पिकनिक भाग १५
पुन्हा एक वळण २
भारत चीन बरोबर युद्ध हरला होता त्यामुळे पाकिस्तानचे सर्वे सर्वा अयुब खान यांना वाटलं की आपण सहज हिंदुस्थान पादाक्रांत करू, म्हणून त्यांनी १९६५ मध्ये भारतावर हल्ला केला. अत्याधुनिक सामग्री मुळे सुरवातीला त्यांची सरशी झाली पण नंतर भारतीय सैन्याने त्यांना धूळ चारली. शेवटी गलीतगात्र पाकिस्तानने तहाची मागणी केली. बोलणी ताश्कंद मध्ये झाली. पण तिथे शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झाला.” – विशाल.
“बापरे, असं झालं? परदेशांमध्ये घटना घडल्या मुले, कोणाचा हात होता यामधे हे कळलं का?” – काका.
गाडीने आता गती पकडली होती. विशाल एक एक घटना जश्या घडल्या तश्या त्याला जेवढा तपशील माहीत होता, त्या नुसार रंगवून सांगत होता. भविष्य ऐकायला कोणाला आवडत नाही? त्यामुळे सगळेच अगदी लक्षपूर्वक ऐकायचे. मधून मधून विदिशा सुद्धा भर घालायची. एकएक प्रसंग वर्णन करायला ३-४ दिवस लागायचे. कारण मधे मधे प्रश्नोत्तरे पण व्हायची.
विशाल घटना कश्या घडल्या हे सांगत होता. इंदिरा गांधी पंत प्रधान झाल्यावर कॉंग्रेस फुटली, १९७१ सालाचं भारत पाकिस्तान युद्ध आणि बांग्लादेश ची निर्मिती. यामधे तर १५-२० दिवस गेले. मग आली इमर्जनसी त्यावर सुद्धा बरीच प्रश्नोत्तरे झाली. सर्वांनाच खूप कुतूहल होतं. मग जनता पार्टीचं केवळ २ वर्ष चाललेलं सरकार, पुन्हा इंदिरा गांधी, यावर सुद्धा आठ दिवस गेलेत.
मग ऑप्रेशन ब्ल्यू स्टार आणि इंदिरा गांधींचा खून, या घटनेने सर्वांनाच स्तंभित केलं. भारतात असंही घडू शकतं यावर कोणाचा विश्वास बसेना. पण सगळे आता गंभीर झाले होते. राजकारणाचा प्रवास कुठल्या दिशेने जाणार आहे याचा विचार करवत नव्हतं.
मग अटल बिहारी बाजपेयी यांचं सरकार. त्यांच्या कार्य काळात केलेला अणुस्फोट आणि त्यावर अमेरिकेने लादलेली बंधने. गुजरात मधील दंगे, मोदींचा उदय आणि नंतरचं मनमोहनसिंग यांचं सरकार. वेगवेगळ्या काळात घडलेल्या गोष्टी, त्या वेळेचं सामाजिक वातावरण, एकूणच राजकीय परिस्थिती त्यावरचे प्रश्न आणि विशालची उत्तरे यात बराच काळ गेला.
विशाल आणि विदिशा आता मोठ्या कुटुंबात सामावून गेले होते. त्यांच्या लग्नाचा विषय जो पर्यन्त ते म्हणत नाहीत, तो पर्यन्त काढायचा नाही असं काकांनी सांगून टाकलं होतं.
विशाल जात्याच कुशाग्र बुद्धीचा होता, त्यामुळे तो झपाट्याने वैद्यकी चे पाठ गिरवत होता. रोज सकाळी काका त्याचा थियरी चा क्लास घ्यायचे. एक दिवस सकाळी, काका अंगणात गादीवर बसले होते. विशाल वही आणि पेन घेऊन समोर बसला.
"विशाल, हे लक्षात ठेव, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.” काका पुढे म्हणाले, “आयुर्वेदाचा पाया म्हणजे त्रिदोष—वात, पित्त आणि कफ. आपण ‘दोष’ म्हणतो तेव्हा लोकांना वाटतं काहीतरी उणीव आहे. पण आयुर्वेदात दोष म्हणजे शरीराचे मूलभूत गुणधर्म, प्रॉपर्टीज. निरोगी शरीरात हे तिघं संतुलनात असतात."
"म्हणजे या दोषांमधलं संतुलन बिघडलं तर आजाराला आमंत्रण?" – विशाल.
"हो. उदाहरणार्थ, वात वाढला तर धाप लागते, शरीर कोरडं पडतं, बेचैनी येते. पित्त वाढलं तर आम्लपित्त, भूक मंदावते, राग जास्त होतो. कफ वाढला तर शरीर जड होतं, सुस्ती येते, कफ साचतो, सूज येते. असं असंतुलन ओळखणं म्हणजेच निदानाचं मूळ आहे." काकांनी सविस्तर सांगितलं.
"हे असंतुलन कसं कळतं? फक्त रुग्णाच्या बोलण्यातून का?" – विशाल.
"नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाडी परीक्षा. रुग्णाची नाडी तपासून आपण समजू शकतो—वात वाढलाय का, पित्त चढलंय का, कफ जड झालाय का. पण ही परीक्षा सोपी नाही. नाडी सामान्य चालली आहे का, वेग वाढलाय का, मंदावली आहे का, उडते आहे का, मधेच थांबते का—या सगळ्या बारीकसारीक गोष्टी पाहाव्या लागतात." – काका
"पण एकच दोष नाही, दोन-तीनही बिघडलेले असतील तर?" – विशाल.
"बरोबर. कधी फक्त वात, कधी वात-पित्त, कधी तिन्ही. आणि त्यावरून विकारही वेगळे दिसतात. म्हणून निदान करण्यापूर्वी नाडीचा नीट अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. चुकीचं निदान म्हणजे चुकीचं औषध. आणि चुकीचे उपचार म्हणजे विकार बळावण्याची शक्यता." – काका.
“पण मग निदान अचूक आहे हे कसं समजणार?” विशालचा बेसिक प्रश्न.
"नाडी परीक्षा ही सुरुवात. त्यानंतर रुग्णाला प्रश्न विचारायचे, लक्षणं तपासायची. मगच पक्क निदान करायचं. उदाहरणार्थ, जुना विकार असेल तर नाडीही वेगळी दिसते—कधी ठोका चुकतो, कधी उडी मारते, कधी मंदावते." – काका.
"समजलं काका. पण हे खूप अवघड आहे.” – विशाल.
काका हसले आणि म्हणाले, “बरोबर. आणि म्हणूनच तिच्यावर वर्षानुवर्षे साधना करावी लागते. विशाल, आयुर्वेद हा रामबाण आहे पण त्यासाठी रामा सारखी साधना करावी लागते तेंव्हाच विकारांवर अचूक बाण मारता येतो. यासाठी नुसतेच कष्ट नाही, तर भरपूर चिकाटी पण लागते."
“हो काका. मला आता इंट्रेस्ट यायला लागला आहे. मी हातचं काहीही न राखता प्रयत्न करेन” – विशाल.
"हे ऐकून आनंद वाटला. आता तू रोज सकाळी आमच्यासोबत बस. प्रत्येक रुग्णाची नाडी तपास, अंदाज वहीत लिहून ठेव. मग दुपारी आपण चर्चा करू. असं केलंस तर हळूहळू तुला दोष ओळखता येतील."
विशालच्या डोळ्यात चमक आली. आता त्याच्या शिकण्यात एक नवा टप्पा सुरू झाला होता.
विशालचं ट्रेनिंग चालू झालं होतं आणि त्यात विशालने पूर्णपणे स्वत:ला झोकून दिलं होतं. काका त्यांची प्रगती पाहून खुश होते. दिवस भराभर जात होते. विशालचं ज्ञान वाढत होतं. बघता बघता डिसेंबर उजाडला.
“आणि एक दिवस बातमी आली की गोवा मुक्ती संग्राम ने जोर पकडला आहे, RSS, कम्यूनिस्ट, समाजवादी, सर्व एकोप्याने आंदोलनात सहभागी झाले आहेत. मग बातमी आली की भारतीय सैन्य गोव्यात घुसलं आहे आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ डिसेंबरला गोवा दमण आणि दिव मुक्त झाले. त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात सामील केल्या गेलं आहे.
विशालची दुसरी भविष्य वाणी खरी ठरली होती. त्या दिवशी घरात आनंदोत्सव साजरा झाला. आता विशाल आणि विदिशाच्या लग्नाची मागणी जोर धरू लागली होती.
“अरे विशाल, हे सांगत होते की तुझी वैद्यकीतली प्रगती खूप चांगली आहे. मग आता लग्न करायला काय अडचण आहे?” – काकू.
“काकू, चार पैसे मिळवून दोन पैसे गाठीला लागल्या शिवाय कसं लग्न करणार? संसार वाढल्यावर जबाबदाऱ्या येतील, त्या कश्या पेलणार?” – विशाल.
“अरे तुम्ही काय वाऱ्यावर पडला आहात का? आम्ही कशाला आहोत? ते काही नाही, आता तुम्ही विचार कराच. किती दिवस असे राहणार?” – काकू.
हा विषय अधून मधून निघत राहिला. विशालचं शिक्षण चालूच होतं. एक दिवस दुपारी विशाल रघुनाथ बरोबर काही वनस्पती आणि मुळया आणायला जंगलात गेले. रघुनाथने विशालला भृंगराजची वेल दाखवली.
“ही झुडुपं बघ, पानं इथे, मुळं इथे. काढून घे.” – रघुनाथ
विशाल झुडुपाजवळ गेला. सूर्य कलला होता, हलका वारा सुटला होता. जंगलातल्या सावल्या लयबद्ध हलत होत्या. अचानक त्या झुडपाजवळ एक विचित्र गारवा जाणवला. विशाल पानं तोडायला पुढे वाकला आणि…
“विशाल!” – रघुनाथच्या तोंडून किंकाळीच फुटली.
त्याच्या डोळ्यासमोर एकदम धूसर धूर पसरला. क्षणभरासाठी विशाल जणू पाण्यातील प्रतिबिंबासारखा डळमळला, शरीराचा आकार धूसर झाला आणि क्षणात नाहीसा झाला.
रघुनाथच्या हातून टोपली खाली पडली. त्याचा आवाज कापत होता, त्याने वेड्यासारख्या हाका मारल्या. दगडावर पाऊल आपटून ओरडला. जंगल दुमदुमलं, पण प्रतिसाद नाही. फक्त पक्ष्यांचा आवाज आणि पानांचा सळसळाट.
रघुनाथ घामाने ओला झाला. छातीत धडधड वाढली. त्याच्या पायाखालची जमीन निसटल्यासारखी वाटली. “हे मी काय पाहिलं? देवाला सुद्धा शपथ घालीन… माझ्यासमोरच तो विरघळला.”
तो बराच वेळ वेड्यासारखा इथे तिथे शोधत राहिला. हातातल्या मातीचा सुगंध घेतला, पाऊलखुणा तपासल्या, पण काहीच नाही. जणू विशाल कधी अस्तित्वातच नव्हता.
रघुनाथ धडपडत घरी परतला. अंगावरचा घाम ओघळत होता, श्वास फुलला होता.
काकूंनी दार उघडलं आणि त्यांचा चेहरा एकदम बदलला.
“अरे काय झालं? चेहरा एवढा पांढरा फटक का पडला? विशाल कुठे आहे?” – काकू.
रघुनाथ काही बोलायच्या बेतात होता, पण ओठातून शब्द बाहेरच येईना. अखेर कष्टाने दोन शब्द फुटले—
“विशाल… नाही आला.”
“नाही आला? म्हणजे काय?” – काकूंचा आवाज कंप पावत होता.
घरातल्या सगळ्यांचे कान उभे राहिले.
रघुनाथने थरथरत्या आवाजात सांगितलं,
“मी त्याला भृंगराजची वेल दाखवली. तो पानं तोडायला वाकला… आणि माझ्या डोळ्यासमोरच… धूर झाला… अदृश्य झाला! मी किती हाका मारल्या, पण तो… तो दिसलाच नाही.”
क्षणभर घरभर शांतता पसरली. भिंती जणू कान देऊन ऐकत होत्या.
“नाही! असं कसं होऊ शकतं?” – काकूंच्या डोळ्यात पाणी तरळलं.
काका खुर्चीचे हात घट्ट पकडून बसले. त्यांच्या डोळ्यात अविश्वास आणि धक्का होता.
पण सर्वात भयंकर क्षण होता— विदिशाच्या डोळ्यांतली भीती.
ती उभीच राहिली जणू दगड झाली. ओठ थरथरत होते, पण आवाज फुटत नव्हता. काही क्षणांनी तिच्या तोंडून फुटलं—
“विशाल… नाहीसा?”
ती जोरात किंचाळली आणि जमिनीवर कोसळली. काकूंनी तिला कवेत घेतलं, पण तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबत नव्हते.
घरभर आक्रोश दुमदुमला.
त्या क्षणी सर्वांना जाणवलं—
ज्याला त्यांनी आपल्या कुटुंबात सामावून घेतलं होतं, जो विदिशाच्या आयुष्याचा आधार बनला होता… तो अचानक त्यांच्या हातातून निसटला होता.
दोन दिवस गेले. घरातल्या लोकांचे डोळे सुजले होते. पण बाहेरचं जग शांत होतं, शेजाऱ्यांना कुतूहल वाटू लागलं.
एक दिवस दुपारी शेजारची काकू आल्या.
“अहो, हे काय? इतकं उदास वातावरण?… आणि विशाल दिसतच नाही? कुठे गेला तो?”
क्रमश:----
पुढचा भाग – विदिशा

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा