Login

नात्यातील गोडवा - जाणीव भाग -2

कोणत्याही नात्यात जाणीव
पण तो प्रल्हादरावांच्या पाठीवर बसला असल्यामुळे उतरताना एक खेळणे त्याच्या पायाखाली आले आणि त्यावर घसरून तो पडला आणि हे अचानक झाल्यामुळे प्रल्हादरावांना काहीच करायला भेटलं नाही. पडल्यामुळे वीरचं रडणं देखील सुरु झाले आणि समोरील दृश्य पाहून समीक्षा खूप घाबरली. ह्या सगळ्यामुळे प्रल्हादराव देखील अजूनच घाबरले. समीक्षाने पुढे होऊन वीरला उचललं आणि त्याच्या डोक्याला हळद लावली. त्याची रडारड चालू झाल्यामुळे प्रल्हाद रावांना अपराधी वाटल, तर समीक्षा ला उशीर झाला म्हणून विराज भडकला; पण ह्यात समीक्षा ला वाटलं की ती उशिरा आल्याचं बाबानी सांगितल्यामुळे तो रागावला. एकंदरीत सगळ्यांचा गैरसमज झाला आणि सगळंच वातावरण दूषित झालं. जेवण तयार होतं. समीक्षा ने वीर ला झोपवलं आणि ती प्रल्हाद रावांच्या जवळ गेली आणि तिच्या मनातील सगळंच तिने बाहेर काढलं.

"मी एवढं सांभाळतो तरी कस काय घडलं हे."

प्रल्हादराव त्याच विचारत होते की विराज ने जेवायला आवाज दिला.

"बाबा, जेवायला या..."

तस ते जेवायला गेले; पण सगळेच शांत होते. त्यांना वीर झोपला का हे विचारायचं होत; पण त्यांनी ते काही विचारलं नाही आणि खाल मान घालून ते जेवले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले. पडल्या पडल्या ते ह्या सगळ्याचा विचार करत होते. त्यांची पत्नी नेहमी म्हणायची की काही गोष्टी वेळेवर स्पष्ट केलेय बऱ्या, नाहीतर गढूळपणा गैरसमजुतीमधून अजूनच वाढू लागतो.



त्यांना जेवण जास्त गेलच नाही समीक्षा च्या मनात एवढं साचलं असेल असं त्यांना वाटलंच नव्हतं . एवढी काळजी घेऊन हि शेवटच्या क्षणी असं काहीतरी झालं . वीर पडला त्याच मला हि वाईट वाटलं ना पण समीक्षा हे असं काय धरून बसली आहे त्यांना समजत नव्हतं .

ते एकदम कमी जेवले नेहमीपेक्षा हे समीक्षा च्या लक्षात आलं त्यामुळे तिला देखील वाईट वाटलं .आपण जास्त बोललो का हे तिच्या मानत येऊन गेलं .पण तिची सुद्धा दगदग व्हायची त्यामुळे चिडचिड होणे स्वाभाविक होत .

समीक्षाच सगळं आवरल्यावर ती गोळ्या घेऊन त्यांच्या रूम मध्ये गेली . तेव्हा प्रल्हादराव आपल्याच विचारात गुंग होते . ती त्यांच्या जवळ बसली .त्यांच्या हातात तिने गोळी आणि पाण्याचा ग्लास दिला .

"बाबा , सॉरी मी जास्तच बोली तुम्हाला ..पण तुम्ही देखील माळ समजून घ्या ना थोडं . मी पण टाकूनच येते त्यात मला घरात वाद नको असतात पण काहीतरी घडत आणि चिडचिड होते . आता हि विराज माझ्या वर रागावलाय . मला ठाऊक आहे कि तुमची सुद्धा दगदग होते म्हणून तर बाई लावले ना कामासाठी आपण .पण तुम्ही देखील त्याला काही सांगत जाऊ नका .मुलगी म्हणता ना मला मग माझं एवढं एक .."

प्रल्हाद रावांनी गोळी घेतली आणि तिच्या कडे पाहून कातर स्वरात म्हंटल,

"पण समीक्षा तुला वाटलंच कस कि मी त्याला काही सांगेन ."

"तुमच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भाव होता बाबा त्यावरून ..पण जाऊदे, काळजी घ्या यापुढे. झोपा खूप रात्र झाले ..गुड नाईट "

असं म्हणून ती लाईट बंद करून त्यांच्या अंगावर टाकून गुड नाईट चालू करून निघून गेली सुद्धा .

आणि इकडे प्रल्हाद राव अजूनच विचारत गढून गेले .

समीक्षा चांगली आहे तशी मनाने. मला आजपर्यंत उलटून बोलली नव्हती पण गैरसमज झाला आहे तिचा विराज करेल दूर . नाती स्वच्छ असलेली बरी नाहीतर कालांतराने गंजतात .

आता तिचा गैरसमज दूर करू कि शांत राहू हेच मला समजत नाही ..अर्चना तू असतीस तर काय केलं असतस ग!.तू मला नेहमी म्हणायचीस ना मुलगा जवळ हवा असेल तर सुनेला जास्त जीव लावावा. ज्या क्षणी सून आपल्याला परकी होते आपला मुलगा आपोआप दुरावतो . तू तेच केलस म्हणून अजूनही तिला तू आठवतेस . तुझ्या शेवटच्या क्षणी देखील तिने खूप केलं तुझं जाणीव आहे ह्याची मला . आता ही बघ ना विराज ने नाही तर तिने मला गोळी दिली . सून चांगली असली तर म्हातारपण चांगलं जात. खर आहे तुझं . तिला समजून घेणे मला जमलं पाहिजे. पण खंत एवढीच ह्या लोकांना माझं बोलणे ऐकून घ्यायला जमत नाही. वेळच नसतो ना. मग हे अस भिंतीशी बोलायला लागत."

विष्णण हसत मनातच विचार करत ते पहाटे कधीतरी झोपी गेले .


दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच स्वतःच यावरून निघून गेले . अर्चना बाई गेल्यापासून त्यांना ते घर खायला उठायचं . कारण ते दोघे ही घरातून बाहेर गेल्यावर वीर देखील शाळेत जायचा. त्यानंतर त्याचे वेगवेगळे क्लास. त्याचा सुद्धा एकदम बिझी वेळापत्रक होता . ह्यात प्रल्हादराव एकटे पडायचे . त्यांच्याशी बोलायला घरात कोणच नसायचं एकदम घुसमटल्यासारखं झालं होत त्यांना . मन मोकळं करायला कोणच नसायचं . म्हणतारपणी जोडीदार का सोबत असावा हे त्यांना आता कुठे उमगत होत . छोटा वीर आला कि त्यांचा वेळ मस्त जायचा .


एव्हाना त्यांचं गुडघ्याच दुखणे देखील वाढलं होत . एक दिवस वीर ला शाळेतून सोडून घरी येत असताना ते चक्कर येऊन पडले . नशीब बाजूच्या काकांनी पाहिलं आणि त्यांना लगेच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं व लगोलग विराज ला देखील कळविण्यात आलं.



प्रल्हाद राव ठीक असतील का?
समीक्षा व विराज ला त्यांना समजून घेता येईल का?