठी तु लपवलास तुझे दु:ख मनातले
तुझ्यामुळे रे सुखाचे दिस मला मिळाले
थकलेल्या पावलांना केले दुर्लक्षित तु
कधी भासले न तुझ्या सावलीत मला अंतर
मुलगी असून तुझ्या नजरेत पाहिले मला मी स्वतंत्र
कधी भासले न तुझ्या सावलीत मला अंतर
मुलगी असून तुझ्या नजरेत पाहिले मला मी स्वतंत्र
तुला लागली जखम मला देते रे वेदना
माझ्या मनातलं साऱ्या तुझ्यापाशीच येत भावना
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी
माझ्या मनातलं साऱ्या तुझ्यापाशीच येत भावना
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी
तुझ्या खांद्यावरून जग सुंदरच भासायचे
तिथे वादळाचे ढग कधी न भेटायचे
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी
तिथे वादळाचे ढग कधी न भेटायचे
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी
जगण्यातल्या क्षणांना तेजामध्ये तु दिपवले
आज दूर तु जाताना भासते जग अंधारले
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी
आज दूर तु जाताना भासते जग अंधारले
नको जाऊ रे दूर बाबा आम्हाला सोडूनी