विराज आणि समीक्षा दोघे ही धावत पळत हॉस्पिटल मध्ये गेले . गुडघ्याचा त्रास जास्त वाढल्यामुळे प्रल्हाद रावांचा ऑपेरेशन त्वरित करायला सांगितलं होत डॉक्टरने . विराजने थोडीही उसंत न दाखवता त्यांचं ऑपेरेशन करून घेतलं आणि त्यांना घरी येईपर्यंत चांगले १५ दिवस गेले . ह्यात समीक्षा ने १५ दिवसासाठी वर्क फ्रॉम होम करून घेतलं होत . आता तिला त्यांची जाणीव होत होती . आपण बाहेर असतो तेव्हाच आणि घरात असताना बाबांची होणारी दगदग , वीरच्या पाठी मागे धावणे , त्यांच्या खेळण्याचा पसारा सगळं काही तिला दिसत होत . वयाच्या मानाने ते किती थकत असतील . हे आपल्याला कस समजलं नाही हा प्रश्न तिला पडला होता . ती रोज डब्बा घेऊन जायची तेव्हा प्रल्हाद राव वीरबद्दल विचारायचे. तिने त्यांना प्रॉमिस केलं होत कि उद्या येताना ती वीरला घेऊन येईल कारण त्याला सुद्धा आजोबांची खूप आठवण येत होती.
समीक्षाला त्यांचं असणे किती महत्वाचं आहे ह्याची जाणीव झाली होती एव्हाना आणि ती जाणीव अजून पक्की व्हायला अजून एक गोष्ट घडली होती . विराज घरी असताना त्याला पोस्टामधून एक पत्र आलं. जे खरं तर प्रल्हादरावांचा होत ज्यात त्यांनी आपलं घर विराजच्या नावाने, दागिने व बँक बॅलन्स सगळा समीक्षाच्या नावाने केला होता तर गावची जमिन वीरला दिली होती . विराज ला समजत नव्हतं बाबाना हे सगळं एवढ्यात बनवायची काय गरज होती त्यात अजून एक म्हणजे त्यांनी एका वृद्धाश्रमात जाण्यासाठी अर्ज केला होता ज्याचं अप्रूव्हल आलं होत ते तो हातात घेऊन रडू लागला तेवढ्यात समीक्षा देखील हॉस्पिटल मधून आली होती त्याला रडताना पाहून ती एकदम घाबरून जाऊन त्याच्या जवळ गेली .
"विराज काय झालं तू असा का रडतोस ?"
"हे बघ ."
असं म्हणून त्याने ते कागद तिच्या हातात दिले ते बघून ती सुद्धा शॉक्ड झाली .
"पण विराज त्यांना वृद्धाश्रमात का जायचं आहे .आपण तर काहीच कमी पडून देत नाहीत ."
"मला तरी काय ठाऊक , ते मला काहीच सांगत नाहीत आई गेल्यापासून एकदम शांत झालेत . काय दुखलं खुपलं काहीच बोलत नाहीत . आताही डॉक्टर बोलले तेव्हा समजलं कि त्यांना कधीपासून गुडघादुखीचा त्रास होता ते. आपण कधी त्यांना समजून नाही घेतलं ग कि आई गेल्यापासून ते सुद्धा एकटे पडले असतील ."
समीक्षा ला देखील पश्च्याताप झाला होता . बाबा विराज ला काहीच सांगत नव्हते आपण उगाच गैरसमज करून घेतला कि ते विराजला भडकवत आहेत . शी..! चुकलंच आपलं , माझ्यामुळे तर त्यांना इथून जावस वाटलं असावं का ? असं असेल तर मी असं कधीच होऊन देणार नाही . जेवढी बाबाना आमची गरज आहे तेवढीच आम्हला सुद्धा त्यांची गरज आहे ."
"विराज उद्या बाबाना आल्यावर विचारू आणि यापुढे रोज रात्री जेवण झाल्यावर आपण चौघेही न चुकता दिवसभरात काय झालं हे एकमेकांना सांगू ..सध्या हे पत्र तू त्यांना दाखवू नकोस ..त्यांचा एकटेपणा दूर झाला तर कदाचित ते असा विचार पण करणार नाहीत .."
"खरं आहे , समीक्षा तू समजावं त्यांना तुझं ते जास्त ऐकतात कारण आता ही बघ ना . माझ्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी त्यांनी तुझ्या नावावर केले .."
विराज ते डोकमेंट्स तिला दाखवत म्हणाला . तस तिच्या अश्रूंचा बांध फुटला . किती तरी वेळ ते दोघे ही बाबाना कस समजून घ्यायच आणि काय करायचं ह्याचा विचार करत होते .
दुसऱ्या दिवशी प्रल्हादराव घरी आले तेव्हा वीरने गळ्यात पडून त्यांचं स्वागत केलं . समीक्षा सुद्धा त्यांना काय हवं नको ते पाहत होते तर विराज तो पूर्ण दिवस त्यांच्याच जवळ पास होता .त्यांना हा बदल सुखावणारा होता . रात्री प्रॉपर्टी चे कागद दाखवून विराज ने त्यांना विचारलं,
"बाबा , हे काय तुम्ही आधीच का आमच्या नावावर केलं आम्ही कुठे काही मागितलं होत ?"
"अरे बाळांनो हे पिकल पान कधी गळेलं हे सांगू शकत नाही म्हणून जे तुमचं आहे तेच तुम्हाला दिल मी ."
ते हसत म्हणाले .
"बाबा , प्लीज असं नका बोलू , आणि तुम्ही माझ्या नावावर कश्याला करायचं मी तर तुमची .."
समीक्षा म्हणाली तस तिला थांबवत ते म्हणाले ..,
"मुलगी आहेस तू माझी. आता ही ह्याच्यापेक्षा जास्त धावपळ तू केलीस . त्याबदल्यात मी दिलेले काहीच नाही आणि आम्हा म्हाताऱ्यांना फक्त तुम्ही हवे असता ."
तस त्यांच्या पायाशी वाकून रडत ती म्हणाली ..,
"मग नाही ना जाणार आम्हांला सोडून , बाबा माफ करा मला मी तुमच्या बद्दल गैरसमज करून घेतला ."
"हो बाबा ..आई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडले असणार हे आम्ही विसरूनच गेलो होतो . यापुढे असं नाही होणार पण त्यासाठी आम्हाला एक संधी द्या .."
असं म्हणून विराज देखील त्यांच्या पायाशी बसून रडू लागला . तस प्रल्हाद रावांनी मान होकारात हलवून त्या दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि छोटा वीर पाठीमागून त्यांच्या गळ्यात पडला. शेवटी काय दोन्ही बाजूने जाणीव असेल तर नाती पक्की होतात.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा